हा लेख ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ या मालिकेचा भाग आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२४ जवळ येत असताना, महिलांनी बजावलेली कामगिरी साजरी करण्याची आणि अधिक लैंगिक समानतेसाठी प्रयत्न करण्याची आठवण करून दिली जाते. हा क्षण आपल्याला जागतिक व देशांतर्गत लैंगिक निकषांचे आणि दृष्टिकोनांचे बारकाईने परीक्षण करण्यास उद्युक्त करतो. राष्ट्रीय सर्वेक्षणातील अंतर्दृष्टी सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक घटकांची श्रेणी प्रकट करते, जी या मानदंडांना आणि वृत्तींना आकार देतात. समानतेच्या दिशेने लक्षणीय प्रगती करत असतानाही, आपल्या देशात शैक्षणिक संधींपासून कामाच्या ठिकाणच्या सहभागापर्यंत लैंगिक भूमिकांच्या पारंपरिक धारणांचा अद्यापही जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रभाव पडतो. हे प्रचलित नियम केवळ असमानता कायम ठेवत नाहीत तर महिलांचे हक्क आणि क्षमता स्पष्टपणे समजून घेण्यात अडथळा आणतात.
प्रगती, पीछेहाट की कुंठित झालेला विकास?
लोकसंख्याशास्त्र आणि आरोग्य सर्वेक्षण माहिती वापरून २६ देशांमधील लैंगिक वृत्तींविषयक ‘पुरुषांच्या लैंगिक वृत्तीतील कल: प्रगती, पीछेहाट की कुंठितता?’ या नावाने ‘यूएसएआयडी’ अहवाल गतवर्षी तयार करण्यात आला. हा अहवाल- विशेषत: भारतासारख्या देशांत, जिथे हे नियम सामाजिक, आरोग्य आणि लोकसंख्याशास्त्रीय परिणामांवर खोलवर परिणाम करतो, तेथील लैंगिक निकषांचे स्थित्यंतर आणि त्यांचा समाजावर होणारा परिणाम याविषयी सखोल अंतर्दृष्टी देतो. ‘महिलांमध्ये गुंतवणूक करा: प्रगतीला गती द्या’, या संकल्पनेसह आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२४ साजरा करण्याकरता जग सज्ज होत असताना, लैंगिक निकषांच्या दृष्टिकोनाबाबत या अहवालाचे निष्कर्ष अधिक समर्पक बनले आहेत.
समानतेच्या दिशेने लक्षणीय प्रगती करत असतानाही, आपल्या देशात शैक्षणिक संधींपासून कामाच्या ठिकाणच्या सहभागापर्यंत लैंगिक भूमिकांच्या पारंपरिक धारणांचा अद्यापही जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रभाव पडतो.
अभ्यास केलेल्या २६ देशांमधील लैंगिक निकष आणि लैंगिक वृत्तीच्या बदलत्या चित्राचे सूक्ष्म दृश्य हा अहवाल प्रदान करतो. या अहवालातून पुरुषांच्या असमान लैंगिक वृत्ती, प्राधान्यक्रम आणि वर्तनांत सर्वसामान्य घट झाल्याचे दिसून येते, हा बदल अधिक समान लैगिंक मानदंडांच्या दिशेने होणारा सकारात्मक प्रवास दर्शवतो. हा बदल, मात्र, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असमान आहे. घरगुती निर्णयांमध्ये महिलांच्या सहभागात लक्षणीय प्रगती झाली आहे आणि जिव्हाळ्याच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण कमी होत आहे, परंतु स्त्रियांनी गर्भनिरोधक वापरण्याबाबत आणि मुलाच्या पसंती करण्याबाबतच्या वृत्तींत कमी बदल झाल्याचे दिसून येते. ही प्रगती असूनही, पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक वृत्तींतील तफावत कायम आहे. यांतून हे सूचित होते की, दोन्ही लैंगिक वृत्ती विकसित होत असताना, पुरुषांचे विचार कमी समानतावादी राहतात.
ही विषमता दूर करण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोहोंनाही प्रभावित करणाऱ्या सामाजिक बदलाच्या महत्त्वावर जोर देऊन, लैंगिक समानतेकडे वळण्यासाठी लक्ष्यित हस्तक्षेपांची गरज अधोरेखित होते. आपण जेव्हा महिलांचे यश साजरे करतो, तेव्हा सर्वांसाठी लैंगिक समानता हे एक वास्तव बनवून, उर्वरित असमानता दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची आणि सहकार्य करण्याची आवश्यकता असते. मात्र, या अहवालातून, देश-स्तरीय भिन्न माहिती उपलब्ध होत नाही.
भारताची कथा
जोडीदाराकडून होणारा हिंसाचार, घरगुती निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग, महिलांची लैंगिक स्वायत्तता, महिलांचा गर्भनिरोधकांचा वापर आणि मुलगा व्हावा, हा प्राधान्यक्रम यांसारख्या संकल्पनेवर ‘यूएसएआयडी’च्या अहवालाचे एकंदर लक्ष ज्यावर केंद्रित झाले आहे, ते प्रतिबिंबित करीत, २१व्या शतकातील एकूण कलाचा मागोवा घेण्याकरता या लेखात भारताच्या विविध लोकसंख्याशास्त्र आणि आरोग्य सर्वेक्षण माहिती अहवालांमधील (याला भारतातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण- एनएफएचएस म्हटले जाते.) माहिती वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आकृती १ मध्ये भारतीय पुरुषांची (१५-४९ वयोगट) एकंदर प्रवृत्ती दर्शविण्यात आली आहेत, ज्यांनी विविध कारणांवरून पत्नीला मारहाण केल्याचे समर्थन केले. हा आलेख २००५ ते २०२१ या कालावधीत विविध परिस्थितीत घरगुती हिंसाचारात गुंतलेल्या १५-४९ वयोगटातील भारतीय पुरुषांच्या संख्येत होत असलेली घट दर्शवतो. विशेष म्हणजे, वादविवाद आणि माहिती न देता घराबाहेर जाण्यासंदर्भात सर्वात मोठी घट दिसून येते, तर मुलांकडे दुर्लक्ष करणे, अन्न खराब करणे आणि लैंगिक संबंध नाकारणे या वृत्तीत हळूहळू बदल व उलटा क्रम दिसून येतो. काही श्रेणींत घसरणीचा कल असूनही, पुरुषांचे मोठे प्रमाण किमान एका कारणास्तव पत्नीच्या मारहाणीचे समर्थन करतो, जे खोलवर रूजलेले लिंगाधारित नियम बदलण्यात आणि सतत लैंगिक संवेदनीकरणाच्या प्रयत्नांकरता महत्त्वाची क्षेत्रे अधोरेखित करण्यातील सातत्यपूर्ण आव्हान दर्शवते.
आकृती १: पत्नीला मारहाण करण्याचे समर्थन करणाऱ्या १५-४९ वयोगटातील भारतीय पुरुषांचे प्रमाण
स्रोत: लेखकाने https://dhsprogram.com/data/statcompiler.cfm या संकेतस्थळावरून माहिती संकलित केली आहे.
आकृती क्र. २ मध्ये तीन सर्वेक्षण फेऱ्यांमधील कल दिसून येतो. १५ ते ४९ वयोगटातील भारतीय महिला, ज्यांचे म्हणणे आहे की, मोठी खरेदी करताना त्या एकट्या किंवा संयुक्तपणे अंतिम निर्णय घेतात. २००५ ते २०२१ सालापर्यंत, मोठी खरेदी करण्यात या वयोगटातील भारतीय महिलांच्या स्वायत्ततेत प्रगतीशील वाढ झाल्याचे दिसून येते. अंतिम निर्णय घेणाऱ्या महिलांची एकूण टक्केवारी ५२.९ टक्क्यांवरून ८३ टक्क्यांपर्यंत लक्षणीयरीत्या वाढली आहे, सर्वात लक्षणीय वाढ १५-२४ वयोगटात दिसून आली आहे, जी ३५.१ टक्क्यांवरून ८३ टक्क्यांवर गेली आहे. हा कल तरुण महिलांमधील आर्थिक सक्षमीकरणाच्या सकारात्मक बदलाकडे निर्देश करतो, जे लैंगिक समानतेकरता एक महत्त्वाचे चिन्ह आहे.
आकृती २: १५-४९ वयोगटातील भारतीय महिलांचे प्रमाण- ज्या सांगतात की, खरेदीच्या वेळी अंतिम मत त्यांचे एकटीचे असते किंवा निर्णय संयुक्तपणे घेतला जातो.
स्रोत: लेखकाने https://dhsprogram.com/data/statcompiler.cfm या संकेतस्थळावरून माहिती संकलित केली आहे.
आकृती ३ मध्ये १५ वर्षांहून अधिक वयाच्या भारतीय पुरुषांचे प्रमाण दर्शवले आहे, जे पत्नीने लैंगिक संबंधास नकार दिल्यास पतीने पत्नीला मारहाण करण्याचे समर्थन करतात. या कारणास्तव पत्नीला मारहाण करणाऱ्या भारतीय पुरुषांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे यांतून स्पष्ट होते. सर्वेक्षण केलेल्या कालावधीत एकूण सहमती ८.९ टक्क्यांवरून १३.३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. वयोगटांत विविध बदल दिसून येतात, परंतु विशेष म्हणजे, १५-२४ वयोगटात अशा पुरुषांचे सर्वोच्च वर्तमान प्रमाण दिसून येते, जे २००५-०६ मध्ये ९.७ टक्क्यांवरून २०१९-२१ मध्ये १४.६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, जो एक चिंताजनक बदल आहे. या आकडेवारीवरून असे सूचित होते की, अशा लिंगभेदांच्या मुळार्यंत पोहोचून त्याला संबोधित करण्यासाठी आणि महिलांच्या स्वायत्ततेचा व संमतीचा आदर करण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र करण्याची गरज आहे.
आकृती ३: १५ वर्षांवरील भारतीय पुरुषांचे प्रमाण, जे पत्नीने आपल्या पतीशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर तिला मारहाण करण्याचे समर्थन करतात.
स्रोत: लेखकाने https://dhsprogram.com/data/statcompiler.cfm या संकेतस्थळावरून माहिती संकलित केली आहे.
आकृती ४ सध्या विवाहित भारतीय महिलांमधील प्रमाणाचा मागोवा घेते, ज्यांनी २००५-०६ ते २०१९-२१ या कालावधीत कुटुंब नियोजन प्रामुख्याने पत्नी, पत्नी व पती यांनी संयुक्तपणे आणि मुख्यतः पतीने केल्याचे सांगितले. यांतून पत्नी आणि पती यांच्या संयुक्त निर्णयक्षमतेत सातत्यपूर्ण वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांत संयुक्त निर्णयक्षमता ८३.४ टक्क्यांवरून ८१.७ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. प्रामुख्याने पत्नीने घेतलेल्या निर्णयांमध्ये ९.५ टक्क्यांवरून १०.१ टक्क्यांपर्यंत किरकोळ वाढ झाली आहे. याउलट, प्रामुख्याने पतीद्वारे घेतल्या जाणाऱ्या निर्णयात ६.१ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. हे कल कौटुंबिक आरोग्याच्या बाबतीत न्याय्य निर्णय घेण्यास प्रोत्साहन देण्याकरता सतत प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. ज्याद्वारे अशा वातावरणाला प्रोत्साहन मिळेल, जिथे दोन्ही भागीदार त्यांच्या भविष्याला आकार देणारी निवड करण्यात समानरीत्या सहभागी होतात.
आकृती ४: भारतीय कुटुंबांत कुटुंब नियोजनाचा निर्णय घेणे
स्रोत: लेखकाने https://dhsprogram.com/data/statcompiler.cfm या संकेतस्थळावरून माहिती संकलित केली आहे.
आकृती ५ भारतातील बहुचर्चित 'मुलगा व्हावा, यास मिळणाऱ्या प्राधान्याक्रमाचा मागोवा घेते. यात १५-४९ वयोगटातील विवाहित भारतीय पुरुषांना, ज्यांना दोन मुले आहेत, त्यांना जर मुलगा असेल तर आणखी मुले नको आहेत. सध्या १५ ते ४९ वयोगटातील विवाहित भारतीय पुरुष- ज्यांना दोन अपत्ये आहेत, त्यात जर मुलगा असेल तर आणखी मुले होऊ नयेत अशी त्यांची इच्छा असल्याचे दिसून येते, तीन राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण फेऱ्यांमधील आकडेवारी (२००५-०६, २०१५-१६ आणि २०१९-२१) मुलगा होण्याकरता एक मजबूत प्राधान्यक्रम प्रकट करते. दोन मुलगे असलेल्या ९० टक्क्यांहून अधिक पुरुषांनी असे सूचित केले आहे की, त्यांना आणखी मुले नको आहेत, ही संख्या अधिक आहे, परंतु वर्षानुवर्षे त्यात किरकोळ घट होत आहे. एक मुलगा असलेल्या कुटुंबांकरता, पुरुषांना अधिक मुले नसण्याची इच्छा ८९ टक्के इतकी राहते. विशेष म्हणजे, मुलगा नसलेल्यांमध्ये एक सातत्यपूर्ण तफावत आहे, जिथे अधिक मुले नसण्याची इच्छा- सुमारे दोन तृतीयांश इतकी लक्षणीयरीत्या कमी आहे. हा आकृतीबंध कुटुंब नियोजनाच्या निर्णयांत सतत मुलगा व्हावा, ही पसंती सूचित करतो, जरी शेवटच्या श्रेणीतील हळूहळू वाढणारी टक्केवारी मुलगा की मुलगी याकडे दुर्लक्ष करून कुटुंबाचा आकार लहान करण्याबाबत हळूहळू बदल दर्शवू शकते.
आकृती ५: सध्या विवाहित असलेले भारतीय पुरुष (१५-४९ वयोगट) ज्यांना दोन मुले आहेत- जर त्यांना मुलं असतील तर, त्यांना आणखी मुलं नको आहेत.
स्रोत: लेखकाने https://dhsprogram.com/data/statcompiler.cfm या संकेतस्थळाहून माहिती संकलित केली आहे.
सुमारे दोन दशकांत, भारतातील लैंगिक निकष आणि लैंगिक वृत्तीच्या चित्रात हळूहळू पण निश्चित बदल झाला आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आकडेवारी या संक्रमणास विराम देते. महिलांच्या निर्णय घेण्याच्या स्वायत्ततेत वाढ आणि लिंग-आधारित हिंसेच्या समर्थनात अपवाद वगळता, मंद, सातत्य नसलेली घट होत असल्याचे दिसून येते. आकडेवारीत कौटुंबिक नियोजनात संयुक्त निर्णय घेण्याबाबत सातत्याने एकमत दिसून येते, त्याच वेळी कौटुंबिक आकांक्षांना आकार देणाऱ्या- मुलगा व्हावा, या रूजलेल्या स्वारस्यासंदर्भात मंद प्रगती होत असूनही, हा कल कायम असल्याचेही स्पष्ट करते. विविध सर्वेक्षण फेऱ्यांच्या लोलकातून पाहिलेली ही बदलाची प्रक्रिया, गतिमान समाजाचे चित्र अधोरेखित करते- ज्यात पारंपरिक नियमांची वीण सातत्याने उसवली जात आहे आणि समानतेची नवी कथा विणली जात आहे. जसजसे आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निकट येतो, तसतसे या मार्गक्रमणात सामाजिक जडणघडणीत टिकून असलेली प्रगती आणि प्रलंबित चिंता या दोहोंचे प्रतिबिंब दिसून येते.
ओमेन सी. कुरियन हे ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे वरिष्ठ फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.