Author : Kashish Parpiani

Published on Mar 13, 2020 Commentaries 0 Hours ago

दोन्ही देशांचे नेतृत्वांमधील व्यक्तिगत केमिस्ट्री कशी आहे, यावर आताभारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधअवलंबून राहतील, हेच सूचित करणारी ट्रम्प-मोदी भेट होती.

ट्रम्पभेटीने भारताला काय मिळाले?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौराभारतामध्येचांगलाच गाजला. आपल्या ३६ तासांच्या भारत भेटीदरम्यान त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली, अहमदाबाद इथल्या मोटेरा स्टेडियमवर झालेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक मेलानिया यांच्यासोबत त्यांनी आग्रा इथल्या ताजमहालालाही भेट दिली. यासोबतच त्यांनी राष्ट्रपती भवन आणि राजधानी दिल्लीतल्या हैदराबाद हाउस येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चांमध्ये सुद्धा सहभाग घेतला.

भारत आणि अमेरिकेत दरम्यान व्यापाराच्या आघाडीवर तणाव असला, तरीदेखील या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये मर्यादित स्वरूपाचे व्यापारी करार होतील, असे यापूर्वीच ठरले होते. मात्र या दौऱ्याआधीच दोन्ही देश एकमेकांवर आपल्या उद्दिष्टापासून लांब जात असल्याचे आरोप करू लागले आणि दोघांदरम्यानच्या वाटाघाटी फिस्कटू लागल्या. अगदी अखेरच्या क्षणी तर भारताने ‘पेकन नट्स’ सारख्या सुक्या मेव्याच्या उत्पादनांची आयात करावी असा आग्रह अमेरिकेने धरला होता. त्यामुळेच मग मोदी सरकारने ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रमच या दौऱ्यातला सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे दाखवायला सुरुवात केली.

माध्यमांनी सुद्धा या कार्यक्रमाशी संबंधित प्रत्येक टप्प्यावरची माहिती दिली आणि दाखवली. त्यामुळे एका अर्थाने हा कार्यक्रम अधिक ठळकपणे उठूननही दिसला, किंवा तो अधिक प्रासंगिक असल्यासारखाही वाटला. मात्र तरीसुद्धा एका दृष्टिकोनातून पाहिले तर माध्यमांची ही वृत्ती आणि हा प्रकार उचित वाटण्यासारखा नव्हता.

सत्ताधाऱ्यांची सत्ताधाऱ्यांसाठीची दुहेरी भूमिका

खरे तर गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेकडून भारताला मिळणारे द्विपक्षीय सहकार्य कमी होत चालल्याचे दिसत असल्याने भारताची चिंता वाढली आहे. खरेतर असे घडण्यामागचे मोठे कारण हेच आहे की, कधीकाळी द्विपक्षीय धोरणांच्या बाबत ठोस दृष्टिकोन बाळगणाऱ्या अमेरिकेतही, आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांशी निगडीत अनेक पैलूंवर ध्रुवीकरणाचा प्रभाव असल्याचे दिसू लागले आहे. अर्थात जर भारताच्या अनुषंगाने विचार केला, तर दोन्ही देशांमध्ये असलेल्या दरीचे आणखी एक स्वरुपही दिसते, ते म्हणजे दोन्ही देशांनी ‘हाऊडी मोदी’ या रॅलीबाबत दाखवलेला उत्साह आणि त्याच वेळी डेमोक्रेट्स कश्मीरमधल्या विविध स्वरूपातल्या संवादबंदीविरोधात सातत्याने व्यक्त करत असलेली चिंता. त्याच अनुषंगाने पाहिले तर ट्रम्प यांच्या आत्ताच्या भारत भेटीतही ट्रम्प प्रशासन भारतासोबत दुहेरी भूमिकेतून वागत असल्याचेच दिसून आले.

उदाहरण घ्यायचे झाले तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सप्टेंबर २०१९ मधल्या आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख “भारताचे राष्ट्रपिता” असा करत, ज्या पद्धतीने स्तुती केली होती, तशाच प्रकारचे भाषण ट्रम्प यांनी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमादरम्यान केले. या कार्यक्रमात आपल्या भाषणाची सुरुवात करताना ट्रम्प “यांनी मोदी हे महान नेते आणि भारताचे सर्वात यशस्वी नेते आहेत, मोदी म्हणजे आपल्या देशासाठी दिवस-रात्र काम करणारे व्यक्तिमत्व आहे, आणि अशा व्यक्तिला स्वतःचा सच्चा मित्र म्हणवून घेताना मला खूप अभिमान वाटतो” अशी स्तुतीपर वक्तव्य केली होती.

ट्रम्प इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या भाषणात अशा काही गोष्टींचा उल्लेख केला की, ज्या गोष्टी सामान्यतः भाजपाच्या सभांमध्ये बोलल्या जातात. त्या म्हणजे “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे, ३२ कोटींपेक्षा अधिक भारतीय इंटरनेटने जोडले गेले आहेत, रस्तेबांधणीचा वेग दुप्पट झाला आहे.” इतकेच नाही तर ट्रम्प यांनी भारतातल्या किती कुटुंबांना स्वयंपाकाचे इंधन आणि स्वच्छतेविषयक मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या आहेत याची संख्याही सांगितली. महत्त्वाची बाब म्हणजे यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतातल्या विवादित नागरिकत्व कायद्याविषयी “मला याबाबत काहीही बोलायचे नसून हा भारताचा प्रश्न आहे,” असे म्हणत बोलणेही टाळले.

सत्तारूढ पक्षाच्या बाजूने झुकलेला हा सत्तेचा खेळ ‘नमस्ते’ कार्यक्रमापलिकडेही ठळकपणे दिसून आला. लक्षात घेण्यासारखी बाब अशीकी, ट्रम्प यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. कारण ट्रम्प यांनी भारताच्या भेटीवर आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष किंवा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी, भारतातल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकण्याची आजवरची परंपराही मोडली. परिणामी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात झालेल्या मेजवानीच्या कार्यक्रमाचेआमंत्रणही स्वीकारले नाही.

त्यानंतर आग्रा इथे ट्रम्प यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चाही केली. मात्र अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक मेलानिया ट्रम्प यांनी, दिल्ली सरकारच्या शासकीय शाळेत जाऊन, तिथल्या आनंददायी शिक्षणाच्या वर्ग शिक्षणाचा आढावा घेतला, तरीसुद्धा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मात्र दूर ठेवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सत्ता काळातच इथल्या शाळांच्या अभ्यासक्रमात आनंददायी शिक्षणाच्या तासिकेचा समावेश करण्यात आला होता.

धोरणात्मक पातळीवर अल्पसा लाभ

या भेटीदरम्यान झालेल्या अगदी मर्यादित स्वरूपाच्या व्यापारी कराराच्या बदल्यात, अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा प्राधान्यक्रमावरच्या देशाचा दर्जा पुन्हा बहाल करावा, अशी भारताची अपेक्षा होती.

या सगळ्या घडामोडींचे पुनरावलोकन केले तर लक्षात येणाऱ्या गोष्टी म्हणजे, अमेरिकेने दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण अवलंबल्यानंतर दोन्ही देशांमधला व्यापार विषयक तणाव वाढू लागला होता. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या पोलाद आणि अल्युमिनियमवर कर आकारायला सुरुवात केली होती.  २०१९ च्या मध्यात अमेरिकेने भारताचा प्राधान्यक्रमावरचा देश असा दर्जा काढून घेतला. याआधी भारताकडे हा दर्जा होता त्यामुळेच  २०१७ मध्ये भारत अमेरिकेत  ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर्सची करमुक्त निर्यात करू शकला होता.

मात्र ट्रम्प यांच्या या  दौऱ्याआधीचअमेरिकेने असा दर्जा मिळवण्याचा भारताचा हक्कच काढून घेतला होता. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची घोषणा केल्यानंतर काहीच दिवसांनी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने एक महत्त्वाची अधिसूचना प्रसिद्ध केली. या यादीतून विकसनशील देशांच्या यादीतून भारतासारख्या देशांचे नाव वगळले जात असल्याचे म्हटले होतं. या यादीत समावेश असलेल्या देशांच्या निर्यात धोरणात अनियंत्रितपणे अनुदानावर भर दिलेला असला, तरी त्यामुळे अमेरिकेतल्या उद्योग क्षेत्रावर काही प्रभावाबाबत विचार न करण्याची सूट अमेरिकेकडून दिली जाते. आता अमेरिकेने अशा देशांच्या यादीतून भारताचे नाव वगळले असल्याने भारत आपोआपच विकसित देशांच्या वर्गवारीत आला आहे. त्यामुळे आता या केवळ या यादीत अनुसुचित असलेल्या देशांना ते केवळ विकसित देश असल्यामुळे विविध करारांमध्ये प्राधान्य दिले जाणारे लाभ आता भारताला यापुढे मिळणार नाहीत.

एका बाजूला दौर्‍यात केवळ मर्यादित स्वरूपाचे व्यापारी करार होण्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या या भेटीचा लाभही केवळ प्रलंबित व्यापारी करण्यापुरताच मर्यादित राहणार होता. त्या अनुषंगाने या भेटीत दोन्ही देशांनी तीन अब्ज अमेरिकी डॉलरच्या एका संरक्षणविषयक कराराला अंतिम स्वरूप दिले. करारांतर्गत भारत कडून TMH-60R Seahawk हे बहुआयामी  २ ४ सागरी हेलिकॉप्टर तसेच AH-6 4E हीसहा अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. मात्र महत्त्वाची बाब अशी की या आधीच एकात्मिक हवाई संरक्षण शास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठीच्या १.८६७ अब्ज अमेरिकी डॉलरच्या कराराला अंतिम स्वरूप देण्याबाबत भारताकडून काहीच सांगण्यात आले नाही. खरेतर तर यामुळे भारत रशियाकडून S-400 ही क्षेपणास्त्र व्यवस्था खरेदी करेल याबाबत अमेरिकेचीच धास्ती वाढली असावी.

दरम्यान भारत आणि अमेरिकेत यावेळी भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अमेरिकेचे आरोग्य आणि मानवी सेवा मंत्रालय यांच्यात मानसिक आरोग्य क्षेत्राशी संबंधित तसेच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन यांच्यात वैद्यकीय उत्पादनांच्या सुरक्षितेविषयक सामंजस्य करार करण्यात आला, तसेच इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड, एक्झोन मोबिल इंडिया एलएनजी लिमिटेड आणि चार्ट इंडस्ट्रीज यांच्यात द्रवरुप नैसर्गिक वायू पुरठ्याबाबत सहकार्याच्या पत्रावरही स्वाक्षऱ्या झाल्या. दोन्ही देशांनी स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीत स्वतंत्रपणे संस्थात्मक पातळीवर विचार करण्याचे मान्य करत, अशा काही अव्यक्त मुद्द्यांच्या बाबतीतल्या सहकार्याबद्दलही काहीएक स्वरूप निश्चित करण्याचाही प्रयत्न केला. खरे तर भारत अमेरिकेच्या द्विपक्षीय संबंधांचा विचार करता ट्रम्प ज्या पद्धतीने अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हाताळत आहेत हे लक्षात घेतले तर ही बाब अगदी निर्विवादपणे अपवादात्मक असल्याचेच म्हणावे लागेल.

भारत-अमेरिका या दोन्ही देशांनी अगदी परिपक्वतेने दाखवलेल्या या सामंजस्यानंतरही ट्रम्प यांच्या भारतभेटीत दुर्दैवी म्हणावेत, असे काही संकेतही मिळाले आहेत. ज्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना आजपर्यंत हळूहळू जे संस्थात्मक रूप मिळाले आहे, त्या संपूर्ण प्रक्रियेचाच वैयक्तिक संबंधाकडे होणारा उलटा प्रवास सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ट्रम्प आणि केमेस्ट्री

ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी, केंद्र सरकारमधल्या एका अज्ञात उच्च-स्तरीय स्रोताने या भेटीविषयी केलेले भाकित रंजक आणि लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांनी असे म्हटले होते की, “ या भेटीकडे आकडेमोड, व्यापार किंवा संरक्षणाच्या दृष्टीकोनातून न पाहता, तुम्ही दोघांमध्ये असलेल्या केमीस्ट्रीविषयी (एकमेकांचे सूर जुळण्याविषयी) बोला,आता ही केमेस्ट्री आणखी वाढेल (या दोघांचे सूर आणखीनच जुळतील). थोडक्यात दोन्ही देशांच्या या प्रमुख नेत्यांचे एकमेकांशी सूर जुळणे आणि त्यांच्या विचारसरणीतली एकवाक्यता वाढणे हेच या दौऱ्याचे फलित असेल असे त्यांचे म्हणणे होते.

ही केमिस्ट्री म्हणजे दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचाच एक पैलू आहे. आणि त्यात न मोजता येण्यासारखी होत असलेली वाढ बाजूला ठेवली तर, दोन्ही देशांमधल्या व्यापाराविषयीच्या पेचप्रसंगाबाबत विचार करता, तू सुटावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली ही केमिस्ट्रीच महत्त्वाची ठरू शकते. हे दोन्ही नेते अहमदाबाद येथे जनसमुदायाला एकत्रितपणे संबोधित करत होते तेव्हा ट्रम्प यांनी आपल्या भाषणातून हे दोन्ही नेते आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने केवळ चांगलेच नाही तर अगदी उत्तम ठरतील असे निर्णय घेण्याच्या दृष्टीने हे एकत्रितपणे काम करत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यांमधून नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा आशावाद झळकत होता. ( आपल्या भाषणात अशा प्रकारचे वक्तव्य करताना ट्रम्प यांनी मी आणि भारताचे पंतप्रधान, असा केलेला उल्लेख समजून घ्यायला हवा). इतकेच नाही तर त्यांनी अगदी गमतीने असेही म्हटले की, नरेंद्र मोदी यांच्यासोबत वाटाघाटी करणे ही सहज सोपी वाटणारी गोष्ट नाही.

दोन्ही देशांच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तींचे परस्परांसोबत किती सूर जुळतात किंवा त्या दोघांमधली केमिस्ट्री कशी आहे, यावरून या दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध कसे आहेत, हे समजून घेणे किंवा त्या विषयीचा अंदाज बांधणे हा आजवर रुळलेला एक प्रकारचा पारंपरिक दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन बदलतो आहे किंवा तो बदलण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असेच गेल्या दोनेक वर्षांत मधल्या घडामोडी पाहिल्या तर लक्षात येऊ शकते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर भारताच्या अणू कार्यक्रमाला अमेरिकेचा असलेला विरोध हादेखील दोन्ही देशांमधला एक असाच वादाचा मुद्दा होता आणि आहे. मात्र आता हळूहळू भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संबंधांना एक बहुआयामी किंवा बहु विशिष्ट असलेले स्वरूप येऊ लागले आहे. आता मात्र या दोन्ही देशांच्या भागीदारी किंवा मैत्रीत कोणत्याही प्रकारच्या सर्वंकष व्यापारी कराराची किंवा सर्वसाधारण सुरक्षाविषयक कराराची जोड नाही. तरीसुद्धा त्यातून, या दोन्ही देशांमध्ये राजकीय, नोकरशाही किंवा राजनैतिक तसेच लष्करी नेतृत्व यांसारख्या बहुविध पातळीवर दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ असतील, अशा प्रकारची काहीएक ग्वाहीच आत्ताच्या परिस्थितीतून सूचित होते.

अलिकडच्या काही घडामोडी नीट पाहिल्या तर वर नमूद केलेली बाब स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे दिसतात. ती काहीशी बिगर संस्थात्मक स्वरूपाची आहेत. भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित प्रमुखांची सल्लामसलतीसाठी होत असलेली भेट, भारताचे पेट्रोलियम मंत्री आणि अमेरिकेचे ऊर्जामंत्री यांच्यासोबत काम करत असलेला दोन्ही देशांचा धोरणात्मक ऊर्जा भागीदारी कार्यकारी गट, तसेच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये सुरू झालेलीहॉटलाइनहे याच बिगर संस्थात्मक साखळीतले काही महत्त्वाचे घटक आहेत.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे दोन्ही देशांमधल्या व्यापार विषयक वाटाघाटींना खीळ बसल्यासारखी स्थिती असताना, डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातल्या केमिस्ट्री ला केंद्रस्थानी ठेवून ट्रम्प यांच्या या भारत भेटीकडे पाहिले, तर असे दिसते की या दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनी पुन्हा एकदा त्या जुन्या काळाच्या दिशेने उलटा प्रवास सुरु केला आहे, की जेव्हा दोन देशांमधले संबंध कसे असावेत यासाठी अगदी वरच्या पातळीवरच्या व्यक्तींच्या हस्तक्षेपाची गरज भासत होती, किंवा दोन व्यक्तींच्या संबंधांवर त्या दोन देशांचे संबंध कसे असतील हे अवलंबून होते.

त्यामुळेच ट्रम्प यांच्या या भेटीतून धोरणात्मक पातळीवर काहीएक लाभ झाला असला तरीसुद्धा, ही भेट म्हणजे या दोन्ही देशांमध्ये घट्ट भागीदारी आहे. दोन्ही देशांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये व्यक्तिगत केमिस्ट्री कशी आहे किंवा त्यांचे व्यक्तिगत पातळीवर किती सुरू होतात यावरच द्विपक्षीय संबंध कसे असतील, हे अवलंबून राहील, हेच सूचित करणारी ही भेट होती असेच म्हणावे लागेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.