Author : Clara Broekaert

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 24, 2025 Updated 1 Hours ago

जनरेटिव्ह एआयचा वापर दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर होत असताना, ईयूने त्यांच्या दहशतवादविरोधी धोरणात एआयचा समावेश केला आहे. परिणामी, नवोपक्रम, नियमन आणि नैतिक विचारांमध्ये संतुलन सुनिश्चित झाले आहे.

AI, EU आणि दहशतवादाविरूद्ध लढा

Image Source: Getty

हा लेख ‘रायसीना एडिट २०२५’ या मालिकेचा एक भाग आहे.


स्फोटकांचा वापर करून हल्ले करण्याच्या दृष्टिने माहिती गोळा करण्यासाठी लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) चा वाढता वापर, इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या मीडिया आउटलेटद्वारे एआय-व्युत्पन्न न्यूज बुलेटिनचा प्रसार आणि होलोकॉस्ट नाकारण्याचा प्रसार करण्यासाठी डिझाइन केलेले बेस्पोक चॅटबॉट्सची निर्मिती यामुळे दहशतवादी आणि इतर हिंसक घटकांच्या हातात असलेल्या जनरेटिव्ह एआयच्या विध्वंसक क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. जनरेटिव्ह एआयमुळे दहशतवादी भरती, ऑपरेशनल प्लॅनिंग आणि प्रचार प्रसाराचे ऑप्टिमायझेशन सुलभ झाले आहे. यात ऑटोमेटेड कंटेन्ट जनरेशन, एखाद्या कंटेन्टची जलद परंतू समाज विघातक भाषांतरे, रसायने किंवा बंदूकांचे ३ डी प्रिंटीग याबाबत माहिती उपलब्ध करून देणे या एआय क्षमतांचा वापर केला जात आहे. या बाबींचे प्रत्यक्ष परिणाम हा एक चर्चेचा विषय आहे. सध्या, जनरेटिव्ह एआयच्या वापरामुळे दहशतवादी घटकांची प्राणघातकता किंवा आकर्षण वाढवले नसले तरी ऑटोनॉमस आणि सेमी ऑटोनॉमस क्षेत्रातील एआय अप्लिकेशन्स दहशतवाद्यांचा हातात पडल्यास त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत. या एआय अप्लिकेशन्समुळे वाढीव कमांड-अँड-कंट्रोल क्षमता आणि हल्ल्यांच्या अंमलबजावणीमध्ये अधिक प्राणघातकता वाढीस लागणार आहे.

जनरेटिव्ह एआयमुळे दहशतवादी भरती, ऑपरेशनल प्लॅनिंग आणि प्रचार प्रसाराचे ऑप्टिमायझेशन सुलभ झाले आहे. यात ऑटोमेटेड कंटेन्ट जनरेशन, एखाद्या कंटेन्टची जलद परंतू समाज विघातक भाषांतरे, रसायने किंवा बंदूकांचे ३ डी प्रिंटीग याबाबत माहिती उपलब्ध करून देणे या एआय क्षमतांचा वापर केला जात आहे. या बाबींचे प्रत्यक्ष परिणाम हा एक चर्चेचा विषय आहे.

दहशतवादी संघटनांकडून वापरण्यात येणाऱ्या एआय तंत्रज्ञानाचे मुल्यांकन केल्यास त्याचे मिश्रित परिणाम समोर येतात. अशा तंत्रज्ञानाचा जागतिक स्तरावर दहशतवादी कारवायांसाठी होणारा वापर निर्विवादपणे चिंताजनक आहे. यामुळे लॉ एन्फोर्समेंट एजंसीज, सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि सिव्हील सोसायटीला त्यांच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांना चालना देण्यासाठी आणि वाढविण्यासाठी एआयसह सर्व उपलब्ध साधनांचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. "जागतिक दहशतवादाविरुद्धच्या युद्धात" आघाडीवर असलेली राष्ट्र-राज्ये या प्रयत्नात निःसंशयपणे वरचढ आहेत. या देशांकडे कट्टरतावाद, दहशतवाद, दहशवादासंबंधी प्रचार साहित्य आणि दहशतवादविरोधी हस्तक्षेप यांवर वर्षानुवर्षे जमा केलेला डेटा आहे. सुरुवातीच्या प्रतिबंधक धोरणांपासून ते जवळजवळ रिअल-टाइम शोध क्षमतांपर्यंत मशीन लर्निंग ड्रिव्हन सिस्टिम्स या शक्तिशाली साधने म्हणून उदयास आल्या आहेत. गेल्या दोन दशकांत दहशतवादावरील गोळा केलेल्या पेटाबाइट्स डेटाचा वापर दहशतवादविरोधी प्रयत्नांसाठी प्रगत मशीन लर्निंगद्वारे करण्यात अमेरिका (यूएस) स्पष्टपणे आघाडीवर आहे. ७ ऑक्टोबरपासून युरोपमध्ये सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, युरोपियन दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये विविध प्रगत एआय एप्लिकेशन्सचा वापर करणे अत्यावश्यक आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि ट्रॅव्हल डेटामधील विसंगती शोधण्यापासून ते दहशतवादी वित्तपुरवठा नेटवर्क्समध्ये व्यत्यय आणण्यासाठी आर्थिक व्यवहारांमधील पॅटर्न शोधण्यापर्यंत, एआयचा कशाप्रकारे वापर करता येऊ शकतो याचा विचार केला पाहिजे.

युरोपियन युनियन आणि त्यांच्या सदस्य राष्ट्रांना दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये एआय यशस्वीरित्या समाविष्ट करण्यासाठी तीन प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. प्रथम, त्यांनी दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या विकासावर आणि वापरावर अतिरेकी नियंत्रण टाळले पाहिजे. नैतिकता आणि गोपनीयतेतील गुंतागुंत नाकारता येत नसली तरी, दहशतवादविरोधी कारवाईत एआयचा वापर न करणे हे बेजबाबदारपणाचे आहे आणि त्यामुळे हिंसक समाजविघातक घटकांना फायदा होण्याचा धोका आहे. दुसरे म्हणजे, २७ देशांचा समावेश असलेल्या या गटामध्ये नवीन टूल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. युरोपियन युनियनवरील करारांतर्गत राष्ट्रीय सुरक्षा ही प्रत्येक इयू सदस्य राष्ट्राची जबाबदारी असली तरी, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बुद्धिमत्ता-सामायिकरण आणि सामूहिक संसाधनांच्या एकत्रीकरणात मजबूत भागीदारी आवश्यक आहे, ज्यामध्ये एआय सक्षम साधनांचा विकास आणि सामायिकरण समाविष्ट आहे. तिसरे म्हणजे, दहशतवादविरोधी कृतींसाठी एआय सिस्टीमना प्रशिक्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डेटा पूलचा विस्तार करण्यासाठी युरोपियन युनियनने सक्रियपणे धोरणात्मक जागतिक भागीदारी निर्माण केली पाहिजे, ज्यामुळे त्यांची अचूकता आणि परिणामकारकता वाढेल.

दहशतवादविरोधी कृतींसाठी एआय सिस्टीमना प्रशिक्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डेटा पूलचा विस्तार करण्यासाठी युरोपियन युनियनने सक्रियपणे धोरणात्मक जागतिक भागीदारी निर्माण केली पाहिजे, ज्यामुळे त्यांची अचूकता आणि परिणामकारकता वाढेल.

दहशतवादाविरूद्धच्या लढ्यामध्ये एआयचा वापर करणे ही काळाची गरज झाली आहे. यासाठी युरोपामधील दहशतवादी संकटाला तोंड देणे आणि एआय ॲक्ट आणि जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर) अंतर्गत कठोर कारवाई या दोन बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. २०१७ च्या सुरुवातीलाच, युरोपोलने दहशतवादविरोधी तपास आणि ऑपरेशन्सना समर्थन देण्यासाठी विविध एआय इंटिग्रेशनसह ऑपरेशनल अनॅलिसीस आणि निर्णय घेण्याकरिता पॅलांटिर गोथम या सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मचा स्वीकार केला आहे. २०२० मध्ये, ईयू काउंटर-टेररिझम अजेंड्याने सार्वजनिक जागी सापडलेल्या बेवारशी वस्तू फुटेजच्या मदतीने शोधण्यापासून ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील दहशतवादी सामग्री ओळखण्यापर्यंत, दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये एआय हे एक प्रभावी तंत्रज्ञान असल्याचे स्पष्टपणे मान्य केले आहे. २०२० च्या अजेंड्यामध्ये प्रेडीक्टीव्ह अनॅलेटीक्सच्या क्षमतेवर भर देण्यात आला आहे. तसेच २०१४ ते २०२० या कालावधीमध्ये युरोपियन युनियनच्या संशोधन आणि नवोपक्रम निधी यंत्रणेच्या होरायझन २०२० या कार्यक्रमांतर्गत एआयच्या एकत्रीकरणावर काम करणाऱ्या विविध ईयू-निधी प्रकल्पांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, रेड अलर्ट सिस्टीमला इयूकडून निधी मिळाला असून आणि युरोपोलच्या दहशतवाद विरोधी युनिटने त्यास पाठिंबा दिला आहे. लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज (एलईए) ना दहशतवादी भरती, प्रचार प्रसार आणि हल्ल्याचे नियोजन रोखण्यात सहाय्य करण्यासाठी या प्रोजेक्टमध्ये नॅचरल लॅग्वेज प्रोसेसिंग, सोशल नेटवर्क अनॅलिसीस आणि कॉम्प्लेक्स इव्हेंट प्रोसेसिंग यांचा वापर करण्यात आला आहे. सहभागी एलईएच्या मते, रेड-अलर्ट सिस्टमने या आधीच्या पद्धतींपेक्षा लक्षणीयरीत्या चांगले काम केले आहे. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या डेटा स्ट्रीम्सचे प्रोसेसिंग आणि विश्लेषण करण्याच्या एलईएच्या क्षमता विकसीत करण्यासाठी प्रीव्हिजनला इयूकडून निधी मिळाला आहे. या डेटामध्ये सोशल मिडीया आणि ओपन वेब डेटा, डार्कनेट आणि डीप वेब डेटा, सर्व्हेलंस डेटा, ट्राफिक आणि मोबिलीटी डेटा आणि आर्थिक व्यवहाराशी निगडीत डेटाचा समावेश आहे. प्रेडिक्टिव्ह अनॅलिटीक्सद्वारे हे प्लॅटफॉर्म एलईएना कट्टरतावादाच्या सुरुवातीच्या संकेतांबद्दल धोक्याची सुचना देतात. हा प्रकल्प पुर्ण झाला असला तरी या टुल्सचा वापर युरोपीय एलईएकडून होत आहे. होरायझन २०२० च्या छत्राखाली स्थापित केलेल्या इतर प्रभावी साधनांमध्ये टेन्सर प्लॅटफॉर्म आणि डांटे प्रकल्प यांचा समावेश होता.

आता एक व्यापक नियामक चौकट म्हणून अस्तित्वात असलेला एआय कायदा, अस्वीकार्य धोका निर्माण करणाऱ्या काही एआय अप्लिकेशन्सना प्रतिबंधित करतो.

होरायझन २०२० च्या समाप्तीच्या सुमारास, युरोपमध्ये दहशतवादविरोधी आणि साथीच्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी एआय सेफ्टी आणि एआय एनेबल्ड टूल्सबाबतच्या नकारात्मक कव्हरेजवर ब्रुसेल्सने लक्ष केंद्रित केल्याने दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये एआयच्या वापरावर एकप्रकारे सावट आले होते. आता एक व्यापक नियामक चौकट म्हणून अस्तित्वात असलेला एआय कायदा, अस्वीकार्य धोका निर्माण करणाऱ्या काही एआय अप्लिकेशन्सना प्रतिबंधित करतो. यामध्ये अनटार्गेटेड स्क्रॅपिंगद्वारे फेशिअल रेकगनिशन डेटाबेसचा विकास, प्रोटेक्टेड कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेणारी बायोमेट्रिक कॅटेगरायझेशन सिस्टीम आणि सार्वजनिक ठिकाणी रिअल-टाइम बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन यांचा समावेश आहे. या कायद्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करणाऱ्या संस्थांबाबत काही अपवाद ठेवण्यात आले आहेत. कायदा अंमलबजावणी संस्था विशिष्ट दहशतवादी धोक्यांसाठी रिअल-टाइम फेशियल रेकग्निशन किंवा गुन्हेगारी तपासासाठी टार्गेटेड इमेज स्क्रॅपिंग करू शकतात परंतु त्यांना पूर्व न्यायालयीन परवानगी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, केवळ राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण किंवा लष्करी सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या एआय सिस्टीम या एआय कायद्यांतर्गत येत नाहीत. परंतू, जर तीच प्रणाली कायदा अंमलबजावणी आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने वापरली जात असेल, तर तिने कायद्यातील तरतुदींचे पालन करणे गरजेचे आहे. थोडक्यात, एआय कायदा कडक असला तरी, विविध अपवादांमुळे सदस्य राष्ट्रांना दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये एआयचे एकत्रीकरण करण्याची परवानगी मिळते. दहशतवादविरोधी लढाईत ब्रुसेल्सच्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत असलेल्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित अपरिहार्य अति-नियामक दबावांना धोरणकर्त्यांनी सक्रियपणे तोंड देणे गरजेचे आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये, ईयू परिषदेने दहशतवादविरोधी संयुक्त प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी भविष्यातील प्राधान्यांवरील आपले निष्कर्ष प्रकाशित केले आहेत. एआय टूल्स, बिग डेटा ॲनालिटिक्स, डिक्रिप्शन टेक्नॉलॉजीज, बायोमेट्रिक डेटा ॲनालिसिस आणि डिजिटल फॉरेन्सिक टूल्स यांचा समावेश असलेल्या दहशतवादविरोधी उपक्रमांना समर्थन देणाऱ्या नवोपक्रमात गुंतवणूक करण्याची गरज याद्वारे अधोरेखित झाली आहे. युरोपियन युनियनने एआयच्या जबाबदार वापराशी निगडीत एआय-पीओएल आणि सीटी-टेक+ या दोन आंतरराष्ट्रीय प्रकल्पांना निधी देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांद्वारे दहशतवादविरोधी कारवायांमध्ये एआयच्या वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असले तरी, युरोपियन युनियनने केवळ दहशतवादी आणि बेकायदेशीर सामग्री काढून टाकण्यासाठी एआय लागू करण्याच्या सापळ्यात अडकून राहू नये. दहशतवादविरोधी प्रयत्नांना बळकटी देण्याची एआयमध्ये लक्षणीय क्षमता आहे आणि युरोपमधील असंख्य एलईए त्याचे मूल्य जाणतात. युरोपोलच्या एआय आणि पोलिसिंगवरील २०२४ च्या अहवालामध्ये, फेस डिटेक्शनपासून ते रिअल-टाइम प्रोसेसिंग आणि अनॉमली डिटेक्शनपर्यंत, पोलिसिंगमध्ये एआय कशाप्रकारे वापरले जाऊ शकते याचे वर्णन करण्यात आले आहे. सदस्य राष्ट्रांच्या पातळीवर, स्थानिक पोलिस, गुप्तचर संस्था आणि इतर कायदेशीर संस्थांकडून अनेक एआय अप्लिकेशन्स या आधीच लागू करण्यात आले आहेत. दहशतवादविरोधी क्षेत्रातील विविध घटकांच्या डेटासेटसह विविध राष्ट्रांनी लागू केलेल्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे व एआय टूल्समधील सुधारणांची खात्री करण्यासाठी ईयू-स्तरीय समन्वय साधला गेला पाहिजे.

दहशतवादविरोधी क्षेत्रातील विविध घटकांच्या डेटासेटसह विविध राष्ट्रांनी लागू केलेल्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे व एआय टूल्समधील सुधारणांची खात्री करण्यासाठी ईयू-स्तरीय समन्वय साधला गेला पाहिजे.

राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेमध्ये नवोपक्रमाला चालना देणारे नियामक वातावरण आणि दहशतवादविरोधी कार्यात एआयच्या प्रभावी एकात्मतेवर आधारित मजबूत आंतर-युरोपीय सहकार्य यासोबतच डेटा हा यशासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. सर्वात प्रभावी एआय ड्रिव्हन दहशतवादविरोधी साधने, प्रणाली आणि धोरणे ही मजबूत डेटा सेटवर अवलंबून असतात. या साधनांना आधार देणारा डेटा शेवटी त्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता ठरवतो. एआय-सक्षम दहशतवादविरोधी उपायांना बळकटी देण्यासाठी कट्टरतावाद आणि दहशतवादी कारवाया, प्रचार आणि दहशतवादविरोधी हस्तक्षेपांवरील डेटा भागीदारांमध्ये सामायिक करणे हा एक प्रमुख आधारस्तंभ असणार आहे. ट्रान्सअटलांटिक प्रदेशातील तणावाच्या पार्श्वभुमीवर, दहशतवादविरोधी प्रयत्न हे सहकार्याचे आधारस्तंभ व्हायला हवेत. यामुळे अधिकाधिक राष्ट्रांचा फायदा होणार आहे. परंतू, युरोपियन युनियनने अटलांटिक प्रदेश आणि सरकारी संस्थांच्या पलीकडे जाऊन एआय डेटा शेअरिंगसाठी धोरणात्मक भागीदारी तयार करणे गरजेचे आहे. हिंसक अतिरेकीपणा रोखण्यासाठी आणि पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सिव्हील सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि बिगर-पाश्चात्य सरकारांकडे याबाबतचा महत्त्वाचा डेटा असू शकतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


क्लारा ब्रॉकर्ट द सौफन सेंटरमध्ये रिसर्च फेलो आणि द सौफन ग्रुपमध्ये ॲनालिस्ट आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.