Author : Anulekha Nandi

Expert Speak Digital Frontiers
Published on May 27, 2025 Updated 0 Hours ago

भारताने जागतिक पातळीवर रोबोटिक्स क्षेत्रात एक स्ट्रॉंग इकोसिस्टम पार्टनर (Strong Ecosystem Partner) बनण्यासाठी आपल्या मजबूत देशांतर्गत मागणीच्या क्षमतेचा (Strong Domestic Demand Potential) आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील किफायतशीरतेचा (Cost Efficiencies in Electronics Manufacturing) पुरेपूर फायदा घेतला पाहिजे.

रोबोटिक्समध्ये भारताचा उदय: जागतिक स्वप्न, स्थानिक सामर्थ्य

Image Source: Getty

    19 April 2025 रोजी, बीजिंगच्या टेक हब यिझुआंगमध्ये प्रथमच एका half-marathon (हाफ-मॅरेथॉन) मध्ये 21 humanoid robots (ह्युमनॉईड रोबोट्स) नी मानवी धावपटूंशी स्पर्धा केली. विजयी रोबोटला सर्वात वेगवान मानवी धावपट्टुच्या तुलनेत दुप्पट वेळ लागला, तरीही या marathon (मॅरेथॉन) मुळे चीनची robotics (रोबोटिक्स) मधील वाढती क्षमता ठळकपणे जगासमोर आली. ही क्षमता चीनच्या आक्रमक धोरणामुळे बळकट झाली आहे. विशेषतः robotics (रोबोटिक्स) मध्ये, जिथे humanoid robots (ह्युमनॉईड रोबोट्स) ना 'new engine of economic growth' (न्यू इंजिन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ) म्हणून पाहण्यात येत आहे. उत्पादन साखळी सुनिश्चित करणे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनासोबत नवकल्पना साधणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

    जगभरात robot installation (रोबोट इन्स्टॉलेशन) मध्ये चीन आघाडीवर असला, तरी सध्या हे एकत्रीकरण प्रामुख्याने जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपमधील परदेशी उत्पादकांमार्फत होत आहे. त्यामुळे देशांतर्गत क्षमतेतील वाढ दाखवणाऱ्या अशा tech exhibitions (टेक एक्झिबिशन्स) हे जगाला दिलेले महत्त्वाचे संकेत आहेत, की चीन फक्त manufacturer (मॅन्युफॅक्चरर) म्हणून नाही, तर सर्वात मोठे market (मार्केट) म्हणूनही पुढे जात आहे. तसेच, supply chain (सप्लाय चेन) व घटक उत्पादन यामध्ये स्वावलंबी होण्याचा चीनचा स्पष्ट प्रयत्न आहे.

    या क्षेत्रातील संभाव्य मार्केट ऑपर्च्युनिटीज लक्षात घेता, Meta (मेटा), Microsoft (मायक्रोसॉफ्ट) , NVIDIA (एनविडिया)  आणि Amazon (अमॅझॉन) सारख्या युनायटेड स्टेट्स-बेस्ड टेक जायंट्सनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. यामध्ये Tesla (टेस्ला) चा Optimus prototype (ऑप्टिमस प्रोटोटाईप) आघाडीवर मानला जात आहे.

    Robotics (रोबोटिक्स) चा उपयोग industrial (इंडस्ट्रिअल), consumer (कंझ्युमर) आणि military domains (मिलिटरी डोमेन्स) मध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. जगभरातील robotics market (रोबोटिक्स मार्केट) दरवर्षी 16.35 टक्क्यांनी वाढेल आणि 2033 पर्यंत US$ 178.7 अब्जपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. यामागे Artificial Intelligence (AI) (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), automation (ऑटोमेशन) ची गरज, labour shortages (लेबर शॉर्टेजेस) आणि वाढती मजुरी, तसेच सरकारच्या अनुकूल धोरणांचा मोठा वाटा आहे. जरी रोबोटिक्सचा वापर आजवर मुख्यतः industrial domain (इंडस्ट्रिअल डोमेन) मध्ये झाला असला, तरी humanoid robots (ह्युमनॉईड रोबोट्स) हे general-purpose (जनरल-पर्पज) असतील, ज्यांचे उपयोग विविध क्षेत्रांत वाढतील, अशी अपेक्षा आहे. Humanoid robots (ह्युमनॉईड रोबोट्स) साठीचा total addressable market (टोटल अ‍ॅड्रेसेबल मार्केट) 2035 पर्यंत US$ 38 अब्ज इतका होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या market opportunities (मार्केट ऑपर्च्युनिटीज) मुळे Meta (मेटा), Microsoft (मायक्रोसॉफ्ट) , NVIDIA (एनविडिया)  आणि Amazon (अमॅझॉन) सारख्या United States-based tech giants (युनायटेड स्टेट्स-बेस्ड टेक जायंट्स) नी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, आणि Tesla(टेस्ला) चा Optimus prototype (ऑप्टिमस प्रोटोटाईप) हे आघाडीवर मानले जात आहे. मात्र, robotics मधील प्रगतीसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा समन्वय आवश्यक असतो, जे robots (रोबोट्स) कडून अपेक्षित असलेल्या अनेक कार्यांसाठी योग्य रीतीने optimise (ऑप्टिमाइझ) करणे कठीण आहे, यामुळे scalability (स्केलेबिलिटी) वर मर्यादा येतात.

    जरी US (यूएस) सॉफ्टवेअर डिझाईनमध्ये आघाडीवर असले तरी, आशिया (Asia) हा उद्योगाचा मुख्य वाढीचा पाया ठरला आहे, ज्यात China (चीन) सर्वात मोठी बाजारपेठ आणि एकूण रोबोट इन्स्टॉलेशन्समध्ये आघाडीवर आहे. Japan (जपान) हा जगातील सर्वात मोठा औद्योगिक रोबोटिक्स उत्पादक आहे, जो जागतिक पुरवठ्याचा 45 टक्के भाग पुरवतो. जपानच्या निर्यातींपैकी 36 टक्के भाग चीनला जातो, तर US (यूएस) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा हिस्सा 22 टक्के आहे. India (भारत) हा आशियातील सर्वात जलद वाढणारा बाजारपेठांपैकी एक आहे, जिथे 2023 मध्ये रोबोटिक्स इन्स्टॉलेशन्समध्ये 59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ विशेषतः ऑटोमोटिव्ह उद्योगामुळे झाली आहे, जिथे कार उत्पादक आणि पुरवठादार यांमुळे मागणीत 139 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातून स्पष्ट होते की, वाढत्या घरगुती मागणीची योग्य पूर्तता करणे, परकीय अवलंबित्व कमी करणे आणि जागतिक स्पर्धात्मकता तसेच धोरणात्मक सुसंगती राखणे आवश्यक आहे, जेणेकरून भारत जागतिक मंचावर एक सक्षम इकोसिस्टम पार्टनर म्हणून उभा राहू शकेल.

    सायबर-फिजिकल सिस्टम्सची (Cyber-Physical Systems) ऊभारणी 

    सायबर-फिजिकल सिस्टम्स (Cyber-Physical Systems) म्हणून रोबोटिक्सचा विचार केल्यास उत्पादन विकास प्रक्रियेत अनेक आव्हाने आणि मर्यादा दिसून येतात. यामध्ये सॉफ्टवेअरच्या पुनरावृत्ती (Software Iteration) साठी आवश्यक डेटा, वेगवेगळ्या वापराच्या संदर्भातील गुंतागुंतीची माहिती रोबोटिक सिस्टम्सला प्रशिक्षित करण्यासाठी लागते, जी हार्डवेअर विकासाच्या वेळापत्रकांशी आणि व्यावसायिक उत्पादनासाठी आवश्यक प्रमाणात वाढीसंबंधी अटींशी कधी कधी विरोधाभासी असते. यामुळे आजच्या काळात रोबोटिक्स सिस्टम्स तयार करणे आणि त्यांचा विस्तार करणे यामध्ये काही अडथळे निर्माण होतात. बहुतेक ह्युमनॉइड (Humanoid) रोबोट्स एक ते दोन तास काम करू शकतात, त्यानंतर त्यांना पुन्हा चार्ज करणे आवश्यक असते. काही रोबोट्स मध्ये गतिशीलता (Agility) आणि हालचाल कौशल्य (Mobility) चांगले असते, तर काही संज्ञानात्मक (Cognitive) किंवा बौद्धिक (Intellectual) कामे करतात, पण दोन्ही क्षमता एकत्र मिळणे आजपर्यंत फारसे शक्य झालेले नाही. शिवाय, हार्डवेअर विकास अनेकदा सॉफ्टवेअरच्या तुलनेत मागे पडलेला असतो, कारण डेटा-आधारित फीडबॅक लूप्स (Data-driven Feedback Loops) अपूर्ण राहतात. हे सर्व अडथळे देशांच्या रोबोटिक्स इकोसिस्टममध्ये वेगवेगळ्या पैलूंमध्ये अपयशाचे प्रतिबिंब आहेत.

    यूएसने रोबोटिक्समध्ये 1.2 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा व्यापार तूट (Trade Deficit) नोंदवला असून, निर्यात (Exports) हे आयातीच्या (Imports) फक्त 28 टक्के मूल्याचे होते.

    अमेरिकेला आपली नाविन्यपूर्ण (Innovation) क्षमता व्यावहारिक वापरात रूपांतरित करण्यात अपयश मिळाले आहे, आणि या वापराचे बहुतेक उदाहरणे आशियामध्ये आहेत, ज्याचे नेतृत्व चीन, जपान आणि दक्षिण कोरिया करत आहेत. चीनकडे सर्वाधिक रोबोट इंस्टॉलेशन्स (Robot Installations) असून तो सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जपान उत्पादन क्षेत्रात आघाडीवर आहे, तर दक्षिण कोरियाकडे रोबोट घनता (Robot Density) सर्वाधिक आहे, म्हणजे 10,000 कामगारांसोबत सर्वाधिक रोबोट्स बसवले गेले आहेत. 2022 मध्ये, अमेरिकेला रोबोटिक्स क्षेत्रात 1.2 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा व्यापार तूट (Trade Deficit) भोगावा लागला, ज्यात निर्याती (Exports) केवळ आयातीच्या (Imports) 28 टक्के मूल्याचे होते. 2024 मध्ये, चीनने जागतिक रोबोटिक्स पेटंट्समध्ये आघाडी घेतली आहे. तरीही, या नाविन्यपूर्ण प्रगती आणि समर्थक धोरणांनंतरही, चीनसाठी स्वावलंबन (Self-sufficiency) साध्य करणे कठीण ठरले आहे, तरीही त्या दिशेने तो जोरदार प्रगती करत आहे.

    भारताचं ट्रस्टेड ग्लोबल पार्टनर (Trusted Global Partner) म्हणून स्थान

    वर नमूद केल्याप्रमाणे, भारतामध्ये मोठी अंतर्गत मागणी आहे, ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये योग्य समाकलन केल्यास त्याचे परिणाम आणि कार्यक्षमता वाढू शकते. भारताचा चीनवर आर्थिक अवलंबित्व आधीच महत्त्वाचा आहे, आणि रोबोटिक्स क्षेत्रातील वाढती मागणी ही अवलंबित्व अधिक बळकट करण्याची शक्यता आहे, कारण चीनकडे स्वस्त उत्पादन (Low-cost manufacturing) क्षमता तसेच इतर विदेशी पुरवठादार देखील आहेत. यामुळे भारताने या क्षेत्रात महत्त्वाचा खेळाडू म्हणून स्वतःची भूमिका ओळखणे अत्यावश्यक ठरते, ज्यामुळे तो आपला धोरणात्मक (Strategic) फायदा टिकवून ठेवू शकेल आणि जगभरातील राजकीय-भौगोलिक (Geopolitical) विचारसरणींवर प्रभाव टाकणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले स्थान मजबूत करू शकेल.

    परंतु, भारताने अद्याप राष्ट्रीय रोबोटिक्स धोरण (National Robotics Policy) अंमलात आणलेले नाही. AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि रोबोटिक्स यांच्या संयोगामुळे विविध क्षेत्रांमध्ये नवीन सीमारेषा ठरतील, आणि भारताला जागतिक स्तरावर एक ट्रस्टेड इकोसिस्टिम पार्टनर  (Trusted Ecosystem Partner) म्हणून स्वतःची ओळख बनवण्याची अनोखी संधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी जागतिक केंद्र (Global Hub) बनण्याच्या मार्गावर आहे. यामुळे, भारत रोबोटिक्स उत्पादनात खर्च बचत (Cost Efficiencies) देऊ शकतो आणि US च्या इंटरनेट प्रोटोकॉल (Internet Protocol - IP) आणि सॉफ्टवेअर नेतृत्वाला पूरक भूमिका निभावू शकतो. जपान अजूनही रोबोटिक्स उत्पादनात जागतिक आघाडीवर आहे, पण तिथे कौशल्यवान कामगारांची कमतरता आहे, तसेच नवप्रवर्तनाच्या व्यावसायिकीकरणात आणि प्रमाण वाढवण्यात किंमतीच्या बाबतीत स्पर्धात्मकता टिकवणे आव्हानात्मक आहे. हे सर्व लक्षात घेतले तर भारतासाठी महत्त्वपूर्ण संधी आहे की तो मुख्य खेळाडूंना ट्रस्टेड पार्टनर (Trusted Partner) म्हणून सेवा देऊ शकेल. हे शक्य होऊ शकते एक बहुपरकीय आणि समाकलित नवप्रवर्तन धोरण (Multi-pronged and Integrated Innovation Strategy) राबवून, ज्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रगत उत्पादन धोरणांचा (Advanced Manufacturing Policies) समावेश असेल, तसेच लागू संशोधन-विकासाला प्रोत्साहन, खाजगी गुंतवणूक वाढवणे, आणि स्थानिक मागणीला चालना देणे यांचा समावेश असेल.

    AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि रोबोटिक्स यांच्या संयोगामुळे विविध क्षेत्रांमध्ये नवीन सीमारेषा ठरतील, आणि भारताला जागतिक स्तरावर एक ट्रस्टेड इकोसिस्टिम पार्टनर (Trusted Ecosystem Partner) म्हणून स्वतःची ओळख बनवण्याची अनोखी संधी आहे.

    यातून असं स्पष्ट होतं की, भारताने धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी (Strategic Technological Partnerships) निर्माण करणं गरजेचं आहे, जिथे ज्ञान व तंत्रज्ञान हस्तांतरण (Knowledge and Technology Transfer) मजबूत पूरकतेवर आधारित असेल. या भागीदाऱ्यांद्वारे भारताने किफायतशीर उत्पादन क्षमतेच्या (Cost-Effective Manufacturing) जोरावर मूल्यसाखळीत (Value Chain) स्वतःसाठी महत्त्वाचं स्थान निर्माण करावं. या माध्यमातून रोबोटिक्सचं जागतिक स्तरावर व्यावसायिकीकरण (Commercialisation) आणि उत्पादनाचा विस्तार (Scaling) शक्य होईल, आणि भारत प्रगत उत्पादन प्रक्रियेच्या (Advanced Manufacturing) आघाडीवर येईल. यासोबतच, भारत आपली सॉफ्टवेअरमध्ये असलेली कुशलता (Software Prowess) वापरून AI-रोबोटिक्स एकत्रीकरण (AI-Robotics Integration) पुढे नेऊ शकतो. ज्यामुळे संकल्पनेपासून प्रत्यक्ष वापरापर्यंतचा प्रवास (Concept to Application) शक्य होतो. त्यामुळे देशांतर्गत नवप्रवर्तन (Domestic Innovation) आणि विस्ताराला चालना मिळेल, जे भारताच्या देशांतर्गत व निर्यात मागणी पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरेल.

    भारतात रोबोटिक्स क्षेत्रात काही नवोदित स्टार्ट-अप्स (Robotics Start-ups) विकसित होत आहेत, आणि सरकारकडून डीपटेक स्टार्ट-अप्स (DeepTech Start-ups) मध्ये गुंतवणुकीसाठी जोरदार प्रोत्साहन दिलं जात आहे. तरीही, डीपटेक हा भारतीय गुंतवणूकदारांमध्ये अजूनही सर्वात कमी पसंतीचा क्षेत्र राहिलेला आहे. त्यामुळे रोबोटिक्ससाठी एक स्पष्ट आणि ठोस धोरण (Defined Robotic Strategy) असणं अत्यावश्यक आहे, जे AI, डीपटेक (DeepTech) आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या अन्य धोरणांशी प्रभावीपणे समाकलित करता येईल. याशिवाय गुंतवणूकदारांची रुची वाढवण्यासाठी मागणी आधारित पाठबळ देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ संरक्षण क्षेत्रात (Defence) सार्वजनिक खरेदी (Public Procurement) वाढवणं, परिवर्तनाकडे वाटचाल करणाऱ्या व्यवसायांना वित्तपुरवठा (Ease of Access to Finance) सुलभ करणे, आणि सरकारी मदतीने उत्पादने स्पर्धात्मक किमतीत उपलब्ध करून देणे, जेणेकरून विविध उद्योग व क्षेत्रांमध्ये त्यांचा स्विकार वाढेल. अशा सर्वसमावेशक दृष्टिकोनातून (Comprehensive Approach), भारताला जागतिक स्तरावर या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण खेळाडू (Key Global Player) म्हणून उभारण्यासाठी योग्य दिशा आणि मार्ग शोधणे शक्य होईल.


    अनुलेखा नंदी ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीच्या फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.