Author : Kabir Taneja

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 04, 2025 Updated 5 Hours ago

इजरायलमधील 7 ऑक्टोबर हल्ल्यानंतर, आयएसआयएस पुन्हा ताकदवर होण्याच्या शक्यता दिसून येत असल्यामुळे चिंता वाढली आहे.

इस्लामिक स्टेटच्या संभाव्य पुनरागमनाचा उलगडा

Image Source: Getty

2023 च्या 7 ऑक्टोबर रोजी इजरायलवर हमासने केलेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतवादाच्या धोका आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये दहशतवादविरोधी प्रयत्नांना मुख्य घटक म्हणून समोर ठेवण्याची आवश्यकता समोर आणली आहे. जरी हमासवर लक्ष केंद्रित करण्यात आले आणि कदाचित इजरायल व गाझा नरेटिव्हचा जागतिकदृष्ट्या विभाजित दृश्याचा फायदा त्याला झाला, तरी इतर दहशतवादी गट मध्यपूर्वेतील सध्याच्या राजकीय गोंधळाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

इस्लामिक स्टेटचे संभाव्य पुनरागमन (ज्याला अरबीमध्ये आयएसआयस किंवा दाएश म्हणून देखील ओळखले जाते) हा फक्त मध्यपूर्वेतील नाही, तर या प्रदेशाच्या राजकीय आणि वैचारिक विभागांमध्ये देखील एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तानमधील तालिबानचा ‘विजय’ अनेक वेळा उदाहरण म्हणून दर्शवला जातो, ज्यामुळे असे सिद्ध होते की कश्याप्रकरे गैर-राज्य दहशतवादी घटक स्वतःला दशकांपर्यंत चालणाऱ्या वैचारिक युद्धांमध्ये खोलवर रुतवू शकतात.

इस्लामिक स्टेट विरुद्धच्या लढाईकडे परतणे?

इस्लामिक स्टेटचा विध्वंसक लढा, जो 2013 ते 2019 दरम्यान इराक आणि सीरियात पसरला, 2011 मध्ये पाकिस्तानमधील अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनची हत्या झाल्यानंतर, इस्लामिक स्टेटमुळे दहशतवादाविरुद्धची लढाई जागतिक सुरक्षा नरेटिव्हचा मुख्य मुद्दा बनला होता. या कालावधीत, प्रदेशीय आणि आंतरराष्ट्रीय शत्रू देश जसे की, यूएस आणि रशिया किंवा इराण आणि सौदी अरेबिया या सर्वांसाठी इस्लामिक स्टेट एक सामायिक शत्रू बनला होता. सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरुद्ध लढण्याच्या बहाण्याने रशियाचा हस्तक्षेप होत होता. याकाळातच रशियाने पहिल्यांदा तेल तस्करीस निशाणा बनवले, कारण ही तस्करीच मोठ्या प्रमाणात दाएशच्या वाढीला वित्त पुरवत होती. याच वेळी, अमेरिकेने आपल्या सहयोगी देशांसोबत 2017 मध्ये ऑपरेशन इनहेरेन्ट रिझोल्व सुरू केले, ज्याचा उद्देश आयएसआयएसला "पराभूत करणे" हा होता.

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरुद्ध लढण्याच्या बहाण्याने रशियाचा हस्तक्षेप होत होता. याकाळातच रशियाने पहिल्यांदा तेल तस्करीस निशाणा बनवले, कारण ही तस्करीच मोठ्या प्रमाणात दाएशच्या वाढीला वित्त पुरवत होती.

तसे तर गेल्या काही वर्षात इस्लामिक स्टेट खूप कमजोर झाले आहे, कारण 2019 मध्ये सीरियन सिव्हिल वॉर दरम्यान अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसच्या ऑपरेशनमध्ये आयएसआयएसचा संस्थापक अबू बकर अल-बगदादी मारला गेल्यानंतर, या संघटनेचे जे जे अमीर म्हणजेच प्रमुख बनले त्यांना एक एक करून मारले गेले. परंतु आता गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयएसआयस पुन्हा एकदा ताकदवर होण्याच्या एक मोठा धोकाच आहे. याचवेळी, आफ्रिका आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान प्रदेशातील इस्लामिक स्टेटच्या सहयोगी गटांनी केवळ आपली छाप सोडली नाही, तर या गटांनी त्यांच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे हल्ले करण्यासाठी पुरेसे पाठबळ मिळवण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत (ISKP) हा एक असा गट आहे, जो अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी सरकार यांच्यात उफाळत असलेल्या संघर्षात महत्त्व प्राप्त करत आहे आणि याचा मध्य आशियापर्यंत फैलाव होण्याचा धोका आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानचे असे म्हणणे आहे की ISKP च्या मुख्य गटाचे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे आणि या गटाला अफगाणिस्तानमध्ये "काही शक्ती" नाही, तर पाकिस्तानचा असा आरोप आहे की अफगाण टीटीपीला (तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) पाकिस्तान मध्ये हल्ले करण्यास मदत करतो.

जागतिक शांततेला दहशतवाद्यांकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ब्रीफिंगमध्ये, अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी दहशतवादाला आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा एक सततचा आणि कायमचा धोका म्हणून अधोरेखित केले. संयुक्त राष्ट्रांनी चेतावणी दिली की आयएसआयएस जागतिक दहशतवादविरोधी प्रयत्नांनंतरही टिकून राहण्याची शक्यता आहे, आणि क्षेत्रीय भूराजकीय ताण, मोठ्या राष्ट्रांमधील स्पर्धा, तसेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेस कदाचित आंतरराष्ट्रीयदृष्ट्या इतर देशांपासून दुर ठेवतील, या सर्व गोष्टी भविष्यातील गुंतागुंत वाढवतील. तथापि, या सर्व परिचित अडचणींवरून गाझातील सध्याची परिस्थिती, अमेरिकेची भूमिका आणि सीरियातील बदलते नवीन वास्तव हे या संभाषणास नवी दिशा दाखवतील.

मध्यपूर्वेत दहशतवादविरोधी कारवाई  

सीरियात तीन दशक सत्तेत असलेल्या बाशर अल-असदच्या राजवटीच्या पतनाचे पश्चिमी शक्त्यांनी सावधपणे स्वागत केले आहे. अहमद अल-शारा (ज्याला हयात ताहरीर अल-शामचे प्रमुख म्हणून ओळखले जाते, आणि ज्याला पूर्वी अबू मोहम्मद अल-जोलानी म्हणून ओळखले जात होते) ने दमास्कसवर नियंत्रण मिळवले, त्याच्या अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटसोबतच्या पूर्वीच्या संबंधांमुळे सुरक्षा धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. संघर्षाने व्यापलेल्या या मध्य पूर्व प्रदेशात, जेंव्हा इस्रायलने ७ ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यांच्या उत्तरार्थ हमास आणि हिज्बुल्लाह यांच्यावर हल्ला केला, तेंव्हा अल-शाराच्या वैधतेवर शिक्कमोर्तब करण्याचे मुख्य कारण हे होते की, यामुळे रशिया आणि इराणचा प्रभाव या देशातून बाहेर पडण्यास मदत होईल. शिवाय, अल-शाराचे इस्रायलला देश म्हणून स्वीकारणे हे ऐतिहासिक जिहादी विचारधारांपासून एकदम वेगळे आणि नवीन आहे.

आयएसआयएसच्या पुन्हा उदयाची भीती निराधार नाही. गाझामधील युद्ध आणि त्यात बळी जाणाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे तमाम देशांत अतिरेकी संघटेनेमध्ये भरतीचे प्रमाण वाढू शकते. इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेमुळे इराक आणि सीरियामध्ये अजूनच आतंकवाद करणाऱ्या लोकांना आकर्षित केले आहे, विशेषत: त्याच्या विचारपूर्वक आणि खूप चतुराईने तयार केलेल्या आकर्षक ऑनलाइन दुषप्रचार मोहिमांमुळे. इस्लामच्या नावाने इतक्या प्रमाणात लोकांना जोडण्याचे असे काम या अगोदर केवळ अफगाणिस्तानमध्ये 1979 ते 1989 दरम्यान सोवियत संघाच्या आक्रमणाच्या वेळी पाहायला मिळाले होते, जेव्हा अमेरिकेने आणि पाकिस्तानने पाठिंबा दिलेल्या मुजाहिदिन ने सोवियत सैन्याला अमु दर्याच्या दुसऱ्या काठावर ढकलण्यासाठी दहा वर्षे लढाई केली. मुजाहिदिनांना समर्थन देण्याची दीर्घकालिन किंमत तेंव्हा चुकवावी लागली जेंव्हा 2021 च्या ऑगस्टमध्ये तालिबानने अमेरिकेद्वारे प्रायोजित गणराज्याचे आणि अमेरिकेकडून प्रशिक्षण घेतलेल्या लष्करी फौजांचे पतन झाले व अमेरिकेला राजकीय आणि लष्करी दृष्ट्या, काबुलमधून तालिबानने हुसकावले.

जरी अमेरिकेने सीरिया आणि इराकमध्ये आयएसआयएसला आव्हान देण्यात आघाडी घेतली आणि इराणला इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेल्या जमिनी सोडवण्यासाठी प्रशिक्षण दिले, तरी आयएसआयएस हा अजूनही या क्षेत्रातील बहुतांश सरकारांसाठी एक धोका आहे. मागील काही वर्षांपासून, इस्लामिक स्टेट आणि अल कायदा दोघांनी एकमेकांशी असलेले मतभेद आणि अंतर्गत प्रतिस्पर्धा बाजूला ठेवून अरब जगातील सरकारे आणि राजेशाहींना "गैर इस्लामी" आणि पश्चिमी शक्तींशी खूप जवळीक असल्यामुळे लक्ष्य केले आहे. उदाहरणार्थ 'अरब स्प्रिंग' नावाच्या जनतेच्या विरोधाला आतंकवादी गटाने समर्थन दिले होते ज्यामुळे दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या शक्तींना हद्दपार केले जाईल आणि या देशांत 'इस्लामिक स्टेट' ची स्थापना केली जाईल. (परंतु हे प्रयत्न मुख्यत्वे अपयशी ठरले) 

सीरियन सरकारच्या पतनासोबत, इस्लामिक स्टेटविरोधी लढण्याविषयी असलेले मतभेद साफ दिसत आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी कारवाई मुख्यत: हवाई शक्तीचा उपयोग करून केली जात आहे. जमिनीवर, अमेरिकेच्या पाठिंब्याने कर्दिश नेतृत्वाखालील गट आयएसआयएसविरोधी लढाईत आघाडीवर आहेत. कर्दिश मिलिशियांनी अमेरिकेला इस्लामिक स्टेटच्या प्रमुख आणि मोठ्या अतिरेक्यांवर व अमिरांवर छापे टाकण्यासाठी कृतीशील पुरावे प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता सीरियामध्ये HTS आणि कर्दिश नेतृत्वाखालील गट, जसे की सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF), यांच्या मध्ये ताकद आणि क्षेत्रांतील वाटण्यांमुळे यांना मिळणारा पाठिंबा ही वेगवेगळा आहे. त्यात HTS (हयात तहरीर अल शाम) ला तुर्कीहून अधिक पाठिंबा मिळतो, तर SDF ला अमेरिकेचा पाठिंबा मिळतो. SDF कडे अल होलसारख्या छावण्यांच्या देखभालीची जबाबदारी आहे, ज्यात इस्लामिक स्टेट लढायांत मृत झालेल्यांच्या कुटुंबातील हजारो सदस्य आहेत. हे विभाजन कमी करत संपवण्यासाठी आणि इस्लामिक स्टेटला पुन्हा आपले पाय मजबूत करण्याची भीती दुर करण्यासाठी, तूर्कीने जॉर्डन, इराक आणि सीरियामधील नव्या शासनासोबत एक नवीन सहकार्य स्थापन करण्याची योजना आखली आहे, जे आयएसआयएसच्या इकोसिस्टम विरोधी नवीन मोहीम सुरू केली जाईल.व्यवस्थांवर प्रतिक्रिया दर्शवेल. यामध्ये, आयएसआयएसला विरोधी असणारी विचारधारा सामायिक आहे पण याचे मूळ भू-राजकीय आहेत, कारण तुर्कीचा जमिनी स्तरावर आयएसआयएसविरोधी पश्चिमेचा प्रमुख भागीदार म्हणून कर्दिशचे स्थान कमजोर करण्याचा प्रयत्न आहे.

SDF कडे अल होलसारख्या छावण्यांच्या देखभालीची जबाबदारी आहे, ज्यात इस्लामिक स्टेट लढायांत मृत झालेल्यांच्या कुटुंबातील हजारो सदस्य आहेत.

तुर्कीद्वारा प्रस्तावित वरील सहयोगाचा उद्देश असा आहे की दहशतवादाविरोधी लढाईत प्रादेशिक देशांची भागीदारी अशा वेळी वाढवणे जेव्हा ट्रम्प अमेरिकेद्वारा तैनात केलेल्या सुरक्षेच्या बदल्यात किंमत वसूल करण्याच्या शोधात असतील तेंव्हा. मतभेद असूनही, आयएसआयएसने प्रस्तुत केलेला विचारधारात्मक धोका हलक्यात घेतला जाऊ शकत नाही. विशेषतः अशा वेळी जेव्हा प्रत्यक्ष राजकारण आणि विचारधारेदरम्यान तडजोडींचे व्यवस्थापन आवश्यक आहे. सामान्य लोकांना या तात्कालिक दृष्टिकोनाची स्पष्टता कळू शकली नाही तरी ते हे नक्कीच समजतात आणि विचारधारात्मक गोष्टींवर एकत्र होऊ शकतात. उदाहरणार्थ, हमासचे संस्थापक, दिवंगत शेख अहमद यासिन ह्यांचा भूमिकेबद्दल जिहादी इकोसिस्टीम मध्ये वाद आहेत. 2018 मध्ये, इस्लामिक स्टेटच्या एका मुखपत्राने यासिनला 'तक्फीर' किंवा इस्लामला न मानणारा म्हटले होते, कारण हमासने लोकशाही निवडणुकांमध्ये भाग घेतला होता आणि इस्लामापेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले होते. त्याच वेळी, बिन लादेनने यासिनला इस्लामाचा आदरणीय व्यक्ती मानले होते. हे फक्त अत्यधिक इस्लामी विचारधारांमध्ये असलेल्या विचारधारात्मक दरीचे उदाहरण नाही, तर ते हे देखील दर्शवते की गाझा युद्ध आणि व्यापक पॅलेस्टाईन प्रश्नासारख्या नाजूक मुद्द्यांचे व्यवस्थापन करत असताना क्षेत्रीय मुस्लिम बहुसंख्यक देशांना यातील जटिलतेचा सामना करावा लागतो.

निष्कर्ष

इस्लामिक स्टेटसारख्या संघटनेचा पूर्ण नाश करणे शक्य नसले, तरी अश्या समस्यांचा सामना करण्यासाठी धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. यासाठी दीर्घकालीन वचनबद्धतेची आवश्यकता आहे, अमेरिकेसाठी दीर्घकाळ याचे समर्थन करणे कठीण होऊ शकते. एक प्रादेशिक दृष्टिकोन, जो याबाबत आतापर्यंत अस्तित्वात आला नाही, तो पर्याय म्हणजे या विचारधारांचा सामना करण्यासाठी भौगोलिक आणि क्षेत्रीय देशांद्वारे आपल्या क्षमतेनुसार प्रतिरोधाचे एक संघटन. पुढे चालून कदाचित समान भौगोलिक आणि प्रादेशिक गरजा देशांना असे करण्यास मजबूर करतील. जागतिक दहशतवादविरोधी क्षमता अजूनही अमेरिकेच्या सामर्थ्याच्या जोरावर निर्भर आहेत, आणि इतर देशांकडे या भूमिकांमध्ये भर घालण्याची क्षमता जवळपास अस्तित्वात नाही.


कबीर तनेजा हे ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राममध्ये डेप्युटी डायरेक्टर आणि फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.