Published on Oct 30, 2023 Commentaries 0 Hours ago

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी साधनांचा मर्यादित वापर केल्यामुळे दीर्घकाळ चालणारे युद्ध सुरू झाले आहे जे वेगाने कोंडीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

युक्रेन-रशिया संघर्ष टोकावर

युक्रेनवरील आक्रमणानंतर गेल्या वर्षी सुरू झालेले रशिया व युक्रेन युद्ध आता डेडलॉकच्या स्थितीत पोहोचले आहे. युक्रेनचा काऊंटर ऑफेन्स आता थांबला असला व युक्रेनच्या लष्कराची चढाई मर्यादित झाली असली तरी सुरुवातीची रशियन आक्रमणे ज्या प्रभावीपणे युक्रेनियन प्रतिहल्ल्यांमुळे थोपवली आणि हळूहळू उलटवण्यात आली त्या तुलनेत रशियन लष्करी संरक्षणाला खिंडार पाडणे अजूनही युक्रेनला साधलेले नाही.

युक्रेनचा काऊंटर ऑफेन्स आता थांबला असला व युक्रेनच्या लष्कराची चढाई मर्यादित झाली असली तरी सुरुवातीची रशियन आक्रमणे ज्या प्रभावीपणे युक्रेनियन प्रतिहल्ल्यांमुळे थोपवली आणि हळूहळू उलटवण्यात आली त्या तुलनेत रशियन लष्करी संरक्षणाला खिंडार पाडणे अजूनही युक्रेनला साधलेले नाही.

सध्याच्या गोंधळासाठी तीन विशिष्ट घटक जबाबदार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, या लष्करी मोहिमेवर निर्णायकपणे खटला चालवण्याची तयारी कोणत्याही पक्षाला करता आली नाही किंवा तसे करण्याची क्षमताही कोणी दाखवली नाही. दुसरे म्हणजे, गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या काळात नवीन शस्त्रे आणली गेली तर युद्धाची तीव्रता वाढण्याची भिती व्यक्त केली गेली होती. यामुळे लढाईची तीव्रता कमी झाली असली तरी त्यातून फार काही निष्पन्न झाले नाही. अखेरीस, गेल्या दीड वर्षांतील सक्रिय लढाईत रशियन सैन्यामध्ये ठळकपणे दिसणारे मनोबल हे पुढे युक्रेनियन लोकांमधेही स्पष्टपणे दिसले. मर्यादित साधनांसह लष्करी मोहिमेवर कारवाई करणे हे रशिया-युक्रेन युद्धाचे वैशिष्ट्य आहे. निर्णायकपणे युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता रशियाने कधीच दाखवली नाही. खरे पाहता, वेगळ्या कारणांसाठी का होईना पण युक्रेननेही तेच केले.

युद्धाच्या विद्यमान स्थितीमागील कारणे

सर्वात पहिली बाब म्हणजे, या युद्धात रशियाने आपल्या सायबर क्षमतेचा वापर अपेक्षेइतका केला नाही. तसेच रशियन नेतृत्वाने, त्यांच्या लढाऊ वायुसेनेचाही वापर केलेला नाही. अर्थात असे का झाले हे आजही अस्पष्ट आहे. भूदलासोबतच्या मल्टी डोमेन ऑपरेशन्समध्ये अनुभवाचा अभाव, जोखीम टाळण्यासाठीचे प्रयत्न आणि पायलट प्रशिक्षणाचा अभाव ही वायुदलाचा वापर न करण्यामागील कारणे देण्यात आली आहेत. वाईट रणनीतीचा अवलंब आणि पुरवठा साखळीतील अंतर याचा मोठा फटका रशियन सैन्याला बसला आहे. जेव्हा युक्रेनियन सैन्याच्या १२ आर्मड ब्रिगेड नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनमध्ये प्रशिक्षण घेत होत्या त्याच सुमारास रशियन सैन्याने भूसुरुंगयुक्त संरक्षणात्मक तटबंदीच्या उभारणीमध्ये गुंतवणूक केली. याच आधारावर युक्रेनच्या सध्याच्या काउंटरऑफेन्सिव्हला खोडून काढत रशिया पुन्हा संघटित होत आहे. लढाऊ शक्तीचा अपुरा वापर आणि टिकावाची शक्यता यामुळे दोन्ही बाजूंना पुन्हा एकत्र येण्याची आणि लढण्याची संधी मिळाली आहे.

भूदलासोबतच्या मल्टी डोमेन ऑपरेशन्समध्ये अनुभवाचा अभाव, जोखीम टाळण्यासाठीचे प्रयत्न आणि पायलट प्रशिक्षणाचा अभाव ही वायुदलाचा वापर न करण्यामागील कारणे देण्यात आली आहेत.

रशियाच्या लष्करी सामर्थ्याच्या अपुऱ्या वापराचा किव्हवर कोणताही परिणाम झालेला नाही. युक्रेनचे नेतृत्व हे त्याच्या सहयोगी आणि प्राथमिक लष्करी पुरवठादार असलेल्या नाटोवर काहीप्रमाणात अवलंबून होते. युक्रेनला त्याच्या काउंटरऑफेन्सिव्हमध्ये मर्यादित यश मिळाले असले तरी, नाटोकडून मिळालेल्या अपुऱ्या लष्करी पाठिंब्यामुळे त्याची लष्करी प्रगती बर्‍याच प्रमाणात मर्यादित झाली आहे. युक्रेनियन सैन्याला क्राइमियावर कब्जा मिळवण्यासाठी मेलिटोपोल ताब्यात घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरी हे करण्यात युक्रेन अपयशी ठरेल असा अमेरिकन इंटिलीजन्सला कयास आहे. मेलिटोपोल हा रेलमार्ग आणि महामार्गासह लँडब्रिजची भूमिका बजावतो. या मेलिटोपोलमुळे रशियाला युक्रेनने व्यापलेल्या क्रिमीयामध्ये सैन्य तैनात करणे सुलभ होणार आहे. मेलिटोपोल काबीज करणे आता अधिकाधिक कठीण होत चालले आहे. आतापर्यंत, या घटकांनी दोन्ही बाजूंना युद्धाबाबत खटला चालवण्यापासून निर्णायक निष्कर्षापर्यंत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रशियन आक्रमणाच्या पहिल्या दिवसापासून कीवला लागणारी शस्त्रे व संसाधने पुरवण्याबाबत अमेरिका उदासीन राहिली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात अमेरिकन इंटेलिजन्सकडून काही कागदपत्रे लिक करण्यात आली. नाटो कडून करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रे व सामग्रीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे युक्रेनचा काऊंटरऑफेन्स अपयशी होईल असा दावा त्यात करण्यात आला आहे.

युद्ध सुरू झाल्यापासून, युक्रेनमध्ये हाय अल्टिट्यूड मोबिलिटी रॉकेट सिस्टम (एचआयएमएआरएस – हिमार्स) पाठवण्यास अमेरिकेने नकार दिला होता. त्यानंतर चार महिन्यांनी म्हणजेच जून २०२२ मध्ये जेव्हा अमेरिकेने हा पुरवठा केला तेव्हा त्याची संख्या अत्यंत मर्यादित होती. युक्रेनने अमेरिकेला प्रुफ ऑफ कंसेप्ट म्हणजेच कल्पनेचा पुरावा दिल्यानंतर किंवा युक्रेनने हिमार्सचा प्रभावी वापर केल्यानंतर, वॉशिंग्टनने आणखी हिमार्स पाठवण्याचे वचन दिले होते. पाश्चिमात्य देश विशेषतः अमेरिकेने, रशियन लोकांविरुद्ध लढाऊ हवाई शक्ती वापरण्याबाबत केलेली टाळाटाळ हा युक्रेनियन लोकांना पाठिंबा देण्याच्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोच्या संकोचाचे खरे प्रकटीकरण आहे. युक्रेनियन लढाऊ वैमानिकांना एफ १६ चे प्रशिक्षण देण्यासाठी नाटोच्या काही युरोपियन सदस्यांना वॉशिंग्टनने उशिराने संमती दिल्याने ह्या वैमानिकांचे प्रशिक्षण २०२४ पर्यंत पूर्ण होणार नाही. एका ब्रिटीश तज्ज्ञाने अगदी योग्य रीतीने म्हटल्याप्रमाणे: “आतापर्यंत आम्ही [नाटो] नेहमीच वेळेत त्यांना [युक्रेन] जे हवे आहे ते दिले आहे. आता जरी उशीर झाला असला तरी आताही आम्ही त्यांना जे हवे आहे ते देत आहोत.”

युक्रेनियन लढाऊ वैमानिकांना एफ १६ चे प्रशिक्षण देण्यासाठी नाटोच्या काही युरोपियन सदस्यांना वॉशिंग्टनने उशिराने संमती दिल्याने ह्या वैमानिकांचे प्रशिक्षण २०२४ पर्यंत पूर्ण होणार नाही.

सरते शेवटी, युक्रेनियन सैनिकांचे मनोबल ढळू लागले आहे. युक्रेनमधील भर्ती केंद्रांवर लष्करी अधिकार्‍यांना लाच देऊन भरतीतून पळवाट काढण्याचा प्रयत्न अनेक जणांकडून केला जात आहे. अर्थात यामुळे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमर झेलेन्स्की यांना भ्रष्टाचारावर कारवाई करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशाप्रकारची उदासिनता ही युक्रेनच्या क्राइमिया आणि पूर्व युक्रेनवरील रशियन कब्जा हटविण्याच्या लष्करी मोहिमेसाठी योग्य नाही. हा प्रतिकार कायम राहिल्यास, कीवला त्याच्या प्रतिआक्रमणासह पुढे जाणे शक्य होणार नाही तसेच हे युद्ध जैसे थे च्या परिस्थितीत राहून युद्धाच्या रेषा स्थिर होण्याची शक्यता आहे. रशियाने २०१४ मध्ये युक्रेनमधून जे काही मिळवले होते त्यातील बहुतांश भाग राखून ठेवला असून कीवने देशाचा उर्वरित भाग सुरक्षित केला आहे, असा अर्थ यातून काढला जाऊ शकतो. मॉस्को आता त्याच्या भक्कम बचावामुळे कदाचित दुसर्‍यांदा आक्रमणाची योजना आखत आहे आणि त्यासाठी रशियाची पूर्ण तयारी करत आहे, असा अंदाज लावण्यात येत आहे.

युद्ध अधिक तीव्र होण्याच्या भीतीने हा संघर्ष कोणत्याही ठोस तोडग्याशिवाय दीर्घकाळ चालला आहे. युक्रेन सैन्याला अलीकडे मिळालेला सेटबॅक म्हणजे काही कायमचा पराभव नाही. युक्रेन कोणत्याही क्षणी बाजी पलटवू शकतो हे आतापर्यंतच्या युद्धातून आपल्याला दिसून आले आहे. या आधी नमूद केल्याप्रमाणे, नाटोची लष्करी मदत उशीरा आल्याने व युक्रेनियन मनोबलात घट झाल्यामुळे, युक्रेनला फटका बसू शकतो. युक्रेन सध्या बचावात्मक पवित्र्यामध्ये असल्याने स्टेलमेट कायम राहण्याची शक्यता आहे. अंतिम परिणामाची पर्वा न करता, क्लॉजविट्झने सांगितल्याप्रमाणे, युद्धातील बचाव हा आक्रमणापेक्षा अधिक मजबूत असतो, ही गोष्ट या संघर्षाने प्रमाणित केली आहे. ज्याप्रमाणे फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवरील रशियन आक्रमण हे युक्रेनच्या सैन्याने मजबूत संरक्षणाच्या आधारे उधळून लावले होते, त्याचप्रमाणे आज रशियन सैन्याच्या बचावात्मक उपायांनी युक्रेनियन हल्ल्याची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी केली आहे. जर एखादे युद्ध लढायचे असेल आणि ते निर्णायकपणे जिंकायचे असेल, तर संसाधनांचा मर्यादित वापर केला जाऊ नये, हा या युद्धातून मिळालेला एक महत्त्वाचा धडा आहे. अशा प्रकारच्या युद्धांमध्ये उद्दिष्टे मर्यादित असली तरी चालतील, पण वापरण्यात येणारी संसाधने विपुल असावीत व प्रयत्न सर्वोत्तम असावेत.

कार्तिक बोम्मकांती हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे वरिष्ठ फेलो आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.