पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत परंपरेचा विचार करता, संगीताचा इतिहास १९५२ पर्यंत मागे जातो. याच वर्षातील ऑगस्ट महिन्याच्या एका उबदार, पण पावसाळी संध्याकाळी न्यूयॉर्क येथील वूडस्टॉकमध्ये एका पियानो वादकाने जॉन केज या संगीतकाराची ४’३३ (नीरव शांततेची चार मिनिटे आणि ३३ सेकंद – कुठल्याही कृत्रिम संगीताचा वापर न करता केलेली रचना) ही रचना प्रथम सादर केली. केजची ही रचना म्हणजे मध्ययुगीन मठ आणि आधुनिक न्यायालयांमध्ये सुरू झालेल्या, जर्मनीतील चर्च व इटालीच्या ऑपेरा हाऊसमध्ये वोराक, माहलेर व शोताकोविच या संगीतकारांच्या काळात भरभराटीस आलेल्या सांस्कृतिक क्रांतीचा नैसर्गिक आविष्कार होता, असे म्हणावे लागेल.
केजच्या ४’३३ या रचनेवरून प्रचंड मोठा गदारोळ झाला. मात्र, म्हणून संगीत संपले नाही. त्यानंतर दोन वर्षांच्या आतच, जुलै १९५४ मध्ये बिल हॅली व त्याच्या सहकाऱ्यांच्या रॉक अँड रोल जातकुळीतील ‘रॉक अराउंड द क्लॉक’ने पहिले प्रचंड मोठे व्यावसायिक यश मिळवले. पुढच्या सात दशकांत लोकप्रिय संगीताची लाट आली. त्यात अनेक बदल झाले आणि पुढे हे संगीत जगभर गेले. त्यात बेबॉप, लोकसंगीत, बोसा नोवा, ब्लूज रॉक, आत्मा, देश, ग्लॅम, रेगे, प्रोग रॉक, डिस्को, पंक, मेटल, न्यू वेव्ह, ग्रंज, हिप-हॉप, रेगेटन, ईडीएम, के-पॉप, मम्बल रॅप अशा संगीतप्रकारांचा समावेश आहे. शास्त्रीय संगीत अजूनही लोकप्रिय आहे, पण या संगीत प्रकारातील नवे संशोधन हे एक विशिष्ट वर्ग, अनुदानित उपयोजित कला केंद्र आणि क्वचित फिल्मी संगीत लिपीपुरते मर्यादित राहिले.
उदारमतवाद ही संकल्पना देखील आज अशाच एका टप्प्यावर आहे. सामाजिक संपर्क, जागतिकीकरण, लोकसंख्येचे बदलते स्वरूप आणि तंत्रज्ञानामुळे उदारमतवादाच्या काही मर्यादा समोर आल्या आहेत. मात्र, आता उदारमतवाद पूर्व भूतकाळाची पुनरावृत्ती होईल, अशी शक्यता नाही. उलट वैविध्यपूर्ण, प्रयोगशील, अराजकीय आणि बंडखोर राजकीय परंपरांचा उद्रेक होऊ शकतो.
ज्याप्रमाणे बॉब डिलन, बीटल्स किंवा बॉब मार्ले हे बाक किंवा ब्रागशी झगडताना दिसायचे, त्याचप्रमाणे भविष्यातील उदारवादावर सध्याच्या अभ्यासकांना कदाचित विश्वासही बसणार नाही. इतकी ही संकल्पना बदललेली आणि अपरिचित वाटेल. आणि तरीही, ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचे कार्य आणि प्रकार लोकप्रिय संगीतातील कोणत्याही समकालीन कलाकारासाठी (बीथोव्हेनशिवाय बीयॉन्सी असू शकत नाही, चोकोव्स्कीशिवाय ‘द रॅपर’ची कल्पना करता येत नाही) पायाभूत व परिचयाचे असतात, त्याचप्रमाणे उदारमतवाद हा भविष्यातील सर्व भावी राजकीय विचारधारांचा आधार असू शकतो. थोडक्यात काय तर, सध्याचे जग उदारवादाने व्यापले आहे. या संकल्पनेचा प्रभाव इतका जास्त आहे की, त्यापासून सुटका करून घेणे जवळपास अशक्य आहे.
कायद्याचे राज्य आणि उत्तदायित्वाची सांगड घालून राज्यकारभार करणाऱ्या उदारमतवादी लोकशाहीच्या विरोधात जगभर एक असमाधानाची लाट असल्याची खंत फ्रान्सिस फुकुयामा यांनी आपल्या ‘उदारवाद आणि असमाधान’ या निबंधात व्यक्त केली आहे. सहिष्णुता, समान हक्क आणि व्यक्तिगत निवडीच्या अधिकाराची जपणूक करण्याची हमी देणारा उदारवाद आपल्याला वैश्विकतेकडे नेतो, असे फुकुयामा म्हणतात. उदारवादाला सध्या हुकुमशाही राजवटी, आर्थिक ताकदीच्या जोरावर बोकाळलेला नवउदारवाद आणि निष्ठुर व्यक्तिवादामुळे तयार झालेल्या सांस्कृतिक पोकळपणामुळे धोका असल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
उदारवादाचे हे विश्लेषण व त्यासमोरची आव्हाने ही सध्याच्या जमान्याशी सुसंगत वाटत असली तरी, ती पूर्णपणे आश्वासक नाहीत. मागच्या पुढच्या संदर्भाशिवाय उदारवाद हा खूपच धूसर ठरतो. इतिहासकार अॅडम टूझ यांनी म्हटल्याप्रमाणे, उदारवादाचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातो आणि लावला गेला आहे. त्यामुळेच “जॉन मेनार्ड केनेस, फ्रेडरिक हायेक, जॉन रॉल्स आणि मार्गारेट थॅचर हे सर्वसामान्यपणे उदारमतवादी म्हणून ओळखले जातात.”
फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात उदारवादाचे दोन किंचित वेगळे प्रकार पाहायला मिळाले किंवा विशिष्ट गुणधर्मामुळे वेगवेगळ्या रूपांत पुढे आले. त्यात अमेरिकी वसाहतवादी, स्कॉटिश नैतिक तत्ववेत्ते, लंडन कॉपीहाऊसवाले आणि मध्ययुगीन अभिजनांचा व्यापारी उदारवाद होता. त्याशिवाय तिथे तळागाळाशी नाते सांगणारा उदारवाद होता. या प्रकारातील उदारवादाने व्यवस्थेतील असमानता ओळखली. आजवरच्या सामाजिक व आर्थिक चुका वंचितांच्या भल्यासाठी दुरुस्त करणे हेच राजकारण असल्याचा या विचारधारेचा विश्वास होता.
दोन्ही विचारधारांचा उगम समाजातील खालच्या वर्गातून झाला होता. युरोपातील आमीर-उमरावांच्या विरोधात बंड करणे ही प्रेरणा या विचारधारेमागे होती. मात्र, कालांतराने या दोन्ही विचारधारा उजव्या (पुराणमतवाद, उदारमतवाद, ऑस्ट्रियन अर्थशास्त्र, ख्रिश्चन लोकशाही) आणि डाव्या (पुरोगामित्व, समाजवाद, किनेशियनवाद, सामाजिक लोकशाही) पाश्चात्त्य राजकीय परंपरेच्या अग्रदूत बनल्या. त्या अर्थाने पाहिल्यास, प्रगत समाजातील सर्व आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्था म्हणजे दोन उदारमतवादी परंपरांमधील स्पर्धा आहे.
फुकुयामा यांनी मांडलेल्या थेअरीशी तुलना करता उदारवादाचा प्रवास नेमका उलट आणि अडथळ्यांचा राहिला आहे. १८ व्या शतकात क्रांती झाल्यानंतरही १९ वे शतक पूर्णपणे उदारमतवादी नव्हते. युरोपमधील अभिजनांचे प्रतिक्रियावादी राजकारण, अमेरिकेतील गुलामी, राष्ट्रवाद व वसाहतवादाची जागतिक युद्धे ही त्याची वैशिष्ट्ये होती. २० व्या शतकाच्या पूर्वाधात उदारवादी शक्तींनी कट्टरतावाद आणि वसाहतवाद, देशांतर्गत दडपशाही, वैचारिक तडजोड यासह साम्राज्यवादाच्या चढाओढीला चाप लावण्याचा प्रयत्न केला.
२० व्या शतकाच्या दुसऱ्या टप्प्यात उदारवाद्यांना कार्यपद्धतीऐवजी ध्येयाला प्राधान्य देणाऱ्या सोव्हिएत युनियनच्या साम्यवादाशी लढा द्यावा लागला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या उदारवादी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा विचार करताना अल्जेरिया, बांगलादेश, कंबोडिया, चिली आणि दक्षिण आफ्रिका या देशांना विस्मरणाचा फायदा देता येऊ शकतो. युद्धानंतरच्या काळात राजकारण क्षेत्र संकुचित व आक्रमक राष्ट्रवादाभोवती केंद्रित करण्याचा मूर्खपणा युरोपीयनांनी पाहिला. स्थलांतर, बिगर वसाहतवाद आणि बहुसांस्कृतिकतेच्या बाबतीत युरोपचा संकुचितवाद युरोपीयनांना ओळखताच आला नाही, असा दावा फुकुयामाने केला आहे.
दांभिकतेच्या आधारे उदारमतावादापासून सुटका करून घेणे, असा याचा अर्थ नाही. उदारमतवादाच्या टीकाकारांच्या मतानुसार, नैतिकतेऐवजी ठोस आणि भौतिकतेच्या पायावर पाहिल्यास उदारमततवाद अधिक मजबूत ठरतो. मागील तीन दशकांत इतर कोणत्याही विचारधारेपेक्षा उदारवादामुळेच मोठ्या प्रमाणावर वाद टळले आहेत आणि जागतिक पातळीवर अभूतपूर्व (असमान असली तरी) अशी समृद्धी आली आहे.
फुकुयमाने केलेल्या उदारमतवादाच्या चित्रणातही अनेक विसंगती आहेत. त्याच्या मते, पूर्वेकडील देशांत, जिथे जात, धर्म, पंत आणि घराणेशाही हे अजूनही वास्तव आहे, तिथे व्यक्तिगत पातळीवरील उदारमतवाद आणि माणसाच्या सामाजिक प्रवृत्तीमध्ये नेहमीच अंतर्विरोध राहिला आहे. असे मत नोंदवल्यानंतर ते पुढे म्हणतात की, उदारमतवाद व्यवस्थित समजून घेतल्यास साम्यवादी उर्मींशी पूर्णपणे सुसंगत आहेच, शिवाय वैविध्यपूर्ण आणि सखोल सामाजिक समृद्धीचा पाया ठरला आहे.
मग उदारमतवाद ही संकल्पना वैश्विक आहे की नाही? तो गटातटाच्या राजकारणाला पूरक आहे का? आणि असल्यास किती प्रमाणात? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. आणि अनुत्तरित असल्यानेच उदारमतवादाच्या सध्याच्या समस्यांचे प्रमुख कारण ठरले आहेत.
बीजिंग ऑलिम्पिकचा शुभारंभाचा सोहळा ही चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षेची द्वाही फिरवणारी घटना होती. उदारमतवादाच्या संकल्पनेसाठी २००८ च्या ऑगस्टची ती संध्याकाळ जॉन केजच्या ४’३३ या संगीत रचनेप्रमाणेच ठरली. त्याच दिवशी रशियाच्या फौजा जॉर्जियामध्ये घुसल्या. त्याच महिन्यात लेहमन ब्रदर्सने १५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. जागतिक आर्थिक संकटाच्या दृष्टीने लेहमन ब्रदर्सची ही दिवाळखोरी धोक्याची घंटा होती. त्याच वर्षी, चिनी नौदलाने आपल्या समुद्री हद्दीच्या बाहेर जाऊन गल्फ ऑफ एडनच्या आखातात चिनी सैनिक तैनात केले. अर्थात, याच वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये, अमेरिकी निवडणुकीतील बराक ओबामा यांच्या ऐतिहासिक विजयामुळे या घडामोडी झाकोळल्या गेल्या असल्या तरीही, पाश्चात्य उदारमतवादाच्या अंताची ती नांदी ठरली.
असे असले तरी त्यानंतर उदारमतवाद ही संकल्पना पुरती इतिहासजमा झाली असे नाही. मनुष्यगौरव, व्यक्तिवाद, समान हक्क ही उदारवादातील निहित तत्त्वे हवीहवीशी आणि निर्विवाद राहिली आहेत. मात्र, मागच्या १२ वर्षांतील घडामोडींनी उदारवादातील अंगभूत त्रुटी चव्हाट्यावर आणल्या. मनुष्य हा केवळ तार्किक नव्हे तर भावनिक प्राणी आहे. मुक्त बाजारपेठेने आर्थिक विकासाचा चमत्कार करून दाखवला, पण त्याचवेळी समानतेची संधी आक्रसत गेली. माहितीचा खजिना सर्वांपर्यंत पोहोचला म्हणून ज्ञानाची हमी मिळत नाही. निवडीचे स्वातंत्र्य उपभोगणारे आदिवासी बनून राहण्याची निवड करू शकतात. निवडून आलेले अधिकारी या परिस्थितीचा फायदा उचलतात.
उदारमतवादाच्या नैतिक श्रेष्ठत्वाला बळ देणे हा या त्रुटींवर मात करण्याचा मार्ग नाही. उदारमतवादातील सुप्त शक्तीचा शोध घेत त्यावर सतत फुकर मारत राहणे महत्त्वाचे आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.