वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद आणि हमास यांनी ऑगस्ट 2021 ते जून 2023 या काळात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 13 कोटी अमेरिकी अमेरिकी डाॅलर्सपेक्षा जास्त पैसे जमा केले. Tron, Bitcoin आणि Tether सारखी डिजिटल चलने आर्थिक व्यवहार आणि देणग्यांमध्ये क्रांती घडवून आणत आहेत. यातील सुमारे दोन तृतीयांश ट्रॉन वॉलेट दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहेत, असे राॅयटर्सने नमूद केले आहे. इस्लामिक स्टेट खोरासान (IS-K) ने अलीकडेच त्यांच्या व्हॉइस ऑफ खुरासान या मुखपत्रात मोनेरो (XMR) क्रिप्टोकरन्सीद्वारे जकात देणग्यांसाठी आवाहन केले आहे. या देणग्यांसाठी QR कोड ही देण्यात आला आहे. बंगळुरू कॅफेवरच्या दहशतवादी हल्ल्यात क्रिप्टोकरन्सीचा वापर आयसिस मॉड्युलच्या कर्नाटकातील ऑपरेशनला वित्तपुरवठा करण्यासाठी केला गेला.
इस्लामिक स्टेट खोरासान (IS-K) ने अलीकडेच त्यांच्या व्हॉइस ऑफ खुरासान या मुखपत्रात मोनेरो (XMR) क्रिप्टोकरन्सीद्वारे जकात देणग्यांसाठी आवाहन केले आहे. या देणग्यांसाठी QR कोड ही देण्यात आला आहे.
जकात हा इस्लामचा आधारस्तंभ असल्याने विविध कामांना समर्थन देण्यासाठी देणग्या देणे अनिवार्य आहे. पण या क्रिप्टोकरन्सी व्यवहारांच्या निनावीपणाचा फायदा घेऊन दहशतवादी गट आणि राज्यांकडून शोषण केले जाते. जकातीचा हा गैरवापर चिंता वाढवणारा आहे आणि सामायिक जबाबदारीवर प्रकाश टाकणाराही आहे. या लेखात जकातीमधील क्रिप्टोकरन्सीच्या गैरवापराचे परीक्षण केले आहे. विशेषत: भारतातील केरळसारख्या राज्यांत दहशतवादी वित्तपुरवठा करण्यासाठी त्याचा कसा उपयोग केला जाते हेही लिहिले आहे.
भारतात क्रिप्टो-हवाला
नोटबंदीनंतर डिजिटल चलन हे हवालाचे आधुनिक रूप म्हणून उदयाला आले. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजेंस ब्युरोने नुकत्याच केलेल्या तपासणीत केरळमध्ये पारंपारिक चलनाऐवजी क्रिप्टोकरन्सीचा वापर करणाऱ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला. क्रिप्टोकरन्सीचा वापर सिंथेटिक औषधांसाठी केला जात असल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे भरपूर नफा मिळत होता. केरळमधले 20 लाख लोक परदेशात राहतात. यामुळे केरळचे आखाती देशांशी चांगले संबंध आहेत. केरळच्या स्थलांतर सर्वेक्षणानुसार यापैकी अंदाजे 89.4 टक्के स्थलांतरित आखाती देशांमध्ये राहतात आणि काम करतात. ते कर चुकवण्यासाठी घरी पैसे पाठवतात. यासाठी क्रिप्ट हवाला पद्धतीचा वापर होतो. यामध्ये काहीवेळा बेकायदेशीर व्यवहार होतात.
गल्फ मनी हा मुख्यतः केरळच्या स्थलांतरितांकडून मिळवला जातो. यातूनच केरळमधील मशिदी आणि मदरशांना निधीही मिळतो. या निधीचा एक महत्त्वाचा भाग भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सतत धोका असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यासारख्या कट्टरपंथी गटांच्या प्रसाराशी संबंधित आहे. या पीएफआय वर सलग बंदी असूनही या गटाने आपल्या विध्वंसक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूअल यासारख्या गटांच्या आंतरराष्ट्रीय पाठिंब्याने PFI क्रिप्टोकरन्सीमध्ये जकात मागते. दिल्ली दंगलींसारख्या घटनांमध्ये बळी पडलेल्यांना मदत करणे, हज यात्रेकरूंना मदत करणे आणि रिहॅब फाऊंडेशन तसेच नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट सारख्या डमी कंपन्यांना निधी देणे यासह PFI वेगवेगळ्या मार्गाने जकात गोळा करते असे तपासात समोर आले आहे. कुवेत इंडिया सोशल फोरम या नावाने कार्यरत असलेल्या देशांमध्ये PFI ला पाठिंबा दिसून येतो. त्यामुळे भारतातही त्यांच्या बेकायदेशीर व्य़वहारांना थारा मिळतो.
या निधीचा एक महत्त्वाचा भाग पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यासारख्या कट्टरपंथी गटांच्या प्रसाराशी संबंधित आहे. या या दहशतवादी संघटनेमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला सतत धोका आहे.
यूकेमधल्या एका टेक कंपनीने तायर केलेल्या द पॉप्युलर फ्रंटच्या अहवालात, क्रिप्टोकरन्सीद्वारे पीएफआयला पाठिंबा देण्यासाठी ISIS, पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूअल आणि KISF या दहशतवादी संघटनांचा कसा हात आहे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑनलाइन नॅरेटिव्हज ॲटेम्पिंग टू रॅडिकलाइज इंडियन मुस्लिम्स म्हणजेच भारतीय मुस्लिमांना धर्माच्या मुद्द्यावर एकत्र आणण्यासाठी कसे ऑनलाइन कथन वापरले जाते अशा अर्थाचे हे शीर्षक आहे. हे गट Exodus, Samourai, Atomic Monero, आणि Bitcoin अशा क्रिप्टोकरन्सीद्वारे PFI मध्ये योगदान देण्यास उद्युक्त करतात आणि निनावीपणा राखण्यासाठी तसेच सुरक्षेचे उपाय टाळण्यासाठी XRP, Ripple आणि Cardano सारख्या जलद पर्यायांचा वापर करतात. इस्लामिक स्टेट ही संघटनादेखील पीएफआय सदस्यांना खलिफाच्या स्थापनेच्या उद्दिष्टाने जिहादसाठी ISIS मध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करते.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विस्तृत निधी उभारणीचे नेटवर्क वापरते, असा आरोप फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने केला आहे. हे नेटवर्क क्यूआर कोडचा प्रसार आणि ऑनलाइन खात्यांची विनंती यांसारखी आधुनिक तंत्रे आणि पारंपारिक पद्धतही वापरतात. यामध्ये 3 हजारहून अधिक बँक खाती आणि अनौपचारिक मूल्य हस्तांतरण यंत्रणेचा सहभाग असल्याचे या तपासात समोर आले आहे.
निनावीपणाचे रहस्य
क्रिप्टोकरन्सीचे विकेंद्रीकरण आणि खोटी नावे यामुळे हे व्यवहार समोर येत नाहीत. त्यामुळे दहशतवादी संघटनांना वित्तपुरवठा करण्यासाठी याचा वापर होतो. जकात मिळालेल्याच्या प्रतिष्ठेसाठी हे व्यवहार निनावी ठेवले जातात, असे सांगितले जाते पण यात शोषण झाल्याचे लक्षात आल्यावर ही अनामिकता समस्या निर्माण करते. हा धर्मादाय निधी दहशतवादाकडे वळवला जाऊ शकतो आणि जकातच्या उदात्त उद्दिष्टांनाही कमीपणा देतो. मोनेरो, झेडकॅश आणि डॅश अशासारख्या क्रिप्टोकरन्सी यात वापरल्या जातात.
जकात मिळालेल्याच्या प्रतिष्ठेसाठी हे व्यवहार निनावी ठेवले जातात असे सांगितले जाते पण यात शोषण झाल्याचे लक्षात आल्यावर ही अनामिक समस्या निर्माण करते.
या चलनांमध्ये वापरकर्त्याची ओळख आणि व्यवहारांची नोंद लपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात.
• प्रत्येक व्यवहारासाठी नवीन पत्ते तयार करून गोपनीयता वाढवली जाते. (उदा. मोनेरो).
• रिंग स्वाक्षरी (उदा. मोनेरो, बाइटकॉइन) मध्ये एकापेक्षा अधिक वापरकर्त्यांना एकत्र करून वैयक्तिक ओळख लपवली जाते.
• व्य़वहारांचा तपशील उघड न करता व्यवहार अधिकृत केले जातात. (उदा. Zcash).
या समस्येवर उपाय काय ?
जकातमधील क्रिप्टोकरन्सीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करणे, ते अधिक पारदर्शक करणे आणि बेकायदेशीर वित्तपुरवठा थांबवणे याचा समावेश आहे.
‘क्रिप्टोकरन्सीचा दहशतवादी वापर’ या शीर्षकाने 2019 मध्ये RAND अहवाल प्रकाशित झाला. कायद्याची अमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी क्रिप्टोचा गुप्त वापर रोखण्यासाठी त्यांच्या धोरणांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे, असे यात म्हटले आहे. हे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाऊ शकते.
1. निनावीकरण: क्रिप्टोकरन्सी वापरकर्त्यांची ओळख उघड करणे
2. खर्चावर निर्बंध : विशिष्ट व्यवहार रोखले तर दहशतवादासाठी हा निधी वापरला जाणार नाही.
3. चोरी : निधी चोरण्यासाठी खाजगी किंवा क्रिप्टोग्राफिक घटकांचा वापर रोखावा.
4. पद्धतशीर हल्ले: ब्लॉकचेन नेटवर्कमध्ये व्यत्यय आणून सर्वांसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर थांबवावा.
क्रिप्टोकरन्सीचा गैरवापर टाळण्यासाठी प्रत्यक्ष प्रणालीच्या सहभागाशिवाय, सिस्टिममध्ये व्यत्यय न आणता आणि डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस असे वर्गीकरण केले जाऊ शकते. यामध्ये सर्व्हर सगळ्यांना वापरता येणार नाही, असा उपाय केला जाऊ शकतो.
शिवाय या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी काही सॉफ्टवेअर वापरले जाऊ शकतात.
1. सॉफ्टवेअर पुरवठा साखळी हल्ला: अंतिम लक्ष्युपर्यंत निधी पोहोचण्यापूर्वी पुरवठा साखळी खंडित करता येते. 2017 मध्ये रॅन्समवेअरच्या रूपात युक्रेनमधील संगणक प्रणालींना लक्ष्य केले गेले. याला NotPetya हल्ले असे म्हणतात.
2. बॅकडोअर : नंतरच्या टप्प्यात लक्ष्य करण्यात आलेल्या संगणक प्रणालीमध्ये एक सॉफ्टवेअर सोडले जाते.
3. क्रिप्टोग्राफिक हल्ले: हे आक्रमणकर्त्याला व्यवहारातील गोपनीयता नष्ट करण्याची मुभा देते.
वित्तीय संस्था गांभिर्याने विचार करू शकतील अशाही काही पायऱ्या आहेत :
- निधीच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी आणि देणगीच्या पैशाचे योग्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करावा.
- विदेशी सहभागाचा मागोवा घेण्यासाठी नियमितपणे गैर-सरकारी संस्थांच्या बँक खात्यांचे ऑडिट करावे. देणगी देण्यापूर्वीच ते परकीय चलन भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित करणे अनिवार्य करावे. यामुळे या व्यवहारांचे दस्तावेज तयार होतील आणि त्यावर कर आकारणी करता येईल.
• शेल कंपन्या, कलाकृतींचे लिलाव आणि रिअल इस्टेट या मार्गाने पैशाची अफरातफर आणि दहशतवादी वित्तपुरवठा रोखण्यासाठी कठोर नियम लागू करावेत. नियमित पैशांमध्ये क्रिप्टोकरन्सीची देवाणघेवाण करण्यासाठीही कठोर नियम असावे.
• बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी डिजिटल चलनाचे नियम पारंपारिक पैशांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांशी जुळणारे असावेत. तुमचा ग्राहक जाणून घेऊन या नियमांची अमलबजावणी करावी.
निष्कर्ष
क्रिप्टोकरन्सी आणि जकात यांचा यांच्यातल्या या संबंधांमुळे धर्मादाय देणग्यांमध्ये संधी आणि आव्हाने निर्माण होतात. जकातीमुळे करुणा आणि ऐक्याच्या तत्त्वांचे पालन होत असले तरी क्रिप्टोकरन्सीच्या निनावी व्यवहारांद्वारे त्याचा गैरवापर केला जातो. यामुळे जागतिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. हे धोके ओळखण्यासाठी, जकातीच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीर हेतूंसाठी त्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी उपाययोजनांची सक्रियपणे अमलबजावणी करणे आवश्यक आहे. जकातीचा खरा उद्देश टिकवून ठेवण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. हिंसा आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कारवायांना उत्तेजन देण्यापेक्षा या जकातीचा वापर गरजू लोकांसाठी होणे महत्त्वाचे आहे.
जकातीमुळे करुणा आणि ऐक्याच्या तत्त्वांचे पालन होत असले तरी क्रिप्टोकरन्सीच्या निनावी व्यवहारांद्वारे त्याचा गैरवापर केला जातो. यामुळे जागतिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो.
त्याचप्रमाणे दहशतवादी आणि अतिरेकी कारवायांना पैसे पुरवणाऱ्या या यंत्रणेचा अंदाज घेणे आवश्यक आहे. हे दहशतवादी गट हळूहळू नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात परंतु सध्याच्या आर्थिक पायाभूत सुविधांच्या मर्यादांमुळे निधी देण्याच्या पद्धतींमध्ये फारशा सुधारणा करता येत नाहीत. दहशतवादी कारवायांना होणारा वित्तपुरवठा हा अनेकदा जागतिक किंवा स्थानिक आर्थिक चढउतारांना प्रतिसाद म्हणून होतो हेही लक्षात घेतले पाहिजे. सर्व प्रदेशांमधील नियामक फ्रेमवर्कमधील विसंगतींमुळे आर्थिक व्यवहार सुरक्षित राहात नाहीत. अतिरेक्यांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पळवाटाही काढता येतात. म्हणूनच या आर्थिक व्यवहारांवर नियमितपणे काटेकोर देखरेख आवश्यक आहे.
सौम्या अवस्थी या फ्री लान्स सल्लागार आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.