Image Source: Getty
हा लेख ‘सागरमंथन एडीट २०२४’ या निबंध मालिकेचा एक भाग आहे.
अथेन्स विद्यापीठातील भू-राजकारण या विषयाचे ग्रीक प्राध्यापक डॉ. इऑनिस मॅझीस म्हणतात, ‘अर्थव्यवस्थेला व्यापारामुळे चालना मिळते आणि व्यापारामुळे राजकीय व भू-राजकीय दोहोंच्या बदलावर परिणाम होतो. प्रत्यक्ष व्यापाराच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्याची (वस्तूंच्या पुरवठ्यावर नियंत्रण) जबाबदारी ज्याच्यावर आहे, तो अपरिहार्यपणे एकूण अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो, त्याच्याकडे देशादेशांवर नियंत्रण ठेवण्याची ताकद असते; तसेच त्याचा जगभरातील भू-राजकीय बदलांवर परिणाम होतो आणि पृथ्वीवरच राज्य करण्याची अंतिम सत्ता त्यांच्याकडे असते.’
अन्न सुरक्षा आणि दारिद्र्य निर्मृलनाच्या कामात महासागर, समुद्र आणि समुद्रकिनारी भागाचे योगदान मोठे असते. जगभरातील तीन अब्जांपेक्षाही अधिक लोक महासागरांचा उदर्निर्वाहासाठी वापर करतात आणि ८० टक्के जागतिक व्यापार समुद्रावर होतो.
एजियन, आयोनियन आणि भूमध्य सागराने वेढलेल्या ग्रीसने एक शक्तीशाली जहाज उद्योग विकसित केला आहे. प्राचीन काळापासून ग्रीक लोकांना परदेशाशी व्यापार करण्याचे महत्त्व समजले आहे. त्यामुळेच त्यांनी जहाजबांधणी, नेव्हिगेशन आणि मालवाहू जहाजांच्या माध्यमातून व्यापार पद्धती विकसित केली होती. या गोष्टींमुळे ग्रीससारख्या लहानशा देशाने अन्य देशांना मालाची आयात व निर्यात सेवा देऊन जगभरातील जहाज उद्योगात आघाडी घेतली आहे.
प्राचीन काळापासून ग्रीक लोकांना परदेशाशी व्यापार करण्याचे महत्त्व समजले आहे. त्यामुळेच त्यांनी जहाजबांधणी, नेव्हिगेशन आणि मालवाहू जहाजांच्या माध्यमातून व्यापार पद्धती विकसित केली होती.
सध्याच्या वाढत्या बहुध्रुवीय जगात बदलती परिस्थिती आणि भू-राजकीय, आर्थिक, उर्जा व तंत्रज्ञान क्षेत्रातील वातावरणातील हितसंबंधांत होणाऱ्या संघर्षांमुळे बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या देशांना अनिश्चिततेशी सामना करावा लागतो. हे पाहता सध्याच्या आघाड्यांना गृहीत धरता येणार नाही. आज प्रत्येक देशाला आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे, अन्य देशांवरील अवलंबित्व कमी करायचे आहे आणि बाहेरील घटकांमुळे आपल्यावर होणारा परिणाम कमी करायचा आहे. त्यासाठी देशादेशांनी सातत्याने कल्पकता दाखवायला हवी आणि विकासाच्या मार्गावर चालायला हवे.
प्रत्येक देशाची आयात व निर्यात देशाच्या अन्न पुरवठ्याला आणि पायाभूत सुविधांना आधार देत असते. यामुळे अखेरीस देशाच्या वाढीस व विकासास हातभार लागतो. अन्य देशांशी व्यवहार करताना आयात व निर्यात देशाच्या व्यापार क्षमतेच्या आधाराने मोजल्या जातात. कार्यक्षमतेसाठी वस्तू व मालाची खरेदी किंवा विक्री खर्च प्रभावी असण्याची गरज आहे. किफायतशीरतेच्या प्रमुख मापदंडापैकी एक म्हणजे, वाहतूक खर्च. जागतिक व्यापाराचा तब्बल ८० टक्के वाटा समुद्रमार्ग उचलत असल्याने जहाज उद्योग अत्यंत कार्यक्षमतेने वाहतूक खर्चाचे व्यवस्थापन करतो. किफायतशीरतेवर परिणाम करणारे अन्य घटक म्हणजे, जागतिक स्तरावरील पुरवठा साखळीचा प्रवाह आणि संभाव्य निर्बंध.
जहाज उद्योगातील पाच प्रभावी देश म्हणजे, ग्रीस, जपान, चीन, सिंगापूर आणि हाँगकाँग. हे पाच देश जगाच्या एकूण व्यापारापैकी ५३ टक्के व्यापारावर नियंत्रण ठेवतात. ग्रीस हा प्रमुख व्यापारी देशांचा धोरणात्मक भागीदार आहे. या देशाच्या ‘मर्चंट फ्लीट’ सेवा या अमेरिकेच्या आयात-निर्यातीच्या तुलनेत २२ टक्क्यांपेक्षाही अधिक आहेत, युरोपीयन व्यापाराच्या २० टक्क्यांपेक्षाही अधिक आहेत आणि आशियाई व्यापाराच्या ३२ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. यामुळे ग्रीसचा जहाज उद्योग हा जागतिक अर्थव्यवस्थेची आणि व्यापाराची कोनशिला बनला आहे आणि ग्रीसच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनला आहे.
किफायतशीरतेच्या प्रमुख मापदंडापैकी एक म्हणजे, वाहतूक खर्च. जागतिक व्यापाराचा तब्बल ८० टक्के वाटा समुद्रमार्ग उचलत असल्याने जहाज उद्योग अत्यंत कार्यक्षमतेने वाहतूक खर्चाचे व्यवस्थापन करतो.
ग्रीसच्या जहाज उद्योगाने अन्य देशांना आपली जहाजबांधणी आणि जहाजदुरुस्ती करण्यास, तंत्रज्ञान विकसित करण्यास आणि जहाजाचे सुटे भाग व उपकरणे विकसित करण्यास प्रेरणा दिली आहे. या अर्थाने ग्रीसच्या जहाज उद्योगाने या देशांच्या आर्थिक वाढीस मदतच केली आहे. उदाहरणार्थ, ग्रीसने सन २००० पासून चीनच्या जहाजबांधणी उद्योगाकडून १५०० जहाजे खरेदी केली. या माध्यमातून चीनच्या अर्थव्यवस्थेत ७० अब्ज डॉलरचे योगदान दिले. हा दर वर्षी जहाज दुरुस्तीतून मिळालेला अतिरिक्त महसूलात मिळवला जात नाही.
गेल्या १५ वर्षांत चीन जागतिक जहाज उद्योगात आक्रमक सहभागी बनला आहे. आपल्या मर्चंट फ्लीटचा आकार वाढवण्यात चीनने मोठे यश मिळवले आहेच, शिवाय जागतिक मालवाहू क्षेत्रातही प्रवेश केला आहे. जगभरातील ४३ देशांमधील ११७ पेक्षा अधिक धोरणात्मक बंदरांवर चीनचे नियंत्रण आहे. त्यामध्ये अतिरिक्त १२ बंदरे विकसित करण्यात आली आहेत. यामुळे सागरी अर्थकारणावरील चीनचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे पुरवठा साखळीवर वर्चस्व गाजवण्यासही चीन सज्ज झाला आहे.
आव्हानांनी भरलेल्या या जगात भारत आणि ग्रीसने एकत्र येऊन भारताचा जहाज उद्योग विकसित करायला हवा आणि जागतिक स्पर्धा वाढवायला हवी. भारताने स्वतःच्या मालकीच्या मर्चंट फ्लीटची निर्मिती केली, तर जागतिक व्यापारात भारताचे स्थान अधिक मजबूत बनेल. त्याचप्रमाणे संयुक्त प्रकल्प उभय देशांना लाभदायक ठरतील. त्यामध्ये जहाजबांधणी आणि जहाज दुरुस्तीसाठी भारतात नव्या जहाज उद्योगाची उभारणी, जहाजविषयक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि प्रशिक्षण; तसेच जास्तीत जास्त भारतीय खलाशांना रोजगार देणे यांचा समावेश आहे.
भारतीय जहाज उद्योगाचा विकास करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाउले उचलणे गरजेचे आहे.
भारतीय जहाज उद्योगाचा विकास करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यामध्ये बंदरे, आगार (टर्मिनल), गोदामे, शिपयार्ड, बंकरसाठी पुरवठा, स्टोअर, जहाजाचे सुटे भाग आणि वर्कशॉप आदींच्या उभारणीचा समावेश होतो. या पायाभूत सुविधांचा यशस्वीपणे विकास करण्यासाठी पुरेशी सार्वजनिक व खासगी गुंतवणूक आवश्यक आहे. अर्थात त्यासाठी भारताचा कायदा अनुकूल हवा आणि अशा प्रकारच्या प्रकल्पांच्या विकासासाठी गुंतवणूकदारांना कायद्याने अनुमती मिळायला हवी.
परियस हे जागतिक जहाज उद्योगाचे केंद्र असल्याने भारताच्या हिताला चालना देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गटाची स्थापना करणे महत्त्वपूर्ण ठरेल. जागतिक जहाज उद्योगातील दैनंदिन घडामोडींवर आणि बदलांवर लक्ष ठेवणाऱ्या निरीक्षकांचा या गटात समावेश असू शकतो. त्याचप्रमाणे हे निरीक्षक भारताचे स्वतंत्र सागरी धोरण ठरवण्यासाठी आणि भारताच्या मालकीच्या जहाजांच्या ताफ्यांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने एकूण महत्त्वपूर्ण सल्ले देऊ शकतात.
जगातील सर्वांत मोठ्या पॉसिडोनिआ प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रीस साऱ्या जगाला जोडून घेते. या वर्षी या प्रदर्शनात ८१ देशांतील २०३८ जण सहभागी झाले होते. सातत्याने विस्तारणाऱ्या आणि बदलत्या जहाज उद्योगात भारतीयांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण गोष्ट असेल.
स्टेला मॅत्झरी या एएस मरीन लिमिटेडच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.