Author : Prithvi Gupta

Published on Jan 17, 2024 Updated 0 Hours ago

आफ्रिकेतील ग्लोबल गेटवे हा युरोपीय महासंघासाठी जागतिक दळणवळण उपक्रमांच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. उर्जा मूल्य साखळ्या अभेद्य असाव्यात किंवा बाहेरील हादरे पचवण्याचे क्षमता असलेल्या असाव्यात, हे त्याचे उद्दिष्ट आहे.

ग्लोबल गेटवे –  युरोपीय महासंघाचा ‘उर्जा सुरक्षेसाठी पायाभूत सुविधा’ प्रकल्प

‘ग्लोबल गेटवे फोरम २०२३’ ही परिषद नुकतीच पार पडली. या फोरममध्ये युरोपीय महासंघ आणि ‘इकनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट’च्या सहकार्याने ११ व्यापार कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. प्रादेशिक एकात्मतेत वृद्धी करण्याबरोबरच युरोपीय महासंघ व आफ्रिकेतील आर्थिक सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने या कॉरिडॉरची निर्मिती करण्याचे युरोपीय महासंघाचे ध्येय आहे.

आकृती १ : आफ्रिकेतील प्रस्तावित ग्लोबल गेटवे कॉरिडॉर

स्रोत : ग्लोबल गेटवे युरोपीय महासंघ/आफ्रिका इन्व्हेंस्टमेंट पॅकेज २०२३

 उत्तर-मध्य-पूर्व आफ्रिका (एनसीईए) धोरणात्मक कॉरिडॉर, पश्चिम आफ्रिका धोरणात्मक कॉरिडॉर आणि दक्षिण आफ्रिका धोरणात्मक कॉरिडॉर या तीन भव्य कॉरिडॉरमधील पायाभूत सुविधांसाठी सुमारे १६५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. आफ्रिका खंडात हातपाय पसरलेल्या चीनच्या हालचालींना तोंड देण्याचा उद्देश त्यामागे आहे. आफ्रिका खंडात चीनचा वारू वेगाने दौडत असल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघाच्या आफ्रिकेशी असलेल्या व्यापाराचे प्रमाण मात्र कमी आहे. हे अंतर भरून काढण्यासाठीही ही तरतूद करण्यात आली आहे. हे तीन भव्य कॉरिडॉर वाहतूक व आर्थिक कॉरिडॉरची उभारणी करणे हे युरोपीय महासंघाला आफ्रिकेशी आर्थिक जवळीक साधायची असल्याचे प्रतीक आहेच, शिवाय आफ्रिकेला अल्प व्याजदरात/व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देऊन आर्थिक संबंध वाढवण्याचा प्रयत्नही आहे. उत्तर-मध्य-पूर्व आफ्रिका कॉरिडॉर उत्तर, मध्य व उत्तर आफ्रिका अशा तीन प्रदेशांमध्ये विस्तारलेला आहे. उर्वरित दोन कॉरिडॉरची निर्मिती पश्चिम व दक्षिण आफ्रिकेतील बंदरांची संख्या अधिक असलेल्या क्षेत्रांमध्ये प्रादेशिक संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने केली आहे. या लेखात पश्चिम व दक्षिण धोरणात्मक कॉरिडॉरसंबंधी उहापोह केला असून या प्रस्तावित कॉरिडॉरच्या भू-आर्थिक व धोरणात्मक परिणामांवर भाष्य केले आहे.

पश्चिम व दक्षिण आफ्रिकी धोरणात्मक कॉरिडॉर – वाट बंदरांचीच

पश्चिम आफ्रिकेतील ग्लोबल गेटवे कॉरिडॉर हा ‘ग्लोबल डिजिटल कनेक्टिव्हिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून डिजिटल संपर्क वाढवण्याबरोबरच रस्ते, पूल, महामार्ग, हरित उर्जा प्रकल्प, महत्त्वपूर्ण खनिज खाणकाम व बंदर पायाभूत सुविधांची तपशीलवार माहिती देणारा प्रभावी गुंतवणूक प्रकल्प आहे. तेरा देशांमधील या चार कॉरीडॉरच्या माध्यमातून (तक्ता १ पाहा) पश्चिम आफ्रिकेतील प्रादेशिक बंदरे आणि उत्तर नायजेरिया, नायजर, माली व बुर्किना फासो या स्रोतांनी समृद्ध मात्र भूप्रदेशांनी वेढलेल्या देशांशी कार्यक्षम पुरवठा साखळी निर्माण करण्याचा युरोपीय महासंघाचा प्रयत्न आहे. याचा परिणाम म्हणजे, हे चारही कॉरिडॉरचा शेवट दक्षिणेकडील नायजेरियाच्या लेक्की बंदरापासून वायव्येकडील सेनेगलच्या एनडयान बंदरापाशी होतो. या  दळणवळणाच्या योजनेमुळे ‘ईसीओडब्ल्यूएएस’ने आखून दिलेल्या उद्दिष्टाप्रत जाण्यास म्हणजे प्रादेशिक उर्जा वाहतूक केंद्र म्हणून समोर येण्यास मदतच होते. पुरवठा साखळीची क्षमता वाढवण्याबरोबरच खाणकाम, उर्जा शोध, रेल्वे, खनिज प्रक्रिया व सामाजिक पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या अर्थविषयक क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम घडवून आणण्याचेही ‘ग्लोबल गेटवे’चे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दळणवळणासंबंधित पायाभूत सुविधांसह शाश्वत उर्जा आणि हरित पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक या माध्यमांचा वापर त्यासाठी केला जाणार आहे.

तक्ता १ : पश्चिम व दक्षिण आफ्रिकेत युरोपीय महासंघाकडून करण्यात येत असलेल्या प्रस्तावित ग्लोबल गेटवेसाठीच्या गुंतवणुका

कॉरिडॉर

क्षेत्र

संभाव्य लाभार्थी

लाभ मिळणारी प्रमुख आर्थिक क्षेत्र

अब्दिदजान-लागोस

पश्चिम आफ्रिका

कोट डिव्हॉयर, घाना, टोंगो, बेनिन, नायजेरिया

हरित उर्जा पायाभूत सुविधा, वाहतूक पायाभूत सुविधा, रेल्वे, शाश्वत खाणकाम

अब्दिदजान-वागाडुगू

पश्चिम आफ्रिका

कोट डिव्हॉयर, बुर्किना फासो

वाहतूक पायाभूत सुविधा, दळणवळण पायाभूत सुविधा

प्राया/डकार-अब्दिदजान

पश्चिम आफ्रिका

सेनेगल, गॅम्बिआ, गिनी-बिसा, गिनी, सिएरा लिओन

अमूल्य धातू शोध, खनिज प्रक्रिया, उर्जा पायाभूत सुविधा, वाहतूक पायाभूत सुविधा, दळणवळण हार्डवेअर

कोटनू-नायमे

पश्चिम आफ्रिका

बेनिन, निगेर

सोने खाणकाम, खनिज प्रक्रिया, शाश्वत खाणकाम, वाहतूक पायाभूत सुविधा

मपुटो-गबरोने-वाल्विस बे

दक्षिण आफ्रिका

मोझाम्बिक-दक्षिण आफ्रिका, एस्वाटिनी, बोट्सवाना, नामिबिआ

प्रमुख खनिजे, खाणकाम, डिजिटल पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा

डर्बन-ल्युसाका

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिका, बोट्सवाना, झिम्बाब्वे, झाम्बिआ

प्रमुख खनिजे, शाश्वत खाणकाम, खनिज प्रक्रिया, डिजिटल पायाभूत सुविधा

एकूण कॉरिडॉर संख्या :

प्रदेश :

देश : १९

एकूण लाभार्थी क्षेत्र : १३

 स्रोत : ग्लोबल गेटवे इन्व्हेस्टमेंट डोसिए

पश्चिम आफ्रिका आणि उत्तर-मध्य-पूर्व आफ्रिका कॉरिडॉर असलेल्या देशांमध्ये युरोपीय महासंघाच्या योजनांचा विस्तार होत असताना दक्षिण आफ्रिकी क्षेत्रात ग्लोबल गेटवे सावधपणे व धोरणात्मकरित्या पुढे जात असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघाने वाल्विस बे, मपुटो आणि डर्बन बंदरे व त्यामध्ये असलेला भाग विकसित करण्यासाठी केवळ दोन कॉरिडॉर सुरू केले आहेत (पाहा तक्ता १, नंतर प्रतिमा १ पाहा). वाल्विस बे हे नामिबियाचे खोल समुद्रातील एकमेव बंदर असून येथे बहुउद्देशीय बंदर उभारणीसाठी चीनने यापूर्वीच हालचाली सुरू केल्या आहेत. डर्बन व मपुटो बंदर यांसह वाल्विस बे मध्य आफ्रिकेतील व दक्षिण आफ्रिकेतील भूप्रदेशांनी वेढलेल्या आफ्रिकी देशांसाठी जागतिक बाजारपेठांचा संबंधक (कनेक्टर) म्हणून काम करतो. ही बंदरे प्रशांत व अटलांटिक महासागरातील प्रमुख जहाज मार्गांवरही नियंत्रण ठेवतात आणि खोल समुद्रातील खाणकाम, तेलाचा शोध आणि व्यापारी तत्त्वावरील मच्छीमारी यांसारख्या ‘ब्लू इकनॉमी’ क्षेत्रांसाठी अनोळखी प्रदेश आहेत. युरोपीय बाजारपेठांसाठी हे महत्त्वपूर्ण जहाज मार्ग, बंदरे आणि ब्ल्यू इकनॉमी ही क्षेत्रे सुरक्षित करणे हे या प्रदेशात पायाभूत सुविधांच्या संबंधाने युरोपीय महासंघाच्या आघाडीचे उद्दिष्ट आहे.

ग्लोबल गेटवेसाठी युरोपीय महासंघाच्या धोरणात्मक गरजा

सर्व ठिकाणी दळणवळणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याबरोबरच ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मुळे निर्माण होणारे भू-राजकीय धोके कमी करून या १९ देशांशी आर्थिक संबंध स्थिर ठेवणे हा उद्देशही त्यामागे आहे (तक्ता १ पाहा). युरोपीय महासंघ चीनकडे एक ‘पद्धतशीर प्रतिस्पर्धी’ या दृष्टीने पाहात असला, तरी व्यापारी तत्त्वावरील महत्त्वाचा भागीदार म्हणूनही पाहातो. युरोपीय महासंघ आणि त्याच्या पाश्चात्य सहयोगी देशांनी चीन हा आपला परदेशी उत्पादक तळ आणि औद्योगिक आयातीसाठीचे एकमेव केंद्र म्हणून दर्जा दिला. त्यामुळे कालांतराने पाश्चात्य जगत चीनवर अवलंबून राहिले. युरोपीय महासंघ आणि चीन यांच्यामधील दैनंदिन व्यापार २०२२ मध्ये २.४३ अब्ज डॉलर होता. युरोपीय महासंघाची वस्तू व्यापार तूट ४४१.५६ अब्ज डॉलर असून ती सातत्याने वाढत आहे. युरोपीय महासंघाच्या चीनमधील राजदूताने यास ‘मानवजातीच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वांत मोठी’ असे संबोधले आहे. पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण करण्याचा आणि चीनच्या अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हळूहळू बाजूला होऊन बाहेरील हादरे पचवण्यासाठी आपली अर्थव्यवस्था धोकाविरहीत करण्यासाठी युरोपीय महासंघाने ग्लोबल गेटवे ही संकल्पना पुढे आणली आहे. कारण जागतिक स्तरावर चीनचा पवित्रा दिवसेंदिवस आक्रमक होत चालला आहे.

‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ला २०१३ मध्ये प्रारंभ करताना चीनने आंतरराष्ट्रीय संबंधांमधील पायाभूत विकासाच्या आवश्यकतेची जाणीव करून दिली. विकेंद्रित मदतीचे वितरण झाल्याच्या दशकभरानंतर विकसनशील जगात प्रादेशिक दळणवळण वाढवून विकासात्मक व पायाभूत सुविधांसंबंधीच्या मुत्सद्देगिरीसाठी बेल्जियमने ग्लोबल गेटवेचा आधार घेतला आहे. संपूर्ण आफ्रिका खंडाच्या विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवून पारदर्शक आर्थिक मदतीच्या माध्यमातून निरीक्षण व प्रयोगावर आधारित संशोधन करून निर्मिलेले कॉरिडॉर चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या प्रकल्पाला एक आकर्षक पर्याय आहेत. बेल्जियमला भागीदार देशांबरोबर पायाभूत सुविधांचे सहकार्य वाढवून आणि लोकशाही मूल्ये, सुशासन, शाश्वतता आणि समान भागीदारी या घटकांवर आधारित विकासात्मक जागतिक दृष्टिकोनाचा प्रसार करून विकासात्मक प्रभाव निर्माण करण्याची एक निराळी संधी प्राप्त झाली आहे. अशा मोठ्या प्रमाणावरील उपक्रमांसाठी समविचारी लोकशाहींसमवेत काम करणे आवश्यक आहे. विकसनशील जगातील पायाभूत सुविधांच्या विकासातील अंतर कमी करण्यासाठी ‘ग्लोबल साउथ’मध्ये चीनच्या अनिमित, व्यापारी व शोषक कर्जपद्धतीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व लोकशाही देशांना एकत्र आणण्यासाठी ग्लोबल गेटवे हा एक मिलाफ बिंदू म्हणून काम करू शकेल, अशी बेल्जियमला आशा आहे.

निष्कर्ष

पायाभूत सुविधा मुत्सद्देगिरीबाबत बेल्जियमचे स्थान एकमेव आहे. बेल्जियमने अलीकडेच भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाशी या संबंधात भागीदारी केली आहे. २०२० च्या मंत्रिस्तरीय जाहिरनाम्यानुसार, आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेशी भागीदारी करण्याचाही बेल्जियमचा प्रयत्न आहे. आफ्रिकेतील ग्लोबल गेटवे हा युरोपीय महासंघासाठी जागतिक दळणवळण उपक्रमांच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. उर्जा मूल्य साखळ्या अभेद्य असाव्यात किंवा बाहेरील हादरे पचवण्याचे क्षमता असलेल्या असाव्यात, हे त्याचे उद्दिष्ट आहे.

पृथ्वी गुप्ता हे स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राम, ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये ज्युनियर फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Prithvi Gupta

Prithvi Gupta

Prithvi works as a Junior Fellow in the Strategic Studies Programme. His research primarily focuses on analysing the geoeconomic and strategic trends in international relations. ...

Read More +