Expert Speak Raisina Debates
Published on May 24, 2024 Updated 0 Hours ago

धर्मादाय संस्थांची आर्थिक क्षमता ही सरकारच्या पलीकडची असते. म्हणूनच, सरकारने अशी स्थिती निर्माण करायला हवी, ज्यामुळे खासगी क्षेत्राला शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्याकरता प्रभावीपणे निधी उपलब्ध होऊ शकेल.

धर्मादाय पैशांचा विकास वित्त म्हणून वापर हा आजचा नवा मंत्र

जागतिक विकास प्रशासन आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे ही जागतिक विकास प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ असल्याने, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यातील मूळ आव्हान कमी वित्तपुरवठा होण्यात आहे. उद्दिष्टे आणि उपलब्ध निधी या दोहोंतील तफावत जास्त असून ती कमी करणे कठीण आहे. ही समस्या नवीन नाही. ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट’च्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार, शाश्वत विकास उद्दिष्टे निश्चित करण्यापूर्वी, विकसनशील जगाकरता वार्षिक गुंतवणुकीतील तफावत २.५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी होती. २०२३ मध्ये मध्यावधीत करण्यात आलेल्या पुनरावलोकनादरम्यान हा आकडा ४-४.३ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढल्याचे आढळून आले. २०१५ पासून अंतरिम कालावधीतील तूट, अनेक जागतिक स्तरावरील आव्हाने यांमुळे निर्माण झालेल्या वाढत्या मागणीमुळे प्रामुख्याने ही दरी वाढली. यामध्ये कोविड-१९ची साथ आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे वाढलेल्या अन्न, इंधन आणि आर्थिक संकटांचा समावेश आहे.

सकृतदर्शनी, ४-४.३ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या वार्षिक वित्तपुरवठ्याची तफावत खूप मोठी वाटू शकते, परंतु ही दरी भरून काढण्याकरता जगाकडे संसाधनांची कमतरता आहे का? या संदर्भात आकडेवारी सर्व शंकांचे समाधान करेल. जगभरात, २०२२ च्या अखेरीस एकूण निव्वळ खासगी संपत्ती अधिक अमाप- ४५४.४ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. २०२७च्या अखेरीस, ती ३८ टक्क्यांनी वाढून ६२९ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. म्हणून, २०३० सालापर्यंत वार्षिक शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वित्तपुरवठ्याची तफावत भरून काढताना खासगी संपत्तीच्या १ टक्क्यांपेक्षाही कमी वितरण होणे आवश्यक ठरते. येथे धर्मादाय संस्था भूमिका बजावू शकतात: अपूर्ण विकासात्मक वित्त उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी खासगी संपत्तीचे घटक एकत्रित करता येतील.

रूंदावणारी दरी मुख्यत्वे २०१५ पासून अंतरिम कालावधीतील तुटीमुळे आहे, जी असंख्य जागतिक आव्हानांमुळे वाढणाऱ्या मागण्यांमुळे रूंदावली आहे.

धर्मादाय संस्था या वित्तपुरवठा चक्रातील अशी एक तुळई आहे, जी केवळ संसाधने एकत्रित करू शकत नाही तर त्यांच्या स्वत:च्या क्षमतेत विकासाची पाईक म्हणून काम करू शकते. पारंपरिक गुंतवणूक योजना आहेत, ज्यांचे उद्दिष्ट जास्तीत जास्त परतावा मिळवणे हे आहे, ज्या कदाचित मोठ्या जागतिक स्तरावरील चांगल्या गोष्टी पूर्ण करू शकतात अथवा करू शकत नाहीत. काही गुंतवणुका सकारात्मक सामाजिक प्रभाव आणि परिणाम साधण्याच्या उद्देशाने केल्या जातात. इथेच 'प्रभाव गुंतवणूक' किंवा 'सामाजिक प्रभाव गुंतवणूक' महत्त्वाची ठरते.

शाश्वत विकासासाठी धर्मादाय आणि प्रभावी ठरणारी गुंतवणूक

धर्मादाय आणि प्रभावी ठरणाऱ्या गुंतवणुकीमधील सीमा किंचित अस्पष्ट आहेत, मात्र, दोहोंमध्ये फरक आहे. आंतरराष्ट्रीय विकास आणि सहकार क्षेत्राच्या संदर्भात, खासगी धर्मादाय संस्था ज्याला खासगी अथवा ना-नफा तत्त्वावरील क्षेत्रांद्वारे सुरू करण्यात आलेल्या व्यवहारांचा संदर्भ आहे. ज्यांचे उद्दिष्ट संशोधन, शिक्षण आणि विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी धर्मादाय योगदानासाठी संस्थांनी दिलेला समर्पित निधी आहे.   धर्मादाय संस्था सहसा परताव्यावर लक्ष केंद्रित करत नाही आणि मानवतेची सेवा या दृढनिश्चयाशी आणि सेवेच्या खोलवर भावनेशी त्या अधिक जोडल्या गेलेल्या असतात. ‘आर्थिक सहकार्य आणि विकास संघटने’द्वारे प्रसिद्ध केलेल्या खासगी धर्मादायासंबंधातील २०२३ च्या अहवालानुसार, २०२० मध्ये खासगी धर्मादाय संस्थांद्वारे सुमारे ९.६ अब्ज अमेरिकी डॉलर्स निधी जमा केला गेला (आकृती १).

आकृती १: विकासासाठी खासगी धर्मादाय निधी प्रवाह (२००९-२०२१)

स्रोत: आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना, २०२३

या वित्ताचे प्रादेशिक वितरण पाहिल्यास, असे दिसून येते की, आफ्रिका आणि आशियातील देशांना सर्वाधिक- म्हणजेच अनुक्रमे ६१ टक्के आणि २९ टक्के धर्मादाय वित्त प्राप्त झाले, (आकृती २).

आकृती २: खासगी धर्मादाय वित्त प्रवाहाच्या प्रादेशिक वितरणाची (२०१८-२०२०) सरासरी

स्रोत: आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना, २०२३

चित्र ३: खासगी धर्मादाय वित्ताचे क्षेत्रनिहाय वितरण (२०१८-२०२०) सरासरी

स्रोत: आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना,२०२३

उदाहरणार्थ, ‘ग्लोबल फिलान्थ्रोपी ट्रॅकर’ २०२३ नुसार, यांत समाविष्ट करण्यात आलेल्या ४७ देशांनी धर्मादाय निधी म्हणून ७० अब्ज अमेरिकी डॉलर्सचे योगदान दिले आणि चारही- फिलान्थ्रोपिक आउटफ्लो, ओडीए, इंडिव्हिज्युअल रेमिटन्स आणि खासगी भांडवली गुंतवणुकीला एकत्रित करत विविध देशांत ८४१ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे सुलभ संसाधनाचे वितरण केले. तरीही, धर्मादाय संस्थांनी दिलेला निधी हा काही विशिष्ट क्षेत्रांसाठी किंवा प्रकल्पांसाठी राखून ठेवलेला असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याने ७० अब्ज अमेरिकी डॉलर्स क्षेत्रानुसार पाहिला तर असे दिसून येते की, आरोग्य (शाश्वत विकास उद्दिष्टे ३) आणि नागरी समाज (शाश्वत विकास उद्दिष्टे  १७) यांना सर्वाधिक निधी मिळाला आहे, तो अनुक्रमे ५६ टक्के आणि १० टक्के इतका आहे (आकृती ३). यांतून धर्मादाय संस्थांनी विशिष्ट प्रकल्पांना समर्थन देण्यापासून व्यापक शाश्वततेच्या कथनाकडे अखंडितपणे सामान्यत: पाठिंबा देण्याची गरज प्रतिबिंबित होते. मात्र, धर्मादाय योगदान खरोखर मोठ्या समाजाच्या फायद्यासाठी चांगले कार्य करण्याच्या निःस्वार्थ कृतीचे प्रतिनिधित्व करते का? किंबहुना, कोणतीही अप्रिय अट नसलेल्या मदतीचा दृष्टिकोन आणि अधिक विश्वास-आधारित धर्मादायाकडे वळणे याबाबत बराच गोंधळ निर्माण झाला आहे- व्हिटमन इन्स्टिट्यूटने २०१४ मध्ये या शब्दाचा अर्थ- ‘देण्यामागचा दृष्टिकोन आहे, तो अंतर्निहित निधी पुरवठा करणारे, ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्था आणि ते सेवा देत असलेले समुदाय यांच्यामधील शक्तीचा असमतोल आहे. […] व्यावहारिक स्तरावर, यामध्ये अनेक वर्षांकरता अमर्यादित देणे, सुव्यवस्थित वापर आणि अहवाल यांचा समावेश आहे’ तज्ज्ञांनी लवचिक वित्तपुरवठ्याच्या आवश्यकतेकडे लक्ष वेधले आहे.

खरोखरच, विकासाचे कमाल परिणाम साध्य करण्यासाठी सरकारने आणि बहुपक्षीयांनी धोरणात्मक चर्चांमध्ये धर्मादाय संस्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. या अर्थाने, परिणाम साधणाऱ्या गुंतवणुका वेगवेगळ्या असतात. तुलनेने नवीन संकल्पना म्हणून, जरी ही गुंतवणूक सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभावांना चालना देण्याच्या उद्देशाने कार्यक्षमतेवर आधारित असली तरी, नफा, उत्तरदायित्व आणि परिणामकारकता यांचे मोजमाप करणारा पैलू यात समाविष्ट आहे.

प्रयोगशील धर्मादायाकडे विकास वित्त म्हणून का पाहिले जाते?

धर्मादायामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी खासगी संस्थांची आणि ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांची सकारात्मक वित्तपुरवठा करण्याबाबत अनुकूल क्षमता आहे. त्यांची मुळे एकूणच सामाजिक चांगले करण्याच्या नीतिमत्तेवर आधारित असल्यामुळे, धर्मादायाकरता विशिष्ट उद्दिष्टे, लक्ष्ये आणि प्रकल्पांसाठी अनुदान निधीची गतिशीलता शोधता येईल. अलिकडच्या वर्षांत केवळ लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठीच नव्हे तर क्षेत्राकरता सामान्य समर्थन देण्याकरताही लवचिक वित्तपुरवठा करण्याकडे बदल झालेला दिसून आला आहे. कमी प्रमाणात असला तरी, लवचिक पद्धतीने करण्यात येणारा वित्तपुरवठा धर्मादाय संस्थांत वाढत आहे. उदाहरणार्थ, २०१६-२०१९ दरम्यान त्यांच्या एकूण देणग्यांपैकी सुमारे १६ टक्के देणग्या समाजाच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्याकडे वळवण्यात आल्या होत्या. तसेच, २० मोठ्या आंतरराष्ट्रीय धर्मादाय देणगीदारांकडून मिळालेल्या ऐतिहासिक डेटाच्या आधारे, ‘आर्थिक सहकार्य आणि विकास संघटने’च्या अहवालात अधिक लवचिक देणग्या देण्याकडे अलीकडे कल वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या देणग्या, २०२१ मध्ये वर्षभरात देण्यात आलेल्या देणग्यांच्या सरासरी २० टक्क्यांवर पोहोचला आहे. आकृती ३ मध्ये २०२१ मध्ये आयोजित केलेल्या आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या अभ्यासात, लवचिक वित्तपुरवठ्याची स्थिती दिसून येते. निवडलेल्या ६४,९४८ अनुदानांपैकी अथवा प्रकल्पांपैकी, केवळ १०,११७- ज्यांची किंमत ६.८ अब्ज अमेरिकी डॉलर्स आणि १६ टक्के आहे, त्यांचा विशिष्ट हेतू स्पष्ट झालेला नाही किंवा त्यांचे वितरण सामान्य हेतूंसाठी होते. दुसरीकडे, विशिष्ट प्रकल्पांकरता अथवा कार्यक्रमांकरता ३० अब्ज अमेरिकी डॉलर्सचे वितरण करण्यात आले. सुमारे १६ टक्के अनुदान किंवा प्रकल्प हे सर्वसाधारण अर्थसंकल्पीय समर्थन म्हणून दिले जाते, या लवचिकपणे दिल्या गेलेल्या देणग्या एकूण देणग्यांच्या १९ टक्के आहेत.

अनेक धर्मादाय संस्था, सार्वजनिक वापराकरता ज्ञाननिर्मिती करण्यासाठी सरकार, व्यवसाय, संबंधित विषयातील तज्ज्ञ आणि नागरी समाज यांच्यासोबत काम करतात आणि त्यांच्या निधीचा व्यवस्थिती आणि वेगवेगळ्या वापरासाठी उपयोग करण्यासाठी धोरणात्मक अंतर्दृष्टी वापरली जाते.

हे पुन्हा सांगण्याची गरज नाही की, थेट वित्तपुरवठा करण्याव्यतिरिक्त, धर्मादाय निधीमुळे भागीदारी वाढते, ज्याद्वारे अतिरिक्त संसाधने आणि कौशल्ये प्राप्त होण्यास मदत होते. अनेक धर्मादाय संस्था, सार्वजनिक वापराकरता ज्ञाननिर्मिती करण्यासाठी सरकार, व्यवसाय, संबंधित विषयातील तज्ज्ञ आणि नागरी समाज यांच्यासोबत काम करतात आणि त्यांच्या निधीचा स्थिती आणि वेगवेगळ्या वापरासाठी उपयोग करण्यासाठी धोरणात्मक अंतर्दृष्टी वापरली जाते. क्षमता निर्मिती आणि युक्तिवादावरही याचा परिणाम जाणवतो. युक्तिवादाच्या प्रयत्नांना धर्मादाय निधीचे मिळणारे समर्थन हेदेखील सुनिश्चित करते की, महत्त्वाच्या समस्या जागतिक अजेंडावर राहतील, धोरणांवर प्रभाव टाकतील आणि सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांकडून पुढील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.

आकृती ३: विकासासाठी खासगी धर्मादाय निधीतील लवचिक वित्तपुरवठ्याची स्थिती (२०१६-२०१९)

स्रोत: आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना,२०२४

मात्र, आव्हाने कायम आहेत. धर्मादाय प्रतिष्ठान आणि लाभार्थी/अनुदान देणारे यांच्यातील हितसंबंधांचे चुकीचे जोडले जाणे, संस्थांद्वारे अनुदान देणाऱ्यांची निवड करण्याचे निकष, विशिष्ट अर्थसहाय्यित अनुदानांची लोकप्रियता इत्यादी विकासासाठी वित्तपुरवठा करण्यात दृश्यमान अडथळा आणतात.

परताव्याचा आर्थिक दर विरोधी परताव्याचा सामाजिक दर

धर्मादाय संस्था आणि देणगीदारांकडे आवश्यक आर्थिक आणि जोखीम पत्करण्याची क्षमता असते, जी अनेकदा सरकारी आणि संस्थात्मक क्षमतांपेक्षा जास्त असते. हालचाल करण्यातील ही चपळता त्यांना नाविन्यपूर्ण शोध आणि अंमलबजावणी करण्याची मुभा देते, जी मोठ्या संस्थांद्वारे वाढवली जाऊ शकते आणि स्वीकारली जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, अशी क्षेत्रे आहेत, जिथे बहुपक्षीय संस्था आणि विकास वित्तीय संस्था अनेकदा त्यांचा निधी देण्याबाबत सावध असतात. हे मुख्यत्वे हवामान बदल रोखण्यासाठीच्या वित्तपुरवठ्याच्या बाबतीत घडले आहे, ज्याला विकास वित्त संस्था आणि नाणे वित्त संस्थांच्या विकास व हवामान वित्तपुरवठा विषयक आराखड्यात सावत्र वागणूक मिळाली आहे, कारण ते सहसा गुंतवणुकीवर एकाच वेळी परतावा न देता ‘सार्वजनिक सेवावस्तू’ तयार करतात. अल्पावधीत परताव्याचा सूक्ष्म अथवा कमी आर्थिक दर असूनही, अशा प्रकल्पांमुळे दीर्घ कालावधीत उच्च सामाजिक परताव्याचा दर दिसून येतो. ही अशी काही क्षेत्रे आहेत, जिथे धर्मादायाला त्यांची आर्थिक क्षमता, जोखीम पत्करण्याची प्रवृत्ती आणि वाढती मागणी व विकास निधीचा कमी होत जाणारा पुरवठा यांच्यातील वाढत जाणारी तफावत भरून काढण्यासाठी मदत करावी लागते.

धर्मादाय संस्था आणि व्यक्तींकडे आवश्यक आर्थिक आणि जोखीम पत्करण्याची क्षमता असते, जी अनेकदा सरकारी आणि संस्थात्मक क्षमतांपेक्षा अधिक असते.

निष्कर्षाप्रत येताना: सरकारची भूमिका

हे महत्त्वाचे मुद्दे असताना, सरकारने मालमत्तेने-समृद्ध अशा खासगी क्षेत्राला धर्मादायात गुंतण्यासाठी सक्षम परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे आणि शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यासाठी निधी उपलब्ध होण्याकरता आर्थिक संसाधने वळवणे आवश्यक आहे. कर आकारणीत सवलत देऊन केवळ वित्तीय क्षेत्रात नवकल्पना आणणे पुरेसे नाही. धर्मादायाकरता अर्थव्यवस्थेत ये-जा करण्यासाठी सुलभ मानदंड, त्यांचे वित्त सुज्ञपणे हाताळण्यासाठी आणि वापरण्यासाठी सोपे नियम, त्यांच्या प्रयत्नांची पावती देऊन शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्षेत्रांमध्ये अनुकरणीय कामगिरीची दखल घेत त्यांचा गौरव करणे महत्त्वाचे ठरते. यांतून मिश्र स्वरूपाच्या वित्तीय क्षेत्रात उत्फुल्लता निर्माण करणारी उत्पादन विषयक नावीन्यपूर्णता आणण्यासही मदत होते, जिथे धर्मादाय पैसा वळवण्यासाठी एक सोपा मार्ग मिळू शकतो.


निलांजन घोष हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे संचालक आहेत.

स्वाती प्रभू या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Nilanjan Ghosh

Nilanjan Ghosh

Dr Nilanjan Ghosh is a Director at the Observer Research Foundation (ORF) in India, where he leads the Centre for New Economic Diplomacy (CNED) and ...

Read More +
Swati Prabhu

Swati Prabhu

Dr Swati Prabhu is Associate Fellow with the Centre for New Economic Diplomacy at the Observer Research Foundation. Her research explores the interlinkages between development ...

Read More +