Author : Sauradeep Bag

Published on Feb 06, 2024 Updated 0 Hours ago

भारतातील बिटकॉइन ईटीएफची शक्यता दूरची दिसते, मात्र, काही आर्थिक व्यासपीठे भारतीय गुंतवणूकदारांसाठी संभाव्य प्रस्ताव देऊ शकतात.

वैशिष्ट्यपूर्ण ते सामान्यीकरण: मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याचा क्रिप्टोचा प्रवास?

दशकभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर, थेट बिटकॉइनच्या किमतीचा मागोवा घेणाऱ्या गुंतवणूक निधीला (ईटीएफ) अमेरिकेत मान्यता मिळाली आहे, ही घटना बिटकॉइन संदर्भात मोठे महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारी घटना मानली जाते. मंजुरीनंतरच्या दिवसांत, अमेरिकेत-सूचीबद्ध झालेल्या बिटकॉइन ईटीएफने ४.६ अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीची शेअर्सची खरेदी-विक्री केली, ज्यातून हा मोठा बदल घडवणाऱ्या नाविन्यपूर्ण उत्पादनांबाबत गुंतवणूकदारांचा असलेला उत्साह दिसून येतो. अशा प्रगतीचा व्यापक जागतिक प्रभाव पडावा, याकरता याचे दक्षतेने मूल्यमापन आणि विश्लेषण करणे आवश्यक आहे.

अवघ्या काही वर्षांत, क्रिप्टोकरन्सी डिजिटल नाविन्यपूर्ण गोष्टीपासून ट्रिलियन-डॉलर तंत्रज्ञानापर्यंत विकसित झाली आहे, जी जागतिक वित्तीय प्रणालीत मोठा बदल घडवून आणण्याकरता तयार आहे. बिटकॉइन आणि इतर अनेक डिजिटल चलनांना केवळ गुंतवणूक म्हणून पाहिले जात नाही तर सॉफ्टवेअर आणि डिजिटल स्थावर मालमत्तेपासून, बेकायदेशीर गोष्टींपर्यंत- विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी चलन म्हणूनही बिटकॉइनचा वापर केला जातो.

क्रिप्टोकरन्सीचे समर्थक क्रिप्टोकरन्सीला लोकशाहीकरणासाठीची एक शक्ती मानतात, जे पैशांच्या निर्मितीवर आणि नियंत्रणावर मध्यवर्ती बँकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या पारंपरिक अधिकाराला आव्हान देतात. दुसरीकडे, टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की, या संदर्भातील नियामक निरीक्षणाचा अभाव गुन्हेगारी संस्था, दहशतवादी संघटना आणि अराजक देशांना सामर्थ्य देतो. शिवाय, त्यांचे म्हणणे आहे की, या डिजिटल मालमत्ता सामाजिक असमानतेला हातभार लावतात, बाजारातील लक्षणीय अस्थिरतेमुळे त्रस्त आहेत आणि त्यांच्या ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणीय नुकसान निश्चित आहे.

बिटकॉइन आणि इतर अनेक डिजिटल चलनांना केवळ गुंतवणूक म्हणून पाहिले जात नाही तर सॉफ्टवेअर आणि डिजिटल स्थावर मालमत्तेपासून बेकायदेशीर गोष्टींपर्यंत विविध प्रकारच्या वस्तूंच्या आणि सेवांच्या खरेदीसाठी चलन म्हणूनही त्यांचा वापर केला जातो.

विवाद सुरू असूनही, क्रिप्टोकरन्सीची निर्विवाद वाढ पूर्वीच्या अपेक्षांहून अधिक झाली आहे. जवळपास दशकभराच्या आव्हानांनंतर, आता ‘बिटकॉइन ईटीएफ’बाबतची समज निकटतम आली आहे, जे या डिजिटल मालमत्तेला मुख्य प्रवाहातील आर्थिक बाजारपेठांमध्ये एकात्मिक करण्याकरता एक उल्लेखनीय मैलाचा दगड मानला जातो. हा विकास अमेरिकेच्या आणि जगाच्या विविध भागांमध्ये स्वीकारला जात असला तरी, या विषयावर भारताची भूमिका अनिश्चित राहिली आहे, ज्यामुळे देशात बिटकॉइनला प्रोत्साहन मिळण्याकरता संभाव्य समर्थनासंदर्भात प्रश्न निर्माण झाले आहेत.

बिटकॉइन ईटीएफचे मूळ स्वरूपात रूपांतरण  

ईटीएफ ही शेअर बाजारातील व्यवहारांत सर्वोत्तम परतावा देणारी बहुआयामी गुंतवणूक असून, विशिष्ट निर्देशांक, माल, रोखे अथवा मालमत्तेची श्रेणी प्रतिबिंबित करते. त्यांच्या पारदर्शकतेसाठी, तरलतेसाठी आणि किफायतशीरपणासाठी ओळखले जाणारे ईटीएफ गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओत प्रवेश मिळवून देतात, वैयक्तिक शेअर्स व्यापाराच्या लवचिकतेची आठवण करून देतात.

अमेरिकेतील निर्णयामुळे थेट बिटकॉइनच्या किमतीचा मागोवा घेणाऱ्या गुंतवणूक निधीला मान्यता मिळाली आहे, जे दशकभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर मिळालेले एक महत्त्वपूर्ण यश आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (एसइसी) द्वारे सुसज्ज, ही अत्यंत अपेक्षित उत्पादने प्रमुख अमेरिकी बाजारपेठा- न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंज, सीबीओइ ग्लोबल मार्केट्स, आणि नॅसडॅकमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत- पारंपरिक दलालांच्या ॲप्सद्वारे किरकोळ ग्राहकांमध्ये बिटकॉइन प्रवेशयोग्यतेसाठी क्रांतिकारी युग सुरू करत आहेत. पारंपरिक वित्तीय संस्थांना आता क्रिप्टो एक्स्चेंजच्या गुंतागुंतीत न शिरता गुंतवणूक करण्याची थेट संधी आहे. या ईटीएफमध्ये क्रिप्टो एक्स्चेंजेसमधून मिळवलेल्या आणि संरक्षकांद्वारे सुरक्षितपणे ठेवलेल्या वास्तविक बिटकॉइन्सचा समावेश असेल. मुख्य प्रवाहातील वित्तीय बाजारपेठांमध्ये बिटकॉइनच्या एकत्रीकरणाचा हा एक महत्त्वाचा क्षण आहे.

पारंपरिक वित्तीय संस्थांना आता क्रिप्टो एक्स्चेंजच्या गुंतागुंतीत न शिरता गुंतवणूक करण्याची थेट संधी आहे.

बिटकॉइन ईटीएफ संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणून उदयास आले आहेत, जे जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीशी संलग्न होण्यासाठी एक विश्वासार्ह मार्ग प्रदान करतात. अशा पर्यायांच्या अनुपस्थितीत, संस्था वारंवार फ्युचर्स ईटीएफ किंवा क्लोज-एण्डेड फंड्सचा (जी गुंतवणूक ठराविक कालावधीसाठी विकता येत नाही) अवलंब करतात, त्या प्रत्येकाला आव्हाने असतात, जसे की उच्च शुल्क आणि मर्यादित कार्यक्षमता. बिटकॉइन ईटीएफचे आगमन केवळ सुलभता वाढवत नाही तर संस्थांसाठी गुंतवणूक प्रक्रिया सुव्यवस्थित करते, क्रिप्टोकरन्सी बाजारपेठेच्या संभाव्यतेचा वापर करण्यासाठी अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम माध्यम सादर करते. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक चित्राच्या व्यापक उत्क्रांतीत योगदान देत, यामुळे एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले गेले आहे.

निधी चोरीला जाणे अथवा तुमच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करणे आणि अचानक कंपनी बंद होणे यांसारख्या याआधी घडलेल्या दुर्दैवी घटनांनी आर्थिक नुकसान झाले असले तरी, बारकाईने नियमन केल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या शेअर बाजारातील बिटकॉइन ईटीएफचे आगमन सकारात्मक बदलाची घोषणा करते. किरकोळ गुंतवणूकदार आता त्यांच्या विद्यमान ब्रोकरेज खात्यांद्वारे या ईटीएफमध्ये सोयीस्करपणे प्रवेश करू शकतात, ज्यांचे बारकाईने निरीक्षण केले जाते, ज्यामुळे गुंतवणूक प्रक्रियेची एकूण सुरक्षा वाढते.

वर्षाअखेरीस बिटकॉइनचे मूल्य एक लाख अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ही वेळ दोन दशकांपूर्वी गोल्ड ईटीएफवर झालेल्या प्रभावाची आठवण करून देणारी असून, उद्योगातील उत्साह वाढवणारी आहे. बिटकॉइन ईटीएफला मिळालेली अलीकडची मान्यता क्रिप्टो संदर्भातील चित्राला नवचैतन्य देते. विशेषत: ब्लॅकरॉकसारख्या प्रमुख कंपन्यांनी ही उत्पादने देऊ करण्यासाठी अमेरिकेत मान्यता मिळवली आहे. पुढे आगेकूच करण्याची परवानगी देणाऱ्या या हिरव्या सिग्नलमधून संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणुकीत वाढ होण्याची चाहूल मिळते. यामुळे क्रिप्टोकरन्सी परिसंस्थेत नवे चैतन्य, उत्साह संचारला आहे. स्पॉट बिटकॉइन ईटीएफला मिळालेली ओळख क्रिप्टो उद्योगाकरता एक विजयी क्षण आहे, त्याची विश्वासार्हता उंचावत आहे आणि बिटकॉइनला मुख्य प्रवाहात स्वीकारण्याकरता अधिक खोलवर चालना देते.  ‘एसइसी’सह व्यापक संघर्षादरम्यान, हा विजय उद्योगाची लवचिकता अधोरेखित करतो. थेट बिटकॉइनच्या किमतीचा मागोवा घेणाऱ्या गुंतवणूक निधीने पदार्पण केल्यामुळे, त्यांचा संभाव्य प्रभाव ऐतिहासिक बदलांचा प्रतिध्वनी करतो, जो गोल्ड ईटीएफचा सोन्याच्या किमतीवर झालेल्या परिवर्तनीय प्रभावाशी समांतर आहे. अमेरिकेतील क्रिप्टो गुंतवणूक चित्र आशादायक नव्या युगाच्या उंबरठ्यावर आहे, उच्च सुलभता, वाढीव तरलता आणि बिटकॉइनच्या मूल्यात भरीव नफा प्रदान करते.

थेट बिटकॉइनच्या किमतीचा मागोवा घेणाऱ्या गुंतवणूक निधीला मिळालेली ओळख क्रिप्टो उद्योगासाठी एक विजयी क्षण आहे, त्यांची विश्वासार्हता उंचावत आहे आणि बिटकॉइनला मुख्य प्रवाहात स्वीकारण्याकरता अधिक खोलवर चालना देते.  

भारतातील भविष्याकडे मार्गक्रमण करणे

विशेषत: अमेरिका आणि भारत यांच्यातील क्रिप्टोकरन्सीवरील दृष्टिकोन भिन्न आहेत. अमेरिकेत, बिटकॉइन ईटीएफचे समर्थन हे क्रिप्टोकरन्सीसाठी एक मजबूत संस्थात्मक प्रमाणीकरण आहे, जे सट्टा आणि अस्थिर मालमत्तेच्या प्रारंभिक वैशिष्ट्यापासून बदलाचे संकेत देते.

भारताच्या क्रिप्टोकरन्सी बाजारपेठेत अनिश्चितता आणि अस्थिरता दिसून आली आहे, सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमनाविषयी त्यांची मते दोलायमान आहे. २०१८ मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांद्वारे क्रिप्टो व्यवहारांवर बंदी घातली, त्यांना पारंपरिक वित्तीय प्रणालीपासून वेगळे केले. बंदी उठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या २०२०च्या निर्णयामुळे उद्योगाला पुन्हा चालना मिळाली, ज्यामुळे स्टार्टअप्समध्ये वाढ झाली. जुलै २०२२ मध्ये, भारताने क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर ३० टक्के कर लागू करण्यात आला आणि सर्व व्यवहारांवर १ टक्के कर वजा केला (टीडीएस). २०२३च्या उत्तरार्धात, ‘फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट’ने नऊ देशाबाहेरील क्रिप्टो एक्स्चेंजेसना कथित ‘बेकायदेशीर कामकाज’ आणि भारताच्या काळा पैसा पांढरा करण्यासाठी बेकायदेशीर व्यवहार करण्याविरोधात नियमांचे पालन न केल्याबद्दल नोटिसा जारी केल्या. भारतीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट’ने अधिकृतपणे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला भारतातील या नऊ क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजेसशी संबंधित ‘युआरएल’ रोखून कारवाई करण्याची विनंती केली आहे. भारतातील क्रिप्टोकरन्सीसाठी नियामक समर्थनाची पातळी अनिश्चित राहिली आहे. या विकसित होत असलेल्या चित्रासंबंधात सावधगिरीने पुढे जाण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. या अस्पष्ट वातावरणात बिटकॉइन ईटीएफची भारतातील शक्यता धूसर दिसते. तरीही, काही आर्थिक व्यासपीठे भारतीय गुंतवणूकदारांसाठी संभाव्य मार्ग देऊ शकतात. क्रिप्टोकरन्सीबद्दलचा भारताचा व्यापक उत्साह, विशेषत: युवावर्गात दुमदुमणारा आहे, बिटकॉइन ईटीएफला विकसित होणारा प्रतिसाद हा अनुसरण करण्याजोगा असल्याचे एक कथन बनवतो.

सौरदीप बाग हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.