Published on Feb 07, 2024 Updated 0 Hours ago

आपल्या परराष्ट्र धोरणाच्या निवडी आणि बहु-संरेखन धोरणाद्वारे, गेल्या दशकात भारताने आपली प्रतिष्ठित सुरक्षा महत्त्वपूर्ण मार्गांनी विणली आहे.

प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेशी संबंधित सुरक्षेवर भारताकडून पुन्हा लक्ष केंद्रित

२०२३ साली भारताने यजमान म्हणून पहिली जी २० शिखर परिषद आयोजित केली. भारताने देशाच्या अनेक भागांमध्ये जी २० चा भाग म्हणून आयोजित केलेल्या २०० हून अधिक सॅटेलाईट इव्हेंट्ससह, नागरिकांमध्ये परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण केले. अर्थात हा जी २० शिखर परिषदेच्या यशाचा एक भाग आहे. २०४७ म्हणजेच राजकीय स्वातंत्र्याच्या शंभरीकडे वाटचाल करत असताना जटिल आणि स्पर्धात्मक भू-राजकीय वातावरणात भारताने आपली रेप्युटेशनल सिक्युरीटी कशी वाढवली आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाचे प्रोफेसर निकोलस जे. कल यांनी परिभाषित केल्यानुसार, प्रतिष्ठित सुरक्षा ही जगातील अशा प्रकारची सुरक्षा आहे ज्याचे मूल्य व्यापक जागतिक समुदायासाठी महत्त्वाचे आहे. कल यांच्या मते, ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह असे प्रतिष्ठेचे दोन घटक असतात. त्यांच्या मते, “प्रतिष्ठा निर्माण करणे ही एक ऑफेन्सिव्ह रणनीती आहे. यात आपले राष्ट्र कोणते आहे तसेच एक राष्ट्र म्हणून आपल्याला काय हवे आहे हे इतर देशांना प्रभावीपणे सांगणे याचा यात समावेश असतो. राष्ट्रीय जीवनातील नकारात्मक पैलू दूर करण्यासाठी आणि देशांतर्गत एक प्रशंसनीय समाज निर्माण करण्यासाठी हा एक बचावात्मक घटक देखील आहे. यासोबतच, तुम्हाला जे नको ते टाळण्यासाठी आणि स्पर्धात्मक डिजिटल जगात फायदा मिळवण्यासाठी हा बचावात्मक पवित्रा वापरला जातो. त्यांचे असेही म्हणणे आहे कि, प्रतिष्ठा ही जगातील अग्रमान्यता आणि जागतिक नेतृत्वासाठी आंतरराष्ट्रीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हे एक साध्य तसेच व्यापक आर्थिक, सुरक्षितता आणि भू-राजकीय उद्दिष्टांचे साधनही आहे.

प्रतिष्ठेची सुरक्षा हा सार्वजनिक मुत्सद्देगिरीचा विस्तार असल्यास यावर चर्चा आणि वादविवाद केला जाऊ शकतो, परंतु त्यासोबतच प्रतिष्ठा ही एखाद्याची सुरक्षा कशी वाढवू शकते ही बाब काळजीपूर्वक विचार करण्यास भागही पाडू शकते. हे लक्षात घेऊन, भारताने, त्याच्या परराष्ट्र धोरणाच्या निवडी आणि त्याच्या बहु-संरेखन धोरणाद्वारे, गेल्या दशकात महत्त्वपूर्ण मार्गांनी आपली प्रतिष्ठा सुरक्षित करण्यासाठी धोरणात्मक गुंतवणूक केली आहे.

प्रतिष्ठेची सुरक्षा हा सार्वजनिक मुत्सद्देगिरीचा विस्तार असल्यास यावर चर्चा आणि वादविवाद केला जाऊ शकतो, परंतु त्यासोबतच प्रतिष्ठा ही एखाद्याची सुरक्षा कशी वाढवू शकते ही बाब काळजीपूर्वक विचार करण्यास भागही पाडू शकते.

यातील पहिली बाब म्हणजे ‘विश्व गुरू किंवा जगाचा गुरू’ होण्याच्या गरजेतून ‘विश्वमित्र’ बनणे ही होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी वेळोवेळी भारत हा ‘जगाचा मित्र किंवा सर्वांचा मित्र’, म्हणजेच ‘विश्व मित्र’ म्हणून उदयास येण्यावर भर दिला आहे. अर्थात अशा बदलांमुळे, असमान नातेसंबंध अधोरेखित होत नाहीत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या दृष्टिकोनात भारताची प्रतिष्ठा कशी वाढवण्यात येईल यावर भर देण्यात आला आहे. कोविड १९ महामारीच्या काळात भारताने पाठवलेल्या लसींचा अनेक देशांना फायदा झाला तसेच भारताने जी २० चे यजमानपद भूषवताना एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या थीमचा यथार्थ वापर केला यातूनच भारताने आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी उचललेल्या पावलांचे दर्शन झाले. भूराजकीय बाबी या फक्त आपल्या देशापुरत्या मर्यादित नसतात. तर यात इतर राष्ट्रांसोबत सहकार्य तसेच मित्र म्हणून एकमेकांसाठी उपस्थित राहण्याचा हा उपक्रम एखाद्याच्या प्रतिष्ठेच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो. जी २० या जागतिक बहुपक्षीय मंचामध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश ही एक सर्वाधिक चर्चिली गेलेली बाब आहे. खरेतर हे फार पूर्वी व्हायला हवे होते. याद्वारे भारताने सामूहिक दृष्टी आणि समावेशकता कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे दाखवून दिले आहे. या बदलाचा अर्थ भारताच्या पुर्वापार चालत आलेल्या स्वदेशी योगदानाला कमी लेखणे किंवा स्वतःचा मार्ग तयार करण्यापासून रोखणे असा होत नाही. पण याद्वारे जागतिक स्तरावर परस्पर सहकार्य आणि जनमत निर्माण करणे यावर भर देण्यात आला आहे.

दुसरी बाब म्हणजे वर्तणुकीतील बदलाद्वारे हवामान बदल रोखण्यामध्ये भारताने दिलेले योगदान होय. भारताने आपल्या हवामान उद्दिष्टांप्रती आपली दृढ वचनबद्धता कायम ठेवली आहे तसेच हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत मदत करणाऱ्या वर्तणुकीतील बदलाचे महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. खरेतर, वर्तणुकीत बदल होण्यास वेळ लागेल, परंतु असे झाले तर दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण होण्यास मदत होईल. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय म्हणून सौरऊर्जेचा वापर केला जातो. हा वापर सामान्य घरगुती उद्दिष्टांसाठी कसा केला जाऊ शकतो यावर भारताच्या मिशन लाईफ  (पर्यावरणासाठी जीवनशैली) या उपक्रमात भर देण्यात आला आहे. आज वीज निर्मितीसाठी घराच्या किंवा इमारतीच्या छतावर सौर पॅनेलचा वापर केला जातो. भारताने जागतिक स्तरावर शाश्वत ऊर्जा पद्धतींबाबत आपली वचनबद्धता दर्शवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातील देशांना सौर पॅनेल भेट दिली आहेत. याद्वारे भारताने आपले प्रयत्न सीमेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या पद्धतींमुळे कमी विकसित देशांच्या सक्षमीकरणास हातभार लागला आहे.  

भारताने जागतिक स्तरावर शाश्वत ऊर्जा पद्धतींबाबत आपली वचनबद्धता दर्शवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातील देशांना सौर पॅनेल भेट दिली आहेत. याद्वारे भारताने आपले प्रयत्न सीमेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

तिसरी बाब म्हणजे, जी २० चे अध्यक्षपद भुषवण्याआधी भारताने व्हॉईस ऑफ द ग्लोबल साउथ समिटचे आयोजन केले होते, ज्याचा उद्देश वर्षभराच्या अध्यक्षपदासाठी आपली दृष्टी स्पष्ट करणे हा होता. या समिटमध्ये ग्लोबल साउथमधील एकूण १२५ देश सहभागी झाले होते. तसेच जी २० नंतर, भारताने व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या सेकंड एडिशनचेही आयोजन केले होते. दुसऱ्या शिखर परिषदेच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे विकास आणि ज्ञान सामायिकरण उपक्रमाशी संबंधित ‘दक्षिण’ (डेव्हलपमेंट अँड नॉलेज शेअरिंग इनिशीएटिव्ह) या ग्लोबल साउथ सेंटर ऑफ एक्सलन्स या थिंक टँकचे उद्घाटन हे होते. ‘दक्षिण’ या थिंक टँकने ज्ञान आणि विकास उपक्रमांचे भांडार म्हणून काम करणे अपेक्षित आहे व त्यामुळे विकसनशील राष्ट्रांमध्ये अधिक सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे. जी २० नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन हे ५० टक्क्यांहून अधिक केवळ ग्लोबल साउथच्या गरजांशी संबंधित आहे, असे भारताच्या माजी अनुभवी परराष्ट्र अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. असे असले तरी, त्याचे विवेकपूर्ण मूल्यमापन जी २० च्या नवी दिल्ली घोषणेच्या निर्णयांच्या अंमलबजावणीनंतरच शक्य आहे. भारताने उचललेल्या या पावलांमुळे भारत प्रतिष्ठेच्या सुरक्षेबाबत किती गंभीरपणे विचार करत आहे, हे स्पष्ट झाले आहे. यासोबतच भारताने ग्लोबल साउथमध्ये आपल्या धोरणात्मक दळणवळण क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणे गरजेचे आहे. असे झाल्यास याचा फायदा पुढे जनमत सक्षम करण्यासाठी होऊ शकतो.

चौथी बाब म्हणजे, सार्वजनिक आरोग्याची काळजी आणि स्वच्छता (स्वच्छ भारत मिशन), पाण्याची उपलब्धता, वीजेची उपलब्धता, आरोग्य आणि बहुआयामी दारिद्र्य कमी करण्याच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक उपक्रमांद्वारे, भारताने युएन शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्राप्तीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. निती आयोग या सरकारच्या अधिकृत थिंक टँकने मुख्य मूल्यमापन यंत्रणा आणून या उद्दिष्टांचा पाठपुरावा करत, या उपक्रमांमध्ये अग्रभागी असलेल्या, परफॉर्मर्स आणि अस्पॅरेंट्स अशा कॅटेगरीजनुसार राज्यांचे वर्गीकरण केले आहे. याशिवाय, सरकारचा महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम सर्वांगीण शाश्वत विकास उद्दिष्टांसोबत संरेखित आहे. असे असले तरी, या सर्व प्रयत्नांसह भारतातील अनेक राज्ये त्यांची सामाजिक आव्हाने सोडवण्यासाठी परदेशातील तज्ञांची मदत घेऊन ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रचनात्मक योगदान देत आहेत.

निती आयोग या सरकारच्या अधिकृत थिंक टँकने मुख्य मूल्यमापन यंत्रणा आणून या उद्दिष्टांचा पाठपुरावा करत, या उपक्रमांमध्ये अग्रभागी असलेल्या, परफॉर्मर्स आणि अस्पॅरेंट्स अशा कॅटेगरीजनुसार राज्यांचे वर्गीकरण केले आहे.

सर्वात शेवटी, बहुपक्षीयतेवर भारताने दिलेला भर अधोरेखित करणे गरजेचे आहे. भारताने धोरणानुसार स्वतःला दिशा देण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला थेट विरोध न करता संभाषण आणि सहकार्याला अनुकूल असल्याचे दाखवण्यासाठी आपल्या धोरणात्मक संप्रेषणाच्या प्रयत्नांमध्ये बरेचसे प्रयत्न केले आहेत. कोणतीही एक व्यक्ती किंवा राष्ट्र जगातील सर्व समस्या सोडवू शकत नाही, याबद्दल परराष्ट्र धोरण तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यासाठी सहयोगी विचार आणि समस्या सोडवण्याची गरज आहे आणि भारत त्यासाठी वचनबद्ध आहे.

आजच्या संदर्भात सैद्धांतिक फ्रेमवर्कच्या प्रासंगिकतेवर लक्ष केंद्रित करताना भारताने स्वतःची प्रतिष्ठा सुरक्षित करण्याच्या दिशेने घेतलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा योजनांचे व उपक्रमांचे स्वागत ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थकडूनही केले जाणार आहे. भारत केवळ पाश्चिमात्य आणि उच्चभ्रू लोकांपुरता मर्यादित न राहता जगभरातील सर्व भागांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आपल्या प्रतिष्ठेच्या सुरक्षेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण करत आहे. हे करत असताना भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे पण जागतिक स्थिरता आणि कृतीद्वारे सहकार्याची दृढ वचनबद्धता हे येणाऱ्या भविष्याला तोंड देण्यासाठी योग्य प्रतिसाद ठरणार आहे.

सुदर्शन रामबद्रन हे पॉलिसी एक्सपर्ट, लेखक आणि इंटरनेशनल कम्युनिकेशन तसेचं पब्लिक डिप्लोमेसी प्रोफेशनल आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sudarshan Ramabadran

Sudarshan Ramabadran

Sudarshan Ramabadran is a policy expert, author and international communications and public diplomacy professional. The views expressed are his own. ...

Read More +