Expert Speak Raisina Debates
Published on Aug 27, 2024 Updated 0 Hours ago

‘आयसीईटी’अंतर्गत बायोसिक्युरिटी आणि बायोसेफ्टी या दोहोंसाठी भारत आणि अमेरिकेदरम्यानचे वृद्धिंगत होणारे सहकार्य अत्यंत लाभदायक ठरू शकते.

बायोसिक्युरिटी आणि बायोसेफ्टी : ‘आयसीईटी’साठी महत्त्वपूर्ण कार्यक्रम

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांनी अलीकडेच ‘इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल इमर्जिंग टेक्नॉलॉजीज’ (आयसीईटी) अंतर्गत सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांचा आढावा घेतला. त्यामध्ये सहकार्याचे प्रमुख क्षेत्र म्हणून जैवतंत्रज्ञान हे क्षेत्र निवडण्यात आले. या क्षेत्रात लक्षणीय आर्थिक क्षमता असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या या उपक्रमांतर्गत जैवतंत्रज्ञानामधील द्विपक्षीय सहकार्याचा कोणत्याही प्रकारचा विशिष्ट कार्यक्रम सांगण्यात आलेला नाही. मात्र, या निवडीमुळे बायोसिक्युरिटी आणि बायोसेफ्टी यांविषयीच्या सहकार्याची सद्यस्थिती, त्याचे महत्त्व आणि विचारविनिमयासाठी भविष्यातील दिशादर्शन गरजेचे आहे.

कोव्हिड-१९ साथरोगाने रोगकारक विषाणूंवर मजबूत देखरेख यंत्रणा, जैविक संशोधनाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांचे नियमन करणाऱ्या पद्धतींची अंमलबजावणी आणि आजार व जैविक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक स्तरावरील बहुअनुशासनात्मक हाताळणीची गरज या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. 

कोव्हिड-१९ साथरोगाने रोगकारक विषाणूंवर मजबूत देखरेख यंत्रणा, जैविक संशोधनाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांचे नियमन करणाऱ्या पद्धतींची अंमलबजावणी आणि आजार व जैविक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक स्तरावरील बहुअनुशासनात्मक हाताळणीची गरज या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. बायोसिक्युरिटी ही जैविक घटकांच्या धोक्यापासून संरक्षणाशी संबंधित आहे, तर बायोसेफ्टी ही प्रयोगशाळेत होणारे अपघात आणि रोगकारक विषाणू अपघाताने प्रयोगशाळेबाहेर पडणे रोखण्यासाठीच्या नियमांशी निगडीत आहे. अमेरिकेने एका कार्यकारी आदेशाअंतर्गत बायोसेफ्टी आणि बायोसिक्युरिटी कल्पक उपक्रमाचा प्रारंभ केला. जैवतंत्रज्ञान सुरक्षेशी संबंधित असुरक्षा आणि धोके विचारात घेऊन जैविक विज्ञान (लाइफ सायन्सेस) क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. दुसरीकडे, भारतामध्ये २०१७ मध्ये सार्वजनिक आरोग्य (बचाव, नियंत्रण आणि साथरोगाचे व्यवस्थापन, जैवदहशतवाद आणि आपत्ती) विधेयक सादर करण्यात आले; परंतु या विधेयकाची सद्यस्थिती आणि त्याच्या समावेशाविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. साथरोगाच्या परिणामांमधून आरोग्य तज्ज्ञ अद्याप सावरत आहेत. या पार्श्वभूमीवर बायोसिक्युरिटी आणि बायोसेफ्टीसंबंधात कृती करण्यासाठी औपचारिक संस्थात्मक यंत्रणेचा विकास करण्याची सर्वाधिक गरज आहे. ‘आयसीईटी’ अंतर्गत द्विपक्षीय भागीदारीमुळे ‘परस्पर विश्वासावर आधारित एक मुक्त, उपलब्ध होणारी आणि सुरक्षित तंत्रज्ञान परिसंस्था उभारणी शक्य होईल. अशी संस्था आपल्या लोकशाही मूल्यांना आणि लोकशाही संस्थांना बळकट करील.’ ती ‘सरकार, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील’ तांत्रिक प्रयत्नांदरम्यान पूल म्हणून काम करील, तंत्रज्ञान कल्पकतेला वाव देईल आणि नियामक अडथळे कमी करील. यानुसार, ‘आयसीईटी’ या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्यासाठी दोन्ही देशांचे एक आदर्श व्यासपीठ म्हणून काम करते.

सद्यस्थिती

दोन्ही देशांमधील जैवतंत्रज्ञान सहकार्य सध्या ‘जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी’ आणि जैवतंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या ‘रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी’ यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या ‘१.५-ट्रॅक बायोसिक्युरिटी डायलॉग’च्या माध्यमातून केले जाते. या भागीदारीमध्ये सहकार्यासाठी अनेक क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सरकारी स्तरावर वृद्धी होणारे द्विपक्षीय कामकाज, पुनःपुन्हा उद्भवणाऱ्या जैविक धोक्यांसाठी ‘वन हेल्थ’ दृष्टिकोन, चुकीची माहिती आणि विकृतीकरण मोहिमांसाठी उपाययोजना आणि प्रयोगशाळांमध्ये सुरक्षिततेची निश्चिती करण्यासाठी उपाययोजना यांचा समावेश होतो. या वर्षीची परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे. मात्र, अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. या परिषदेमुळे या चर्चेला पाठबळ देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेच्या ‘नॅशनल ॲकॅडमिक्स ऑफ सायन्सेस, इंजिनीअरिंग अँड मेडिसिन’कडून ‘आयसीईटी’ अंतर्गत जैवतंत्रज्ञान सहकार्यासंबंधी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन आणि जैवसुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्यावर भर दिला जाईल. अखेरीस, अमेरिकेकडून लवकरच एक नवा ‘बायोसेक्युअर’ कायदा मंजूर करण्यात येणार आहे. त्याचे उद्दिष्ट म्हणजे, चीनच्या काही कंपन्यांकडून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन चीनवरील अवलंबित्व कमी करणे. हा कायदा मंजूर झाल्यास भारतीय ‘कॉन्ट्रॅक्ट डिव्हेलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन्स’साठी (सीडीएमओ) लक्षणीय संधींचा मार्ग मोकळा होईल आणि ‘आयसीईटी’ हे औषधनिर्माण क्षेत्रातील धोक्याच्या मूल्यांकन आराखड्याच्या विकासासाठी एक आगळेवेगळे व्यासपीठ म्हणून काम करू शकेल. हे उपक्रम असूनही ‘आयसीईटी’ डोमेन अंतर्गत बायोसेफ्टी आणि बायोसिक्युरिटी वाढवण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

दुहेरी वापर संशोधनाची चिंता

जैवतंत्रज्ञानाने विशेषतः लस, निदान, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांच्या निर्मितीमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे; परंतु ‘दुहेरी वापर संभ्रम’ ही चिंतेची बाब आहे. लाइफ सायन्सेसमध्ये करण्यात येत असलेल्या बऱ्याच संशोधनाचे आरोग्यासाठी भरीव लाभ होतात; परंतु इजा होण्याच्या उद्देशाने त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही अधिक असते. उदाहरणार्थ, अँटीबॉडीज आणि एमआरएनए लसींच्या विकासासाठी कृत्रिम जीवशास्त्र जबाबदार आहे; परंतु इजा पोहोचवण्याच्या आणि नुकसान करण्याच्या उद्देशाने जैविक घटकांचा दुष्ट लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने वापर होण्याची दाट शक्यताही यामध्ये आहे. यामुळे लाइफ सायन्सेसच्या वापराशी संबंधित संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि या तंत्रज्ञानामुळे व्यापक समाजाला मिळणाऱ्या संभाव्य लाभाशी तडजोड न करता या धोक्यांशी सामना करणारा एक आराखडा विकसित करण्याची गरज अधोरेखित करते.    

जैवतंत्रज्ञानाने विशेषतः लस, निदान, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांच्या निर्मितीमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे; परंतु ‘दुहेरी वापर संभ्रम’ ही चिंतेची बाब आहे.

धोके व कल्पकता आराखडा तयार करण्यासाठी संशोधन समुदाय, शैक्षणिक संस्था, खासगी क्षेत्र, सरकारमधील सुरक्षा तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक आणि ‘थिंक टँक’च्या सदस्यांची आवश्यकता भासेल. जैवतंत्रज्ञानामध्ये लक्षणीय प्रगती होत असल्याने संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या संशोधनाची दुहेरी वापराची क्षमता लक्षात घ्यायला हवी. कारण अत्याधुनिक जैवतंत्रज्ञानाचा गैरवापर कसा होऊ शकतो, हे सुरक्षा तज्ज्ञांच्या ध्यानात येणार नाही. हे औषधनिर्माण क्षेत्रासाठी सर्वाधिक संबंधित आहे. या क्षेत्रात व्यासपीठ आधारित लस विकसनामध्ये दुहेरी वापराच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. कोव्हिड-१९ वरील लसींच्या विकासामुळे उत्प्रेरित झालेल्या भारतीय आणि अमेरिकी औषध कंपन्यांनी पारंपरिक नसलेल्या व्यासपीठांवर आधारित लसींच्या विकसनात प्रवेश केला आहे. त्यामध्ये एमआरएनए-आधारित, व्हायरली व्हेक्टर्ड, डीएनए-आधारित आणि रीकॉम्बिनंट प्रोटीन एक्स्प्रेशन सिस्टिम आधारित प्रणालींचा समावेश आहे. या व्यासपीठांमध्ये दुहेरी वापराच्या शक्यतेचा धोका कमी असेल, याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; परंतु ही व्यासपीठे नवी असल्याची बाब लक्षात घेऊन संशोधकांनी प्रत्येक तंत्रज्ञानाच्या धोक्याचे आकलन आणि मूल्यांकन करणे गरजेचे आहे. हे जैवतंत्रज्ञान आणि सुरक्षा समुदायांमधील सहकार्याच्या दृष्टिकोनाची गरज दाखवून देते; तसेच ही दरी भरून काढण्यासाठी भारत व अमेरिकेतील प्रतिनिधींना संधीही देते. त्याचप्रमाणे, प्रयोगशाळांच्या सुरक्षेची जागरूकता वाढवण्यासाठी आणि सूक्ष्मजीव व जैविक उपकरणांची योग्य हाताळणी करण्यासाठी ‘आयसीईटी’च्या अंतर्गत कार्यशाळा आणि अन्य प्रशिक्षण उपक्रम संयुक्तपणे आयोजिले जाऊ शकतात. हे प्रयत्न जैविक प्रयोगांमुळे होणारी अपघाती किंवा अनवधानाने होणारी हानी टाळू शकतात. शिवाय संशोधन सुरक्षित व जबाबदार पद्धतीने केले जाईल, याची निश्चितीही देऊ शकतात. या व्यासपीठांच्या दुहेरी वापराच्या शक्यतेचा धोका कमी असला, तरी ही व्यासपीठे नवीन असल्याने संशोधकांनी प्रत्येक तंत्रज्ञानाच्या धोक्याचे नीट आकलन करून घेणे आणि मूल्यांकन करणेही आवश्यक आहे. यातून जैवतंत्रज्ञान व सुरक्षा समुदायांमधील सहकार्याच्या दृष्टिकोनाची गरज दिसून येते; तसेच ही दरी भरून काढण्यासाठी भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींना संधीही मिळाली आहे. याच पद्धतीने प्रयोगशाळेच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि सूक्ष्मजीव व जीवशास्त्रीय उपकरणांची योग्य हाताळणी करण्यासाठी ‘आयसीईटी’ अंतर्गत कार्यशाळा आणि अन्य प्रशिक्षण उपक्रम संयुक्तपणे आयोजित केले जाऊ शकतात. हे प्रयत्न जीवशास्त्रीय प्रयोगांमुळे होणारी अपघाती अथवा अनवधानाने होणारी हानी टाळू शकतात. शिवाय संशोधन सुरक्षित व जबाबदार पद्धतीने केले आहे ना, याची निश्चितीही करू शकतात.

आजारासंबंधाने देखरेख आणि आगाऊ इशारा यंत्रणा

कोव्हिड-१९ साथरोगाने आरोग्य दक्षता यंत्रणेच्या मर्यादा अधोरेखित केल्या आहेत. अशा प्रकारे संभाव्य जैविक उद्रेक, आपत्ती किंवा दहशतवादी हल्ले यांना तोंड देण्यासाठी आरोग्यविषयक यंत्रणेची व्याप्ती वाढवण्यासाठी अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेच्या कुक्कुटपालन केंद्रांमध्ये सध्या सुरू असलेल्या एच५एन१ एव्हीयन एन्फ्लुएंझा साथरोग आणि भारतातील निपाह विषाणूचा प्रसार यांसह अन्य आजारांचा फैलाव हा हवामान बदल व लोकसंख्येतील वाढ या कारणांसह मानववंशजन्य घटकांमुळे वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बायोसिक्युरिटीच्या निश्चितीसाठी ‘वन हेल्थ’ दृष्टिकोनाच्या गरजेवर भर देण्यात आला आहे. धोरणकर्त्यांनी झूनॉटिक विषाणूच्या प्रजातींचे अडथळे पार करण्याची क्षमता आणि फैलावाच्या घटनांमध्ये वाढ करणारे मानववंशीय घटक समजावून घेणे आवश्यक आहे. आंतरसरकारी सहकार्यामुळे मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी रोगकारक विषाणू शोधणे आणि त्यावर उपाययोजना करण्यामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.  

कोव्हिड-१९ साथरोगाने आरोग्य दक्षता यंत्रणेच्या मर्यादा अधोरेखित केल्या आहेत. अशा प्रकारे संभाव्य जैविक उद्रेक, आपत्ती किंवा दहशतवादी हल्ले यांना तोंड देण्यासाठी आरोग्यविषयक यंत्रणेची व्याप्ती वाढवण्यासाठी अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याची आवश्यकता आहे.

अमेरिकेचे रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र (सीडीसी) आणि भारताचे राष्ट्रीय एक आरोग्य अभियान वनस्पती, प्राणी आणि मानवांमध्ये संसर्गजन्य आजारांच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य उपाययोजना अवलंबण्यासाठी पद्धती तयार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू शकतात. याशिवाय, या प्रयत्नांमुळे सांडपाणी व वन परिसंस्था, मेटाजिनोमिक डेटा आणि क्लिनिकल माहिती मिळवणे आणि संभाव्य उद्रेकांबद्दलची वास्तव माहिती तयार करणे यांच्यासह पर्यावरणीय दक्षतेवर लक्ष्य केंद्रित करणारी भारत व अमेरिका केंद्रे उभारण्यात येऊ शकतात. आरोग्यविषयक माहिती पद्धतशीररीत्या गोळा करणे, जास्तीतजास्त लोकांपर्यंत ती पोहोचवणे आणि तिचे विश्लेषण करणे या गोष्टींमुळे संभाव्य आरोग्य आणीबाणीची परिस्थिती लवकर ओळखणे शक्य होणार आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर मेडिकल इंटेलिजन्स’ आणि भारताच्या ‘सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स’कडून आरोग्यविषयक घडामोडींवर लक्ष ठेवले जाते. या संस्थात्मक संघटना मायक्रोबियल फॉरेन्सिक आणि धोक्याच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून अनोळखी जीवशास्त्रीय धोक्यांवर उपाययोजना करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवू शकतात. त्याचप्रमाणे बायोसिक्युरिटी प्रयत्नांमधून ‘सायबरसुरक्षे’सारख्या अन्य विषयांमधील एकत्रित उपक्रमांपर्यंत वाढवता येऊ शकतात. आरोग्य यंत्रणेच्या माहितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन या क्षेत्रासाठी आरोग्य क्षेत्राचे सुरक्षा जाळे मजबूत करण्यासाठी आणि वाईट घटकांपासून संरक्षण करण्यासाठी समन्वयीत उपाययोजना करण्यासाठी आयसीईटी एक वाहन म्हणून काम करू शकते.

जैवतंत्रज्ञानातील जलद प्रगतीमुळे बायोसिक्युरिटी आणि बायोसेफ्टीची खात्री करण्यासाठी एक मजबूत नियामक आराखड्याची आवश्यकता आहे. अमेरिका आणि भारतातील खासगी क्षेत्रांतील नियामक संस्थांच्या भागीदारीमुळे नव्या जैवतंत्रज्ञानाशी संबंधित बायोसिक्युरिटी धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी योजना विकसित होऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्ञानाचा प्रसार करणारी यंत्रणा जैवतंत्रज्ञान आणि सुरक्षा समुदायांना शिक्षण देण्यास मदत करू शकते. शिवाय हेल्थ इंटेलिजन्स नेटवर्कसाठी परिवर्तनीय जीवशास्त्रीय धोक्यांसाठी सहकार्याचा दृष्टिकोन महत्त्वपूर्ण ठरू शकतो. ‘आयसीईटी’ हे दुहेरी वापर संशोधन आणि आजाराबाबतीत दक्षता घेण्यासाठी चर्चा घडवून आणणारे एक आदर्श व्यासपीठ आहे. त्यामुळे लवचिक जैवसुरक्षाविषयक उपकरणांची निश्चिती करण्यासाठी, शैक्षणिक भागीदारी, साथरोगाशी सामना करण्यासाठी सज्जता आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून अन्य सहकारी घटकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.


लक्ष्मी रामकृष्णन या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.