Expert Speak Raisina Debates
Published on May 18, 2024 Updated 0 Hours ago

लष्करी पुनर्रचनेद्वारे आपल्या अंतराळ आणि सायबर क्षमतांमधील अंतर भरून काढण्याचे चीनचे प्रयत्न भारताच्या तुलनेत आपली क्षमता वाढवत आहेत, ज्याचे भारतासाठी दूरगामी परिणाम होतील.

चीनने ‘PLASSF’ला हटवून स्थापन केलेल्या ‘ISF’चे भारतावर होणारे परिणाम

‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’ बरखास्त करण्यात आले आहे. २०१५ च्या उत्तरार्धात, ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ने अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली ‘पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स’सोबत ‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’ निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती, जी दोन नवीन सैन्य दले होती. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स’ जे पूर्वीचे ‘सेकंड आर्टिलरी फोर्स’ होते, ताज्या खांदेपालटात ते विसर्जित करण्यात आलेले नाही आणि अद्यापही त्याचे कमांड अधिकार शाबूत आहे. या दोन नवीन सेवांव्यतिरिक्त, आता फक्त ‘पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स’ अस्तित्वात आहे. २०१५-१६ साली सशस्त्र दलांच्या विविध शाखांमध्ये अधिक चांगला समन्वय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने एकात्मिक कमांड व्यवस्थेअंतर्गत पाच एकात्मिक कमांड्सदेखील स्थापित करण्यात आली होती. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’ ही एक एकात्मिक सेवा होती, जी चिनी सैन्याची अवकाश, सायबर, इलेक्ट्रॉनिक आणि मनोवैज्ञानिक युद्ध क्षमता एकत्मिक करत होती आणि आता त्याची जागा ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’ने घेतली आहे. शी जिनपिंग म्हणाले की, नवीन शक्ती “... पीपल्स लिबरेशन आर्मीची एक नवीन धोरणात्मक शाखा आणि नेटवर्क माहिती प्रणालीचा समन्वयित विकास व उपयोगात आणण्याचा एक महत्त्वाचा आधार” असेल, जो पीपल्स लिबरेशन आर्मीला “लढण्यासाठी आणि आधुनिक युद्धात विजय मिळवण्यासाठी मदत करेल.”

‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’चे विघटन कशामुळे घडले आणि त्याची जागा- ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’ ने का घेतली, याची तीन सामान्य स्पष्टीकरणे आहेत. प्रथम म्हणजे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’ ही एक धोरणात्मक ताकद होती, ज्याला अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’मधील सर्वोच्च राजकीय आणि लष्करी निर्णय घेणारी ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’ या संस्थेच्या अधिक देखरेखीची आणि तिच्या नियंत्रणाखाली आणण्याची गरज होती. या प्रशासकीयच्या अडथळ्याचा दुसरा घटक आणि परिणाम म्हणजे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’ संस्थेची कठोरता, ज्या प्रमाणात ‘एकात्मिक कमांड्स’ला संसाधने किंवा मालमत्तेसाठी मान्यता मिळवणे आवश्यक होते, त्याला ‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’ दल अवरोधित करू शकते किंवा विलंब लावू शकते, कारण त्यांना एकात्मिक कमांडसह समान अधिकारांचा कमांड दर्जा लाभला होता. थोडक्यात, बदलदेखील अति नियंत्रण मर्यादित करण्याच्या गरजेतून झाला. तिसरे आणि अंतिम कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा अनुभव, ज्याने चिनी लोकांना स्पष्टपणे दाखवून दिले आहे की, सायबर, इलेक्ट्रॉनिक- आणि अवकाश-जनित संसाधनांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्यात लवचिकता आवश्यक आहे. बदल करण्यामागील अत्यावश्यक मुद्दा हा लष्करी रणनीतीत मोहिमांची परिणामकारकता साधण्याचा आहे.   

पीपल्स लिबरेशन आर्मी सायबरस्पेस फोर्स आणि एरोस्पेस फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे, ज्यामुळे सैन्य दलांची संख्या चार झाली आहे, ज्यामध्ये ‘पीपल्स लिबरेशन आर्मी लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स’चा समावेश आहे, ज्याची स्थापना सध्याचे बदल होण्याच्या आधी झाली आहे.

‘पीपल्स लिबरेशन आर्मी लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स’चे पंख कापण्यामागची कारणे काहीही असली तरी, नव्याने स्थापन झालेल्या ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’चे घटक नेटवर्क माहिती प्रणाली आणि दळणवळण साह्य संभाव्य नेटवर्क संरक्षणाद्वारे पूरक आहेत. ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’ प्रामुख्याने बाह्य घुसखोरी आणि हल्ल्यांपासून चिनी नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी सुसज्ज आहे. या व्यतिरिक्त, पीपल्स लिबरेशन आर्मी सायबरस्पेस फोर्स आणि एरोस्पेस फोर्स तयार केले गेले आहे, ज्यामुळे सैन्य दलांची संख्या चार झाली आहे, ज्यामध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी लॉजिस्टिक सपोर्ट फोर्सचा समावेश आहे, ज्याची स्थापना सध्याचे बदल होण्याच्या आधी झाली आहे. आता एकात्मिक कमांड, जे चिनी क्षेत्राच्या संरक्षणासाठी आणि परदेशातील मोहिमांसह आक्षेपार्ह मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण आहे, त्याला प्रत्येक शस्त्र दलाची सेवा अधिक सहजतेने आणि कार्यक्षमतेने उपलब्ध होऊ शकते. ‘सायबर वॉरफेअर’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’चे पृथक्करण यांसारख्या अतिरिक्त विभागांची स्थापना केली गेली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि संभाव्यतः सायबर फोर्स ही नवीन शाखा असेल, जी एकात्मिक सायबर युद्धसामग्री आणि ‘इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री मोहिमांवर देखरेख ठेवते व त्यांचा पाठपुरावा करते आणि ज्यांच्या संसाधनांचा एकात्मिक कमांड लाभ घेऊ शकतात. सायबर युद्धसामग्री आणि इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्रीचे एकत्रित उपयोजन अधिक सुस्पष्ट होण्याची शक्यता आहे, विशेषत: ज्याला चिनी ‘बौद्धिक युद्ध’ म्हणतात, त्याबाबत युद्धप्रणालीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनचा अधिक वापर केला जाईल.

भारतावर होणारा परिणाम

आपण आज पाहात असलेले बदल मुख्यतः ‘कमांड अँड कंट्रोल’शी संबंधित आहेत, आणि पूर्वीच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’ने नियंत्रित केलेल्या क्षमता आणि संसाधने एकात्मिक कमांडला सुलभपणे उपलब्ध होण्याशी जोडलेले आहेत. हा फेरबदल सायबर, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री, अवकाश क्षमता आणि संघर्ष रोखण्यासाठी शत्रूच्या अंतराळातील संपत्तीला धोका निर्माण करणारी शस्त्रे आणि मोहिमा संबंधित क्षमतांचा लाभ घेण्याचा एक प्रयत्न आहे, ज्यामुळे विविध क्षेत्रांतील मोहिमांमध्ये त्यांचा परिणामकारक वापर केला जाईल. विशिष्ट कारणांसाठी करण्यात आलेल्या आताच्या ताज्या बदलांच्या अगोदरही, २०२४च्या चिनी संरक्षण अर्थसंकल्पात दिसून आल्यानुसार, चिनी लोकांनी सायबर आणि अंतराळ क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, याचे कारण चिनी आर्थिक वाढ कमी झाली असतानाही त्यात ७.२ टक्के वाढ झाली आहे. सायबर शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री, अवकाश क्षमता आणि संघर्ष रोखण्यासाठी शत्रूच्या अंतराळातील संपत्तीला धोका निर्माण करणारी शस्त्रे व मोहिमांकरता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक उपलब्ध झाल्यामुळे भारताने आता अधिक सतर्क आणि सुसज्ज असायला हवे. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’च्या विघटनाचा अंतराळ, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री क्षेत्रांतील चिनी क्षमतांवर कोणताही परिणाम होणार नाही. ते केवळ तैवानवर आक्रमण करण्यासाठी सज्ज नाहीत, तर ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’च्या सायबर, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री, अवकाश क्षमता आणि संघर्ष रोखण्यासाठी शत्रूच्या अंतराळातील संपत्तीला धोका निर्माण करणाऱ्या शस्त्रांचा आणि मोहिमा राबविण्याच्या क्षमतांचा वापर भारताविरोधातील लष्करी आकस्मिक परिस्थितीत केला जाऊ शकतो. खरोखरच, तैवान आक्रमणासाठी अमेरिकेच्या विरोधातील त्यांच्या सायबर आणि अंतराळ क्षमतांपर्यंत पोहोचण्याचा आणि दरी भरून काढण्याचा चिनी शोध सहजपणे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या पश्चिमी एकात्मिक कमांडच्या भारताविरोधातील आक्षेपार्ह आणि बचावात्मक मोहिमांकरता सायबर, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री, अवकाश क्षमता आणि संघर्ष रोखण्यासाठी शत्रूच्या अंतराळातील संपत्तीला धोका निर्माण करणाऱ्या शस्त्रांद्वारे लष्करी मोहिमांमध्ये रूपांतरित होऊ शकतो. अमेरिकेशी बरोबरी साधण्याच्या अथवा त्यांना मागे टाकण्याच्या चिनी उद्दिष्टांमुळे अंतराळ आणि सायबर क्षेत्रांत चीन आणि भारत यांच्यात महत्त्वपूर्ण दरी निर्माण झाली आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये अरुणाचल प्रदेशच्या तवांग क्षेत्रात चिनी सैन्याने यांगत्सेवर हल्ला केला, तेव्हा अमेरिकेने भारताला दिलेली मदत हे यातील सर्वात दृश्यमान प्रकटीकरण होते. भारताने घुसखोरी होऊ दिली नाही, परंतु पुरेशा भारतीय अवकाश विषयक संसाधनांचा अभाव स्पष्ट झाला आणि अमेरिकेने त्यांच्या सर्वोत्तम अवकाश निरीक्षण संसाधनांचा विस्तार केल्यामुळे ते त्यास पराभूत करू शकले. अवकाश क्षेत्रात, भारत आणि चीन यांच्यातील अवकाश शक्तीविषयक तफावत मोठी आहे आणि चीनची अवकाश विषयक लष्करी संसाधने अत्यंत सक्षम आहेत.  

‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’ तसेच स्वतंत्र सायबर आणि स्पेस फोर्सच्या स्थापनेचा भारतावर इतर परिणाम होतो, ज्यामध्ये एकात्मिक कमांड, विशेषत: पश्चिमी एकात्मिक कमांड, जे चीन-भारतीय सीमेवर जमिनीवरील आणि हवाई मोहिमांकरता जबाबदार आहे, त्यांना आता नव्याने स्थापन झालेल्या ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’, सायबर फोर्स आणि एरोस्पेस फोर्स सैन्य दलांची संसाधने अधिक सहजपणे उपलब्ध आहेत. निश्चितच, पश्चिमी एकात्मिक कमांडकडे काही सेंद्रिय सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री विषयक संसाधने असतील, परंतु पूर्वीचे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’ एकात्मिक कमांडला सहाय्य प्रदान करण्यात खूप कठोर होते, ज्यामुळे अलीकडील पुनर्रचना वेगाने करण्यात आली. ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ पूर्वीच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट’ची स्वतंत्र सैन्य दलात उपविभाजित करण्याच्या निर्णयाचा आणखी एक परिणाम असा आहे की, त्यामुळे अधिक लवचिकता आली. या बदलांनी भारतीय लष्करी नियोजकांना दाखवून दिले आहे की, त्यांनी अंतराळ, सायबर, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री आणि मनोवैज्ञानिक मोहिमांशी जोडलेली स्वतंत्र संसाधने कशी तैनात करावी याचा विचार करणे आवश्यक आहे; ज्याची एकदुसऱ्यात सरमिसळ झाली आहे; आणि जिथे ते पारंपरिक लष्करी मोहिमांसाठी सक्षम आणि सक्तीचे गुणक म्हणून काम करतात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आणखी एक क्षेत्र आहे, जिथे भारताला ‘बौद्धिक युद्धा’साठी चीनची वचनबद्धता लक्षात घेता अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे चीनने गोळा केलेल्या माहितीचे संकलन, मूल्यमापन, विश्लेषण, एकत्रीकरण आणि अर्थ लावण्याची तसेच सायबर युद्धसामग्रीची क्षमता वाढवू शकते आणि अधिक प्रभावी बनवू शकते. अखेरीस, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स’ बरखास्त करण्याचा शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेला निर्णय निश्चित मानला जाऊ नये, कदाचित भविष्यात त्याची काही कामे एका नवीन सेवा दलात एकत्रित करून ती दुसऱ्या वेषात पुनरुज्जीवित होऊ शकेल. चिनी नेतृत्वाने राबविलेल्या संघटनात्मक बदलांच्या संदर्भात भारतीय लष्करी नियोजक आणि रणनीतीकारांनी बोध घ्यायला हवा, तो म्हणजे चीनची प्रयोगशीलता, लवचिकता आणि त्यांच्या जुळवून घेण्याच्या क्षमतेचे महत्त्व यांतून अधोरेखित होते, जे ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ने अलीकडच्या रशिया विरोधी युक्रेनच्या सुरू असलेल्या लष्करी युद्धात चीनने पाहिले आहे. 


कार्तिक बोम्मकांती हे ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.