Author : Sauradeep Bag

Published on Dec 30, 2023 Updated 0 Hours ago

भारताच्या भरभराटीची स्टार्टअप परिसंस्था आणि वाढत्या स्मार्टफोन व इंटरनेट उपलब्धतेसह, भविष्यातील क्रिप्टो केंद्र म्हणून स्थान संपादन करण्याची क्षमता भारतामध्ये आहे.

‘क्रिप्टो’चे अनुसरण करण्याच्या शर्यतीत भारत जगभरात आघाडीवर

तळागाळापर्यंत क्रिप्टो चलन स्वीकारण्यातील भारताचे अग्रगण्य स्थान हे जागतिक क्रिप्टो चलनाच्या वापरासंबंधीच्या चित्रातील उल्लेखनीय प्रवृत्तीचे संकेत देते. तळागाळातील क्रिप्टोचा अवलंब कमी झाल्याचे जगभरातील कल सूचित करत असताना, कमी मध्यम-उत्पन्न देश मात्र याला उल्लेखनीय अपवाद आहेत. भारताने, विशेषत: युवा वर्गाने क्रिप्टो चलन स्वीकारणे ही उल्लेखनीय बाब आहे, विशेषतः युवा वर्गाची जगातील सर्वात मोठी लोकसंख्या ज्या देशात आहे, तिथे हे घडणे विशेष ठरते. क्रिप्टो चलनाच्या परिसंस्थेतील नियामक स्पष्टतेचा अभाव आणि गुंतवणुकीतील अडथळे असूनही, भरभराट होत असलेल्या स्टार्टअप परिसंस्थेसह आणि स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या उपलब्धतेसह, भविष्यातील क्रिप्टो केंद्र म्हणून स्थान संपादन करण्याची क्षमता भारतात आहे.

भारताने, विशेषत: युवा वर्गाने क्रिप्टो चलन स्वीकारणे ही उल्लेखनीय बाब आहे, विशेषतः युवा वर्गाची जगातील सर्वात मोठी लोकसंख्या ज्या देशात आहे, तिथे हे घडणे विशेष ठरते.

‘क्रिप्टो’चे वाढते प्रमाण

क्रिप्टो चलन अनुसरण्यात आशिया आघाडीवर आहे. भारत, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि थायलंड या देशांनी क्रिप्टो सर्वाधिक अनुसरणाऱ्या पहिल्या १० देशांत स्थान संपादन केले आहे. कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक कच्चा व्यवहार आहे, यावरून तळागाळापर्यंत क्रिप्टोचा अवलंब होत आहे, हे ठरवले जात नाही. त्याऐवजी, ज्या देशांत क्रिप्टोचा वापर सरासरी, सर्वसामान्य लोकांद्वारे सर्वाधिक केला जातो, त्या देशांवर प्रकाशझोत टाकण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. या देशांमध्ये क्रिप्टोची वाढ होण्यामागे विविध आणि विलक्षण कारणे आहेत. याकडे पाहण्याचा एक मार्ग म्हणजे एखाद्या राष्ट्रातील क्रिप्टो चलनाची वाढ त्याच्या अनन्य आर्थिक परिस्थितीशी संबंधित असते. पाकिस्तानचेच उदाहरण घ्या; देशातील आर्थिक आव्हानांमुळे बचत जलद कमी होण्यास संवेदनाक्षम आहे. शिवाय, सध्याच्या आर्थिक वातावरणात सामान्य लोकांसाठी मर्यादित गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. भांडवली बाजार व शेअर बाजार घसरला आहे आणि कोणताही आर्थिक नफा महागाईमुळे नाहीसा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती आणि क्रिप्टो चलनाचा अवलंब यांच्यातील एकमेकांवर होणारा सूक्ष्म परिणाम केवळ पाकिस्तानच नव्हे तर संपूर्ण आशियातील क्रिप्टो चित्रावर प्रभाव टाकणारे विविध घटक अधोरेखित करतो.

व्हिएतनाममध्ये क्रिप्टो चलनाच्या वाढीला प्रोत्साहन देणारी परिस्थिती वेगळी आहे. व्हिएतनाममध्ये क्रिप्टो चलनाचे यश हे तेथील नागरिकांसाठी मर्यादित कायदे आणि राष्ट्रीय चलनाबद्दल ऐतिहासिक संशयामुळे उद्भवते. औपचारिक नियमन नसणे हे फायदेशीर असताना, कायदेशीर मार्ग नसल्याने आव्हाने उभी करते. व्हिएतनाममधील बँकेत स्वत:चे खाते नसलेली सुमारे ६९ टक्के इतकी मोठी लोकसंख्या, वित्तीय सेवांकरता क्रिप्टो चलनाचा स्वीकार करते, जगातील विकेंद्रित वित्ताचा वापर सर्वाधिक बनवते.

भारतात विकास होत असल्याचे दिसून येत आहे, विकास साधताना आव्हानेही उभी ठाकतात; काही पैलूंकडे लक्ष देण्याची, सुधारणा घडण्याची आणि सखोल समज निर्माण होण्याची आवश्यकता आहे. भारताच्या ‘जीडीपी’ने ३.७ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठला आणि ती जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात विकसित शेअर बाजार आणि रोखे खरेदी बाजारपेठ आहे, भारतात मजबूत नियम आहेत, पाकिस्तानात तसे नाही आणि भारतात बँकेत स्वत:चे खाते नसणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने कमी होत जात आहे, व्हिएतनाममध्ये तसे नाही. भारतातील क्रिप्टोच्या वाढीवर इंटरनेट आणि स्मार्टफोन उपलब्धतेच्या वाढत्या प्रमाणासह लोकसंख्या वाढीमुळे बदल घडून झालेल्या आर्थिक वाढीचा प्रभाव पडू शकतो.

भारतातील क्रिप्टोच्या वाढीवर इंटरनेट आणि स्मार्टफोन उपलब्धतेच्या वाढत्या प्रमाणासह लोकसंख्या वाढीमुळे बदल घडून झालेल्या आर्थिक वाढीचा प्रभाव पडू शकतो.

भारताचे क्रिप्टो संबंधित चित्र

भारतातील क्रिप्टो चित्रामध्ये, वापरकर्ता म्हणून युवावर्गाचे प्रमाण ४५ टक्के आहे. त्यानंतर २६-३५ वयोगटात ३५ टक्के आणि ३६-४५ श्रेणीमध्ये १३ टक्के आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जवळपास ८ टक्के क्रिप्टो वापरकर्ते १९४६-६४ असे युद्धानंतर जन्मलेल्या पिढीतील आहेत. भारतातील गुंतवणुकीच्या मूल्याच्या बाबतीत क्रिप्टो अवलंबण्यात दिल्ली आघाडीवर आहे, त्या पाठोपाठ तंत्रज्ञानाचे केंद्र असलेले बंगळुरू आणि हैदराबाद आहे. उदयोन्मुख शहरी केंद्रांमध्ये, जयपूर क्रिप्टो अनुसरण्यात अव्वल स्पर्धक म्हणून उदयास आले आहे, लखनौ आणि पुणे हे त्याचे अनुकरण करत आहेत. ही अंतर्दृष्टी केवळ ‘कॉइनस्विच’ वापरकर्त्यांनी दिलेल्या आकडेवारीवरून काढली आहे, जी संपूर्ण भारतीय क्रिप्टो परिसंस्थेचे प्रतिनिधित्व करत नाही. मात्र, भारतीय क्रिप्टोविषयक चित्र समजून घेण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी मौल्यवान कथात्मक दृष्टिकोन देतात.

क्रिप्टोमधील प्रभावशाली वाढीच्या आकड्यांचा काळजीपूर्वक विचार करताना,  परिसंस्थेचे अधिक सूक्ष्म आणि अचूक चित्रण सादर करणे अत्यावश्यक बनते. २०२१ मध्ये, क्रिप्टो चित्राच्या गुंतवणुकीत वाढ झाली. गुंतवणूकदारांनी ३२ क्रिप्टो सौद्यांमध्ये उल्लेखनीय ५१३ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली, ज्याद्वारे एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला, कारण ‘कॉइनडीसीएक्स’ने ऑगस्ट २०२१ मध्ये ९० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निधीच्या फेरीद्वारे युनिकॉर्न दर्जा प्राप्त केला.

मात्र, २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, चलनवाढ आणि नियामक अनिश्चितता यामुळे तयार झालेल्या जागतिक आर्थिक चित्रात बदल झाला. हा कालावधी ‘स्टार्टअप्सकरता कमी झालेल्या भांडवलाचा कालावधी’ म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे सर्व ‘स्टार्टअप्स’करता आव्हाने उभी ठाकली. या आव्हानांमध्ये क्रिप्टो चलनाच्या किमतीत तीव्र घट, प्रमुख बाजारांमधील वाद आणि नियामक संदिग्धता यांचा समावेश आहे. एकत्रितपणे, या घटकांनी क्रिप्टो स्टार्टअप्ससाठी एक मजबूत वातावरण तयार केले आहे, ज्यामुळे विचारांमध्ये गंभीर बदल होत असलेल्या बाजारपेठेवर त्यांचे कुशल दिशादर्शन आवश्यक होते. तरीही, अशी परिस्थिती असूनही भारत क्रिप्टो चलनाचा अव्वल जागतिक अवलंबकर्ता बनला आहे.

क्लिष्ट नियामक आणि कर वातावरण लक्षात घेता, एक प्रमुख क्रिप्टोचलन बाजारपेठ म्हणून भारताचा झालेला उदय लक्षणीय आहे. मागील वर्षात, नियामक संस्थांनी विविध मुद्द्यांवर स्पष्टता व्यक्त केली आहे, ज्यामध्ये क्रिप्टोचलन व्यवहारांसाठी ‘अँटी-मनी लाँडरिंग’ नियम लागू करणे समाविष्ट आहे. भारतात क्रिप्टो चलन उपक्रमांवर बर्‍याच देशांच्या तुलनेत बर्‍याच प्रमाणात उच्च कर दर लादला जातो, नफ्यावर ३० टक्के कर लावला जातो, शेअर्ससारख्या इतर गुंतवणुकीच्या दरांना मागे टाकतो. या व्यतिरिक्त, सर्व व्यवहारांवर १ टक्के कर आहे, ज्याला ‘टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स’- ‘टीडीएस’ म्हणून ओळखले जाते, क्रिप्टो व्यासपीठाने प्रत्येक व्यापारासाठी ही रक्कम वजा करणे आवश्यक आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय बाजारांद्वारे ‘टीडीएस’च्या असमान अंमलबजावणीमुळे, देशी भारतीय बाजारांच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम होऊ शकतो. ‘टीडीएस’ लागू झाल्यानंतर लाखो भारतीय वापरकर्ते ‘ऑफशोअर प्लॅटफॉर्म’वर स्थलांतरित झाले, एकाच ‘ऑफशोअर प्लॅटफॉर्म’वर या अंमलबजावणीनंतर महिन्याभरात ४५०,००० वापरकर्त्यांनी नावनोंदणी केली. ‘टीडीएस’ कर गोळा करण्यातील विसंगती भारतीय वापरकर्त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे आकर्षित करू शकते, जे जुलै २०२२ मध्ये टीडीएस सुरू झाल्यानंतर या बाजारांवरील वेबसाइटला भेट देणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमध्ये दिसून येते.

भारतात 'क्रिप्टो'चे क्षितिज

भारताने विशेषत: युवावर्गाने, क्रिप्टो चलनाचा अवलंब करणे उल्लेखनीय आहे. जागतिक स्तरावर सर्वात जास्त युवा आणि किशोरवयीन लोकसंख्या भारतात आहे हे लक्षात घेता, हे अधिकच वेधक ठरते. क्रिप्टो चलन परिसंस्थेतील नियम आणि गुंतवणुकीच्या बाबतीत अलीकडील आव्हाने असूनही, मजबूत स्टार्टअप वातावरणासह आणि स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या उपलब्धतेसह, भविष्यातील क्रिप्टो केंद्र म्हणून उदयास येण्याची क्षमता भारतात आहे. ही शक्यता अधिक सखोल विश्लेषणाची हमी देते, अनेक समर्पक प्रश्नांना प्रवृत्त करते: ही वाढ भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या डिजिटल चलनाशी (सीबीडीसी) कशी जुळेल? भारताच्या क्रिप्टो कर धोरणाचे परिसंस्थेवर कोणते दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात?, या तंत्रज्ञानाची मोजपट्टी आणि नव्या उत्पादनांचा अवलंब लक्षात घेता‘क्रिप्टो-नेटिव्ह’ लोकसंख्येची कल्पना करणे योग्य आहे का? या घटकांचे परीक्षण केल्याने जागतिक क्रिप्टो चलनविषयीच्या चित्रात भारताच्या गतिशील भूमिकेचे सखोल आकलन होईल. भारतात लोकसंख्या वाढीमुळे बदल घडून झालेल्या आर्थिक वाढीचा प्रभाव केवळ राष्ट्राच्या जागतिक आणि देशांतर्गत आकांक्षांना आकार देण्यातच नव्हे तर क्रिप्टो चलनाच्या सतत विकसित होत असलेल्या चित्रावर प्रभाव टाकण्याबाबतही महत्त्वाचा वाटतो.

सौरदीप बाग हे ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.