जसजसं 2024 जवळ आलं तसतसं आरोग्यसेवेत एक द्वंद्व वाढीस लागलं आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि नवकल्पना अभूतपूर्व वैद्यकीय क्षमतांचे भविष्य सूचित करतात. मात्र तरीही ही प्रगती सहसा श्रीमंत लोकांच्या आवाक्यातच राहते. हेल्थकेअरची आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), जीन एडिटिंग आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करणं सामन्यांना शक्य नाही आणि फरक तीव्रपणे जाणवतो. यातून 2024 मध्ये आरोग्य सेवा कशा असतील याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे इतकी प्रगती असूनही, सर्वांना समान आरोग्यसेवा मिळणं शक्य नाही. त्यामुळे या गुणवत्तेवर आर्थिक विषमतेचा प्रभाव कसा पडतो हे जाणून घेतलं पाहिजे जेणेकरून आरोग्यसेवा नवकल्पना केवळ काही लोकांसाठी लक्झरी बनणार नाहीत आणि भविष्याला आकार येईल.
ट्रेंड 1 : जनरेटिव्ह एआय आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन
2024 मध्ये हेल्थकेअर क्षेत्र जनरेटिव्ह एआय आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा वापर आणखी पुढे नेण्यासाठी सज्ज आहे. ही चळवळ रुग्णांची काळजी आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने वाढवली जातं आहे. जनरेटिव्ह एआय, विशेषत: लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) आणि लार्ज मेडिकल मॉडेल्स (LMMs) द्वारे, रुग्णाच्या डेटावर प्रक्रिया आणि काळजी कशी घेतली जाते यामध्ये परिवर्तन करून आरोग्यसेवेत क्रांती घडवून आणेल. हे एआय टूल्स हॉस्पिटलमधील मृत्यूचा अंदाज लावण्यात, हॉस्पिटलमधील रुग्णांचा मुक्काम ठरवण्यात आणि वैद्यकीय दाव्यांची प्रक्रिया करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे जगभरातील आरोग्य सेवा संस्थांची कार्यक्षमता वाढेल.
हेल्थकेअर क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), जीन एडिटिंग, आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यांसारख्या गोष्टींमुळे क्रांतिकारी बदल झाले असले तरी यात समानता नसून गरीब श्रीमंत असा मोठा फरक आहे.
ही प्रगती असूनही हेल्थकेअरमध्ये डिजिटल परिवर्तनाला स्वतःची आव्हानं आहेत. या तंत्रज्ञानाच्या असमान एकीकरणामुळे समृद्ध समाज आणि इतरांमधील आरोग्यसेवा सुलभता अंतर वाढू शकते, ज्यामुळे जनरेटिव्ह एआयच्या वेगाने विकसित होत असलेल्या नियामक आणि सुरक्षिततेच्या पैलूंबद्दल चिंता निर्माण होऊ शकते. शिवाय, ग्लोबल साउथमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रभाव जागतिक आरोग्य सेवा इक्विटीबद्दल प्रश्न निर्माण करतो. जनरेटिव्ह एआयमध्ये आरोग्यसेवेचे लोकशाहीकरण करण्याची क्षमता असताना, संसाधन वितरणातील असमानता श्रीमंत राष्ट्रांसाठी त्याचे फायदे मर्यादित करू शकते, ज्यामुळे जागतिक आरोग्य असमानता वाढू शकते. या आव्हानांना तोंड देण्यासाठी जनरेटिव्ह एआय आणि डिजिटल हेल्थकेअर टूल्स महत्वाचे आहेत. त्यांच्या माध्यमातून आरोग्यसेवा फायदेशीर आणि सेवेचं समान वितरण करता येऊ शकतं. हे तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि नियामक फ्रेमवर्कमधील गुंतवणुकीद्वारे जागतिक स्तरावर न्याय्य आरोग्य सेवा परिणाम सुनिश्चित करण्यासाठी केले जाऊ शकते.
ट्रेंड 2: विलीनीकरण, अधिग्रहण आणि उद्योग एकत्रीकरण:
2024 मध्ये, आरोग्य सेवांमध्ये आर्थिक अडचणी आल्यामुळे विलीनीकरण आणि अधिग्रहण अशा मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. ही प्रवृत्ती मोठ्या, अधिक एकात्मिक आरोग्य सेवा प्रणालीच्या निर्मितीकडे जाते. आणि यातून सेवांच सुधारित वितरण आणि कार्यक्षमता वाढते. पण आरोग्यसेवेचे व्यावसायीकरण झाल्यामुळे कमी-उत्पन्न गटांसाठी सुविधा कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. मूल्य-आधारित काळजीकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. आरोग्य सेवा संस्था रुग्णांच्या काळजीची गुणवत्ता वाढवणाऱ्या धोरणांना प्राधान्य देतात. याव्यतिरिक्त, दूरस्थ रुग्णांचे निरीक्षण आणि मानसिक आरोग्य सेवेवर भर वाढला आहे. मात्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाद्वारे या गोष्टी सुलभ होत आहेत. हेल्थकेअर क्षेत्रात नव्या कंपन्यांचा सहभाग जसं की टेक कंपन्या आणि खाजगी इक्विटी फर्म्स यामुळे विलीनीकरण आणि अधिग्रहणांना आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
या तंत्रज्ञानाच्या असमान एकीकरणामुळे समृद्ध समाज आणि इतरांमधील आरोग्यसेवा सुलभता अंतर वाढू शकते. जनरेटिव्ह एआयच्या वेगाने विकसित होत असलेल्या नियामक आणि सुरक्षिततेच्या पैलूंबद्दल चिंता निर्माण होऊ शकते.
दुर्दैवाने आर्थिक दबावामुळे उद्योग एकत्रीकरण करून रवांडातील अनेक नवे उपक्रम बंद झाले. मात्र क्रॉस-सबसिडी मॉडेलवर काम करून त्यांनी कमी उत्पन्न असलेल्या स्वतःच्या देशात इक्विटी वाढविण्यासाठी उल्लेखनीय काम केलं. आरोग्य सेवा क्षेत्रातील हे एक महत्त्वपूर्ण आव्हान होतं जे योग्य पद्धतीने पार पाडण्यात आलं. हेल्थकेअर इक्विटीला प्राधान्य देणार्या नाविन्यपूर्ण मॉडेलला समर्थन देणं आणि ते टिकवून ठेवण्याच्या गरजेसह कार्यक्षमतेसाठी आणि विस्तारासाठी मोहिमेचा समतोल साधणे खूप गरजेचं असतं. 2024
मध्ये हेल्थकेअर हे अगदी डायनॅमिक पद्धतीने विकसित होऊ लागलं आहे. मात्र यामुळे इक्विटी कमी होणार नाही याची खात्री करण्यासाठी काळजीपूर्वक मार्ग निवडावा लागेल. विशेषत: अशा प्रदेशांमध्ये नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा उपायांची सर्वाधिक गरज आहे.
ट्रेंड 3: आरोग्य कर्मचारी आव्हाने आणि आउटसोर्सिंग
2024 मध्ये, आरोग्य सेवा क्षेत्राला अधिक तीव्र कर्मचार्यांच्या आव्हानांना सामोरं जावं लागण्याची अपेक्षा आहे. यात प्रतिभावंतांचा तुटवडा आणि क्लिनिशियन बर्नआउट, आरोग्यसेवा नोकऱ्यांचे मागणी असलेले स्वरूप, आरोग्यसेवा व्यावसायिकांची वृद्ध लोकसंख्या आणि COVID-19 साथीच्या रोगाचा दीर्घकालीन प्रभाव. हे सगळे घटक आरोग्यसेवेवर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा संसाधनांवर आणि कर्मचाऱ्यांवर लक्षणीय ताण आहे. आरोग्य सेवा संस्था या आव्हानांना तोंड देण्यासाठी धडपडत असताना, आउटसोर्सिंग, बिलिंग, कोडिंग आणि क्लेम प्रोसेसिंग यांसारख्या प्रशासकीय कार्यांकडे कल वाढतो आहे.
आउटसोर्सिंग करण्यामुळे सेवेच्या गुणवत्तेत विसंगती निर्माण होऊ शकते. जर आउटसोर्स केलेल्या सेवांमध्ये इन-हाऊस टीम्सप्रमाणे देखरेख किंवा कौशल्याचा अभाव असेल तर गोष्टी आणखीन बिघडण्याची शक्यता निर्माण होते.
पण आउटसोर्सिंग करण्यामागे बरीच कारणं आहे. हे अल्प-मुदतीचे आर्थिक सवलत आणि ऑपरेशनल फायदे प्रदान करू शकते. पण कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता वाटत नाही त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. आउटसोर्सिंग करण्यामुळे सेवेच्या गुणवत्तेत विसंगती निर्माण होऊ शकते. जर आउटसोर्स केलेल्या सेवांमध्ये इन-हाऊस टीम्सप्रमाणे देखरेख किंवा कौशल्याचा अभाव असेल तर गोष्टी आणखीन बिघडण्याची शक्यता निर्माण होते. शिवाय, ही प्रवृत्ती आरोग्यसेवेतील आधीपासूनच असलेली असमानता वाढवू शकते. यामुळे आर्थिक क्षमतेवर आधारित आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि उपलब्धता प्रभावित होते. आउटसोर्सिंग धोरणांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी श्रीमंत आरोग्य सेवा संस्था पुढे असतात. कारण लहान किंवा कमी निधी असलेल्या सुविधा सेवेत गुणवत्ता राखण्यासाठी संघर्ष
करावा लागतो. तेच श्रीमंत आरोग्य सेवा संस्थाना अशा अडचणी येतं नाहीत. त्यामुळे विविध सामाजिक-आर्थिक गटांमधील आरोग्यसेवा प्रवेश आणि गुणवत्तेतील अंतर वाढते.
ट्रेंड 4: सीआरआयएसपीआरचे नवीन धोरण: 2024 आणि त्यापुढील मोठी झेप
आरोग्यसेवेतील सीआरआयएसपीआरचे भविष्य, विशेषत: युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) च्या CRISPR/Cas9 जनुक-संपादित उपचारांना मान्यता मिळाल्याने, अनुवांशिक विकारांच्या व्यवस्थापनात क्रांती घडेल. सिकल सेल ॲनिमिया उपचारांमध्ये तंत्रज्ञानाच्या जटिल प्रक्रियांचा समावेश होतो आणि अनुवांशिक कमतरता भरून काढण्यासाठी रुग्णांच्या हेमॅटोपोएटिक स्टेम पेशींना लक्ष्य केले जाते. हे तंत्रज्ञान औषध क्षेत्रात झालेली लक्षणीय प्रगती दर्शविते. ज्यांची अवस्था गंभीर आहे अशांना आशा देते. परंतु या उपचारांचा खर्चही तितकाच आहे. ही उपचारपद्धती, घेण्यासाठी एका रुग्णाला 2 दशलक्ष युएस डॉलर खर्च करावे लागतात. आरोग्यसेवा प्रवेश आणि परवडण्यामध्ये लक्षणीय असमानता अधोरेखित करतात. विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सिकलसेल ॲनिमिया असणारे बहुतेक रुग्ण सापडतात.
सीआरआयएसपीआर तंत्रज्ञानात विकास करत आहे. जसं की प्राइम एडिटिंग आणि एपिजेनोम एडिटिंग, संभाव्य हेल्थकेअर ऍप्लिकेशन्सचा विस्तार, अधिक लवचिक आणि अचूक जीनोम संपादन, डीएनएचा क्रम न बदलता जीन बदलणं आदी गोष्टी सुरू आहेत.
सीआरआयएसपीआर तंत्रज्ञानात विकास करत आहे. जसं की प्राइम एडिटिंग आणि एपिजेनोम एडिटिंग, संभाव्य हेल्थकेअर ऍप्लिकेशन्सचा विस्तार, अधिक लवचिक आणि अचूक जीनोम संपादन, डीएनएचा क्रम न बदलता जीन बदलणं आदी गोष्टी सुरू आहेत. मात्र विकसनशील जगात याचे परिणाम चिंतेचा विषय आहेत. हे तंत्रज्ञान अनुवांशिक विकारांवर नवीन उपचारांचे आश्वासन देत असले तरी, त्यांचा खर्च जागतिक आरोग्यसेवा विषमतेची दरी आणखी वाढवू शकते. जसं की सीआरआयएसपीआरमुळे जनुक संपादन विज्ञानातील एक नवीन युग सुरू होत असताना हे उपचार आर्थिक दृष्ट्या परवडतील याची काहीच तजवीज केली जात नाहीये. त्यामुळे याचे फायदे श्रीमंत समाजांपुरते मर्यादित राहण्याचा धोका आहे.
पुढे जाण्याचा मार्ग
संपूर्ण इतिहासात, आरोग्यसेवा हा बहुधा श्रीमंत लोकांचा विशेषाधिकार राहिला आहे. आणि ही प्रवृत्ती 2024 पर्यंत चालूच आहे. ऐतिहासिकदृष्ट्या बघायचं तर, 19 व्या शतकात वैद्यकशास्त्रात क्रांती होईपर्यंत वैद्यकीय पद्धती अप्रमाणित कल्पनांवर आधारित होत्या. मात्र नंतरच्या काळात नफ्यासाठी असलेल्या खाजगी वैद्यकीय शाळांचा उदय झाला. त्यांनी रुग्णसेवेपेक्षा नफ्यावर भर दिल्याने आरोग्य सेवा उद्योगात बदल झाला. आज या क्षेत्रात लक्षणीय प्रगती असूनही आरोग्यसेवा प्रणाली अनेकदा समान प्रवेश सुनिश्चित करण्याच्या आव्हानाचा सामना करते. हा ट्रेंड आधुनिक आरोग्यसेवेसाठी घातक आहे. नाविन्यपूर्ण उपचार आणि तंत्रज्ञान बहुतेकदा श्रीमंत लोकांसाठीच असतात. आरोग्यसेवेला श्रीमंत माणसाचा खेळ म्हणून कायम ठेवतात. ज्या पद्धतीने टेस्लाने मुक्त-स्रोत दृष्टिकोन ठेऊन इलेक्ट्रिक वाहन उद्योगात क्रांती घडवून आणली त्याप्रमाणे आरोग्य सेवा क्षेत्रात अधिक न्याय्य प्रवेशासाठी क्रांती घडू शकते.
ओमन सी. कुरियन हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ फेलो आणि हेल्थ इनिशिएटिव्हचे प्रमुख आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.