Image Source: Getty
प्रस्तावना
सध्या जागतिक स्तरावर विडीओ गेम्स हे अब्जावधी लोकांना जोडणारे विशाल डिजिटल नेटवर्क झाले आहे. मात्र, या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामागे एक चिंताजनक वास्तवही आहे. दहशतवादी संघटना आणि अतिरेकी गटांकडून हळूहळू ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत आहे. जगभरातील तरुणांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि अडकवण्यासाठी भौगोलिक अडथळ्यांना मागे टाकत या अतिरेकी संघटना गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.
जागतिक स्तरावर, कोविड १९ महामारीनंतर ऑनलाइन गेमिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक स्तरावरील गेमिंगचे स्वरूप, त्यातील वाढ आणि त्याचे तरूणाईतील आकर्षण पाहता, एक मजबूत जागतिक गेमिंग संस्कृती अधोरेखित झाली आहे. भारतानेही कोविड १९ महामारीच्या काळात स्वस्त स्मार्टफोन, कमी डेटा खर्च आणि सामाजिक बदल यामुळे या क्षेत्रातील स्फोटक वाढ पाहिली आहे.
जगभरातील तरुणांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि अडकवण्यासाठी भौगोलिक अडथळ्यांना मागे टाकत या अतिरेकी संघटना गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.
या लेखामधून तेजीत असलेल्या डिजिटल लँडस्केपच्या गडद बाजूचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात अतिरेकी गट त्यांचा प्रभाव पसरवण्यासाठी आणि खेळाडूंना कट्टरतावादी बनवण्यासाठी गेमिंग प्लॅटफॉर्मचा कशाप्रकारे वापर करतात याचा आढावा घेण्यात आला आहे. गेममधील सामग्रीचा गैरवापर करणे, अनुभव नसलेल्या खेळाडूंना लक्ष्य करणे तसेच गेममध्ये सामाजिक वैशिष्ट्यांचा गैरवापर करून क्लोज्ड रॅडीकल सर्कल तयार करणे, यांसारख्या अतिरेकी गट वापरत असलेल्या पद्धतींचे परिक्षण करण्यात आले आहे. तसेच तरूणांना लक्ष्य करणारे हे गट कट्टरतावादी विचार पसरवण्यासाठी कशाप्रकारे तंत्राचा वापर करत आहेत यावरही या लेखात चर्चा करण्यात आली आहे. सर्वात शेवटी, वापरकर्त्याची सुरक्षा आणि गोपनीयतेला हातभार लावताना, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी डेव्हलपर्सनी कोणती धोरणे स्विकारायला हवीत यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
ऑनलाईन गेमर्सची वाढती संख्या
आकृती १ - प्रदेशानुसार गेमर्सचे जागतिक वितरण (दशलक्षमध्ये)
![](https://www.orfonline.org/public/uploads/editor/20241205160616.png)
स्त्रोत – प्रायोरी डेटा (Priori Data)
भारतीय गेमिंग क्षेत्र आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत २० टक्के वाढून अंदाजे २५३ अब्ज रूपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यातून देशाच्या वेगाने विस्तारत असलेल्या गेमिंग लँडस्केपवर प्रकाश पडला आहे. एकट्या २०२३ या वर्षांमध्ये, भारताने अंदाजे १००,००० लोकांना रोजगार दिला आहे आणि २०२५ पर्यंत तो २५०,००० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा युजर बेस आहे, पहिल्या क्रमांकावर चीन असून भारत हा गेमिंग पॉवरहाऊस ठरत असल्याचे, थॉर्नटन भारत आणि ई गेमिंगच्या गार्डिअन्स ऑफ सेफ प्ले – एथिकल गेमिंग फॉर अ व्हायब्रंट भारत या अहवालात दिसून आले आहे. लुडो किंग आणि फ्री फायर मॅक्स सारख्या लोकप्रिय गेम्सनी या अभूतपूर्व वाढीला हातभार लावल्याने २०२२ मध्ये ५.२ अब्जावरून भारतातील मोबाइल गेम डाउनलोडची संख्या २०२३ मध्ये ९.६६ अब्जांवर पोहोचली आहे.
आकृती २: चीन, भारत आणि युनायटेड स्टेट्समधील ऑनलाइन गेमर आणि मार्केट रेव्हेन्यूची तुलना (डॉलरमध्ये)
![](https://www.orfonline.org/public/uploads/editor/20241205160602.png)
स्त्रोत – स्टॅटिस्टा
गेमिंग प्लॅटफॉर्मवरील अतिरेकी कारवाया
कट्टरतावादासाठी आणि भरतीसाठी दहशतवादी संघटना या गेमिंग प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक वापर करत आहेत. गेममधील कॅरेक्टर्सचा रंग, वातावरण किंवा कथानक अशा गेमिंग सामग्रीत बदल करणे या काही सामाईक युक्त्या आहेत. ग्लोबल प्रोजेक्ट अगेंस्ट हेट अँड एक्स्ट्रीमिझमनुसार, काऊंटर स्ट्राईक – ग्लोबल ऑफेन्सिव्ह – (सीएस – जीओ) सारख्या गेम्समध्ये व्हाईट नॅशनालिस्ट इन्सिग्नीया किंवा उजव्या अतिरेकी विचारसरणीचा वापर केला जातो. यामुळे निर्माण होणाऱ्या अवकाशात खेळाडूंना या समजुतींचा सामना करावा लागतो किंवा या समजुती अगदी निष्क्रीयपणे स्वीकारल्या जातात. कॉल ऑफ ड्यूटी सारख्या खेळांमध्ये इस्लामिक स्टेट सारख्या दहशतवादी गटांद्वारे राजकीय किंवा राष्ट्रवादी विचारधारेचा वापर केला जातो. यातील सतत एक्सपोजरमुळे अशा अतिरेकी विचारधारा नॉर्मल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कॉल ऑफ ड्यूटी सारख्या खेळांमध्ये इस्लामिक स्टेट सारख्या दहशतवादी गटांद्वारे राजकीय किंवा राष्ट्रवादी विचारधारेचा वापर केला जातो. यातील सतत एक्सपोजरमुळे अशा अतिरेकी विचारधारा नॉर्मल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
अशा खेळांमध्ये खेळाडू दीर्घकाळ गुंतून राहत असल्याने ते प्रभावी ठरतात. यातून अतिरेकी संघटनांकडून खेळाडूंचे ब्रेनवॉश केले जाते. याव्यतिरिक्त, व्हीआर चॅटसारख्या व्हर्चुअल रिअलीटी (व्हीआर) गेममधून रीअल-टाइम आणि वैयक्तिकृत परस्परसंवाद साधण्याची संधी मिळते. यातून अतिरेक्यांना तरुण, असुरक्षित खेळाडूंना विशिष्ट विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या सुधारित सेटिंग्जमध्ये गुंतवून त्यांचा वापर करण्याची महत्त्वाची संधी प्रदान होते.
मोबिलायझेशन आणि प्रशिक्षण
काही गेम्सचा वापर प्रशिक्षणाचे मैदान म्हणून केला जातो. यामध्ये अतिरेकी आक्रमणाचा सराव करण्यासाठी किंवा रणनीती सुधारण्यासाठी गेममधील वातावरणाचा वापर करतात तसेच लढाऊ किंवा समन्वय डावपेचांचे अनुकरण करतात. उदाहरणार्थ, अर्मा ३ आणि एस्केप फ्रॉम टारकोव्हसारखे गेम हे आभासी प्रशिक्षणाचे मैदान बनले आहेत. अशा गेम्समध्ये वापरकर्ते वास्तववादी वातावरणाचा वापर करून रणनीती आखू शकतात. या खेळांची त्यांच्या उच्च दर्जाच्या वास्तववादासाठी प्रशंसा केली जाते. अतिरेकी गट कट्टरतावादी मानसिकता विकसित करण्याच्या उद्देशाने अशा गेम्सना पसंती देतात. अतिरेकी या गेमचा वापर रणनीतींचा सराव करण्यासाठी आणि वास्तविक-जगातील परिस्थितींमधील भूमिका ठरवण्यासाठी करतात.
आर्थिक फसवणूक आणि सायबर बुलिंग
अतिरेक्यांनी मनी लाँड्रिंग आणि फसव्या व्यवहारांसाठी इन-गेम चलन प्रणाली आणि आयटम मार्केटप्लेसचा देखील वापर केला जातो. काऊंटर स्ट्राईक – ग्लोबल ऑफेन्ससारख्या गेम्समध्ये वेपन स्किन मार्केटप्लेसचा वापर बेकायदेशीर व्यापारांसाठी केला जातो. तर काही प्रकरणांमध्ये याचा वापर मनी लाँडरिंगसाठी केला गेल्याचे उघड झाले आहे. याशिवाय, अल कासम ब्रिगेड्स, हमास, अल-कायदा, आयसीस आणि हिजबुल्लाह सारख्या दहशतवादी संघटना सायबर फसवणूक, प्रचार आणि शूटिंग सराव आणि युद्धासारख्या प्रशिक्षणासाठी खेळाडूंना लक्ष्य करत आहेत. या वातावरणाचा वापर असुरक्षित व्यक्तींना समाजापासून वेगळं करण्यासाठी आणि त्यांना अतिरेकी गटांमध्ये खेचण्यासाठी केला जातो. अशा प्रकारच्या व्यक्तींना अशा वातावरणात सुरक्षिततेची किंवा आपलेपणाची फसवी भावना निर्माण होते.
अतिरेक्यांनी मनी लाँड्रिंग आणि फसव्या व्यवहारांसाठी इन-गेम चलन प्रणाली आणि आयटम मार्केटप्लेसचा देखील वापर केला जातो.
गेमिंग प्लॅटफॉर्मवरील धमक्यांना तोंड देण्यातील आव्हाने
या डिजिटल वातावरणात तयार करण्यात आलेली आणि सामायिक केली जाणारी सामग्री ही गेमिंग प्लॅटफॉर्मवर दहशतावादाशी मुकाबला करण्यातील प्रमुख आव्हान आहे. रॉबलॉक्स आणि जिटीए सारख्या गेम्समध्ये विशाल सँडबॉक्स अवकाश तयार केले जाते. यात खेळाडू सामग्रीमध्ये बदल करू शकतात यामुळे डेव्हलपर्सना रिअल-टाइममध्ये सर्व क्रियाकलापांचे निरीक्षण करणे कठीण होते. अतिरेकी सामग्री ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शोध यंत्रणा सतत विकसित केली जात आहे. तरीही, अतिरेकी डावपेचांच्या जलद उत्क्रांतीमुळे आणि गोपनीयता आणि डेटा प्रवेश मर्यादांमुळे या तंत्रज्ञानावर मर्यादा आली आहे.
काही समुदाय सुरक्षिततेपेक्षा गेममधील कमाईवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याने, गेमिंग कंपन्यांना बऱ्याचदा दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक समर्पित संसाधनांची आवश्यकता भासते. रिअल-टाइम मॉडरेशन बहुतेक वेळा कमी-संसाधन किंवा गुप्त कट्टरतावादी युक्त्या शोधण्यात प्रभावी नसल्याचा फायदा अतिरेकी गट घेतात.
गेम डेव्हलपर्ससाठीचे उपाय
सरकार आणि गेमिंग कंपन्या विविध नियामक उपाय आणि सक्रिय धोरणांद्वारे गेमिंगमधील दहशतवादाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी काम करत आहेत. २०२१ मध्ये, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने गेमिंग प्लॅटफॉर्मवरील अतिरेकी क्रियाकलाप ओळखण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी टेक कंपन्यांशी सहयोग करण्यासाठी समर्पित टास्क फोर्स लाँच केले आहे. भारतामधील २०२१च्या माहिती तंत्रज्ञान नियमामध्ये गेमिंग प्लॅटफॉर्मनी दहशतवादी तसेच बेकायदेशीर कंटेन्ट ट्रॅक करणे आणि रिपोर्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारतातील मोबाईल गेमिंगचे व्यापक स्वरूप हे अंमलबजावणीतील मोठे आव्हान आहे असे म्हटले जाते. युरोपमध्ये, २०२२ साली पारित झालेल्या युरोपियन युनियन (इयू) डिजिटल सेवा कायद्यानुसार, जोखीम मूल्यांकन करणे आणि सामग्री नियंत्रणाची अंमलबजावणी करणे ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी अत्यावश्यक आहे. असे असले तरीही, या मानकांची अंमलबजावणी राष्ट्राराष्ट्रानुसार बदलत जाते. दरम्यान, सिंगापूर आणि इंडोनेशिया सारख्या आग्नेय आशियाई राष्ट्रांनी डिजिटल सामग्री नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. असे असले तरी यात दहशतवादी कारवायांवर थेट लक्ष केंद्रित करण्याऐवजी सायबर सिक्युरिटीवर भर दिला जात आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या गॅप्सचा गैरफायदा अतिरेकी संघटना घेत आहेत.
२०२१ मध्ये, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने गेमिंग प्लॅटफॉर्मवरील अतिरेकी क्रियाकलाप ओळखण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी टेक कंपन्यांशी सहयोग करण्यासाठी समर्पित टास्क फोर्स लाँच केले आहे.
या सरकारी प्रयत्नांसोबत, सुरक्षित आणि अधिक लवचिक गेमिंग समुदाय तयार करण्यासाठी गेमिंग कंपन्या काही अतिरिक्त उपायांचा अवलंब करू शकतात.
· अतिरेकी सामग्री शोधण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी मानवी निरीक्षणासह प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे अल्गोरिदमचा वापर डेव्हलपर्स करत असताना प्रभावी सामग्री नियंत्रणाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. अतिरेकी अशा अल्गोरिदमचा सहज वापर करत असल्यामुळे वेळोवेळी हे अल्गोरिदम अद्ययावत करणे गरजेचे आहे.
· अतिरेकी आणि द्वेषयुक्त भाषणांना स्पष्टपणे प्रतिबंधित करणारे समुदाय मानक स्थापित करणे आणि संप्रेषणामधील सुरक्षितता वाढवते यासाठी विकसित होत असलेल्या अतिरेकी कारवायांना ओळखण्यासाठी आणि संबोधित करण्यासाठी डेव्हलपर्सनी मॉडरेटर्सना सतत प्रशिक्षण दिले पाहिजे.
· दहशतवादाशी लढण्यासाठी डेव्हलपर्सनी तज्ञांची मदत घ्यायला हवी, असे केल्यास नवनवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच त्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करता येऊ शकेल.
· शिक्षक आणि अतिरेकी विरोधी संघटनांच्या सहकार्याने, खेळाडूंना कट्टरतावादाच्या लक्षणांबद्दल शिक्षित करणे, अतिरेकी प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी ज्ञानाने सुसज्ज करणे व जागरूक समुदायासाठी योगदान देणे या बाबी प्रभावी ठरू शकतात.
· सरते शेवटी, दहशतवादी कारवायांबाबत सतर्क करणारी यंत्रणा सुसज्ज केल्यास खेळाडू सहजपणे अतिरेकी सामग्रीबाबत तक्रार करू शकतील. असे झाल्यास एक सक्रिय आणि सशक्त गेमिंग वातावरण वाढीस लागेल.
अशा एकत्रित नियामक उपाय आणि उद्योग-चालित धोरणांमुळे एक सक्षम गेमिंग इकोसिस्टम तयार होण्यास मदत होईल. यामध्ये खेळाडूंचे संरक्षण करणे सुलभ होईलच पण त्यासोबत अतिरेकी संघटनांचा प्रभाव कमी करणे आणि गेमिंग समुदायाला हानिकारक सामग्रीच्या प्रसाराचा सक्रियपणे प्रतिकार करण्यास सक्षम करणे शक्य होईल.
दहशतवादी कारवायांबाबत सतर्क करणारी यंत्रणा सुसज्ज केल्यास खेळाडू सहजपणे अतिरेकी सामग्रीबाबत तक्रार करू शकतील. असे झाल्यास एक सक्रिय आणि सशक्त गेमिंग वातावरण वाढीस लागेल.
निष्कर्ष
सध्या व्हिडिओ गेमचे रूपांतर सामाजिकरित्या कनेक्टेड प्लॅटफॉर्ममध्ये झाले आहेत. अशा प्लॅटफॉर्मचा वापर दहशतवादी संघटना खेळाडूंना भरती करण्यासाठी आणि कट्टरपंथी बनवण्यासाठी करत आहेत. गेमिंगमधील तल्लीनतेचा आणि निनावीपणाचा फायदा घेऊन, अतिरेकी गट जगभरातील असुरक्षित व्यक्तींना लक्ष्य करत आहेत. या आव्हानामुळे संपूर्ण गेमिंग इकोसिस्टमवर तातडीची कारवाई करण्याची गरज आहे. डेव्हलपर्सनी मॉडरेशन सिस्टीम मजबूत करणे, एआय डिटेक्शन टूल्स वापरणे आणि तज्ञांसह कारवाई करणे आवश्यक आहे. धोरणकर्त्यांनी गेमिंग प्लॅटफॉर्मला जबाबदार धरण्यासाठी नियम स्थापित केले पाहिजेत. तसेच गेमिंग समुदायाने सतर्क राहत दहशतवादी कारवायांची वेळीच तक्रार केली पाहिजे.
गेमिंगला सकारात्मक जागा म्हणून जतन करण्यासाठी सामूहिक दक्षता, नाविन्यपूर्ण संयम आणि मजबूत शोषणविरोधी उपाय आवश्यक आहेत. कंपन्या, सरकार आणि सुरक्षा तज्ञ यांच्यातील घनिष्ठ सहकार्याने, अतिरेकी प्रभावापासून गेमिंगला मुक्त, सुरक्षित आणि आकर्षक करणे शक्य आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.