Authors : Ayjaz Wani | Sameer Patil

Published on Nov 01, 2023 Updated 0 Hours ago

काश्मीर खोऱ्यामध्ये समस्या निर्माण करण्याच्या इस्लामाबादच्या प्रयत्नांचा सामना करण्यासाठी भारताला तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबरोबरच दहशतवाद विरोधाची नवी रणनीती तयार करावी लागणार आहे.

काश्‍मीरमध्ये दहशतवादाचा प्रतिकार करण्याची गतीशीलता बदलतेय

13 ते 19 सप्टेंबर 2023 दरम्यान काश्मीरच्या अनंत नाग जिल्ह्यात या सात दिवसांच्या कालावधीत दहशतवाद विरोधी (CT) ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चार लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, लष्कर-ए-तैयबा (एलईटी)चा कमांडर उझैर खानसह दोन दहशतवादी मारले गेले आहेत. ही चकमक घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी घनदाट जंगलातील जागा निवडली होती. दहशतवाद्यांच्या या प्रयत्नांना सुरक्षा दलाने निष्प्रभ केला. सुरक्षा दलांनी पाळत ठेवण्यासाठी आणि फायर पॉवरच्या वितरणासाठी नवीन हायटेक साधनांचा वापर करून त्याच बरोबर उच्च प्रभावशाली अचूक फायर ड्रोन चा वापर देखील करण्यात आला.

काश्मीर खोऱ्यातील हे दहशतवादी शहरी वातावरणातील सुरक्षा दलांना तोंड देऊ शकत नाहीत हे अनंतनाग मधील चकमकीने स्पष्ट केले आहे. या दहशतवाद्यांना आता घनदाट जंगलाची साथ करावी लागत आहे. 2020 पासून हा बदल प्रामुख्याने झालेला दिसून आला आहे. दहशतवादी गटांनी त्यांच्या कारवाया खोर्‍यातून पीर पंजाल पर्वतरांगांमधील पूंछ आणि राजौरीच्या जंगली भागात हलवल्या आहेत. त्या वेळेपासून काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या तीन वर्षांत या भागात सीटी ऑपरेशनमध्ये पाच पॅरा ट्रूपर्ससह 26 जवान शहीद झाले आहेत.

नवीन प्रशासकीय पुनर्रचना केंद्रशासित प्रदेशाच्या गतिशीलतेमुळे बळकट झाली आहे. 2020 मध्ये सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीर मधील विविध दहशतवादी संघटनांच्या 47 कमांडरसह 225 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

दहशतवादाची सद्यस्थिती

भारताच्या केंद्र सरकारने 2019 मध्ये कट्टरतावाद, फुटीरतावाद आणि दहशतवाद संपवण्यासाठी कलम 370 आणि 35a रद्द केले आहे. नवीन प्रशासकीय पुनर्रचना केंद्रशासित प्रदेशाच्या गतिशीलतेमुळे बळकट झाली आहे. 2020 मध्ये सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीर मधील विविध दहशतवादी संघटनांच्या 47 कमांडरसह 225 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शिवाय 299 दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या पुढच्या वर्षी 2021 मध्ये 20 पाकिस्तानी दहशतवाद्यांसह 184 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हा ट्रेंड पुढेही चालू राहिला: गेल्या वर्षी J&K मध्ये मारल्या गेलेल्या एकूण 187 दहशतवाद्यांपैकी 57 पाकिस्तानी आणि 130 स्थानिक होते. 25 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरक्षा दलांनी 53 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापैकी केवळ 11 स्थानिक होते. उर्वरित 42 पाकिस्तानी होते. 2019 ते 2022 या कालावधीत मारल्या गेलेल्या स्थानिक दहशतवाद्यांची टक्केवारी 83 टक्के इतकी होती. 2022 मध्ये स्थानिक दहशतवाद्यांमध्ये झपाट्याने घट झाली होती, तर विदेशी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची टक्केवारी 43 टक्क्यांपर्यंत वाढली होती.

Figure 1: Total Terrorists Killed in J&K (2020-2023)

Source: Indian Security Agencies

दहशतवाद्यांच्या व्यतिरिक्त सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्याच्या परिसंस्थेच्या इतर भागांवर देखील कारवाई केली आहे. उदाहरणार्थ, 635 OGW च्या अटकेने आणि 426 शस्त्रे जप्त केल्यामुळे ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त केले गेले आहे. याव्यतिरिक्त दहशतवादी निधीवर वाढलेल्या कारवाईमुळे खोऱ्यात विशेषतः दक्षिण काश्मीरमध्ये कार्यरत दहशतवादी गटांसाठी गोष्टी कठीण झाल्या आहेत. तसेच, दहशतवादी भरतीतही घट झालेली दिसून येत आहे. 2023 च्या पहिल्या नऊ महिन्यांत केवळ 25 व्यक्ती दहशतवादी गटांमध्ये सामील झाल्या जे 2019 मधील 143 आणि 2022 मधील 100 च्या तुलनेत लक्षणीय घट आहे. याबरोबरच आत्मसमर्पण, पुनर्वसन धोरणाद्वारे चकमकी दरम्यान जवळपास आठ दिशाभूल झालेल्या तरुणांनी आत्मसमर्पण केले आहे तसेच 50 जणांनी शांतपणाने दहशतवाद सोडला आहे.

दहशतवादी फंडिंगवर वाढलेल्या कारवाईमुळे खोऱ्यात विशेषतः दक्षिण काश्मीरमध्ये कार्यरत दहशतवादी गटांसाठी गोष्टी कठीण झाल्या आहेत.

सुरक्षा यंत्रणांनी गेल्या दोन वर्षांत यशस्वी घुसखोरीमध्ये लक्षणीय घट नोंदवली आहे. 2021 मध्ये 31 घुसखोरीच्या घटना झालेल्या आहेत तर 2022 मध्ये आठ घटना घडल्या आहेत. घुसखोरीच्या प्रयत्नामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या देखील 2021 मध्ये सहा वरून 2022 मध्ये 16 इतकी झालेली आहे. 2023 मध्ये नियंत्रण रेषेच्या (एलओसी) बाजूने घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 26 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या (जेकेपी) ताज्या आकडेवारीनुसार सध्या 81 सक्रिय दहशतवादी आहेत. त्यापैकी 33 स्थानिक आणि 48 परदेशी आहेत. दक्षिण काश्मीर या प्रदेशात ज्यामध्ये 28 परदेशी आणि स्थानिक भर्तीसह एकूण 56 सक्रिय दहशतवादी आहेत.

या महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे दहशतवादी तंझीम (संस्था) यांना गीअर्स आणि भौगोलिक परिस्थिती बदलण्यास भाग पाडले आहे.

काश्मीर ते पीर पंजाल

या ठिकाणी हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पीर पंजालच्या दक्षिणेकडील भागात नियंत्रण रेषेजवळ यावर्षी मारल्या गेलेल्या 31 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. विशेषत: पीर पंजालच्या घनदाट जंगलात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या उपस्थितीत होणारी प्रचंड वाढ म्हणजे दहशतवाद जिवंत ठेवणे आणि काश्मीरवर आंतरराष्ट्रीय लक्ष केंद्रित करणे असेच म्हणावे लागेल. ते गनिमी रणनीती वापरत असल्याचे दिसून येते – सुरक्षा दलांना लक्ष्य करा आणि नंतर पीर पंजाल भागातील घनदाट जंगलात परत जा आणि दुसर्‍या हल्ल्यासाठी पुन्हा संघटित व्हा असा त्यांचा उद्देश दिसत आहे.

नियंत्रण रेषा ओलांडून आलेले दहशतवादी समान वंश, समान भाषेचा वापर करतात. ज्यामुळे स्थानिक नागरिक त्यांना सहज आत्मसात करतात आणि सुरक्षा दलांना त्यांचा शोध घेणे कठीण जाते. त्यानंतर, सपाट भूभाग आणि स्थापित रस्त्यांचे जाळे असलेल्या काश्मीर खोऱ्याच्या उलट, पीर पंजालच्या दक्षिणेकडील प्रदेशात वाहतूक व्यवस्था फारशी विकसित झालेली नाही.

नियंत्रण रेषा ओलांडून आलेले दहशतवादी समान वंश, समान भाषेचा वापर करतात. ज्यामुळे स्थानिक नागरिक त्यांना सहज आत्मसात करतात आणि सुरक्षा दलांना त्यांचा शोध घेणे कठीण जाते.

पीर पंजालच्या दक्षिणेमध्ये सुरक्षा एजन्सी सीटी रणनीती तयार करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना त्यांना एका नवीन धोक्याचा सामना करावा लागत आहे— अनंतनाग चकमक सुरू असतानाच काही मीडिया हाऊसेसने जोरदार आरोप केले की चकमकीत सामील असलेल्या दहशतवाद्यांकडे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हँडलर्सकडून सैन्याच्या हालचालींबद्दल तपशीलवार माहिती होती – एका आतल्या व्यक्तीची ही भूमिका सूचित करते. एका स्थानिक वृत्तसंस्थेने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये नुकतेच अटक करण्यात आलेले आणि JKP चे निलंबित पोलीस उपअधीक्षक आदिल मुश्ताक यांचा ही माहिती लीक करण्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे JKP ला या अफवा दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास भाग पाडले आणि सेवानिवृत्त सुरक्षा अधिकाऱ्यांना चुकीची माहिती पसरवण्यापासून रोखण्यास सांगण्यात आले होते. सुरक्षा एजन्सी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणून या व्हिडिओकडे पाहिले जात होते.

आभासी दहशतवादी गटांचा उदय

आणखी एक महत्त्वाचा ट्रेंड जो पाहिला गेला आहे तो म्हणजे आभासी दहशतवादी गटांचा उदय म्हणावा लागेल. ज्यांचे स्पष्टपणे कोणतेही पूर्ववृत्त नाहीत. गेल्या तीन वर्षांत द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) जम्मू काश्मीर गझनवी फोर्स आणि पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAAF) सारखे गट समोर आले आहेत. एलईटी आणि इतर दहशतवादी संघटनांच्या आघाडीच्या संघटना आहेत. उदाहरणार्थ, मुख्यतः LeT च्या फंडिंग चॅनेलचा वापर करते. दरम्यान, PAAF जैश-ए-मोहम्मदचा प्रॉक्सी आहे, जो फेब्रुवारी 2019 च्या प्राणघातक लेथपोरा आत्मघाती हल्ल्यासाठी जबाबदार होता. या गटांनी त्यांचे कथन आणि प्रचार पुढे नेण्यासाठी X, Telegram आणि Facebook सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. काश्मीर खोऱ्याला मुस्लिम-अल्पसंख्याक प्रदेशात रुपांतरित करण्याचा कथित कट यासारख्या मुद्द्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी स्थानिकांना विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) म्हणून काम करण्यापासून सावध देखील केले आहे.

एका स्थानिक वृत्तसंस्थेने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये नुकतेच अटक करण्यात आलेले आणि JKP चे निलंबित पोलीस उपअधीक्षक आदिल मुश्ताक यांचा ही माहिती लीक करण्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निष्कर्ष

वरील घडामोडींच्या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात येते की रावळपिंडी आणि इस्लामाबादचा काश्मीर खोऱ्यात सामान्य स्थिती सुरू असताना समस्या निर्माण करण्याचा दृढ निश्चय दर्शवितात. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) द्वारे सतत तपासणी केल्यामुळे पाकिस्तानने नवीन संस्था तयार करण्याचा अवलंब केला आहे. जे आपल्या भूमीवर भरभराट करणाऱ्या भारतविरोधी दहशतवादी गटांचे लक्ष काढून टाकतील आणि काश्मीरच्या बंडखोरीला स्थानिक म्हणून प्रोजेक्ट करणार आहेत. भारताला नवीन दहशतवाद विरोधी धोरण तयार करावे लागणार असून जे तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे असेल. तसेच सुरक्षा एजन्सी मध्ये चुकीची माहिती आणि विभागणी द्वारे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी भूमिकेचे परीक्षण आणि प्रतिकार करणारे असेल बर का.

एजाज वानी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे फेलो आहेत.

समीर पाटील हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Ayjaz Wani

Ayjaz Wani

Ayjaz Wani (Phd) is a Fellow in the Strategic Studies Programme at ORF. Based out of Mumbai, he tracks China’s relations with Central Asia, Pakistan and ...

Read More +
Sameer Patil

Sameer Patil

Dr Sameer Patil is Senior Fellow, Centre for Security, Strategy and Technology and Deputy Director, ORF Mumbai. His work focuses on the intersection of technology ...

Read More +