Author : Shoba Suri

Published on Feb 06, 2024 Updated 0 Hours ago

पिढ्यानुपिढ्या चालणारे गरिबीचे चक्र संपवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या कुपोषणाचे निर्मूलन करण्यासाठी, धोरणकर्त्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये वाढ करण्याची गरज आहे.

२०३० कडे वाटचाल: जागतिक अन्न सुरक्षा आव्हाने समजून घेताना

आजच्या घडीला हवामान बदल आणि संसाधनांच्या ऱ्हासापासून ते आर्थिक विषमता आणि भू-राजकीय तणावापर्यंत परस्पर संबंधित असलेल्या समस्यांमधील जटिल संबंधांना जग सामोरे जात आहे. या आव्हानांमुळे सर्वांना सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेशा प्रमाणात अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. सुमारे ९२४ दशलक्ष लोकसंख्येला (जगाच्या लोकसंख्येच्या ११.७ टक्के) तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. यात पुढे कोविड महामारीपासून २०७ दशलक्षांची वाढ झाली आहे. एका बाजूस आपल्यासमोर अनेक दशकांची प्रगती असून देखिल, आजही जग कुपोषण, लठ्ठपणा, आहार आणि सूक्ष्म पोषक घटकांशी संबंधित पोषणाची कमतरता या तिहेरी आव्हानाला तोंड देत आहे. येणाऱ्या काळात भूक आणि अन्न असुरक्षिततेविरुद्धच्या लढ्यासाठी सतत आणि लक्ष्यित प्रयत्नांची आवश्यकता असणार आहे. यात आशिया आणि उप-सहारा आफ्रिकेसारख्या प्रदेशात जिथे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या तीव्र भुकेने ग्रस्त आहे तिथे विशेष प्रयत्न घेण्याची गरज आहे. यात कुपोषण कमी झाल्यास त्याचे आरोग्य आणि गरिबी निर्मुलनावर सकारात्मक परिणाम होतात, हे लक्षात घेण्याजोगे आहे.

येणाऱ्या काळात भूक आणि अन्न असुरक्षिततेविरुद्धच्या लढ्यासाठी सतत आणि लक्ष्यित प्रयत्नांची आवश्यकता असणार आहे. यात आशिया आणि उप-सहारा आफ्रिकेसारख्या प्रदेशात जिथे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या तीव्र भुकेने ग्रस्त आहे तिथे विशेष प्रयत्न घेण्याची गरज आहे.

शाश्वत विकास लक्ष्ये (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स - एसडीजी) २.२. मध्ये “सर्व प्रकारचे कुपोषण संपवण्यावर” भर देण्यासाठी सहा जागतिक पोषण लक्ष्यांचा सेट निश्चित करण्यात आला आहे. एसडीजी अजेंडा २०३० शी संरेखित करण्यासाठी डब्लूएचए लक्ष्ये २०३० पर्यंत वाढवण्यात आली आहेत. प्रौढांमधील लठ्ठपणा आणि एनसीडी ( नॉन कम्युनिकेबल डिसीज - असंसर्गजन्य रोग) यांच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर, प्रौढांमधील लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच याद्वारे २०२५ पर्यंत एनसीडीचा धोका २५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी डब्लूएचए लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहेत.

आजमितीस, सुमारे ७३५ दशलक्ष लोक किंवा जागतिक लोकसंख्येच्या ९.२ टक्के लोक कुपोषित आहेत.
आफ्रिकेत कुपोषणाचा दर सर्वाधिक म्हणजे जवळपास २० टक्के आहे, तर त्याखालोखाल आशिया (८.५ टक्के), लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन (६.५ टक्के), आणि ओशनिया (७.० टक्के) यांचा क्रमांक लागतो. २०३० पर्यंत सुमारे ६०० दशलक्ष लोक तीव्र कुपोषणाने ग्रस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरेतर एसडीजीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यामधील ही सर्वात मोठी अडचण आहे. युक्रेनमधील युद्धाचा थेट परिणाम सुमारे २३ दशलक्ष लोकांवर झाला आहेत. त्याचप्रमाणे, कोविड महामारी आणि इतर संघर्षांमुळे सुमारे ११९ दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले. २०१९ ते २०२० पर्यंत वाढ झाल्यानंतर जागतिक स्तरावरील मध्यम किंवा गंभीर अन्न असुरक्षिततेचे प्रमाण सलग दुसऱ्या वर्षी स्थिर राहिले आहे. असे असले तरी, महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षा हे २५.३ टक्क्यांहून अधिक आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्स (जीएचआय) २०२३ नुसार जगभरात भूक मध्यम पातळीवर आहे. सब-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियामधील भूकेची पातळी गंभीर म्हणजेच जीएचआय २७ वर आहे. युरोप आणि मध्य आशियामध्ये हा जीएचआय २०२३ स्कोर सर्वात कमी म्हणजेच ६.१ आहे. हा दर कमी आहे असे मानले जाते.

जॉईंट मालन्युट्रीशिअन एस्टिमेट २०२३ नुसार, पाच वर्षांखालील मुलांपैकी एकूण १४८.१ दशलक्ष (२२.३%) मुलांवर स्टंटिंगचा परिणाम झाला आहे. २०२२ मध्ये अंदाजे ४५ दशलक्ष (६.८ टक्के) मुलांमध्ये वेस्टिंगचे प्रमाण कायम आहे. २०२० पासून २०२२ पर्यंत ३७ दशलक्ष (५.६ टक्के) मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण किंचित कमी झाले आहे (आकृती १).

आकृती १ – स्टंटिंग, वेस्टिंग आणि अतिलठ्ठपणा यांचा परिणाम झालेल्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या.

A comparison of a graph Description automatically generated with medium confidence

स्रोत: युनिसेफ / डब्ल्यूएचओ / जागतिक बँक ग्रुप जॉईंट चाईल्ड मालन्युट्रिशन एस्टिमेट्स, 2023

गेल्या २० वर्षांत स्टंटिंगचे प्रमाण कमी झाले आहे. परंतू, काही प्रदेशांमध्ये पाच वर्षांखालील मुलांमध्ये स्टंटिंगचे प्रमाण अजूनही जास्त आहे. यात आशिया (७६.६ दशलक्ष) आणि आफ्रिका (६३.१ दशलक्ष) यांमध्ये दर सर्वाधिक आहेत. गरिबी आणि असमानता, आरोग्यसेवेचा अभाव आणि वाढती अन्न असुरक्षितता या कारणांमुळे उप-सहारा आफ्रिकेतील स्टंटिंगचे प्रमाण वाढले आहे. यात दक्षिण आशिया हे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहे.  यात एकूण प्रादुर्भाव जागतिक व्याप्तीपेक्षा २२ टक्के अधिक आहे. येथे १० पैकी तीन मुले खुंटलेली आहेत. आशियातील उपप्रदेशांमध्ये लठ्ठपणाचे सरासरी प्रमाण सर्वात कमी म्हणजेच २.५ आहे. दक्षिण आशिया उपप्रदेशात वेस्टिंगचे प्रमाण १४.१ टक्के आहे, जे जागतिक सरासरीच्या ६.७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एकूणच, आहारातील विविधता, मॅटरनल एज्युकेशन आणि कौटुंबिक गरिबीची पातळी हे दक्षिण आशियातील बालकांच्या वाढीच्या दरातील फरक स्पष्ट करणारे मुख्य घटक आहेत. याशिवाय, दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिकन प्रदेशामध्ये लहान मूले आणि मातांमधील पोषण व स्वच्छतेची कमतरतेचा स्टंटिंग हा परिणाम आहे.

दक्षिण आशिया हे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहे.  यात एकूण प्रादुर्भाव जागतिक व्याप्तीपेक्षा २२ टक्के अधिक आहे. येथे १० पैकी तीन मुले खुंटलेली आहेत.

जगभरात, ४५ दशलक्ष म्हणजेच ६.८ टक्के पाच वर्षांखालील मुले वेस्टेड आहेत. दक्षिण आशियामध्ये अंडर फाईव्ह वेस्टिंगचे प्रमाण ५६ टक्के (२५.१ दशलक्ष) तर आफ्रिकेत हे प्रमाण २७ टक्के आहे. आशियातील ३१.६ दशलक्ष कुपोषित मुलांपैकी जवळपास ८० टक्के मुले दक्षिण आशियामध्ये राहतात. दक्षिण आशियातील पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की मातेचा कमी बॉडी मास इंडेक्स, कमी उंची, कमी सांपत्तिक स्थिती आणि मातृशिक्षणाचा अभाव हे पाच वर्षाखालील मुलांमधील कुपोषणाशी संबंधित आहे. कोविड-१९ च्या प्रभावामुळे दक्षिण आशियातील सुमारे ५८ टक्के मुले तसेच उप-सहारा आफ्रिकेतील अंदाजे २२ टक्के मुलांच्या कुपोषणाच्या प्रमाणात १४.३ टक्क्याने (६.७ दशलक्ष) वाढ झाल्याचा लॅन्सेटचा अंदाज आहे.

पाच वर्षाखालील मुले तसेच प्रौढांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. पाच वर्षांखालील मुले आणि प्रौढांमध्ये अधिक वजन असण्याचे ओझे वाढत आहे. जागतिक स्तरावर, पाच वर्षांखालील सुमारे ३७ दशलक्ष (५.६ टक्के) मुलांचे वजन जास्त आहे. एकूण जागतिक लोकसंख्येच्या जवळपास निम्मे लोक आशियामध्ये राहतात (१७.७ दशलक्ष). तर त्याखालोखाल आफ्रिकेचा (१०.२ दशलक्ष) क्रमांक लागतो. २०१२ ते २०२२ या दशकात ओशनिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये अधिक वजन असलेल्या मुलांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे ट्रेंड्सनी सूचित केले आहे. गेल्या दशकात हे प्रमाण ओशनियामध्ये ९.३ दशलक्षावरून १३.९ दशलक्षावर आणि ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये १२.४ दशलक्षावरून १९.३ दशलक्ष इतके वाढले आहे. मुलांमधील लठ्ठपणा कमी करण्यासाठी निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याबाबत बहुतांश प्रदेश ऑफ-ट्रॅक आहेत.

दक्षिण आशियातील पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की मातेचा कमी बॉडी मास इंडेक्स, कमी उंची, कमी सांपत्तिक स्थिती आणि मातृशिक्षणाचा अभाव हे पाच वर्षाखालील मुलांमधील कुपोषणाशी संबंधित आहे.

जागतिक पोषण लक्ष्यांपैकी, २०२५ पर्यंत किमान ५०-टक्के दर केवळ एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफिडींगबाबातच गाठण्यात आल्याचे दिसून आले आहे. २०२१ मध्ये, जगभरातील ४७.७ टक्के मुलांना एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफिडींग देण्यात आले आहे. याचे प्रमाण दक्षिण आशिया, पूर्व आफ्रिका आणि दक्षिणपूर्व आशियात जागतिक सरासरीपेक्षा अनुक्रमे ६०.२, ५९.१ आणि ४८.३ टक्के आहे. उत्तर अमेरिका, ओशनिया आणि पश्चिम आशिया हे प्रदेश आजही अनेक बाबतीत ऑफट्रॅक आहेत. आशिया, लॅटिन अमेरिका आणि ओशनियाच्या काही भागांमध्ये बालपणातील लठ्ठपणाचा कल वाढत चालला आहे.

आकृती २ - जागतिक पोषण लक्ष्यांमधील प्रगती

स्त्रोत – एफएओ २०२३

जगभरात जन्मलेल्या जवळजवळ १५ टक्के मुलांचे जन्मतःच वजन २५०० ग्रॅमपेक्षा कमी आहे. अलिकडच्या दशकांमध्ये याचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आशिया, उप-सहारा आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या तीन मुख्य प्रदेशात बालकांचे जन्माच्या वेळेचे वजन कमी आहे. हे प्रमाण अनुक्रमे २४.४, १३.९ आणि ९.६ टक्के आहे. २०३० पर्यंत लो बर्थ वेट ३० टक्क्यांनी कमी करण्याबाबतची प्रगती मंदावली आहे. यातूनच अनेक गर्भधारणा, संक्रमण आणि असंसर्गजन्य रोगांमुळे जन्मतः वजन कमी असणे, नवजात बालकांचा मृत्यू इ. नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. प्रसूतीपूर्व काळजी आणि सेवा, पोषणविषयक समुपदेशन आणि नवजात बालकांची प्राथमिक काळजी यांसारखे उपचार या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

प्रौढांमधील लठ्ठपणा सर्व प्रदेशांमध्ये वाढत आहे. तो गेल्या चार दशकांमध्ये तिप्पट झाला आहे. आजच्या घडीला जगातील एक अब्जाहून अधिक लोक लठ्ठ आहेत. यात ६५० दशलक्ष प्रौढ, ३४० दशलक्ष किशोरवयीन आणि ३९ दशलक्ष मुलांचा समावेश आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. २०२५ पर्यंत, सुमारे १६७ दशलक्ष लोक (प्रौढ आणि मुले) लठ्ठ असण्याचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्लुएचओ) चा अंदाज आहे., जगामधील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी लठ्ठपणा हे कारण पाचव्या क्रमांकावर आहे. लठ्ठपणामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह आणि कर्करोगांसारख्या रोगांची जोखीम देखील वाढते.

याचाच परिणाम म्हणून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, मागणी कमी असल्याने अन्नाचा अपव्यय झाला आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे योग्य साठवणूक प्रक्रिया उपलब्ध नव्हती त्यांच्याकडे विक्री न झालेला माल तसाच शिल्लक राहिला आहे.

कोविड-१९ महामारी आणि रशिया-युक्रेन संघर्ष, यांनी एकत्रितपणे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील सर्वात वाईट अन्न आपत्ती निर्माण केली आहे. आज जगातील १.७ अब्ज लोक गरिबी आणि उपासमारीत जगत आहेत. ही संख्या सध्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. याचाच परिणाम म्हणून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, मागणी कमी असल्याने अन्नाचा अपव्यय झाला आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे योग्य साठवणूक प्रक्रिया उपलब्ध नव्हती त्यांच्याकडे विक्री न झालेला माल तसाच शिल्लक राहिला आहे. ज्या राष्ट्रांमध्ये अन्न असुरक्षितता अधिक आहे अशी राष्ट्रे पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे गंभीरपणे प्रभावित झाली आहेत. प्रवासावरील निर्बंध आणि महामारीच्या काळात व्यवस्थापनाच्या दृष्टीने कामगारांची सेवा बंद करण्यात आल्याने स्थलांतरित कामगारांवर अवलंबून असलेल्या अन्न उत्पादन चक्रावर नकारात्मक परिणाम झाला आहे. रशिया – युक्रेन युद्धामुळे या प्रदेशातील कृषी उत्पादनात व्यत्यय आला आहे, ज्यामुळे उत्पादन कमी झाले आहे आणि ग्रामीण समुदायांचे विस्थापन झाले आहे. भू-राजकीय तणावाचे पडसाद जागतिक बाजारपेठांमध्ये पुन्हा उमटलेले दिसून आले आहेत. यामुळे प्रमुख अन्नपदार्थांची उपलब्धता आणि परवडण्यावर परिणाम झाला आहे.

रशिया आणि युक्रेन हे मका, गहू आणि बार्लीचे महत्त्वपूर्ण उत्पादक आहेत हे आकृती ३ मध्ये दर्शवण्यात आले आहे. यांचा २०१६ ते २०२२ मधील जगभरातील निर्यातीच्या सरासरी २७, २३ आणि १५ टक्के इतका वाटा आहे. जागतिक अन्न कार्यक्रमासाठी युक्रेन-रशिया प्रदेशातून ५० टक्के धान्य पुरवठा होतो. त्यामुळेच, या कार्यक्रमाला तीव्र किंमत वाढीचा सामना करावा लागत आहे. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे पूर्वीपासून असलेली विषमता आता अधिक वाढली आहे आणि त्याचा अन्नाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.

आकृती ३ -  युक्रेन आणि रशियाचा जागतिक निर्यातीतील वाटा, २०१६-२०२०

स्त्रोत – स्टॅटिस्टा

पिढ्यानुपिढ्या चालणारे गरिबीचे चक्र संपवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या कुपोषणाचे निर्मूलन करण्यासाठी, धोरणकर्त्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या राष्ट्रांमध्ये उच्च-प्रभाव व पोषणाधारित योजनांच्या अंमलबजावणीमध्ये वाढ केल्याने स्टंटिंग ४० टक्क्यांनी कमी होईल आणि सुमारे ४१७ अब्ज अमेरिकन डॉलरचा फायदा मिळेल असा अंदाज आहे. कृषी आणि आरोग्य या क्षेत्रांच्या पलीकडे, अधिकाधिक भागधारक आणि क्षेत्रांचा सहभाग असणे आवश्यक आहे. कुपोषणाचा मुकाबला करण्यासाठी, "अन्न प्रणाली" दृष्टीकोन तसेच पुरवठा आणि मागणी हे दोन्ही विचारात घेणाऱ्या सर्वसमावेशक धोरणांची आवश्यकता आहे. एक लवचिक अन्न प्रणाली तयार करण्यासाठी व लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक कृती मजबूत करणे अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

शोबा सुरी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.