Author : Soumya Bhowmick

Expert Speak India Matters
Published on Dec 06, 2023 Updated 0 Hours ago

सरकारी उपक्रम आणि कामसू मनुष्यबळ यांमुळेभारत वैविध्यपूर्ण आणि नोकरीच्या संधींत भरीव वाढ होण्याच्या उत्तम स्थितीत आहे.

भारतातील रोजगार वाढीची संधी असणारी सर्वोत्तम १० क्षेत्रे

आपल्या प्रचंड मोठ्या आणि वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्थेसहभारताने गेल्या काही वर्षांत रोजगाराच्या प्रवाहात लक्षणीय बदल पाहिले आहेत. अर्थव्यवस्थेतील रोजगारासंबंधीत आवश्यक कौशल्ये आणि कामाचे स्वरूप यात बदल होत असून या संबंधीचे चित्र विकसित होत असताना, अनेक क्षेत्रांत लक्षणीय वाढीची क्षमता निर्माण झाली आहे. भारत आर्थिक विकासाच्या मार्गावर पुढे जात असतानाभारतीय अर्थव्यवस्थेतील खाली नमूद केलेल्या संधी असलेल्या क्षेत्रांनी देशाच्या रोजगार- नोकऱ्यासंदर्भातील दृष्टिकोन तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे.

()  डिजिटल सेवा

चौथ्या औद्योगिक क्रांतीतील भारताच्या नेतृत्वाने नाविन्यपूर्णतेला चालना दिली आहे आणि विविध क्षेत्रांत डिजिटल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण केले आहे, ज्यामुळे सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, डेटा सायन्स आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रांमध्ये कुशल व्यावसायिकांची मागणी निर्माण झाली आहे. डिजिटल अर्थव्यवस्था २०२५ सालापर्यंत संभाव्यतः ६० ते ६५ दशलक्ष नोकर्‍या निर्माण करू शकतेज्याकरता सर्वात जास्त कार्यात्मक डिजिटल कौशल्ये आवश्यक आहेत. हा कल जागतिक स्तरावर डिजिटलायझेशनच्या दिशेने होणाऱ्या व्यापक संक्रमणाशी जुळणारा आहेजिथे भारताचे तज्ज्ञ आणि मनुष्यबळ या क्षेत्राचे भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याकरता सज्ज आहेत.

Figure 1: Sector-wise growth rate of India’s IT industry (in percentage)

Source: Department of Commerce, USA

(२) वित्तीय सेवा:

बँकिंग आणि विमा सेवांच्या वाढत्या मागणीमुळे भारतातील वित्तीय सेवा क्षेत्राचा लक्षणीय विस्तार होत आहे. शिवाय, वित्त-तंत्रज्ञानसंबंधातील नाविन्यपूर्ण कल्पनांचा उदय या उद्योगाला आकार देत आहे आणि रोजगाराच्या नवीन संधी खुल्या करीत आहे. सर्वप्रथम, डिजिटल बँकिंगकडे वळल्याने मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंग तंत्रज्ञान, ग्राहक अनुभव रचना आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांत कुशल व्यावसायिकांची मागणी निर्माण झाली आहे. दुसरे असे की, तंत्रज्ञानाच्या एकात्मतेने विमा क्षेत्र परिवर्तन पाहात आहे. २०२५ सालापर्यंत विमा क्षेत्राची वाढ २५० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत होणे अपेक्षित आहे. २०२०-३० सालापासून ७८ अब्ज अमेरिकी डॉलर्स अतिरिक्त जीवन विमा प्रीमियम्सच्या संधीसह विमा क्षेत्र निर्णायक ठरेल.

(३) आरोग्य सेवा:

विविध घटकांमुळे भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. पहिली बाब अशी की, वयोवृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे, विशेषत: वयासंबंधित तसेच अनेक वर्षे जडलेल्या विकारांमुळे आरोग्य सेवांची मागणी वाढत आहे. दुसरे म्हणजे, आरोग्य सेवांविषयी जागरूकता वाढल्याने वैद्यकीय सेवा, प्रतिबंधात्मक खबरदारी आणि नियमित तपासणीची गरज वाढली आहे. टेलिमेडिसिन आणि आरोग्यासंबंधित अॅप्ससारख्या तांत्रिक प्रगतीने आरोग्यसेवांच्या उपलब्धतेसंदर्भातील सुलभता वाढली आहे. विशेषत: कोविड-१९च्या साथीनंतर, दूरस्थ सल्लामसलतांसाठी टेलिमेडिसिनला महत्त्व प्राप्त झाले आहे. २०१७ मध्ये ६१.७९ अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीचा रुग्णालय उद्योग २०२३ सालापर्यंत १३२ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

(४) आदरातिथ्य सेवा:

हॉटेल व्यवस्थापन, पर्यटन संस्था, पाककला, वाहतूक आणि संबंधित सेवांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत भारताचा पर्यटन उद्योग लक्षणीय वाढीच्या उंबरठ्यावर आहे. साथीच्या रोगानंतर पर्यटन क्षेत्राचे पुनरुत्थान होऊन, आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीला हातभार लावण्यासाठी पर्यटन क्षेत्र सज्ज आहे. या व्यतिरिक्त, स्मृतीचिन्हांची दुकाने आणि मनोरंजनासह पर्यटन-संबंधित सेवा, या क्षेत्रातील रोजगार संधी वृद्धिंगत करतात. २३.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या सद्य बाजारपेठेचा आकार आणि ४.७३ टक्के आशादायक चक्रवाढ वार्षिक वाढ दरासह हा उद्योग २०२८ सालापर्यंत २९.६१ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

Table 1: Targets of Draft Tourism Policy, 2022

Source: CBRE

(५) ग्राहक किरकोळ सेवा:

ई-कॉमर्स आणि संघटित किरकोळ विक्रीच्या वाढत्या वर्चस्वामुळे भारतीय रिटेल क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. ई-कॉमर्स युगात डिजिटल मार्केटिंगदेखील महत्त्वपूर्ण बनले आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तज्ज्ञ, आशय निर्माते, सोशल मीडिया व्यवस्थापक आणि डिजिटल जाहिरात तज्ज्ञ यांसारखी पदे व्यवसायांच्या ऑनलाइन उपस्थितीत सक्रिय योगदान देतात. किरकोळ क्षेत्रातील हे परिवर्तन भारतातील संबंधित नोकऱ्यांमधील आवश्यक कौशल्ये आणि कामाचे स्वरूप याबाबतच्या चित्राला आकार देत आहे. पुरवठा, साठवणूक,  डिजिटल मार्केटिंग आणि संबंधित क्षेत्रातील विविध संधींना चालना देत आहे, ज्यामुळे देशातील रोजगार बाजारपेठेला चालना मिळते. भारताच्या भरभराट होत असलेली मध्यमवर्गीय लोकसंख्या २५ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे. किरकोळ बाजारपेठेत २०२७ सालापर्यंत १.१ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स आणि २०३२ सालापर्यंत २ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढ होईल.

(६) जागतिक क्षमता केंद्रे:

भारताची जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) ही माहिती-तंत्रज्ञान सक्षम सेवा क्षेत्राचे आवश्यक घटक आहेत, जी जागतिक स्तरावर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बॅक-ऑफिस कामकाजाला समर्थन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे क्षेत्र भारतातील नोकरी देणारे एक महत्त्वपूर्ण चालक आहे, ज्यात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतात. पहिली गोष्ट म्हणजे भारताची जागतिक क्षमता केंद्रे ग्राहक समर्थन सेवा प्रदान करतात. मजबूत संभाषण कौशल्ये आणि भाषासंबंधित प्रावीण्य संपादन केलेल्या व्यक्तींना नोकऱ्या देतात. दुसरे म्हणजे, ते माहिती-तंत्रज्ञान सल्लागार सेवा प्रदान करतात. सॉफ्टवेअर अभियंते, व्यवस्था विश्लेषक, सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापकांसाठी नोकऱ्या निर्माण करतात आणि तिसरी बाब म्हणजे, भारताची जागतिक क्षमता केंद्रांमधील वित्त आणि लेखाविषयक संघ हे लेखापाल, आर्थिक विश्लेषक आणि लेखा परीक्षकांची नियुक्ती करतात.

(७) अक्षय ऊर्जा:

भारताने स्वच्छ ऊर्जा उपाय अवलंबिण्यात लक्षणीय प्रगती केली आहे, विशेषत: अक्षय ऊर्जा, जी पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देते आणि प्रामुख्याने सौर व पवन उर्जा क्षेत्रात लक्षणीय रोजगार निर्माण करते. हरित ऊर्जा तंत्रज्ञानाच्या स्थापनेसाठी, देखभालीसाठी आणि संशोधनासाठी कुशल कामगारांवर लक्ष केंद्रित करून अक्षय ऊर्जेचा विस्तार- लाखो रोजगार निर्माण करू शकतो. हा कल स्वच्छ ऊर्जेकडे जागतिक स्तरावर होत असलेल्या बदलांशी जुळणारा आहे, जिथे सौर फोटोव्होल्टेइक, जलविद्युत, जैव इंधन, आणि पवन ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये वाढ होते. २०२२ मध्ये, केवळ सौर उद्योगात अतिरिक्त ५२,०८० लोकांना रोजगार उपलब्ध झाला. हे क्षेत्र जसजसे वृद्धिंगत होईल तसतसे ते २०३० पर्यंत १ दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकेल.

(८) ई-कॉमर्स:

ऑनलाइन शॉपिंगच्या विस्तारामुळे कार्यक्षम पुरवठा विषयक आणि वितरण सेवांची मागणी वाढली आहे, ज्यामुळे हजारो ने-आण करणारे भागीदार आणि तात्पुरत्या स्वरूपाचे काम करणाऱ्या असंघटित कर्मचाऱ्यांकरता नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. ई-कॉमर्स कंपन्या लक्षणीय प्रमाणात नोकरी देणाऱ्या आहेत, ज्यांना माहिती-तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञ, डिजिटल पेमेंट विशेषज्ञ आणि व्यापारी यांच्यासह विविध प्रकारच्या व्यावसायिकांची आवश्यकता असते. भारतातील ई-कॉमर्स बाजारपेठ २०२६ सालापर्यंत २०० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत विस्तारण्याची अपेक्षा आहे. २०२० सालच्या ४६.२ अब्ज अमेरिकी डॉलर्स या आकड्यात लक्षणीय वाढ संभवते.

()   सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग:

सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे अविभाज्य घटक आहेत, जे जीडीपीमध्ये ३० टक्क्यांहून अधिक योगदान देतात आणि या उद्योगांचा निर्यातीत मोठा वाटा आहे. हे उद्योग रोजगाराचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत. हे उद्योग लाखो उपजीविकांना आधार देतात. कृषी क्षेत्रापाठोपाठ हे क्षेत्र रोजगार पुरवण्याबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग क्षेत्र म्हणजे एका अर्थाने उद्योजकता, नवकल्पना आणि व्यापक आर्थिक सहभाग जिथे राबवता येऊ शकतो, असे क्षेत्र आहे, ज्यामुळे ते भारताच्या आर्थिक उलाढालींसंबंधित आवश्यक कौशल्ये आणि कामाच्या स्वरूपाबाबत एक महत्त्वाचा घटक बनते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योग क्षेत्राने १ जुलै २०२० ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत विक्रमी १२३.६ दशलक्ष लोकांना रोजगार दिला आहे.

Figure 2: Distribution of Employment in the MSMEs


Source: Ministry of MSME, Annual Report

(१०) स्टार्टअप परिसंस्था:

भारताच्या भरभराट होत असलेल्या स्टार्टअप परिसंस्थेचे यश सरकारच्या २०१६ च्या स्टार्टअप इंडिया उपक्रम आणि स्टार्टअपवरील आर्थिक ओझे कमी करणारे कर प्रोत्साहन, नवकल्पना आणि विस्ताराला चालना देणारी प्रस्तावना धोरणे यांच्यामुळे प्राप्त झाले आहे. भारताच्या व्यावसायिक वातावरणात सुधारणा करण्याच्या ठोस प्रयत्नांमुळे नवा उपक्रम सुरू करत स्वतंत्र व्यवसायाकडे वळण्याचे आकर्षक स्थान बनत, स्टार्टअप्सचा दर्जा उंचावला आहे, ज्यामुळे भारतीय नगरे आणि बंगळुरू, मुंबई, चेन्नई, गुरगाव इत्यादी शहरांच्या विकासाला अधिक चालना मिळाली आहे, यामुळे नोकऱ्यांची निर्मिती करणारी उद्योजकता केंद्रे बनण्यास मदत झाली असून, स्टार्टअप क्षेत्रात जागतिक स्पर्धात्मकता वृद्धिंगत होत आहे.

Figure 3: Jobs created by Startups


Source: Indian Economic Survey, 2022-23

सारांशभारताच्या नोकऱ्यांसंबंधित आवश्यक कौशल्ये आणि कामाचे स्वरूप याबाबत विविध क्षेत्रांत लक्षणीय बदल होत आहेत. डिजिटल सेवांपासून भरभराट होत असलेल्या स्टार्टअप परिसंस्थेपर्यंतदेश भरीव रोजगार निर्मितीकरता सज्ज आहे. सरकारी उपक्रम आणि कामसू मनुष्यबळ यांमुळेभारत वैविध्यपूर्ण आणि नोकरीच्या संधींत भरीव वाढ होण्याच्या उत्तम स्थितीत आहे, याचे कारण २०२७-२८ सालापर्यंत जगातील तिसरी- सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या ध्येयाकडे यामुळे देशाची आर्थिक वाटचाल सुरू राहिली आहे.

सौम्य भौमिक  हेऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक डिप्लोमसीचे सहयोगी फेलो आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.