Author : Kabir Taneja

Published on May 07, 2019 Commentaries 0 Hours ago

आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी जिवंत असण्याच्या बातमीचे जागतिक राजकारण आणि दहशतवाद या संदर्भातले महत्त्व विशद करणारा लेख.

बकर अल-बगदादी अज्ञातवासातून बाहेर?

तथाकथित इस्लामिक राज्याच्या अखत्यारीतील  बगहौजचा पाडाव झाल्यामुळे जागतिक पातळीवरील मोस्ट वांटेड गुन्हेगार अबू बक्रअल-बगदादीला व्हिडीओच्या माध्यमातून का असेना पण, पाच वर्षांच्या अज्ञातवासातून बाहेर यावे लागले.

सीरियाच्या डायर एझर या वाळवंटी प्रदेशातील बगहौज हे एक छोटेसे गाव. पण तथाकथित इस्लामिक राज्याच्या अखत्यारीतील या छोट्याश्या गावाच्या पाडावामुळे, जागतिक पातळीवरील मोस्ट वाँटेड गुन्हेगाराला व्हिडीओ संदेश देण्याच्या बहाण्याने आपले अस्तित्व उघड करण्यास भाग पाडले. गेल्या चार वर्षात, पाश्चिमात्य राष्ट्रे आणि रशियाकडूनही, आयसिसप्रमुख अबू बक्र अल-बगदादी, दहशतवाद विरोधी कारवाईत किंवा हवाई-हल्ल्यामध्ये मारला गेल्याची माहिती  गुप्तचर विभागाने दिल्याचे अनेक  अहवाल प्रसिद्ध करण्यात आले.

अल फर्कन, या हाय प्रोफाईल प्रसार-साहित्य प्रसारित करण्याची जबाबदारी असलेल्या आयसिसच्या प्रसिद्धी विभागाने २९ एप्रिल रोजी अबू बक्र अल-बगदादीचा एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. ज्यामध्ये अल बगदादी पांढऱ्याशुभ्र भिंती असणार्या एका खोलीत बसला आहे, त्याच्यासमोर तीन बुरखाधारी व्यक्ती बसल्या असून, तो त्यांना काही माहिती देत आहे.

इमारतीची रचना अशी आहे की, तिथे पडझडीच्या कुठल्याही खुणा दिसत नाहीत. मोसुल बगदादी या इराकी शहरातील, अल नुरी मशिदीजवळ उभे राहून खिलाफतची स्थापना झाल्याचे घोषित करणारा त्याचा यापूर्वीचा व्हिडीओ त्याने २०१४ मध्ये प्रसिद्ध केला होता. यापूर्वी सार्वजनिक करण्यात आलेला हा त्याचा शेवटचा व्हिडीओ होता.

बगदादीला हा व्हिडीओ आत्ताच का प्रसारित करावासा वाटला याचा संबध मागच्या दोन आठवड्यात घडलेल्या घटनांशी लावता येईल. पहिली आणि सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे, सिरियातील आयसिसच्या ताब्यात असणाऱ्या बगहौज या शहराचा पाडाव झाला ज्यामुळे इस्लामिक स्टेटची भौगोलिक सत्तादेखील संपुष्टात आली. आयसीसचे अनेक लढाऊ सैनिक वाळवंटात पळून गेले आणि इतर अनेकांनी शरणागती पत्करली आणि काही जणांना पकडून कुर्दिश बंदिवासात डांबण्यात आले आहे.

कुर्द लोकांसाठी आणि आयसिसऐवजी त्यांना पाठिंबा देणाऱ्या पश्चिम आघाडीसाठी ही घटना फारच त्रासदायक ठरली. आयसिसला आपले नुकसान झाल्याचे मान्य असले तरी, एकसंघ असणाऱ्या, एकाच राजकीय पक्षाला सु-स्पष्ट सत्ता मिळालेली नसून, एकत्र आलेल्या घटक पक्षाच्या आघाडीने हे सरकार स्थापन केले असल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. बगहौजचा पाडाव झाल्यानंतर आयसीसच्या अनेक  लढाऊ सैनिकांची मुलाखत घेण्यात आली, ज्यात स्त्रियांचादेखील समावेश होता, ज्यामध्ये त्यांनी खिलाफतीला पाठिंबा का दिला आणि त्यांच्या लढण्यामागे नेमके काय कारण होते, ते देखील स्पष्ट केले.

बगहौजचा पाडाव झाल्याने सिरियातील इस्लामिक स्टेटची भौगोलिक सत्ता संपुष्टात आली.

दरम्यान यावर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयसिसचा पराभव झाल्याची एकतर्फी घोषणा केल्यानंतर आणि या मोहिमेतून सैन्याच्या महत्त्वाच्या तुकडीला माघारी बोलावल्यानंतर आयसिसविरोधी मोहिमेत फूटदेखील पडली होती.

दरम्यान अमेरिकेचे लष्कर आणि आयसीसविरोधी आघाडीचे प्रमुख, ब्रेट मॅकगर्क यांनी,  सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयामध्ये सहभागी करून न घेतल्याच्या कारणावरून, राजीनामा दिला त्यामुळे आघाडीच्या घटकांमध्येच अंतर्गत बंडाळी माजली.  परंतु, यात सर्वात मोठी फसवणूक झाली ती. कुर्दिश जनरल माझलोम कोबानी अब्दी यांची. त्यांनी आयसिसविरोधी लढ्यात आपल्या हजारो नागरिकांचा बळी दिला. जगाच्या भल्यासाठी त्यांनी केलेला हा मोठा त्याग आहे असेच म्हणावे लागेल. परंतु, याबदल्यात त्यांना आहे तिथेच राहण्याचे बक्षीस मिळाले असून, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर येऊन पडली आहे. कुर्द लोकांनी कैद केलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे, ज्या-त्या देशांनी आयसिसमध्ये सामील होण्यासाठी बाहेर पडलेल्या आपल्या नागरिकांना परत आपल्या देशात न्यावे, अन्यथा या कट्टर-लढाऊ इस्लामवाद्यांना मुक्त करण्याव्यतिरिक्त पर्याय नाही, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, गेल्या आठवड्यात इस्टरच्यादिवसी श्रीलंकेमध्ये झालेला हल्ला, ज्यामध्ये २५० लोक मारले गेले. या हल्ल्याकडे आयसिसच्या व्याप्तीचा मापदंड म्हणून पहिले जाते. याच्या आधारे आयसीस संपल्याची चर्चा करणार्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. खिलाफतीच्या अपयशामुळे सिरीयामधील आणि सिरीया बाहेरील प्रदेश आणि ज्या ज्या ठिकाणी या संघटनेला पाठिंबा दिला होता त्या त्या देशातील  आयसीसच्या दहशतवाद्यांचे नैतिक खच्चीकरण झाले असेल. श्रीलंकेमधील हल्ला आणि त्याचसोबतच बगदादीचा व्हिडीओ ज्यात तो बराच सदृढ दिसत असून आदेश देत आहे, त्यामुळे या संघटनेच्या जगभरातील समर्थकांना मात्र, नैतिक प्रेरणा मिळाली असेल.

१८ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये बगदादी २०१४ मध्ये दिसत होता त्यापेक्षा थोडा वयस्क आणि थकलेला  दिसतो आहे. श्रीलंकेपासून सुदान आणि अल्जेरिया, ज्याला काही जण अरब स्प्रिंग २.० असेही संबोधतात, येथील सत्तेचा पाडाव, अशा काही नुकत्याच घडलेल्या घटनासंबंधी त्याने काही मते मांडली आहेत.

२०११ नंतरच्या अरब स्प्रिंग आंदोलनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत आयसीसने आपले स्थान पक्के केले या चष्म्यातून या घडामोडींकडे पाहणे गरजेचे आहे. सिरीयातील यादवी युध्द आणि इराकमधील बेबनाव यांना ही संघटना जबाबदार नसली, तरीही या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा त्यांनी पूर्ण फायदा उचलला. व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या माध्यमाद्वारे केला जाणारा आयसीसचा प्रसार आणि त्यासाठी आयसीसचे काम करणारे लोक यांचीदेखील दखल खलीफाने घेतलेली दिसते.

ऑस्ट्रेलियन “प्रसारमाध्यमांचा सरदार” अब्द अल-ल्लाह अल-औस्ट्राली आणि मारले गेलेले फ्रेंच बंधू फॅबियन आणि जीन-मिशेल क्लेन यांचे त्याने कौतुक केले आहे. आयसीसने संघटनेचा ऑनलाईन प्रसार करणाऱ्या व्यक्तीस प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकाइतकेच संघटनेच्या श्रेणीबद्ध व्यवस्थेत समान स्थान आणि तितकाच संस्थात्मक आदर देण्याचे आपले धोरण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवले आहे. यामुळे ऑनलाईन विचारवंतांची एक मजबूत फळी निर्माण करण्यात संघटनेला यश आले आहे, जे सातत्याने आयसीसचा प्रसार करणारे व्हिडीओज, इमेजेस, पोस्टर्स, मेमेज, ऑडीओ आणि इतर गोष्टी प्रसारित करत असतात. या व्हीडीओमध्ये बगदादीने माली, बुर्कीना फासो आणि अफगाणिस्थान सोबत श्रीलंका येथील इस्टर संडेला दहशतवादी हल्ला करणाऱ्या आयसीसच्या समर्थकांच्या, प्रतिज्ञा मान्य केल्या आहेत.

आयसीसच्या विचारधारेबद्दल आणि त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल या व्हिडीओमध्ये फारशी माहिती देण्यात आलेली नाही पण, अजूनही बगदादी हाच आयसीसचा सर्वोच्च नेता असल्याचे मात्र या व्हिडीओतून स्पष्ट दिसते. हा व्हिडीओ गेल्या आठ दिवसातच चित्रित करण्यात आला आहे, हे देखील स्पष्ट होते कारण यामध्ये अलीकडे ज्या काही घटना घडल्या, ज्यांच्याशी संघटनेचा संबध होता, त्या सर्व घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या व्हिडीओमुळे अल बगदादी जिवंत असल्याचा अस्सल पुरावा मिळतो, ज्यामुळे माजी अफगाण तालिबान प्रमुख मुल्लाह ओमरच्या मृत्युच्या बातमीप्रमाणे, ही केवळ एक कल्पना राहत नाही किंवा त्यासंबधी चुकीची माहिती देखील प्रसारित होण्याची शक्यता नाही. ओमर २०१३ साली मारला गेला असला तरी, त्याच्या मृत्यूची खात्री २०१५ मध्ये झाली.

जगभरात असे हल्ले करणाऱ्या आपल्या समर्थकांना आश्रय देणारी आणि असे हल्ले यशस्वीरीत्या घडवून आणणाऱ्यांना ओळख देणारी ही संघटना, नजीकच्या भविष्यात, श्रीलंकेमध्ये जसे हल्ले झाले तशाच प्रकारच्या हल्ल्यांचे नियोजन करत राहील. याबाबतीत अंतर्गत राजकीय-सहकार्य जिथे पूर्णतः अस्तित्वात नाही किंवा मूलभूत अवस्थेत आहेत, अशा दक्षिण आशियामध्ये, अशा प्रकारच्या स्वयंप्रेरित दहशतवादी पद्धतीने सुरक्षा आणि गुप्तचर खात्यांपुढे नवे आव्हान उभे केले आहे. सध्याच्या काळात निर्माण झालेला हा धोका काही वेगळा नाही, तो एक ब्रँड आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात जगामध्ये आणि मोठ्या-प्रमाणात याचे समर्थन करणारे लोक कोण आहेत यावर आपल्याप्रमाणेच आयसीसचीदेखील नजर आहे आणि हेच आपल्यापुढील एक मोठे आव्हान आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.