Author : Kajari Kamal

Expert Speak Raisina Debates
Published on Aug 31, 2024 Updated 0 Hours ago

शेख हसीना ह्यांनी तयार केलेले परराष्ट्रीय धोरण ज्यामध्ये राजकीय तटस्थता, राजकीय धोक्याची पातळी न ओलांडणे ह्यांचा समावेश होतो. ह्या गोष्टी कौटिल्यने सांगितलेल्या राजकीय सिद्धांतांशी जुळत असल्या तरी त्या लोकांच्या राजकीय भावना ओळखण्यात कमी पडल्याचे दिसून येते. 

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरता: कौटिल्यनीतीच्या दृष्टिक्षेपातून

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सुरू झालेल्या बांग्लादेशातील हिंसक आंदोलनाने; तसेच त्यांच्या दीर्घकाळ टिकलेल्या पंतप्रधान शेख हसीना ह्यांच्या राजीनाम्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यांचा राजीनामा आणि शेजारील देशात मिळवलेला आश्रय ह्या जलद घटना असल्या तरी त्यांच्या विरुद्ध झालेल्या आंदोलनाची कारणे सखोल रुजलेली दिसून येतात, ज्याच्या उद्रेकासाठी नोकरीतील आरक्षण हे नाममात्र कारण आहे. कौटिल्याच्या राजकीय सिद्धांताननुसार शेख हासिना ‘योगक्षेम’ (संरक्षण व भरभराट) हे धोरण अवलंबताना अयशस्वी झालेल्या आहेत. 

सत्ता म्हणजे यश नव्हे!

वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार, ‘मिशनवर असलेला हा देश’ मागच्या दोन वर्षात वेगाने आर्थिक प्रगती करत आहे.  २०२३ मध्ये बांगलादेशचा जीडीपी हा US$446.35 बिलियन डॉलर होता. २०१४ सालच्या जीडीपी पेक्षा हा जवळपास US$253 एवढा जास्त आहे. जरी सध्याचे माइक्रोइकोनॉमिक वारे वाढीसाठी चांगले नसले तरी साधारणत: २०२३ पेक्षा २०२४ जास्त आर्थिक वाढीचा अंदाज आहे. दक्षिण आशियामध्ये लष्करी खर्चात बांगलादेशचा तिसऱ्या क्रमांक लागतो. त्यांचा फायरपॉवर इंडेक्स मध्ये १४५ देशांपैकी ३७वा क्रमांक आहे. इतके अनुकूल वातावरण असताना मध्येच तणावाचे वातावरण कसे काय निर्माण झाले? भारतातील मौर्यकाळातला रणनीतीकार-कौटिल्यच्या म्हणण्याप्रमाणे, स्वामी (राज्यकर्ता) आणि त्याचे अमात्य (मंत्रिमंडळ) हे त्याच्या राज्यातील दोन मुख्य घटक असतात ज्यांची जागा अर्थ व लष्कर विभागच्याही वर असते. असे हे दोन्ही घटक बांगलादेशच्या बाबतीत लोकांची राजकीय क्षमता आणि त्यातील त्यांचे यश हे दोन्ही समजून घ्यायला कमी पडले. 

हसीना ह्यांच्याकडून सामाजिक कराराचे उल्लंघन झाले आणि त्या बांग्लादेशी नागरिकांसाठी कौटिल्यने सांगितलेल्या ‘योगक्षेम’ (संरक्षण आणि भरभराट) ही श्रेणी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्या. 

कौटिल्यने लिहिलेल्या अर्थशास्त्र ह्या प्राचीन राजकीय ग्रंथामध्ये त्याने लोकांच्या उठावाची कारणे नमूद केली आहेत. शांततेचा आणि त्या संबंधित बाकीच्या धोरणांचा योग्य वापर न करणे हा चुकीचा राजकीय निर्णय असून, त्याचा परिणाम अश्या घातक आंदोलने किंवा उठावांमध्ये होऊ शकतो. ह्यापुढे कौटिल्य राजाला त्याच्या ग्रंथामध्ये असा ही सल्ला देतो की, ‘राज्यकर्त्याने प्रजेमध्ये अधोगती, लोभ आणि असंतोष ही कारणे निर्माण होऊ देऊ नयेत आणि ती उद्भवलीच तर त्यावर ताबडतोब प्रतिकार करावा.’ कौटिल्य लोक विद्रोहाचे कारण म्हणून शासक आणि शासक वर्गाने वापरलेल्या चुकीच्या धोरणाला दोष देतात. या संदर्भात, शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय यांचे सर्वात उल्लेखनीय विधान म्हणजे विद्यार्थी आंदोलन हाताळण्यात चुका झाल्याची कबुली, जी अत्यंत अल्प आणि उशिरा आली. 

अवामी लीग वर उद्भवलेल्या ह्या अविश्वास आणि असमाधानाचे मुळ असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे अवलोकन करूया. लोकांच्या अडचणी न समजून घेता, त्यांच्याशी योग्य संवाद न साधता हसीना सरकारने लोकांवर दडपशाहीचा वापर केला, जे कौटिल्यच्या अनेक नियमांपैकी एक आहे. कौटिलीयन नियमावली ही अंतर्गण सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी अनेक मार्ग पुरवत असली, तरी त्यामध्ये दडपशाहीचा वापर, भेटवस्तू, सूट देणे आणि रोजगार पुरवणे ह्या गोष्टी वगळलेल्या आहेत. 

राजमंडल सिद्धांतानुसार... 

अंतर्गत नाराजी सामान्य जनतेतील असंतोष ही कारणे जरी खरी असली तरी परकीय हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही. ह्या असंतोषाला आणि उद्रेकाला चार मूलभूत कारणे अर्थशास्त्रात सांगितली आहेत ज्याने अंतर्गत सुरक्षितेला हानी पोहोचते. (बाह्य-अंतर, अंतर-बाह्य, बाह्य-बाह्य, अंतर-अंतर) ह्या कारणांना अनुसरून, त्याचा प्रकार समजून व त्याच्याशी संबंधित लोकांचा विचार करून कौटिल्याने त्यावरील उपाय देखील अर्थशास्त्रात नमूद केले आहेत. बाह्य/बाह्य हे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा आतील भागात सामान्य निराशेचे लक्षण असेल. जर हा हस्तक्षेप बाहेरून उत्तेजना देणारा आणि त्याला आतून मिळणारा प्रतिसाद असा दोन्ही मधला असेल, तर राजासाठी प्रतिसाद देणाऱ्यावर यश मिळवणे अधिक फायदेशीर आहे आणि कौटिल्य केवळ साम (समिलीकरण) आणि दान (भेटवस्तू) ह्या मार्गांचा वापर करायला सुचवतो. शेख हसीना ह्याची कारकीर्द बघता अमेरिकेसारख्या बाह्य शक्तींना दोष देण्यापेक्षा स्वत:च्या असक्षम आणि असमंजस निर्णयांचे अवलोकन करणे उचित ठरेल. 

कौटिल्य अमेरिकेसारख्या देशांच्याबाबतीत उदासीन नीती वापरण्यास प्रोत्साहन देतो. हे देश त्यांच्या तुलनेने दुर्बल असलेल्या भागीदार देशांना शक्तिशाली ही बनू देत नाहीत किंवा त्यांना अजून दुर्बल ही बनू देत नाहीत.

असे संभाव्य बाह्य घटक कुठले असतील ज्यांना बांगलादेशातील असुरक्षित वातावरणाचा फायदा होऊ शकतो? अमेरिका ही सर्वार्थाने उदासीन देश (तटस्थ राज्य) आहे जी बांगलादेशच्या राजमंडलाच्या (राजकीय वर्तुळ) च्या बाहेरची आहे आणि तिच्यात विजिगीषू राज्य बनण्याची क्षमता देखील आहे. ह्या बरोबरच अमेरिका त्यांच्या राष्ट्रहिताच्या गरजेप्रमाणे अरि (शत्रू राज्य) आणि मध्यमा राज्य देखील होऊ शकते.

ढाकाने आंतरराष्ट्रीय संबंधात वैविध्य जपण्यासाठी चीनशी वाढवलेले संपर्क अमेरिकेसाठी धोक्याची घंटा वाजवणारे असल्याने ते सरकार स्थापनेमध्ये हस्तक्षेपची संधी सोडणार नाहीत. याव्यतिरिक्त, पूर्वीच्या तुलनेने सुरक्षित सीमेवर एक अशांत शेजारचा परिसर, सीमापार दहशतवादाचे संभाव्य पुनरुज्जीवन आणि ढाकामधील यूएस-समर्थित आस्थापना वॉशिंग्टनच्या या प्रदेशातील धोरणात्मक भागीदार-भारताला वादातीत ठेवू शकते, विशेषतः जेव्हा दिल्लीची स्वतंत्र निर्णय प्रक्रिया ही अमेरीकेच्या प्रादेशिक स्वारस्याच्या विरुद्ध जाऊ शकते. कौटिल्य अमेरिकेसारख्या देशांच्याबाबतीत उदासीन नीती वापरण्यास प्रोत्साहन देतो. हे देश त्यांच्या तुलनेने दुर्बल असलेल्या भागीदार देशांना शक्तिशाली ही बनू देत नाहीत किंवा त्यांना अजून दुर्बल ही बनू देत नाहीत.
 
चीन हा मध्यमा राज्याची भूमिका बजवतो जो बांग्लादेश (विजिगिशू) आणि म्यानमार (संभाव्य शत्रू) ह्या दोघांपेक्षा अधिक मजबूत आहे आणि त्यांच्या राजकीय उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना एकसंध किंवा विभक्त ठेवू शकतो. शेख हासिना यांचे सरकार चीन साठी पूरक परिस्थिती तयार करीत होते, तरी त्यांचे भारताकडे झुकलेले पारडे आणि त्यांनी भारताविरुद्धच्या आतंकी गटांवर केलेली कारवाई ही चीनला सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन करायला भाग पाडते, जेणेकरून भारताची अजून एक सीमा असुरक्षित होईल. 
 

चीन हा मध्यमा राज्याची भूमिका बजवतो जो बांग्लादेश (विजिगिशू) आणि म्यानमार (संभाव्य शत्रू) ह्या दोघांपेक्षा  अधिक मजबूत आहे आणि त्यांच्या राजकीय उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना एकसंध किंवा विभक्त ठेवू शकतो.

पाकिस्तान हा जन्मजात शत्रू आहे. ते चीनबरोबरही सामायिक आहे आणि बीजिंगचा भारताप्रती वैमनस्यपूर्ण स्वभाव आहे. जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील प्रशिक्षणाचा वापर करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे गुप्तचर अहवाल आहेत. भारतविरोधी भूमिका घेऊन खालिदा झिया यांचे संभाव्य पुनरागमन इस्लामाबादच्या फायद्याचे असेल.

भारत बांगलादेशसाठी मित्र राज्य आहे. शेख हसिनांनी प्रदेशातील आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून किफायतशीर व्यवहार न गमावता कुशल मुत्सद्देगिरीने दिल्लीचे संरक्षण मिळवले. ढाका बरोबर असलेले घनिष्ट संबंध, बांगलादेशींमध्ये भारतविरोधी भावना वाढत असतानाही परस्पर फायदेशीर ठरले. 

प्रादेशिक आणि बाह्य महाशक्तींसोबत हसीना यांच्या बाह्य संवादाने कौटिल्लियन नियमांचे अनुसरण केले आहे. बचावात्मक पवित्रा, सौद्यांसाठी आपल्या तटस्थतेचा फायदा घेणे आणि क्वचितच निर्धारित लाल रेषा ओलांडणे. मात्र बांग्लादेशी नागरिकांची बाजू जाणून घेण्यात त्या अपयशी ठरल्या. योग्य राजकीय वैधतेसाठी आणि बाह्य शक्तींच्या कारस्थानांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी देशांतर्गत सुरक्षेमध्ये दृढता महत्त्वाची आहे. अंतर्गत सुरक्षा हा यशस्वी धोरणात्मक स्वायत्ततेचा पाया आहे.


कजारी कमल या तक्षशिला संस्थेत सहयोगी प्राध्यापक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.