7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर सुमारे आठ महिन्यांनंतर आणि इस्रायलकडून एकत्रित लष्करी प्रत्युत्तरानंतर अनेक प्रादेशिक घडामोडी घडल्या आहेत. गेल्या आठवडाभरात वॉशिंग्टन डी.सी.मध्ये झालेल्या चर्चा पाहता इस्त्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्यात प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोक्याची घंटा सतत वाजते आहे.
हिजबुल्ला ही अधिकृतपणे निमलष्करी संघटना आहे. लेबनॉनवरच्या इस्रायली आक्रमणाला प्रतिसाद म्हणून या संघटनेची 1982 मध्ये स्थापना झाली. त्याला इराणचे मार्गदर्शन आणि पाठिंबा होता. तेव्हापासून हा गट फोफावला. गेल्या दोन दशकांमध्ये हिजबुल्ला संघटनेने आपल्या इराणी मित्रांच्या बाजूने सीरिया आणि इराकमध्ये फौजा तैनात केल्या. हिजबुल्लाहमध्ये अफाट आर्थिक आणि लष्करी संसाधने आणि 1 लाखांहून जास्त सैनिक आहेत.
इस्रायलने हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी गाझामध्ये आक्रमण सुरू केल्यापासून, हिजबुल्लाह इस्त्रायलवर दबाव कायम ठेवण्यासाठी आणि त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी सतत हल्ले करते आहे.
इस्रायलने हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी गाझामध्ये आक्रमण सुरू केल्यापासून, हिजबुल्लाह इस्त्रायलवर दबाव कायम ठेवण्यासाठी आणि त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी सतत खालच्या स्तरावरचे हल्ले करते आहे. हे हल्ले एकमेकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि मोठे हल्ले सुरू करण्यापासून एकमेकांना परावृत्त करण्यासाठी असले तरी त्यांचे प्रमाण आणि तीव्रता हळूहळू वाढते आहे. याचा परिणाम म्हणून या दोघांमध्ये मोठे युद्ध सुरू होऊ शकते. मध्यपूर्वेच्या इतर भागांमध्ये या युद्धाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याने गंभीर विनाश होऊ शकतो.
वर्चस्वाची चढाओढ
इस्रायल आपले वर्चस्व वाढवण्यासाठी या युद्धात उतरण्याची शक्यता आहे. इस्रायलवर एखादा हल्ला झाला तर हा देश त्याचा तीव्र प्रतिकार करतो. किरकोळ लष्करी घुसखोरी किंवा मोठा हल्ला याबाबत इस्रायलची रणनीती सारखीच असते. हिजबुल्लाच्या बाबत 2006 मध्ये हेच दिसून आले. हिजबुल्लाने दोन इस्रायली सैनिकांचे अपहरण केले. त्यानंतर इस्रायलने विध्वंसक हल्ला चढवला. यात 1 हजार लेबनीज नागरिकांचा मृत्यू ओढवला. या प्रतिहल्ल्याची तीव्रता पाहता हे अपहरण टाळले असते तर बरे झाले असते हे हिजबुल्लाहने मान्य केले. इस्रायलच्या याच रणनीतीमुळे हमासच्या हल्ल्यानंतर गाझावरही जोरदार प्रतिहल्ला झाला.
इस्रायल आपले वर्चस्व वाढवण्यासाठी या युद्धात उतरण्याची शक्यता आहे. इस्रायलवर एखादा हल्ला झाला तर हा देश त्याचा तीव्र प्रतिकार करतो. किरकोळ लष्करी घुसखोरी किंवा मोठा हल्ला याबाबत इस्रायलची रणनीती सारखीच असते.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना 7 ऑक्टोबरपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागला होता. आणि आता गाझावरच्या हल्ल्यामुळेही निषेधाचा सामना करावा लागतो आहे. इस्रायलची रणनीती गाझामध्ये अयशस्वी ठरली आहे. उदाहरणार्थ इस्रायलने विजयाचा दावा केलेल्या उत्तर गाझामध्ये इस्रायली सैन्याने स्थलांतर केल्यानंतर हमासने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे आता इस्रायलला इथे पुन्हा हल्ले करावे लागत आहेत. हे गनिमी युद्धातील ‘सिसिफस तत्त्व’ म्हणून ओळखले जाते.
या पार्श्वभूमीवर नेतन्याहू यांना लेबनॉनजवळच्या उत्तरेकडील सीमांकडे लक्ष द्यावे लागले आहे. असे केल्याने आपला वर्चस्व गाजवण्याचा पावित्रा पुन्हा सिद्ध होईल, असे त्यांना वाटते आहे. हिजबुल्लाह आणि इस्रायलमधील हल्ले हळूहळू वाढत असताना 35 हजारहून अधिक इस्रायली नागरिकांना सुरक्षिततेसाठी स्थलांतर करावे लागले आहे. अशा हल्ल्यांमुळे इस्रायलला शत्रूंच्या नजरेत आपली लष्करी प्रतिमा ठसवण्यासाठी मदत होऊ शकते.
संभाव्य धोके
सध्याच्या परिस्थितीत तीन शक्यतांचा विचार केला जाऊ शकतो. विस्तारित युद्धाच्या प्रादेशिक आणि आर्थिक परिणामांमुळे अमेरिका आणि त्याचे मित्र देश या दोघांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुत्सद्देगिरीने पावले टाकली तर हा तणाव कमी होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांसाठीही ही परिस्थिती फायदेशीर असेल. कारण अशा युद्धामुळे लेबनॉन आणि इस्रायलची मोठी हानी होणार आहे. जोपर्यंत इस्रायल गाझामध्ये युद्धविराम लागू करत नाही तोपर्यंत कोणतीही शांतता चर्चा स्वीकारणार नाही, असा दावा हिजबुल्लाहने केला आहे. त्याचबरोबर हमासला पराभूत केल्याशिवाय नेतन्याहू आणि त्यांचे मंत्रिमंडळ आपली विश्वासार्हता मिळवू शकणार नाहीत, अशीही परिस्थिती आहे.
दुसऱ्या परिस्थितीमध्ये दक्षिण लेबनॉन प्रदेशात असलेल्या इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात मर्यादित घुसखोरी दिसू शकते. या परिस्थितीत दोन पक्ष त्यांच्या स्वत:च्या लोकांना दाखवून देण्यासाठी काही प्रकारच्या लढाईत गुंतू शकतात. आपण समर्थ आहोत पण विनाश टाळायचा असेल तर थांबावे लागेल, असा संदेश ते देऊ शकतात. या संघर्षाचा वेग मर्यादित ठेवून दोन्ही पक्षाच्या नागरिकांवर हल्ला न करता विरोधकांच्या लष्करी केंद्रांवर हवाई हल्ले करण्याची ही रणनीती असेल. हे अत्यंत जोखमीचे असले तरी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील नागरी केंद्रांवर आघात होऊ शकतो. त्यामुळे दबाव आणि तणाव वाढू शकतो आणि मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकते.
दुसऱ्या परिस्थितीत दक्षिण लेबनॉन प्रदेशात असलेल्या इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात मर्यादित घुसखोरी दिसू शकते. या परिस्थितीत दोन पक्ष त्यांच्या स्वत:च्या लोकांना दाखवून देण्यासाठी काही प्रकारच्या लढाईत गुंतू शकतात. आपण समर्थ आहोत पण विनाश टाळायचा असेल तर थांबावे लागेल, असा संदेश ते देऊ शकतात.
तिसरी आणि सर्वात त्रासदायक परिस्थिती ही मोठे युद्ध हीच असेल. यामध्ये केवळ हे दोन पक्षच नाही तर येमेनमधील हौथी आणि इराकमधील शिया यासारखे हिज्बुल्लाचे प्रादेशिक सहकारीदेखील सामील होतील. हौथींमुळे लेबनॉन आणि इस्रायलमधील विनाश होण्याची भीती आहे. त्याचबरोबर या अतिरेक्यांनी जागतिक सागरी मार्गांना लक्ष्य केले आहे. ही परिस्थिती कदाचित अमेरिका आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांसाठी चिंतेची असेल. त्यामुळे हा तणाव कमी करण्यासाठी हे देश मुत्सद्देगिरी सुरू ठेवतील.
निष्कर्ष: सतत वाढणारे युद्ध
इस्रायल-पॅलेस्टिनी युद्ध आणि त्याचे परिणाम आता हिजबुल्लाह आणि लेबनॉनकडे वळू लागले आहेत. हे युद्ध जगाच्या विस्तृत क्षेत्रांना वेढण्याचा धोका आहे. या संघर्षामुळे सततचा तणाव, मर्यादित किंवा मोठी युद्धे सुरूच आहेत. इस्रायलला हमासचे सर्वोच्च नेतृत्व काढून घ्यायचे आहे. या मुद्द्याशिवाय युद्धविरामाच्या वाटाघाटी करणे हे केवळ कमकुवतपणाचे लक्षण म्हणून पाहिले जाईल. अशी परिस्थिती नेतन्याहू यांना नको आहे. त्यामुळे कमीतकमी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या विरोधात तरी एकत्र यावे, असा इस्रायलचा होरा आहे.
या घटनेचे परिणाम काहीही असले तरी पॅलेस्टाईनमधील संघर्ष संपताना दिसत नाही. हिंसाचाराचे, तणावाचे चक्र सुरूच आहे. या प्रत्येक चक्रासह मृतांची संख्या वाढते आहे. आर्थिक आणि भौतिक नुकसानही वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील दुसरे युद्ध मध्यपूर्वेला अजिबातच परवडणारे नाही.
मोहम्मद सिनान सियेच हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अनिवासी असोसिएट फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.