Author : Soumya Bhowmick

Expert Speak Health Express
Published on Apr 08, 2024 Updated 0 Hours ago

युवा भांडवल आणि त्यांचे कल्याण जोपासणे ही केवळ नैतिक गरज नाही तर देशाची आर्थिक गरजही आहे.

दरी भरून काढत भविष्याची बांधणी करणे: शाश्वत विकासाचे उद्दिष्ट (SDG 3) आणि युवा भांडवल

हा लेख ‘जागतिक आरोग्य दिन २०२४: माझे आरोग्य, माझा हक्क’ या लेखमालिकेचा भाग आहे.


युवा भांडवलाची प्रगती ही देशाच्या विकासाची एक आधारशिला आहे, जी आर्थिक प्रगती साधण्यासाठी आणि लवचिक समाजाला चालना देण्याकरता आवश्यक ठरणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलाला गती देणारी ठरते. अलिकडच्या दशकांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्नाच्या निर्देशकांमध्ये भरीव सुधारणा होऊनही, जगभरातील अनेक कमी विकसित राष्ट्रांना अद्यापही संयुक्त राष्ट्रांनी ‘शाश्वत विकास उद्दिष्टां’द्वारे निश्चित केलेली समान उद्दिष्टे साध्य करणे शक्य झालेले नसून त्याकरता त्यांनी मोठे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

‘उत्तम आरोग्य आणि कल्याणा’वर लक्ष केंद्रित करणारे शाश्वत विकास उद्दिष्ट-३ हे युवावर्गाच्या कल्याणाचा मार्ग तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, आणि त्यामुळे युवावर्गासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरते, विशेषत: पौगंडावस्था- जो एक महत्त्वाचा कालावधी आहे, ज्यात योगदान मिळालेल्या घटकांमधून दीर्घकालीन कल्याण साधले जाते आणि बळकटी मिळते. शाश्वत विकास उद्दिष्ट-३ मध्ये, युवावर्गाला प्रभावित करणारे अनेक निर्देशक आहेत, ज्याकडे लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे. यामध्ये 'माता मृत्यूचे प्रमाण,' 'नवजात मृत्यू दर,' 'एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या,' आणि 'हृदयविकार व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे ओढवणारा मृत्यू दर यांचा समावेश आहे. युवावर्गावर यांचा थेट प्रभाव पडण्यापलीकडे, या निर्देशकांचा संपूर्ण समाजावर दूरगामी परिणाम होतो.

एक आंतरिक कल्याण दृष्टिकोन

युवावर्गातील गुंतवणूक ही मानवी भांडवलाची प्रगती साधण्यापलीकडची आहे; त्याकरता आंतरिक कल्याणाचा दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. या चौकटीत किशोरवयीन कल्याणाची विविध क्षेत्रे समाविष्ट होतात, ज्यात आरोग्य आणि पोषणापासून कौशल्ये आणि रोजगारक्षमतेपर्यंतचे मापदंड समाविष्ट आहेत (तक्ता १ पाहा). शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे महत्त्वाचे घटक असले तरी, कल्याणाच्या व्यापक व्याख्येत व्यक्तिनिष्ठ अनुभव आणि जीवनाचा वस्तुनिष्ठ दर्जा यांचा समावेश होतो.

सारणी १: कल्याणकारी क्षेत्र

क्षेत्रे

उपक्षेत्रे

आवश्यकता

कल्याणकारी प्रकार

उत्तम आरोग्य आणि कमाल पोषण

शारीरिक आरोग्य क्षमता- मानसिक आरोग्य क्षमता– उत्तम आरोग्य आणि पोषण

पुरेशी माहिती, निगा आणि सेवा उपलब्धता– स्वच्छ व पुरेशा पाण्याच्या स्वरूपात निरोगी वातावरण उपलब्ध- शारीरिक हालचालींची संधी- वैयक्तिक गरजेनुसार संतुलित आणि निरोगी आहाराची उपलब्धता

शारीरिक- पौष्टिक- भावनिक- सामाजिक- सांस्कृतिक

इतरांशी नातेसंबंध, सकारात्मक मूल्ये आणि समाजातील योगदान

इतरांशी नातेसंबंध- मूल्य आणि आदर- वृत्ती- परस्परांशी संवाद कौशल्य- उपक्रम- बदल आणि विकास

सकारात्मक आणि अर्थपूर्ण संबंध विकसित करण्याची संधी- निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी- वैयक्तिक जबाबदारी विकसित करण्याची संधी - सहानुभूती, मैत्री आणि संवेदनशीलता विकसित करण्याची संधी- सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरीदृष्ट्या सक्रिय होण्याची संधी- समुदाय विकासात योगदान देण्यासाठी कौशल्ये विकसित करण्याची संधी

भावनिक- सामाजिक- सांस्कृतिक

सुरक्षितता आणि आश्वासक वातावरण

सुरक्षितता

- भौतिक परिस्थिती

– समान संधी आणि समानता

- भेदभाव न होणे

- गोपनीयता

- प्रतिसाद

हिंसा आणि शोषण करणाऱ्या हितसंबंधांपासून संरक्षण- अन्न आणि पोषण, पाणी, घरात पुरेशी ऊब असणेकपडे आणि भौतिक सुरक्षा यांचा अधिकार- सहाय्यक कायदेशीर आणि धोरणात्मक नियमांची चौकट आणि त्याबद्दल माहितीची उपलब्धता- भेदभाव न करता वैयक्तिक श्रद्धा आचरणात आणण्याचा अधिकार

- संमतीशिवाय दृष्टिकोन शेअर केले न जाणे- सुरक्षित आणि स्वारस्यपूर्ण संधींची उपलब्धता

शारीरिक

- भावनिक

- सामाजिक-सांस्कृतिक

अध्ययन, क्षमता, शिक्षण, कौशल्ये आणि रोजगारक्षमता

अध्ययन- शिक्षण- संसाधने- कौशल्ये- रोजगार- आत्मविश्वास

प्रेरणा आणि शिकण्याची वचनबद्धता विकसित करणे- वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत औपचारिक शिक्षण आणि त्यानंतर औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाच्या संधींची उपलब्धता- संसाधने, कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्याची संधी- तांत्रिक, व्यावसायिक, व्यापार आणि सृजनशील कौशल्ये विकसित करण्याची संधी- शोषणमुक्त आणि शाश्वत शिक्षणात सहभागी होण्याची संधी- आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रोत्साहन

- भावनिक

- संज्ञानात्मक

संस्था आणि लवचिकता

संस्था- ओळख - उद्देश- लवचिकता- पूर्तता

आत्म-सन्मान आणि संस्थात्मक भावना विकसित करण्याची संधी– स्वत:ची ओळख निर्माण करताना स्पष्टता आणि आराम विकसित करण्याकरता सुरक्षित अवकाश- लवचिकता आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता विकसित करण्याची संधी– संभाव्य क्षमता पूर्णत्वाला नेण्याची संधी

भावनिक - संज्ञानात्मक



 स्रोत: रॉस आणि इतर (२०२०), ‘किशोरवयीन मुलांचे कल्याण: व्याख्या आणि संकल्पनात्मक चौकट’

आरोग्य आणि आर्थिक समृद्धी

१९७१ ते २००० सालापर्यंत ११८ विकसनशील देशांमध्ये वापरली जाणारी ‘पॅनेल डेटा अॅनालिसीस’ ही माहितीचे विश्लेषण करणारी एक सांख्यिकीय पद्धत, देशाच्या आर्थिक संभाव्यतेवरील आरोग्य सुधारणांचे मूर्त फायदे स्पष्ट करते. आयुर्मानात एक वर्षाची वाढ 4 टक्के उच्च विकास दराशी संबंधित आहे. शालेय शिक्षणातील प्रगती दर्शवणाऱ्या राष्ट्रांमध्ये औपचारिक बँकिंग प्रणाली, सुधारित आरोग्य, घटलेले प्रजनन दर आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यांचे उच्च प्रमाण दिसून येते.

५ वर्षांखालील बालकांच्या मृत्युदरातील असमानता कमी आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमधील दरडोई ‘जीडीपी’मध्ये महत्त्वपूर्ण दरी निर्माण करते (चित्र १ पाहा). ही दरी आरोग्य आणि आर्थिक समृद्धी यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करते. ही तफावत कमी करण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याची गरज आहे.

आकृती १: ५ वर्षांखालील मृत्यूदर आणि दरडोई जीडीपी यांच्यातील संबंध, ‘वर्ल्ड रीजन्स’तर्फे, २०२०

स्रोत: मानवी भांडवल निर्देशांक २०००, जागतिक बँक समूह

आफ्रिकी राष्ट्रांना त्यांच्या युरोपीय, मध्य आशियाई आणि पॅसिफिक समकक्ष राष्ट्रांच्या तुलनेत उच्च मृत्युदराचा सामना करावा लागत असल्याने, यांतून आर्थिक विकासाचा आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचा जागतिक स्तरावरील संबंध स्पष्ट होतात. सार्वजनिक आरोग्यात केलेली वाढती गुंतवणूक अनेकदा आर्थिक प्रगतीला चालना देते आणि देशवासियांचे आरोग्य उत्तम ठेवण्यात योगदान देते. फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि जर्मनी यांसारखी राष्ट्रे सार्वजनिक आरोग्य सेवेत त्यांच्या जीडीपीच्या ११ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक करतात, यांतून आरोग्यातील गुंतवणुकीचा आणि आर्थिक विकासाचा संबंध स्पष्ट होतो. याउलट, २०२५ सालापर्यंत ‘जीडीपी’च्या २.५ टक्के असावी, हे राष्ट्रीय आरोग्य धोरणाचे जे लक्ष्य आहे, त्या तुलनेत भारताची आरोग्य सेवा गुंतवणूक कमी राहिली आहे, म्हणूनच लक्ष्याच्या दिशेने प्रगती करण्यात अडथळे येत आहेत.

आव्हानांवर परिणामकारक उपाय योजणे

कोविड-१९ साथीच्या झालेल्या परिणामामुळे आरोग्य आणि कल्याणकारी प्रगतीत लक्षणीयरीत्या अडथळे निर्माण झाले आहेत. प्रतिबंधित हालचाली आणि तणावग्रस्त आरोग्य व्यवस्थेमुळे युवावर्गाशी संबंधित महत्त्वाच्या निर्देशकांकडे लक्ष देता न आल्याने आव्हाने निर्माण झाली आहेत. ‘कॉमनवेल्थ’च्या ‘युवा विकास निर्देशांक २०२० अहवाला’त कोविड साथीनंतरच्या परिस्थितीत विशेष लक्ष द्यायला हवी, अशी दोन विशिष्ट क्षेत्रे नमूद केली आहेत. यांतील पहिले म्हणजे, शैक्षणिक व्यत्यय, विलग राहणे आणि बेरोजगारी यांची उच्च पातळी लक्षात घेता, मानसिक आरोग्य सेवा युवावर्गाला उपलब्ध होण्यासंबंधीचा कायदा महत्त्वपूर्ण ठरतो. दुसरी बाब म्हणजे, या अहवालात युवापिढीच्या रस्ते वाहतुकीत होणाऱ्या मृत्यूंच्या चिंताजनक आकडेवारीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे आणि आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

अखेरीस, युवा भांडवल आणि त्यांचे कल्याण जोपासणे ही केवळ नैतिक गरज नाही तर ती आर्थिक गरजही आहे. विकसनशील आणि विकसित राष्ट्रांमधील भागीदारीतून शाश्वत विकास उद्दिष्टे ३ची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक आशादायक मार्ग दिसतो. अशा सहकार्यातून ज्ञानाची देवाणघेवाण, संसाधनांची देवाणघेवाण आणि युवावर्गाच्या कल्याणावर परिणाम करणाऱ्या बहुआयामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समन्वित प्रयत्न करता येतील. लवचिक समाजनिर्मितीकरता आणि जागतिक स्तरावर शाश्वत विकासाला चालना देण्याकरता शाश्वत विकास उद्दिष्टांच्या नियमांच्या चौकटीतील सर्वांगीण दृष्टिकोन आवश्यक ठरतो. या सर्वांगीण दृष्टिकोनात- आरोग्य, शिक्षण आणि आंतरिक कल्याण समाविष्ट आहे.


सौम्य भौमिक हे ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनचे सहयोगी फेलो आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.