Author : Kriti M. Shah

Published on Jan 30, 2024 Updated 0 Hours ago

दहशतवादच्या विरोधात सहकार्याची भावना न ठेवता राजनैतिक आणि जमिनीवरच्या संघर्षामध्ये कशाप्रकारे वाढ होऊ शकते याचे प्रमुख उदाहरण म्हणजे इराण-पाकिस्तान स्ट्राइक आहे.

इराण, पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा मोठा प्रश्न

इराण-पाकिस्तान यांच्यातील सततच्या भांडणामुळे आणि वाढत्या तणावामुळे पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेहरानने बलुचिस्तानमधील जैश अल-अदल या सुन्नी इस्लामी दहशतवादी गटाला लक्ष्य करणे आणि 48 तासांनंतर इस्लामाबादचा बदला यामुळे दोन शेजारी देशांमध्ये कदाचित मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो का? येत्या काही आठवड्यांत हे कसे घडेल याचे उत्तर या प्रदेशाच्या इतिहासात त्याचबरोबर प्रत्येक देशाद्वारे लक्ष्य करण्यात आलेल्या दहशतवादी गटांच्या विचारसरणीमध्ये पाहायला मिळणार आहे.

इराणने लक्ष्य केलेल्या जैश अल-अदल या गटाला इराणच्या सिस्तान-बलुचेस्तान प्रांताचे स्वातंत्र्य हवे आहे. शियाबहुल इराणमधील वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याक गट सुन्नी बलूच हे त्याचे सदस्य आहेत. माजी जुंदल्लाह गटाची एक शाखा ते इराणविरूद्ध अनेक गंभीर हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत. ज्यामध्ये अनेक वर्षांमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट तसेच माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्याविरुद्ध अपहरण,  हत्येच्या प्रयत्नांचा समावेश आहे. सर्वात अलीकडील हल्ला  ज्यासाठी इराणने प्रत्युत्तर दिले, त्यात पोलीस ठाण्यात 11 इराणी सुरक्षा कर्मचार्‍यांची हत्या करण्यात आली होती. 2007 च्या एका मुलाखतीत या गटाचा आता मारला गेलेला नेता अब्दोल्मालेक रिगी यांनी सांगितले की, त्यांचा गट बलुच लोकांच्या इराणमधील त्यांच्या राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अधिकारांच्या मान्यतेसह त्यांच्या हक्कांसाठी लढत आहे.

माजी जुंदल्लाह गटाची एक शाखा इराणविरूद्ध अनेक गंभीर हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत. ज्यात अनेक वर्षांमध्ये अनेक आत्मघाती बॉम्बस्फोट तसेच माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्याविरुद्ध अपहरण आणि हत्येच्या प्रयत्नांचा समावेश आहे.

इराणमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांमध्ये बलुच लिबरेशन फ्रंट (BLF) आणि बलूच लिबरेशन आर्मी (BLA) यांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानी राज्याकडून होणाऱ्या आर्थिक आणि संसाधनांच्या शोषणापासून बलुच लोकांचे संरक्षण करणे ही दोन्ही गटांची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. अरबी समुद्राला लागून असलेल्या बलुचिस्तानचे मोक्याचे स्थान, दक्षिण अफगाणिस्तान आणि पूर्व इराणकडे जाणारे व्यापारी मार्ग पाहता भूतकाळातील वेगवेगळ्या शासकांसाठी हा प्रदेश नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे. मग तो पर्शियन, अफगाण, शीख किंवा ब्रिटिश असो. 1947 पासून आणि तत्कालीन कलातचे राज्य (सध्याचे बलुचिस्तान) म्हटल्या जाणार्‍या पाकिस्तानचे विलयीकरण झाल्यापासून बलुच प्रतिकार राज्याविरुद्ध लढले आहे.  राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकार तसेच राजकीय स्वायत्ततेसह विविध मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत.

BLF च्या दोन गटांपैकी सर्वात जुना 1960 च्या उत्तरार्धापासून बलुच बंडखोरीमध्ये आघाडीवर आहे. दुसरीकडे बीएलए हा एक अधिक हिंसक आणि कट्टरपंथी गट आहे.  या गटाने लष्करी ताफ्यांवर आणि कर्मचार्‍यांवर हल्ले करून चिनी अभियंत्यांचे अपहरण करून, नागरिकांची हत्या देखील केली आहे. संसाधनांचा अधिक चांगला वाटा आणि अधिक स्वायत्ततेच्या मागणीसाठी पाकिस्तान सरकारविरुद्ध लढा सुद्धा या गटाने दिला आहे. 

वर्षानुवर्षे बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचे आर्थिक शोषण केले जात आहे.  जसे की खनिजे आणि हायड्रोकार्बन्स; राजकीय आणि लष्करी दडपशाही; स्वायत्ततेचा अभाव; अफगाणिस्तानमधील युनायटेड स्टेट्सच्या युद्धामुळे प्रांतात अतिरेक्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानमध्ये कट्टरपंथी इस्लामचा प्रचार करण्यासाठी तसेच बलुच फुटीरतावाद्यांना एकाकी पाडण्यासाठी लष्कर-ए-झांगवी सारख्या गटांचा वापर करण्यात आलेला असताना,  BLF आणि BLA सारखे गट समान सामायिक उद्दिष्टांसह सहकार्य आणि एकत्र काम करण्यासाठी ओळखले जातात. चीन-पाकिस्तान-इकॉनॉमिक-कॉरिडॉर (CPEC) आणि बलुचिस्तानमधील ग्वादर बंदरातील त्याच्या प्रमुख प्रकल्पाच्या विकासामुळे बलुच लोकांचे, स्थानिकांना त्याचा फायदा न घेता, त्यांच्या जमिनीचे दडपशाही आणि 'वसाहतीकरण' यामध्ये मोठी वाढ झाली आहे.

जैश अल-अदलचा पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये काही प्रकारचा ताबा असण्याची शक्यता आहे. तर बीएलएफ आणि बीएलएचाही सिस्तान-बलुचिस्तानमध्ये पाठिंबा असेल.

प्रदेशाचा इतिहास याबरोबरच गटांची विचारधारा पाहता, तेहरानमधील नेते जैश-अल-अदलच्या सदस्यांना आश्रय दिल्याबद्दल पाकिस्तानला कडक इशारे देऊ शकतात.  या प्रकरणावर पूर्णपणे बेफिकीर राहण्याचे ढोंग देखील करू शकतात, दोन्ही देशांची शंका कदाचित वैध असू शकते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास जैश अल-अदलचा पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये काही प्रकारचा ताबा आहे. तर बीएलएफ आणि बीएलएचाही सिस्तान-बलुचिस्तानमध्ये पाठिंबा असेल. या प्रदेशातील बलुच लोक आणि जमाती दोन्ही देशांच्या सीमेवरून विभागल्या जाऊ शकतात. इराण आणि पाकिस्तानची चिंता तर आहेच परंतु दोन्ही बाजूंच्या लोकांमधील वस्तूंची दैनंदिन देवाणघेवाण तसेच खोलवर रुजलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक, वांशिक आणि धार्मिक संबंध ही बाब देखील महत्त्वाची  आहे.

जैश अल-अदल कदाचित इराणच्या वांशिक आणि धार्मिक भेदभाव आणि छळाच्या विरोधात लढू शकेल. तर बीएलए आणि बीएलएफ त्यांच्या भूमीचे आर्थिक शोषण आणि प्रांतीय स्वायत्ततेच्या अभावासाठी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध युद्ध सुरू ठेवू शकतात; परंतु गट त्यांच्या देशांवर विश्वास ठेवण्यापेक्षा एकमेकांशी अधिक साम्य असण्याची शक्यता आहे.

त्यामुळे एकमेकांच्या देशात होणारे ‘लक्ष्यित अचूक स्ट्राइक’ हे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय दादागिरीशिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. इराण सध्या गाझामधील त्याच्या प्रॉक्सी गट हमाससह अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. तर पाकिस्तान त्याच्या अपंग अर्थव्यवस्था आणि अपयशी लोकशाहीसह लढा देत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जाण्यापूर्वी ताकदीचा दर्शनी भाग उभा करणे आवश्यक आहे. कोणत्याही राष्ट्राला दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाची गरज नाही किंवा त्यांना कमी तीव्रतेचा संघर्ष परवडणारा नाही. बलुच लोकांच्या समस्या आणि तक्रारी वास्तविक आहेत.  जैश अल-अदल, बीएलए आणि बीएलएफ सारखे गट त्यांचा आवाज वाढवण्यासाठी अत्यंत हिंसक आणि क्रूर मार्गांचा वापर करू शकतात, परंतु ते त्यांच्या निश्चित केलेल्या उद्दिष्ट समोर कुचकामी राहतील.

इराणने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करण्याची किंवा पाकिस्तानमधील इराणविरोधी घटकांना ठार मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर पाकिस्तानची मात्र ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानच्या कृतींनी भविष्यासाठी एक धोकादायक उदाहरण मांडले असताना, दहशतवादविरोधी सहकार्याची अनुपस्थिती राजनैतिक आणि जमिनीवरील संघर्षात कशी वाढू शकते याचे स्ट्राइक हे एक प्रमुख उदाहरण आहे.

गाझामधील हमास विरुद्ध इस्रायलचे युद्ध आणि लाल समुद्रातील हौथींच्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील संघर्ष धोकादायक टप्प्यात प्रवेश असल्याचे चित्र आहे. याबरोबरच जैश अल-अदल, बीएलए आणि बीएलएफ सारख्या स्थानिक तक्रारी असलेले गट हे अत्यंत प्रशंसनीय म्हणावे लागतील. सुन्नी आणि शिया किंवा इस्लाम आणि यहुदी धर्म यांच्यातील मोठ्या 'जागतिक जिहाद' प्रकल्पात आकर्षित करण्याचे प्रयत्न आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास गटांना युती बनवण्याची, बाजू घेण्याची आणि तालिबानसारख्या इतर आंतरराष्ट्रीय दहशतवादी किंवा कट्टरवादी वैचारिक गटांशी हातमिळवणी करण्याची संधी आहे. ज्यामुळे त्यांच्या संबंधित राष्ट्रांवर विनाश घडवून आणण्याची त्यांची उद्दिष्टे पुढे जाण्याची शक्यता आहे.

कृती एम. शाह ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामसह सहयोगी फेलो या पदावर होत्या.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.