Author : Chaitanya Giri

Expert Speak Space Tracker
Published on Aug 20, 2024 Updated 2 Hours ago

भारत आपली मानवी अंतराळ उड्डाण मुत्सद्देगिरी विस्तारण्याचा प्रयत्न करत असताना इतर देशांसोबत आयसीईटीसारख्या द्विपक्षीय उपक्रमांवर काम करणे भारतासाठी फलदायी ठरणार आहे.

गगनयान मिशनमुळे iCET क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना चालना!

ही दोन एक्झिओम्स म्हणजेच एक्झिओम रिसर्च लॅबची गोष्ट आहे. २०१० मध्ये बंगळुरूमध्ये स्थापन झालेल्या लॅबला टीम इंडस म्हणून ओळखले जाते; तर एक्झिओम स्पेसची स्थापना २०१६ मध्ये ह्युस्टन येथे करण्यात आली. या दोन्ही संस्था भारत-युनायटेड स्टेट्स (US) अंतराळ सहकार्याशी संबंधित असून उदयोन्मुख जागतिक सीआयएस – लूनार आर्किटेक्चरच्या क्षेत्रात काम करण्याचा दोघांचा मानस आहे. इंडियन एक्झिओमची बांधणी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी केली. परंतू, व्यावसायिक अंतराळ संधींच्या अभावामुळे २०१७ मध्ये, ते यूएस व्यावसायिक अंतराळ परिसंस्थेमध्ये सामील झाले. तर अमेरिकन एक्झिओमची बांधणी भरभराट होत असलेल्या यूएस व्यावसायिक अवकाश क्षेत्राकडे आकर्षित झालेल्या अमेरिकन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी केली आहे. भारत त्याच्या मानवी अंतराळ उड्डाण मुत्सद्देगिरीच्या मार्गावर एक महत्त्वाचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर असल्याने या दोन्ही संस्थांचे व त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करणे आता गरजेचे आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला एक गगनयात्री (भारतीय अंतराळवीर) पाठवला जाणार आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने राष्ट्रीय एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) सोबत संयुक्त मोहिमेचा भाग म्हणून एक्झोम स्पेससोबत अंतराळ उड्डाण करारावर स्वाक्षरी केली आहे. याबाबतची घोषणा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये लॉन्च होणाऱ्या एक्झोम मिशन ४ (AM4) या मिशनमध्ये प्रमुख उमेदवार असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला किंवा राखीव उमेदवार असलेले ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर यातील एक जण गगनयात्री म्हणून हे मिशन पायलट करतील. सर्वात जास्त काळ अंतराळात राहणारे अंतराळवीर अशी ओळख असलेले व यूएस अस्ट्रॉनॉट ऑफिसचे माजी प्रमुख पेगी व्हिटसन हे स्पेसक्राफ्ट कमांडर असणार आहेत. या मिशनमध्ये पोलंड आणि हंगेरीचे दोन नॉन-करिअर अंतराळवीर सामील होणार आहेत. एक्झोम स्पेस हे पुढील पाच वर्षात त्याच्या स्पेस स्टेशनचे तीन मॉड्युल प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे. त्यातील पहिले मॉड्युल सध्याच्या आयएसएस संरचनेतील आहे. म्हणूनच AM4 हे एक्झोम स्पेसच्या महत्त्वाच्या मोहिमांपैकी एक आहे. दीर्घकाळात, एक्झोम स्पेसचा व्यावसायिक स्पेस स्टेशन वाढवण्याचा आणि ऑपरेट करण्याचा मानस आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये लॉन्च होणाऱ्या एक्झोम मिशन ४ (एएम४) या मिशनमध्ये प्रमुख उमेदवार असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला किंवा राखीव उमेदवार असलेले ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर यातील एक जण गगनयात्री म्हणून हे मिशन पायलट करतील.

भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून, आणि विशेषतः २०१८ मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा झाल्यापासून, इस्रोला CNES या फ्रेंच स्पेस एजन्सीकडून आणि रशियन रॉसकॉसमॉस (ROSCOSMOS) कडून स्पेस फ्लाइट प्रशिक्षण आणि अवकाश औषधांवर सहकार्य मिळाले आहे. नागरी अंतराळ सहकार्यासाठी भारत-अमेरिकेचा संयुक्त सक्रिय कार्यगट २००५ मध्ये स्थापन करण्यात आला असला तरी याबाबत अमेरिकेची स्पष्ट अनुपस्थिती होती. या कार्यगटाने भारतीय चांद्रयान मोहिमांना खूप मदत केली असली तरी त्यात मानवी अंतराळ उड्डाणाच्या घटकांचा समावेश नव्हता. यानंतर, २०१४ मध्ये मंगळावर इस्त्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशन आणि नासाच्या मावेन अंतराळयानाचे जवळजवळ एकाच वेळी प्रक्षेपण झाल्यानंतर, इस्त्रो आणि नासा या दोघांनीही मंगळ कार्यगट स्थापन केला असला तरी त्यात कोणतेही मानवी स्पेसफ्लाइट घटक जोडलेले नाहीत. द्विपक्षीय अंतराळ सहकार्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. परंतू हा घटक राष्ट्रीय अंतराळ संस्थांच्या पाठपुराव्याच्या पलीकडे असतो. ही भूमिका दोन्ही देशांतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदासाठी योग्य आहे. 

द्विपक्षीय अंतराळ सहकार्यातून स्पष्ट झाल्याप्रमाणे, मानवी अंतराळ उड्डाणासाठी नागरी अवकाश आणि वैज्ञानिक संस्था, संरक्षण आस्थापना आणि व्यावसायिक संस्थांकडील प्रतिभांचे अभिसरण आवश्यक आहे. या समूहांना एकत्र आणण्याचे अधिकार अवकाश संस्थांकडे नसतात. यूएस मध्ये, युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकारी कार्यालयातील राष्ट्रीय अंतराळ परिषदेकडे अशा प्रकारची क्षमता आहे. तसेच, भारतात, पंतप्रधान कार्यालयातील अंतराळ आयोगाकडे ही क्षमता आहे. आणि या दोन्ही संस्थांमध्ये, संयोजक शक्तीसह व्यावसायिक स्थान हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे आहे. त्यासाठी, मे २०२२ मध्ये एनएसएच्या (NSA) नेतृत्वाखालील अमेरिका व भारत यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या इनिशिएटिव्ह ऑन क्रिटीकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी (आयसीईटी) ने ह्युमन स्पेसफ्लाईट, कमर्शिअल लुनार एक्सप्लोरेशन आणि कमर्शिअल स्पेस पार्टनरशिपवर प्रचंड भर दिला आहे. खरेतर या बाबी दोन्ही देशांच्या नागरी अवकाश सहकार्य फ्रेमवर्कमध्ये समाविष्ट नव्हत्या.

भारत आणि यूएस टेक इकोसिस्टममधील नैसर्गिक आत्मीयता (नॅचरल अफिनीटी) लक्षात घेता, इतर कोणत्याही अंतराळ सहकार्य उपक्रमांच्या तुलनेत हे द्विपक्षीय संबंध पुढे जाणे अधिक स्वाभाविक आहे. परंतू, दीर्घकाळात, जागतिक स्तरावर देशांतर्गत व्यावसायिक अंतराळ परिसंस्था स्पर्धात्मक बनविण्यासाठी भारताला आपला मार्ग आखावा लागणार आहे.

भारत आणि यूएस टेक इकोसिस्टममधील नैसर्गिक आत्मीयता (नॅचरल अफिनीटी) लक्षात घेता, इतर कोणत्याही अंतराळ सहकार्य उपक्रमांच्या तुलनेत हे द्विपक्षीय संबंध पुढे जाणे अधिक स्वाभाविक आहे.

जेव्हा अवकाश क्षेत्राचा विचार केला जातो, तेव्हा अमेरिका हे एक असे संसाधन चुंबक आहे जे प्रतिभा आणि गुंतवणूक आकर्षित करते. एक्झोन रिसर्च लॅब (ARL) किंवा टीम इंडसने २०१० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या गुगल लुनार एक्स या स्पर्धेत भाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये इन हाऊस बिल्ट लँडर आणि रोव्हर लाँच केले होते. या स्पर्धेत यश मिळवूनही, २०१८ च्या आधी एआरएलचा भारतातील भविष्यकालीन सेवांमध्ये म्हणावा तसा उल्लेख करण्यात आला नाही. परंतु यूएस इकोसिस्टमला ते उपयुक्त वाटले. एआरएलने नासा कमर्शिअल लुनार पेलोड सर्व्हिसेस (CLPS) प्रोग्रामकडे आपले लक्ष वळवले. या प्रोग्राममध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या शोधात, संसाधनांचे उत्खनन आणि दीर्घकाळासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पेलोड्सच्या विकासामध्ये भाग घेणाऱ्या कंपन्यांशी करार केला जातो. तसेच, CLPS मध्ये स्वारस्य असलेल्या आणि तिची कौशल्ये आणि बौद्धिक संपदा सामायिक करण्याचा इरादा असलेल्या ऑर्बिट बियॉंड आणि सेरेस रोबोटिक्स या अमेरिकन कंपन्यांसोबत ARLने भागीदारी केली आहे. एआरएलच्या व्यावसायिक सेवांना सामावून घेण्यासाठी भारताचा चंद्र शोध कार्यक्रम काहीसा नवजात होता.

त्याचप्रमाणे, अमेरिकेने आर्थिक, मानव संसाधन आणि तांत्रिक संसाधने आकर्षित करण्याच्या उद्देशाने आर्टेमिस प्रोग्राम तयार केला आहे. आंतरराष्ट्रीय भागीदारांना त्याच्या इंटरनॅशनल लुनार रिसोर्स स्टेशन मेगाप्रोजेक्टच्या बाजूने आकर्षित करताना चीनही अशा प्रकारचा विचार करतो. भारतीय खाजगी खेळाडूंकडे विविध देशांच्या अंतराळ परिसंस्थांसोबत काम करताना अनुभवात्मक शिक्षण घेण्याची असमर्थता आहे. त्यामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अनेक घटकांसह हा अनुभव धोरणात्मक स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.

अंतराळ संस्थेच्या पातळीवर भारतीय मानवी अंतराळ उड्डाणाचा मुत्सद्दीपणा एकतर्फी नाही. भारत-फ्रान्स स्ट्रॅटेजिक स्पेस डायलॉग आणि भारत-रशिया स्पेशल आणि प्रिव्हिलेज्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या माध्यमातून भारत इतर देशांशी संलग्न आहे. जसजसा भारत भारतीय अंतरीक्ष स्टेशन (बीएएस – बास) च्या आर अँड डी मध्ये पुढे जात आहे, तसतसे त्याला निश्चितपणे भू-राजकीय गटांमधील देशांमधून उदयास आलेल्या संस्थांसह व्यावसायिक अंतराळ भागीदारीचा लाभ घेता येणार आहे. ज्याप्रमाणे AM4 हंगेरियन आणि पोलिश अंतराळवीरांना घेऊन जात आहे, त्याचप्रमाणे भारतालाही अंतराळवीर आणि त्यांच्या देशांच्या व्यावसायिक परिसंस्थांना त्याच्या बासच्या फोल्डमध्ये (BAS Fold) आणावे लागणार आहे.

अंतराळ संस्थेच्या पातळीवर भारतीय मानवी अंतराळ उड्डाणाचा मुत्सद्दीपणा एकतर्फी नाही. भारत-फ्रान्स स्ट्रॅटेजिक स्पेस डायलॉग आणि भारत-रशिया स्पेशल आणि प्रिव्हिलेज्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या माध्यमातून भारत इतर देशांशी संलग्न आहे.

यूएस इकोसिस्टमसोबतची भारताची भागीदारी निःसंशयपणे उपयुक्त आहे. तरीही, बहुदेशीय अंतराळवीरांना बासमध्ये (BAS) गुंतवण्याचा भारताचा मानस असेल, तर त्याला मानवी अंतराळ उड्डाण मुत्सद्दगिरीद्वारे, त्याच्या नागरी, व्यावसायिक आणि संरक्षण परिसंस्था-आंतरराष्ट्रीय भू-राजकीय गटांशी जोडून घ्यावे लागणार आहे. हे केवळ शांतताप्रिय उपाय आहे असे नाही. मानवी अंतराळ उड्डाण मुत्सद्देगिरीचा गाभा म्हणजे ऑपरेशनल इंटरऑपरेबिलिटी, बाह्य अवकाशातील अत्यंत, मागणी असलेल्या आणि मर्यादित वातावरणात काम करणाऱ्या विविध, सक्षम समुहांची मनोसामाजिक ओळख आणि नेटवर्कमधील विविध भागीदारांसह नेहमी व्यावसायिकरित्या उपलब्ध आकस्मिकता विकसित करणे गरजेचे आहे. आपले सैन्य ज्याप्रमाणे लष्करी सरावात भाग घेते त्याप्रमाणेच या क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मानवी अंतराळ उड्डाणावरील सुसंगत भागीदारांसोबत काम करण्याची भारताची क्षमता ही आपल्या उच्च-तंत्रज्ञानाच्या धोरणात्मक स्वायत्ततेचे सूचक असणार आहे. ही धोरणात्मक स्वायत्तता केवळ इस्रोच्या क्षेत्रापुरती मर्यादित नाही; तर ती आपल्या व्यावसायिक अवकाश परिसंस्थेत विस्तारणार आहे. इतर देशांसोबत आयसीईटीसारख्या द्विपक्षीय 'मानवी अंतराळ उड्डाण' उपक्रमांवर काम करणे भारतासाठी फलदायी ठरणार आहे. शेवटी, भारतीय व्यावसायिक अवकाश संस्थांना जागतिक मानवी अंतराळ उड्डाण आणि सीआयएस लूनार आर्किटेक्चर क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर स्थान निर्माण करण्यासाठी सक्षम करणे गरजेचे आहे.


चैतन्य गिरी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी आणि टेक्नॉलॉजीचे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.