Author : Shoba Suri

Expert Speak Health Express
Published on Aug 28, 2024 Updated 0 Hours ago

कामाच्या ठिकाणी, घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सर्वसमावेशक धोरणांद्वारे स्तनपानाला समर्थन दिले तर त्यामुळे कुटुंब आणि अर्थव्यवस्था दोन्ही मजबूत करण्यासाठी मदत होऊ शकते. 

स्तनपान आणि लैंगिक समानता : महिला सक्षमीकरण आणि भविष्याचे पालनपोषण

आई आणि बाळासाठी स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. स्तनपानातून अत्यंत आवश्यक असे पोषण मिळते. त्यामुळे त्याला संरक्षण दिले पाहिजे. मातांसाठी स्तनपान वजन कमी करण्यास मदत करते, रोगांचा धोका कमी करते आणि नैसर्गिक गर्भनिरोधक म्हणून काम करते. जागतिक स्तरावर 50 टक्क्यांहून कमी बालकांना 6 महिन्यांपर्यंतचे स्तनपान मिळते. एका आकडेवारीनुसार केवळ 46 टक्के अर्भकांना जन्माच्या एका तासाच्या आत स्तनपान केले जाते.

आकृती : स्तनपान दर आणि जागतिक उद्दिष्टे 

स्रोत: युनिसेफ

पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यू कुपोषणामुळे होतात. कुपोषणामुळे मुलांचे जगणे आणि आरोग्य धोक्यात येते. जागतिक स्तरावर 1 कोटी 48 लाख मुले पाच वर्षांखालील आहेत. यापैकी 3 कोटी 70 लाख मुले जास्त वजनाने ग्रस्त आहेत. ही स्थिती चिंताजनक आहे.

अर्भके आणि लहान बालकांची आहार पद्धती सुधारणे हे बालकांचे अस्तित्व, वाढ आणि विकासाशी निगडीत आहे. स्तनपान न केल्यामुळे मुलांचे मोठे नुकसान होते. आर्थिक नुकसानाबद्दल बोलायचे तर त्याचा आकडा वर्षाला 257 ते 341अब्ज अमेरिकी डाॅलर्स वर जातो. संज्ञानात्मक विकासावर स्तनपानाच्या कालावधीच्या पडणारा प्रभाव पाहिला तर दीर्घ काळ केलेल्या स्तनपानामुळे मुलांचा बुद्ध्यांक सुधारतो, असे समोर आले आहे.  

अर्भके आणि लहान बालकांची आहार पद्धती सुधारणे हे बालकांचे अस्तित्व, वाढ आणि विकासाशी निगडीत आहे, असे आढळून आले आहे.  

स्तनपान कमी होण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. स्त्रियांना सर्व स्तरांवर स्तनपानाच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. घर, समुदाय किंवा कामाचे ठिकाण या सगळ्याच ठिकाणी स्तनपानामध्ये अडथळे येतात. लैंगिक असमानता, सामाजिक-सांस्कृतिक नियम, शहरीकरण, आईच्या दुधाच्या पर्यायाचे आक्रमक मार्केटिंग, खराब गुंतवणूक आणि स्तनपान संरक्षणाबाबत धोरणांचा अभाव या त्या समस्या आहेत. या वर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताह 2024 ची थीम आहे, स्तनपानाचे समर्थन. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 'जगणे, आरोग्य आणि कल्याण' यामधली असमानता कमी करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. दारिद्र्य निर्मूलन, चांगले आरोग्य आणि कल्याण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, समानतेचे प्रयत्न, शाश्वत शहरे आणि समुदाय या शाश्वत विकास उद्दिष्टांवर लक्ष देण्याची गरज आहे.

कामाच्या ठिकाणी लैंगिक समानता राखायची असेल तर स्तनपानामधले अडथळे दूर करावे लागतील. कामाच्या ठिकाणी स्तनपान करण्याची सुविधा असेल तर महिलांची कामाची गुणवत्ता वाढू शकते. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरातील 8 कोटी 30 लाख महिलांना याबद्दलच्या पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत, की अशा धोरणांमुळे स्तनपानाचे प्रमाण सुधारते, असे अमेरिकेच्या वर्कप्लेस ब्रेस्टफीडिंग धोरणाची तपासणी करणाऱ्या विश्लेषणात आढळून आले आहे. स्तनपानाची सुविधा ही सर्वात हुशार गुंतवणूक आहे. स्तनपानामध्ये अमेरिकेने केलेली गुंतवणूक पाहता एका अमेरिकी डाॅलरच्या तुलनेत 35 डाॅलरचा परतावा मिळू शकतो. 2025 चे जागतिक पोषण लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रति अर्भक 4.70 अमेरिकी डाॅलर्सची गुंतवणूक आवश्यक आहे.

स्तनपानाबद्दल अनेक सकारात्मक घटक आहेत पण तरीही याचे महत्त्व समजून घेतले जात नाही. यासाठी ‘मदर्स मिल्क टूल’ नावाचे एक नवीन साधन विकसित केले गेले आहे. याद्वारे स्तनपानाद्वारे महिलांनी दिलेले योगदान मोजले जाते. जागतिक स्तरावर सुमारे 35.6 अब्ज लिटर एवढे आईच्या दुधाचे उत्पादन होते. त्यातील 22 अब्ज लिटर (38.2 टक्के) सांस्कृतिक अडथळे आणि बाह्य वातावरणामुळे वाया जाते. भारताला वार्षिक 8.7 अब्ज लिटर उत्पादनात 40 टक्के तोटा सहन करावा लागतो.

स्तनपानाबद्दल अनेक सकारात्मक घटक आहेत पण तरीही याचे महत्त्व समजून घेतले जात नाही. यासाठी ‘मदर्स मिल्क टूल’ नावाचे एक नवीन साधन विकसित केले गेले आहे. याद्वारे स्तनपानाद्वारे महिलांनी दिलेले योगदान मोजले जाते.   

ILO कन्व्हेन्शन 2000 नुसार, महिलांना त्यांच्या बाळाला स्तनपान करण्यासाठी एक किंवा अधिक दिवसांची सुटी किंवा त्यांचे कामाचे तास कमी करण्याचा अधिकार आहे. महिलांना मातृत्व संरक्षणाचा अधिकार आहे आणि कन्व्हेन्शन क्र. 183 नुसार प्रसूती रजा ही 14 आठवड्यांपेक्षा कमी नसावी. शिफारस क्र. 191 सूचित नुसार प्रसूती रजा किमान 18 आठवडे असावी असे म्हटले आहे. यामुळे स्तनपानास समर्थन मिळते. याचे महत्त्वाचे फायदे आहेत. भारतात 2017 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या मातृत्व लाभ कायद्यानुसार 26 आठवड्यांच्या सशुल्क प्रसूती रजेची तरतूद आहे. स्तनपान सुविधा आणि प्रसूती रजेमुळे वैयक्तिक, कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणासह अनेक घटक यशस्वी स्तनपानास हातभार लावतात. स्तनपानाला पाठिंबा देण्यासाठी वडिलांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांचे ज्ञान आणि शिक्षण हेही महत्त्वाचे आहे. स्तनपानाच्या प्रवासात महिलांना जोडीदाराची सोबत आणि भावनिक प्रतिसाद मिळाला तर कुटुंबातील आणि समाजातील लोकही त्याकडे संवेदनशीलतेने पाहू शकतात.   

आईच्या दुधाच्या पर्यायाचे आक्रमक मार्केटिंग, आकर्षक जाहिराती आणि भेटवस्तू यामुळे महिलांचा स्तनपानाबद्दलचा विश्वास कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

आईच्या दुधाच्या पर्यायाचे आक्रमक मार्केटिंग, आकर्षक जाहिराती आणि भेटवस्तू यामुळे महिलांचा स्तनपानाबद्दलचा विश्वास कमी होत असल्याचे दिसून आले आहे. 2022 मध्ये 73 अब्ज अमेरिकी डाॅलर्सची विक्री आणि 2032 साठी 185 अब्ज अमेरिकी डाॅलर्स अंदाजानुसार स्तन-दुधाचा पर्यायी व्यवसाय अनेक पटींनी वाढला आहे. स्तन-दुधाच्या पर्यायांचे विपणन : आंतरराष्ट्रीय संहितेची राष्ट्रीय अंमलबजावणी अहवाल 2024 नुसार 194 पैकी 146 देशांमध्ये स्तन-दुधाच्या पर्यायांच्या विपणनाच्या आंतरराष्ट्रीय संहितेला समर्थन देण्यासाठी कायदेशीर उपाय आहेत. युनिसेफच्या मते, कमी-मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्तनपानाचे दर बदलतात. स्तनपानाचे संरक्षण, समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे आणि कार्यक्रम असलेल्या देशांमध्ये हे दर स्वाभाविकपणे जास्त आहेत. नॉर्वेमध्ये सुमारे 98 टक्के बाळांना जन्माच्या पहिल्या तासात स्तनपान केले जाते आणि 78 टक्के केवळ सहा महिन्यांपर्यंत स्तनपान केले जाते. नॉर्वे मधील पालकांना 49 आठवड्यांच्या पालकांच्या रजेचा हक्क आहे आणि मातांना प्रत्येकी 30 मिनिटांच्या दोन स्तनपान विश्रांतीची तरतूद करण्यात आली आहे.

स्तनपान हा मूलभूत मानवी हक्क आणि सामूहिक जबाबदारी आहे. आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा, चांगले पोषण आणि कामाच्या ठिकाणी स्तनपानासाठी सुविधा अशा सर्वसमावेशक धोरणांद्वारे महिलांना स्तनपानास पोषक वातावरण निर्माण केले तर कुटुंब आणि अर्थव्यवस्था हे दोन्ही मजबूत होऊ शकतात.


 शोभा सुरी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.