Author : Sauradeep Bag

Published on Feb 20, 2024 Updated 0 Hours ago

सैन्यामध्ये सध्या AI चा उपयोग करून नवीन गोष्टी समाविष्ट करून लष्करी वर्चस्व वाढविणे या मधील संतुलन साधण्याचे कार्य सध्या सुरु आहे.

उद्याचे रक्षक: AI सशस्त्र दलांचे भविष्य कसे घडविणार

लष्करात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून घेण्याचा इतिहास हा तांत्रिक उत्क्रांती, भू-राजकीय बदल आणि लष्करी वर्चस्वाच्या अथक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीची उलगडणारी एक आकर्षक कथा म्हणावी लागेल. 20 व्या शतकाच्या मध्यात आपला प्रवास सुरू झाला त्यावेळी AI ची बीजे जटिल गणना आणि डेटा विश्लेषण स्वयंचलित करण्याच्या प्रयत्नात पेरण्यात आली.

शीतयुद्ध सुरू असताना गुप्तचर एजन्सी विशेषत: केंद्रीय गुप्तचर संस्था (CIA) युनायटेड स्टेट्स (US) साठी परदेशी गुप्तचर हाताळणारी त्याच्या समकक्ष राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NSA) सोबत AI चे प्राथमिक स्वरूप स्वीकारण्यात आले. या काळात समकालीन नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) तंत्राचा पाया परदेशी भाषेतील कागदपत्रांच्या मशीनी भाषांतराच्या माध्यमातून घातला गेला आहे. 1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात सामान्य समस्या सोडवणारा (GPS) सारख्या सुरुवातीच्या AI प्रणालींचा उदय झाला. ज्याची रचना मानवासारख्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे अनुकरण करण्यासाठी करण्यात आली होती. त्याच वेळी यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (DARPA) सारख्या प्रकल्पांना AI च्या लष्करी ऍप्लिकेशन्सचा शोध लावला. ज्यामुळे आगामी दशकांमध्ये अधिक महत्त्वाकांक्षी घडामोडींचा एकप्रकारे मार्ग मोकळा झाला.

1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात सामान्य समस्या सोडवणारा (GPS) सारख्या सुरुवातीच्या AI प्रणालींचा उदय झाला. ज्याची रचना मानवासारख्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे अनुकरण करण्यासाठी करण्यात आली होती.

21 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्समधील प्रगतीमुळे एक महत्त्वपूर्ण बदल घडून आला. मानवरहित एरियल व्हेइकल्स (UAVs), ज्यांना सामान्यतः ड्रोन म्हणून संबोधले जाते. पाळत ठेवण्यासाठी आणि महावाच्या काही गोष्टी जाणण्यासाठी ही उपकरणे आवश्यक बनली आहेत. ज्यामध्ये आता प्रगत AI क्षमतेचा समावेश करण्यात आला आहे. विस्तृत डेटासेटद्वारे सशक्त AI अल्गोरिदमने मध्यवर्ती पण महत्वाची भूमिका स्वीकारली. माहितीचे विश्लेषण केले, नमुने ओळखले आणि विशेषत: युद्धभूमीवर परिस्थितीजन्य माहितीचा वापर करून जागरूकता वाढवली आहे. लष्करी ऍप्लिकेशन्समध्ये AI चा समावेश समकालीन युद्धाचा एक व्यापक अधिक शुद्ध आणि अविभाज्य पैलू म्हणून करण्यात येत आहे.

एआय-सक्षम युद्धाची कल्पना अधिक महत्त्वाची बनली आहे. हे स्वायत्त प्रणाली, ड्रोन आणि भविष्यसूचक विश्लेषणासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदमसह विविध तंत्रज्ञानाचा समावेश करणारे साहे. स्वायत्त ऑपरेशन्ससाठी AI सह सुसज्ज ग्राउंड वाहनांची रचना विशेषत: आव्हानात्मक वातावरणात रसद पुरवणारी कार्ये करण्यासाठी वापरण्यात आली आहेत. जागतिक स्तरावर राष्ट्रे त्यांच्या शस्त्रागारांमध्ये नवीनतम उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित आणि अंतर्भूत करण्यासाठी स्पर्धात्मक प्रयत्नात गुंतलेली आहेत. भारताला या प्रवृत्तीची जाणीव असल्याचे दिसते आणि आता या जागतिक शर्यतीत सहभागी होण्यासाठीच नव्हे तर त्यामध्ये नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी सक्रियपणे एकत्रित प्रयत्न करत आहेत.

AI चा लाभ घेण्यास सशस्त्र दल सज्ज

भारतीय सशस्त्र दल विविध डोमेनवर AI चा लाभ घेण्यास सज्ज आहे. धमकीचे मूल्यांकन, लॉजिस्टिक ऑप्टिमायझेशन, सायबर सुरक्षा आणि AI-सक्षम UAVs सह पाळत ठेवण्याच्या संदर्भामध्ये क्रांतिकारकपणे उपयोगी आहे. लष्करी प्रगतीच्या संदर्भात नजीकच्या भविष्यामध्ये अर्थव्यवस्थेवर AI च्या विस्कळीत प्रभावाप्रमाणेच पुन्हा नव्याने व्याख्या करण्यासाठी तयार आहेत.

संरक्षण मंत्रालयाने (MoD) संरक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प एजन्सी (DAIPA) ला पुढील पाच वर्षांसाठी INR 100 कोटी (US$12 दशलक्ष) चे वार्षिक बजेट देण्याच्या संदर्भात वचनबद्ध केले आहे. हा निधी AI प्रकल्पांना पायाभूत सुविधांचा विकास, डेटा तयार करणे आणि क्षमता निर्माण करण्यास मदत करणारा आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दस्तऐवजात भारतीय संरक्षण उद्योग प्रगती करत असून, सशस्त्र दलांना जगातील सर्वात प्रगत गटांमध्ये स्थान मिळवून देण्यावर भर देण्यात आलेला आहे. या सहयोगी प्रयत्नात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रे, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, स्टार्ट-अप आणि नवोन्मेषकांचा समावेश आहे. जे अत्याधुनिक AI नवकल्पनाच्या नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी इच्छुक आहेत. डेटा, लॉजिस्टिक्स, पाळत ठेवणे आणि शस्त्रास्त्रे यासारख्या क्षेत्रात अद्वितीय उत्पादने अलीकडच्या काळामध्ये उदयास आलेली आहेत. अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये वर्धित सहयोगी स्वायत्त रोव्हर सिस्टम (ECARS) मानवरहित ग्राउंड व्हेइकल (UGV) ची निर्मिती, बहु-भूप्रदेश हालचालीसाठी AI द्वारे समर्थित एक बहुमुखी मॉड्यूलर प्लॅटफॉर्म आहे. त्याची समज आणि नेव्हिगेशन मॉड्यूल संपूर्ण मानवरहित नियंत्रण सक्षम करतात, ऑपरेशनल क्षमता वाढवतात आणि गंभीर मोहिमांमध्ये जोखीम कमी करण्यास मदत करतात याबरोबरच आपल्या सैन्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक प्रकारे हातभार लावतात.

संज्ञानात्मक रडारच्या विकासासह आणखी एक महत्त्वपूर्ण प्रगती उदयास आली आहे, जी सध्याच्या काळातील रडारना डायनॅमिक वातावरणात एक मजबूत शोध यंत्रणा सुनिश्चित करण्यासाठी भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देत आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यंग सायंटिस्ट लॅबोरेटरी, संज्ञानात्मक तंत्रज्ञानामध्ये विशेषज्ञ आहे, या आव्हानांना डीप न्यूरल नेटवर्क आणि मजबुतीकरणाद्वारे हाताळते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे हे एकत्रीकरण एक उल्लेखनीय झेप दर्शवते, रडार अनुप्रयोगांवर नाविन्य आणि प्रभुत्वासाठी वचनबद्धता दर्शविते.

AI ची परिवर्तनीय क्षमता

उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रभाव व्यावसायिक नोकऱ्यांच्या पलीकडे पसरत असताना दिसत आहे. ज्यामुळे लष्करी पद्धतींवर लक्षणीय छाप पडत आहे. अनेक तांत्रिक क्रांती अनेकदा लष्करी विचार लक्षात घेऊन त्यांची उत्पत्ती शोधताना दिसतात. डेटाची संपत्ती आणि एआय मॉडेल्सच्या विकासामध्ये सशस्त्र दलांमधील विविध क्षेत्रांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे. उदाहरणार्थ, A2AD (ॲन्टी-एक्सेस/एरिया डिनायल) म्हणून ओळखला जाणारा धोरणात्मक दृष्टिकोन या प्रगतीतून लक्षणीयरीत्या फायदा घेताना दिसतो. A2AD विशिष्ट क्षेत्रांमध्ये प्रतिस्पर्ध्याचा प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सामरिक युक्ती यांचे अत्याधुनिक मिश्रण वापरत आहे. परिभाषित क्षेत्रांमध्ये त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण करतात. ही संकल्पना आधुनिक युद्ध आणि संरक्षण रणनीतींवरील चर्चांमध्ये गुंतागुंतीची आहे, जी AI सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या चढाईने निश्चितपणे प्रभावित होऊ शकते.

लष्करी क्षमता वाढवण्याची तीव्र जागतिक स्पर्धा धक्कादायक आहे. अमेरिका आणि चीन दोघेही त्यांच्या सशस्त्र दलांकडे वाढत्या प्रमाणात भरीव संसाधने निर्देशित करत आहेत. लष्करी पद्धतींमध्ये AI च्या विकासावर आणि एकात्मतेवर हे दोन्ही देश विशेष भर देत आहेत.  या डायनॅमिक लँडस्केपमध्ये आकांक्षा, वेगवान वाढ आणि जागतिक दक्षिणेतील एक नेता म्हणून उदयास येत असलेल्या भूमिकेने प्रेरित भारताला निश्चितपणे मागे पडणे परवडणारे नाही. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए), उदाहरण म्हणून, एआय तंत्रज्ञानामध्ये भरीव गुंतवणूक केली आहे, जे त्याच्या संरक्षण क्षमतांमध्ये एआयचा समावेश करण्यासाठी समर्पित वचनबद्धतेचे प्रदर्शन करते. भारताला आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी, AI शर्यतीत सक्रिय सहभाग घेणे अत्यावश्यक आहे, जो जागतिक स्तरावर लष्करी तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यासाठी स्वत:ला एक नेता म्हणून स्थान देऊ शकतो. विशेषत: शेजारील प्रदेशांकडून वाढत्या धोकादायक परिस्थितीमध्ये भारतासाठी आपले राष्ट्रीय संरक्षण सुरक्षित करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

याव्यतिरिक्त सायबर युद्धात AI मध्ये अलीकडील महत्त्वपूर्ण विकास आहे. AI-चालित साधने,  अल्गोरिदम सायबर धोके शोधण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी लष्करी नेटवर्क मजबूत करण्यासाठी आणि गंभीर पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रिअल-टाइममध्ये डेटाच्या विस्तृत खंडांचे विश्लेषण करण्यासाठी AI ची क्षमता सायबर धोक्यांच्या सतत विकसित होत असलेल्या लँडस्केपच्या विरूद्ध सैन्याची लवचिकता निश्चितपणे वाढविणारेच आहे.

लष्करातील AI चा इतिहास ही एक जटिल कथा म्हणावी लागेल. ज्यामध्ये सुरुवातीच्या गणनेपासून ते आजचे मशीन लर्निंग आणि स्वायत्त प्रणालींवर लक्ष केंद्रित केले जाते. AI ने जागतिक स्तरावर लष्करी ऑपरेशन्समध्ये लक्षणीय बदल केला आहे. ज्यात राष्ट्रे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत राहण्यासाठी संशोधनात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. भविष्यातील नोकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या एआयसाठी नैतिक मानकांबद्दल चर्चा व्यापक असताना, लष्करी एआय विकासामध्ये सहयोग अस्पष्ट आहे. यूएसने AI च्या जबाबदार लष्करी वापरासाठी सर्वोत्कृष्ट पद्धती हायलाइट करणारी गैर-कायदेशीर बंधनकारक मार्गदर्शक तत्त्वे असलेली घोषणा जारी केली आहे. ही तत्त्वे लष्करी AI प्रणालींचे ऑडिट, सुस्पष्ट आणि सु-परिभाषित वापर प्रकरणे, त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात कठोर चाचणी आणि मूल्यमापन, अनपेक्षित वर्तन शोधण्याची आणि प्रतिबंधित करण्याची क्षमता आणि उच्च-परिणाम अनुप्रयोगांसाठी वरिष्ठ-स्तरीय पुनरावलोकन यासारख्या महत्त्वपूर्ण पैलूंवर अधोरेखित करतात. AI विकासाचे भविष्य अस्पष्ट आहे. अभूतपूर्व प्रमाणात आणि नवकल्पनाचा प्रभाव पाहता, नियमन आव्हानात्मक बनले आहे. तंत्रज्ञानातील हे बदल स्वीकारणे सशस्त्र दलांसाठी अत्यावश्यक झालेले दिसत आहे.

अंतराळामध्ये इंटरनेटच्या व्यापक माहितीवर प्रवेश करून सशस्त्र दलामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आलेली आहे. त्याबरोबरच एआयचा तुलनात्मक प्रभाव मोठा असल्याचे पाहिले जाऊ शकते. इंटरनेटने मोठ्या प्रमाणात डेटामध्ये प्रवेश दिला आहे. आता, AI सह, या डेटावर विलक्षण गतीने अंतर्दृष्टीमध्ये प्रक्रिया केली जाऊ शकते. सैन्यात AI च्या चालू कथनामध्ये नावीन्य वाढवणे आणि लष्करी वर्चस्व मिळवणे यामधील संतुलन शोधणे समाविष्ट आहे.

सौरदीप बाग हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sauradeep Bag

Sauradeep Bag

Sauradeep is an Associate Fellow at the Centre for Security, Strategy, and Technology at the Observer Research Foundation. His experience spans the startup ecosystem, impact ...

Read More +