Published on Apr 10, 2024 Commentaries 0 Hours ago

समुद्राच्या तळाशी असलेल्या केबल्स अतिशय महत्वाची पायाभूत सुविधा आहेत. जाणूनबुजून केलेली छेडछाड आणि अपघाताने होणारे नुकसान यांसारच्या गोष्टींमुळे त्यांच्या सुरक्षेचा धोका वाढतो हे मान्य करणे आवश्यक आहे.

समुद्राखालील कम्युनिकेशन केबल्स असुरक्षित आहेत कारण...

लाल समुद्रातील नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे आणखी एक सुरक्षा धोका समोर आला आहे, तो म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेल्या दूरसंचार केबल्सची सुरक्षा.

लाल समुद्रातून जाणाऱ्या तीन संचार केबल्स, ज्या इंटरनेट आणि दूरसंचार सेवांसाठी वापरल्या जातात, त्यांवर यमनच्या हुथी बंडखोरांनी कदाचित हल्ला केला असल्याचे संयुक्त अरब अमिरातच्या अधिकाऱ्यांनी मार्चच्या सुरुवातीला म्हटले होते. परंतु, हुथी बंडखोरांनी स्वतः हा हल्ला केल्याचं नाकारलं आहे. या केबल्समुळे विविध प्रदेशांमध्ये संदेश पाठवणे शक्य होते. वृत्तमाध्यमांच्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यामुळे आशिया - आफ्रिका - युरोप 1, युरोप - इंडिया गेटवे, सीकॉम, टीजीएन (टाटा ग्लोबल नेटवर्क) गल्फ आणि हाँगकाँगची एचजीसी ग्लोबल कम्युनिकेशन यासारख्या अनेक संचार केबल लाईन्स खराब झाल्या.

लाल समुद्रातून आशिया आणि युरोपमधल्या इंटरनेटच्या वाहतुकीवर (कम्युनिकेशन) या खंडनाचा वाईट परिणाम झाला आहे. टक्केवारीत सांगायचं तर 25% परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांना तात्कालीन दुरुस्ती (उपाय) कराव्या लागल्या. उदाहरणार्थ, टाटा कम्युनिकेशन्सने यावर भाष्य करताना म्हटलंय की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि नेटवर्क व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी पाऊलं उचलत आहेत. अशा वेळी इंटरनेटचे ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने वळविण्याची (रि-रूटिंग) सोय त्यांनी केली आहे.

लाल समुद्र हा जहाजांच्या वाहतुकीसाठी (मॅरीटाइम शिपिंग) नेहमीच अडचणीचा मार्ग (चोक पॉइंट) मानला जातो. पण आश्चर्य म्हणजे, तो "इंटरनेट आणि दूरसंचारासाठी देखील अडचणीचा मार्ग" (चोक पॉइंट) आहे, असे सेंटर फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (CSIS) च्या तज्ञांचे मत आहे. अरुंद अशा अल-मंदीब जलसंधीच्या खाली असलेल्या केबल्सद्वारे युरोप आणि आशिया दरम्यान सुमारे 90 टक्के संवाद (कम्युनिकेशन) आणि जागतिक इंटरनेट वाहतुकीच्या 17 टक्के वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाते, त्यामुळे तो दूरसंचार क्षेत्रासाठी एक प्रमुख अडथळा आहे.

काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (CRS) च्या अहवालानुसार, "व्यापारी समुद्री तळाखाली असलेल्या दूरसंचार केबल्सद्वारे जवळपास 99 टक्के आंतरखंडीय डिजिटल संवाद (उदा., आवाज, डेटा, इंटरनेट) वाहतुक केली जाते.

समुद्री तळाखाली असलेल्या केबल्स ही जागतिक अर्थव्यवस्था आणि वेगवेगळ्या प्रदेशांना जोडणाऱ्या संवाद प्रणालीसाठी अत्यंत महत्वाची पायाभूत सुविधा आहे.  काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (CRS) च्या अहवालानुसार, "व्यापारी समुद्री तळाखाली असलेल्या दूरसंचार केबल्सद्वारे जवळपास 99 टक्के आंतरखंडीय डिजिटल संवाद (उदा., आवाज, डेटा, इंटरनेट) वाहतुक केली जाते, ज्यामध्ये आर्थिक व्यवहारांचा समावेश असतो." अहवालात पुढे म्हटले आहे की, 500 पेक्षा जास्ती व्यापारी समुद्री तळाखाली असलेल्या केबल्स आहेत ज्यांची मालकी आणि देखभाल खाजगी कंपन्या आणि कंपन्यांच्या संघटना (कन्सोर्टिया) करतात. या केबल्स आता जागतिक इंटरनेटचा मुख्य आधार बनल्या आहेत.

जगातील सर्व देशांना जोडणारे 1.4 दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या या केबल्सचे महत्व दुर्लक्षित करता येत नाही. अधिक मोठ्या कंपन्या या क्षेत्रात येत असल्याने, ही संख्या येत्या काही वर्षांत वाढण्याची शक्यता आहे. आधीच, अमेझॉन, गूगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या जागतिक कंपन्या या क्षेत्रावर वर्चस्व गाजवतात, सर्व सबमरीन बँडविड्थच्या सुमारे निम्मे मालकी किंवा लीजवर घेतात. परंतु अशा अतिनिर्भरतेचा अर्थ मोठी असुरक्षितता असू शकते आणि त्या बदल्यात अधिक संरक्षणाची गरज निर्माण होते.

समुद्री तळाशी असलेल्या या केबल इन्फ्रास्ट्रक्चरवर जाणूनबुजून आणि अनजाणतेपणी हल्ले झाले आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या नॉर्ड स्ट्रीम पाईपलाइन हल्ल्याने अशा केबल्सची असुरक्षितता अधोरेखित केली आणि समुद्री दूरसंचार केबल्ससाठी अधिक चांगले संरक्षणात्मक उपाय सुनिश्चित करण्याची मागणी केली. दूरसंचार केबल्सवरच्या जाणूनबुजून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांच्या बाबतीत, एप्रिल आणि ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या दोन घटना उल्लेखनीय आहेत. ज्यावेळी दक्षिण फ्रान्समध्ये अनेक केबल्स तोडण्यात आल्या. हा एक समन्वित आणि लक्षित हल्ला असल्याचे दिसून आले. एका क्लाउड सुरक्षा कंपनी, झस्केलरने, ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की हा हल्ला "एशिया, युरोप, अमेरिका आणि कदाचित जगात इतर भागात कनेक्टिव्हिटी असलेल्या प्रमुख केबल्सवर परिणाम करतो."

समुद्री तळाशी असलेल्या केबल्स देखील अनेकदा नैसर्गिक घटनांमुळे तुटतात किंवा खराब होतात, ज्यामुळे संचारात व्यत्यय आणि अडथळी निर्माण होते. दक्षिण प्रशांत महासागरीय बेटराष्ट्र टोंगा येथे जानेवारी 2022 मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर समुद्री तळाशी असलेल्या केबलचे नुकसान हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. क्लाउडफ्लेअरने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, समुद्री तळाशी असलेल्या केबलची दुरुस्ती यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर 38 दिवसांनंतर इंटरनेट कनेक्शन पुन्हा सुरळीत झाले. हे लक्षात घेणेही तितकेच महत्वाचे आहे की केबलची दुरुस्ती अत्यंत आव्हानात्मक आणि महाग असते.

टोंगाच्या प्रकरणात, केबलची दुरुस्ती करण्यासाठी जबाबदार असलेल्या जहाज, सीएस रिलायन्स, या जहाजाचे दैनिक खर्च 35000 ते 50000 डॉलर दरम्यान असल्याचा अंदाज होता.

सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या नॉर्ड स्ट्रीम पाईपलाइन हल्ल्याने अशा केबल्सची असुरक्षितता अधोरेखित केली आणि समुद्री दूरसंचार केबल्ससाठी अधिक चांगले संरक्षणात्मक उपाय सुनिश्चित करण्याची मागणी केली.

समुद्री तळाशी असलेल्या केबल्सचं झालेलं नुकसान हे जाणूनबुजून केलं गेलंय की ही नैसर्गिक घटना किंवा अपघाताचे परिणाम आहेत हे ओळखण आव्हान आहे. विश्लेषकांच्या मते, मासेमारीची जाळी, हवामान, जहाज, शार्क किंवा अगदी बुडणाऱ्या मालवाहू जहाजांमुळे देखील नुकसान होऊ शकते, जसे नुकत्याच लाल समुद्राच्या घटनेमध्ये दिसून आले. जाणूनबुजून केलेल्या हल्ल्यांमागे आणि अपघातांमध्ये फरक न करू शकणे हे दोन वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीचे ठरू शकते. पहिले म्हणजे, हल्लेखोरांना नुकसानाची विशिष्ट कारणे निश्चित करण्यातील अडचणीचा फायदा होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे, समुद्री तळाशी असलेल्या केबल्सची सुरक्षा वाढवण्यासाठीच्या प्रशासन आणि नियामक उपाययोजनांच्या दृष्टीने आव्हान निर्माण करतो.

समुद्री तळाशी असलेल्या केबल्सची सुरक्षा हाताळण्यासाठी सोप उत्तर नाही. सर्वात आधी आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे, सायबरसुरक्षा आणि इतर महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या संरक्षणासह, समुद्री तळाशी असलेल्या केबल्सना महत्वाच्या पायाभूत सुविधा म्हणून ठरवणं आवश्यक आहे. ही कम्युनिकेशन व्यवस्थेसाठी असलेल्या सावळ्या गोंधळाची कबुली देणे हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा म्हणजे कंपन्यांनी विविध केबल संघटनांमध्ये गुंतवणूक करणे जेणेकरून पुनर्निर्देशन करणे शक्य होईल आणि त्याद्वारे समुद्री तळाशी असलेल्या केबल खंडनाच्या परिणामांना कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतील.

समुद्री तळाशी असलेल्या केबल्सच्या संरक्षणाचे काम मिनिलेटेरल गटांच्या माध्यमातूनही करता येते जसे की क्वाड. क्वाडने मे 2023 मध्ये हिंदी-पॅसिफिकमध्ये समुद्री तळाशी असलेल्या केबल्सच्या संरक्षणासाठी एक नवीन उपक्रम जाहीर केला, ज्याला "क्वाड पार्टनरशिप फॉर केबल कनेक्टिव्हिटी अँड रेसिलियन्स" असे म्हणतात, जो अधिक चांगले आणि अधिक लवचिक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या त्यांच्या व्यापक प्रयत्नांचा भाग आहे. समुद्री तळाशी असलेल्या केबल्सना होणारे संभाव्य नुकसान सर्व देशांना प्रभावित करू शकते हे लक्षात घेता, बहुराष्ट्रीय प्रयत्नांना वाढत्या महाशक्ती स्पर्धेमुळे वाढता धोका असूनही, जागतिक स्तरावर बहुपक्षीय प्रयत्न देखील हाती घेतले पाहिजेत.


हा लेख मूळतः द डिप्लोमॅटमध्ये प्रसिद्ध झाला होता.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.