Author : Sauradeep Bag

Published on Oct 20, 2023 Updated 0 Hours ago

डिजिटल युरो डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवू शकतो परंतु त्याचे भविष्य अनिश्चित आहे. कारण त्याचा उद्देश आणि मूल्याबद्दल व्यापक राजकीय संशय व्यक्त केला जातोय. 

डिजिटल युरोचं भवितव्य काय असणार?

डिजिटल चलन आणि पेमेंटमध्ये जर कोणत्या चलनामध्ये मोठी प्रगती करण्याची क्षमता असेल तर ते चलन आहे डिजिटल युरो. हे चलन युरोपियन सेंट्रल बँकेने (ECB) जारी केलं असून सेंट्रल बँकेच्या पैशाचं डिजिटल स्वरूप म्हणून या युरोकडे आपण बघू शकतो. रोखीसोबतच किरकोळ वापरासाठी देखील याचा वापर केला जातोय. जगात डिजिटल चलन वाढू लागलंय आणि तो व्यापक आणि व्यवसायिक दृष्टिकोन ठेऊन युरोपियन युनियनने (EU) अनेक फायदे मिळवण्यासाठी हे चलन आणलं आहे.

डिजिटल युरोची संकल्पना समजून घेण्यासाठी, मध्यवर्ती बँकेचे पैसे आणि खाजगी पैसे यांच्यातील फरक ओळखण महत्त्वाचं आहे. मध्यवर्ती बँकेचे पैसे ज्याला आपण “सार्वजनिक पैसे” असं म्हणतो जे मध्यवर्ती बँकेद्वारे जारी केले जातात. असे चलन हे एखाद्या देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाचे किंवा युरोझोनसारख्या सदस्य राष्ट्रांच्या संघाचे प्रतिनिधित्व करते. दुसरीकडे, खाजगी पैसे, ज्याला “व्यावसायिक बँक पैसे” म्हटलं जातं ते व्यावसायिक बँकांद्वारे जारी केलं जातं. त्यात बँक ठेवी आणि कर्ज समाविष्ट असतात. डिजिटल युरो हा मध्यवर्ती बँकेच्या पैशाचा एक प्रकार आहे, जो अशा सार्वजनिक निधीशी संबंधित हमी आणि स्थिरता प्रदान करतो.

डिजिटल युरो हा मध्यवर्ती बँकेच्या पैशाचा एक प्रकार आहे, जो अशा सार्वजनिक निधीशी संबंधित हमी आणि स्थिरता प्रदान करतो.

मात्र, केंद्रीय बँक डिजिटल चलनाच्या (सीबीडीसी) उद्देशाविषयी युरोपियन युनियन संसदेत असलेल्या शंकांमुळे सावध आणि हळूहळू पावलं टाकत आहे. हा निर्णय नोव्हेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो. मध्यवर्ती बँकेच्या अधिकार्‍यांनी तांत्रिक, आर्थिक आणि राजकीय अडथळे दूर करणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. तांत्रिक युक्तिवादाकडे जाण्यापूर्वी वास्तविक उपयुक्तता जाणून घेणं आवश्यक आहे.

डिजिटल रोडमॅप

डिजिटल युरोची विकास प्रक्रिया अनेक टप्प्यांतून गेली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये, युरोपियन सेंट्रल बँकेने सीबीडीसी या चलनाचं युरोमध्ये असणारं मूल्य तपासलं आहे. त्यानंतर याचा परीक्षण करणारा अहवाल प्रकाशित केला. ऑक्‍टोबर 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत, डिजिटल युरोच्या फायद्याबाबत माहिती गोळा करण्यासाठी सार्वजनिक सल्लामसलत करण्यात आली. जुलै 2021 मध्ये, युरोपियन सेंट्रल बँकेने डिझाईन आणि वितरण यासारख्या अत्यावश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणीचा टप्पा सुरू केला. या चालू टप्प्यात डिझाइन समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि विस्तृत धोरणांची सुनिश्चिती करण्यासाठी युरोपियन युनियन, युरोपियन संसद, युरोपियन आयोग या संस्था आणि भागधारक यांच्यातील डिजिटल युरोची व्यावहारिकता तपासण्यासाठी अभ्यास करण्यात आला.

युरोपियन सेंट्रल बँकच्या गव्हर्निंग कौन्सिलने तयारी आणि प्रयोगाच्या टप्प्यात पुढे जायचे की नाही याचा निर्णय घेऊन तपासणीचा टप्पा ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू ठेवला. हा पुढील टप्पा अंदाजे तीन वर्षांचा असू शकतो जेणेकरून डिजिटल युरोचा विकास होईल. शेवटी, डिजिटल युरो सादर करण्याचा निर्णय परिषद आणि संसदेवर अवलंबून असेल.

युरोपियन सेंट्रल बँकच्या गव्हर्निंग कौन्सिलने तयारी आणि प्रयोगाच्या टप्प्यात पुढे जायचे की नाही याचा निर्णय घेऊन तपासणीचा टप्पा ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू ठेवला आहे.

मध्यवर्ती बँकेच्या पैशांशी संबंधित स्थिरता आणि सुरक्षितता राखून डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवून आणण्याची डिजिटल युरोची क्षमता ही युरोपियन युनियनच्या विकासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

भरपूर आव्हाने

युरोपियन सेंट्रल बँक आणि युरोपियन कमिशन डिजिटल युरोच्या तांत्रिक पैलूंवर काम करत आहेत. पण या नावीन्यपूर्णतेसाठी राजकीय मदत मिळताना दिसत नाही. सीबीडीसीची स्थापना करण्यासाठी नवीन कायदे आणले जाणार असून, त्यात प्रामुख्याने डिजिटल युरोने काय करू नये यावर भर दिला आहे. यात होल्डिंग्स आणि व्याज पेमेंट्सवरील मर्यादा समाविष्ट आहेत. पारंपारिक बचत आणि गुंतवणुकीशी स्पर्धा रोखण्यासाठी  या मर्यादा टाकल्या आहेत.

पण आता काही राजकारणी या डिजिटल करन्सीवरच प्रश्न उपस्थित करू लागलेत. नेमका त्याचा उद्देश काय? त्याचं अस्तित्त्व असावं का हे प्रश्न आहेत. जर या डिजिटल करन्सी संबंधातला प्रस्ताव तयार करायचा असेल तर मात्र हे प्रश्न त्यासाठी आव्हान ठरू शकतात. नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान, युरोझोनच्या अर्थमंत्र्यांनी युरोपियन नागरिकांच्या जीवनात आणि व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये डिजिटल युरोचं अतिरिक्त मूल्य आणि महत्त्व याविषयी प्रेरक स्पष्टीकरणाच्या गरजेवर भर दिला.

युरोपियन सेंट्रल बँक मधील डिजिटल करन्सीचे समर्थक सुचवितात की डिजिटल युरो आर्थिक आधार म्हणून काम करू शकतो. वाढत्या डिजीटलाइज्ड युगात नागरिकांना राज्याने जारी केलेल्या डिजिटल पैशांचा प्रवेश सुनिश्चित करते. काही जण असा सल्ला देतात की यामुळे अस्थिर व्यावसायिक बँकिंग प्रणालीला पूर्णपणे बायपास करू शकते. पण लोकांना हे सनिव्वळ कठीण काम आहे. कारण अगदी तंत्रज्ञान जाणणाऱ्यांपैकी काहींनी डिजिटल युरोबद्दल बरच काही ऐकलंय किंवा त्याचे परिणाम समजून घेतले आहेत.

डिजिटल करन्सी (सीबीडीसी) सुरू करण्यासाठी नवीन कायदे तयार केले जाणार आहेत. यात डिजिटल युरोने काय करावं आणि काय करू नये याविषयी स्पष्ट दिशानिर्देश दिले जाणार आहेत. यात होल्डिंग्स आणि व्याज पेमेंट्सवरील मर्यादा समाविष्ट आहेत. यात पारंपारिक बचत आणि गुंतवणुकीशी स्पर्धा रोखणे हे मूळ उद्दीष्ट आहे.

युरोपियन संसदेचे जर्मन सदस्य (एमईपी) स्टीफन बर्जर यांची ईसीबीच्या संभाव्य युरोसाठी कायद्याच्या विकासाचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. बर्जर यांनी पूर्वी क्रिप्टो अॅसेट्स रेग्युलेशन ( एमआयसीए ) मध्ये युरोपियन युनियनचे मार्केट्स पास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी डिजिटल युरोच्या यशामध्ये विश्वासावर जोर दिला. युरोपियन सेंट्रल बँकेने अद्याप सीबीडीसीवर औपचारिकपणे निर्णय घेतलेला नसला तरी, त्यांनी त्यांच्या तांत्रिक तयारीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. हे चलन देशांमध्ये लागू करण्यासाठी युरोपियन संसद आणि युरोपियन युनियनची कायद्यांवर सहमती असणे आवश्यक आहे. यामुळे संसदेतील राजकीय भावना परिणामांवर प्रभाव टाकतील.

युरोपियन कमिशनच्या उलट आश्वासने असूनही युरोपीयन संसदेत याविषयी साशंकता पसरली आहे. यात रोख स्वरूप बदलण्यापासून ते सीबीडीसीचं चिनी-शैलीच्या क्रेडिट प्रणाली सारखी अवस्था होण्याच्या भीतीपर्यंत चिंता आहे. काही खासदार डिजिटल युरोच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. हा गोंधळ युरोपियन युनियनच्या आधीच असलेल्या अत्याधुनिक पेमेंट नेटवर्क्समुळे उद्भवू शकतो. यात नागरिकांना डिजिटल पेमेंट पर्यायांची भरपूर सोय आहे.

डिजिटल पेमेंट पद्धतींसाठी अमेरिकन कंपन्यांवर अवलंबून राहण्याबद्दल अधिकारी अस्वस्थ आहेत. अनेक युरोपियन नागरिक कॅशलेस पेमेंट सोल्यूशन्सकडे वळले आहेत आणि त्यांनी डिजिटल युरोच्या आवश्यकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. काहीजण असं सुचवतात की, हा गोंधळ केवळ व्यावसायिक बँकांमुळे उद्भवला आहे. त्यांनी स्पर्धा करत डिजिटल युरोसाठी सुरू असलेला प्रयत्न हाणून पाडला आहे.

हे चलन देशांमध्ये लागू करण्यासाठी युरोपियन संसद आणि युरोपियन युनियनची कायद्यांवर सहमती असणे आवश्यक आहे. यामुळे संसदेतील राजकीय भावना परिणामांवर प्रभाव टाकतील.

याचा आवाका किती असेल?

डिजिटल युरोवर वादविवाद सुरू असताना, त्याच्या उद्देशावर वेगवेगळी मतं आहेत. जून 2024 मध्ये युरोपियन निवडणुका आहेत. त्यापूर्वी सहमती मिळेल असं दिसत नाही. या अनिश्चिततेच्या दरम्यान, काहीजण डिजिटल युरोच्या संभाव्यतेबद्दल आशावादी आहेत.

युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्स (यूएस) या दोन्ही देशांतील समीक्षकांनी गोपनीयतेच्या मुद्द्यांपासून ते षड्यंत्र सिद्धांतापर्यंत चिंता व्यक्त केली आहे. यातून सूचित केलं जातं की सीबीडीसी हे व्यवहारांवर पाळत ठेवण्याचे साधन आहेत. त्यामुळे याला विरोध होत आहे. या व्यापक विरोधामुळे केंद्रीय बँकर्सना डिजिटल युरोचा प्रभावीपणे बचाव करणे आव्हानात्मक होते. बेल्जियन सेंट्रल बँकेचे गव्हर्नर, पियरे वुन्श सांगतात की, काही समीक्षकांनी डिजिटल चलन तयार करणे हे जग आणि तेथील नागरिकांवर नियंत्रण ठेवण्याच्या मोठ्या योजनेचा भाग आहे असं म्हटलं आहे. डिजिटल युरो हा व्यक्तींच्या जीवनावर नियंत्रण ठेवणारा नाही हे स्पष्ट करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

असं असलं तरी, समर्थनामध्येही एकवाक्यता दिसून येत नाही.  ऑस्ट्रियन सेंट्रल बँकर रॉबर्ट होल्झमन यांनी सीबीडीसीवर काही प्रकाश टाकला. ही करन्सी सार्वजनिक हितासाठी आणली जात असल्याचं चित्र उभे केले जात आहे. मात्र युनियन मध्ये सहभागी असलेल्या देशांना आर्थिक सार्वभौमत्व राखण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आहे.

या अनिश्चिततेच्या काळात काहीजण डिजिटल युरोच्या संभाव्यतेबद्दल आशावादी आहेत. डिजिटल युरो हा एक खात्रीशीर मार्ग बनवता येईल जो लोकांच्या वापरास प्रोत्साहन देईल.

एव्हीलियन वीटलॉक्स या युरोपियन सेंट्रल बँकेत डिजिटल युरोचे प्रोग्राम मॅनेजर आहेत. त्यांनी डिजिटल युरो हा सांस्कृतिक वादाच्या भोवऱ्यात अडकल्याच्या चिंतेची कबुली दिली आहे. त्यांनी सांगितलं की, लोकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आणि वैयक्तिक खर्चाची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी एक सिस्टीम तयार केली आहे. पण विश्वासार्हतेचे आव्हान समोर आहे. आणि हा विश्वास निर्माण करण्यासाठी सतत संवादाची गरज आहे.

सीबीडीसीची योग्यता आणि प्रामाणिक हेतू जनतेला पटवून देण्याची गरज आहे. यासाठी बँकेचे अधिकारी तांत्रिक युक्तिवादांच्या पलीकडे जाऊन आणि राज्य नियंत्रण आणि पाळत ठेवण्याबद्दलच्या व्यापक चिंतेकडे लक्ष ठेऊन आहेत.

गोपनीयतेविषयी बोलताना युरोपियन सेंट्रल बँकच्या अध्यक्ष क्रिस्टीन लागार्डे सांगतात की, डिजिटल युरो सुरू होण्यासाठी अंदाजे दोन वर्ष लागू शकतात. इसीबी येत्या आठवड्यात याविषयी मोठे निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. मात्र संसदेचे अनेक सदस्य, ज्यांच्याकडे ही योजना मंजूर करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या भूमिकेविषयी सांगता येणं कठीण आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, डिजिटल युरो प्रकल्पाचा पायलट प्रोग्राम करायचा की नाही याचा निर्णय बँकेच्या गव्हर्निंग कौन्सिलद्वारे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी घेतला जाईल.

युरोपियन सेंट्रल बँक येत्या आठवड्यात सीबीडीसीच्या तयारींबाबत मोठे निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.

डिजिटल युरोचे भवितव्य अनिश्चित राहिलं आहे कारण त्यावर राजकीय संशय घेतला जातोय. त्याचप्रमाणे डिजिटल करन्सी आणण्याचा उद्देश अजूनही स्पष्ट नाहीये. युरोपियन सेंट्रल बँकेचे आगामी निर्णय, चालू असलेले प्रयत्न डिजिटल युरोसाठी तयार झालेल्या आव्हानांवर मात करू शकतात. त्यामुळे हा युरो स्वीकृती मिळवून महत्वपूर्ण भूमिका बजावेल यात शंका नाही.

सौरदीप बाग हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.