-
CENTRES
Progammes & Centres
Location
व्यक्तींप्रमाणेच देशही केवळ त्यांच्या कृतींवर उभे नसतात तर ते जगण्यासाठी नरेटिव्हचा आधार घेत असतात. सत्ता, नुकसान आणि आकांक्षा यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करत असतो आणि त्यावर आपले नरेटिव्ह उभारतो. यापैकी काही नरेटिव्ह ही वास्तवावर आधारित असतात. पण काही मात्र काळाच्या ओघात वाहून जातात. भारतासोबत पाकिस्तानने जो शस्त्रसंधी करार केला त्यामध्ये तर हे प्रकर्षाने जाणवलं आहे. पाकिस्तानने याचा वापर देशांतर्गत आणि राजनैतिक विजय घोषित करण्यासाठी केला खरा पण यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत.
पाकिस्तानमध्ये जो ‘विजय’ साजरा केला जातो आहे त्याला राजनैतिक मास्टरस्ट्रोक असं नाव दिलं गेलं आहे. पण धोरणात्मक पर्यायांचा अभाव असल्यामुळेच पाकिस्तान या मुद्द्याचे भांडवल करतो आहे. आपल्याकडे दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता आहे, अशी पाकिस्तानच्या लष्करी वर्गाची अनेक वर्षांची धारणा आहे. प्रॉक्सी युद्ध, आण्विक अस्त्रे आणि निवडक आंतरराष्ट्रीय सहानुभूतीच्या जोरावर पाकिस्तानने हे मत बनवले आहे. पण हा त्यांचा भ्रम आता समोर आला आहे. रावळपिंडी ज्याला विजय म्हणते तो खरंतर तिथल्या परिस्थितीची गरज म्हणून घोषित केला गेला आहे.
एकीकडे आपल्या सामर्थ्याचे मोठमोठे दावे करायचे आणि दुसरीकडे मात्र वास्तवापासून पलायन करायचे. ही एक प्रकारची माघारच आहे. पाकिस्तानचे बोलणे आणि कृती यांच्यात कमालीची तफावत आहे. याउलट पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेला गतिमान प्रतिसाद हे परिपक्वतेचे लक्षण आहे. मोठमोठ्या नाट्यमय संघर्षापेक्षा भारताने आपल्या रणनीतीमध्ये मोठे बदल केले आहेत.
ऑपरेशन सिंदूर ही पाकिस्तानच्या चिथावणीला दिलेली स्फोटक प्रतिक्रिया नव्हती तर प्रतिबंधाच्या चौकटीत राहून जाणीवपूर्वक केलेली कृती होती. या मोहिमेमध्ये दहशतवादी तळांवर अचूक आणि संयमाने हल्ला करण्यात आला. यात नागरिकांचे नुकसान आणि प्रतिकात्मक अतिरेक जाणीवपूर्वक टाळण्यात आला. हे उघडउघड शक्तीप्रदर्शन नव्हते तर धोरणात्मक शिस्तीद्वारे राबवलेली एक यशस्वी लष्करी मोहीम होती.
प्रॉक्सी युद्ध, आण्विक अस्त्रे आणि निवडक आंतरराष्ट्रीय सहानुभूतीच्या जोरावर पाकिस्तानने हे मत बनवले आहे. पण हा त्यांचा भ्रम आता समोर आला आहे. रावळपिंडी ज्याला विजय म्हणते तो खरंतर तिथल्या परिस्थितीची गरज म्हणून घोषित केला गेला आहे.
हिंसाचाराला दिलेली ही धोरणात्मक आणि नैतिक प्रतिक्रिया होती. कोणतीही लष्करी प्रतिक्रिया न देता फक्त जबाबदार शक्ती म्हणून शांत राहण्याची भारताची भूमिका नाही. भारत आपल्या कृतींद्वारे एक नवा प्रभावी संदेश देतो आहे. यामध्ये निर्णयक्षमता, प्रमाणबद्धता आणि दृढ निश्चयाचा समावेश आहे. दहशतवादी तळांवर हल्ला करून भारताने पाकिस्तानचा पर्दाफाश केला. पाकिस्तानातला दहशतवाद्यांचे अड्डे फार काळ लपवता येणार नाहीत हेच भारताने दाखवून दिले. त्यामुळे आता पाकिस्तान आपली नाचक्की लपवण्यासाठी वेगवेगळ्या नरेटिव्हचा आधार घेतो आहे.
पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्र हल्ले केले. नागरी वस्त्यांवर ड्रोन हल्ले केले. पण यामध्ये अचूकता आणि स्पष्टता नव्हती. याउलट पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांना भारताने लक्ष्य केले आणि त्यांची यंत्रणा निकामी केली. भारत असा प्रतिकार करताना मागेपुढे पाहणार नाही हा स्पष्ट संदेश पाकिस्तानला देण्यात आला. भारत यापुढे जो लष्करी प्रतिकार करेल त्यात हल्लेखोरीपेक्षा रणनीती प्रभावी असेल हेच यातून दिसून आले. या रणनीतीमध्ये राजकीय आणि लष्करी अशा दोन पातळ्यांचा समावेश आहे.
भारताच्या पूर्वीच्या धोरणात्मक भूमिकेपेक्षा हा बदल नक्कीच नवा आहे. संयम आणि जागतिक सद्भावनेवर दीर्घकाळ अवलंबून राहण्यापेक्षा आपली रणनीती प्रभावी करणे हा या धोरणाचा गाभा आहे. भारताच्या आधीच्या धोरणाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले असले तरी त्याचा अपेक्षित परिणाम मात्र साधता आला नव्हता. आता मात्र भारताची ताकद आक्रमक धोरणांद्वारे दाखवून दिली जात आहे. पाकिस्तानच्या संदर्भात स्वत:ची व्याख्या करण्यापेक्षा भारत आता या द्विपक्षीय दृष्टिकोनाच्या पलीकडचा विचार करतो आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या चौकटीतून बाहेर पडून जागतिक स्तरावर एक स्वायत्त घटक म्हणून आपली भूमिका मांडतो आहे. सत्ता आणि राजकीय कल्पनाशक्ती यांचा मेळ घालून भारत पुढे जाऊ पाहतो आहे. अहंकार किंवा देखाव्यासाठी नव्हे तर राष्ट्रीय विकासासाठी अनुकूल स्थिर व्यवस्था निर्माण करणे आणि यासाठी शक्तीचा वापर करणे याला धोरणात्मक परिपक्वता असे म्हणता येईल. आतापर्यंत भारताने खूप संयम दाखवला होता. परंतु आता भारत आपला पवित्रा बदलतो आहे. याला कसा प्रतिसाद द्यायचा हे पाकिस्तानने ठरवायचे आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानमध्येच रचला गेला होता. त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याने भारताची धोरणात्मक स्पष्टता दिसून आली. परंतु याबद्दलची माहिती देण्यात त्रुटी राहिल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या अपप्रचाराला संधीच मिळाली. या संघर्षात आपणच कसे वरचढ ठरलो याचा गवगवा पाकिस्तानने केला. त्यामुळे भारताला लष्करी यश मिळूनही त्याबद्दल संदिग्धता राहिली.
भारतातल्या काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी लष्करी मोहिमेचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले आणि वस्तुस्थितीचा विपर्यास केला. त्यामुळे राष्ट्रीय उद्दिष्टांना खीळ बसली. पाकिस्तानच्या प्रचारयंत्रणेने या चुकीच्या माहितीच्या गैरफायदा घेतला आणि त्याचवेळी आपल्या खोट्या बातम्या पेरल्या. परिणामी भारताचे लष्करी यश मागे पडले आणि चुकीच्या जागतिक धारणा तयार झाल्या. काश्मीरबद्दल आधीच पाश्चात्य देश जुन्या आणि चुकीच्या दृष्टिकोनात अडकलेले आहेत. त्यामुळे या देशांनी भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईकडे पाकिस्तानच्या शत्रुत्वाचा भाग म्हणून पाहिले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या आवाहनामुळे एका महत्त्वाच्या क्षणी जागतिक नरेटिव्हाला आकार देण्याच्या भारताच्या भूमिकेत मोठा अडथळा निर्माण झाला.
हा अनुभव समकालीन भूराजकारणात एक स्पष्ट आठवण करून देतो. ज्या युगात जागतिक धारणा विद्युतगतीने परिणाम घडवू शकते त्या युगात धोरणात्मक संवाद हा अविभाज्य घटक आहे. आधुनिक युद्धाचा विस्तार भूभागांवरचे हल्ले आणि लक्ष्यभेदाच्या पलिकडे झाला आहे. यामध्ये माहिती गोळा करणे आणि तिचा अर्थ लावणे याचा समावेश आहे. भारताने युद्धात आपली इच्छाशक्ती निर्णायकपणे मांडली असली तरी आता भारताला व्यापक नरेटिव्हचे युद्ध जिंकण्याची हमी द्यावी लागेल. कोणत्याही मोहिमेच्या यशाची शाश्वतता केवळ युद्धभूमीच्या कौशल्यावर अवलंबून नाही तर धोरण, धारणा आणि उद्देश या सगळ्यामधली सुसंगती अधोरेखित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सध्या जे सुरू आहे ते भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या दीर्घ इतिहासातले आणखी एक प्रकरण एवढेच नाही. भारताला या दीर्घकाळ सुरू असलेल्या प्रादेशिक समतोलाच्या धोरणाचे निर्मूलन करायचे आहे. विघटनापेक्षा सातत्याला आणि वैचारिक संघर्षापेक्षा आर्थिक विकासाला प्राधान्य देणे हे भारताचे ध्येय आहे. भारताची नजर भविष्यावर अधिकाधिक केंद्रित होत असताना बाजारपेठ वाढवणे, व्यवस्था बळकट करणे आणि स्वत:ची ओळख निर्माण करणे याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
देशाच्या परिपक्वतेचे निकष मिथके कायम ठेवण्याच्या क्षमतेत नाही तर सत्तेचे वितरण आणि बदलत्या जगासोबत आपल्या महत्त्वाकांक्षा जुळवून घेण्याच्या क्षमतेत आहे. भारत त्या दिशेनेच वाटचाल करतो आहे.
पाकिस्तान मात्र अजूनही जुन्या नरेटिव्हमध्ये अडकलेला आहे. ज्या धोरणात्मक वळणावर सध्या पाकिस्तान आहे त्याचा सामना करण्याची क्षमता या देशामध्ये नाही. तिथले लष्कर दहशतवादाला समर्थन देण्याच्या भूमिकेत आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या हवाई क्षमतेचा एक महत्त्वाचा भाग निष्क्रिय केला. सरगोधा, भोलारी आणि जेकबाबाद या तळांना लक्ष्य करून निकामी केले. भारताने पाकिस्तानवर केलेल्या या संरचनात्मक हल्ल्यानंतरही जनरल असीम मुनीर यांचा कांगावा सुरूच आहे. आपली प्रतिमा मजबूत करण्यासाठी ते खोट्या विजयाचा दावा करतात. त्यांचे हे एकीकरणाचे प्रयत्न राष्ट्रीय हितासाठी नाहीत तर गैरसोयीचे सत्य दाबण्यासाठी आहेत. बलुचिस्तानमधील बंडखोरांपासून ते इम्रान खान यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याचे आव्हान त्यांच्यासमोर अजूनही आहे.
पाकिस्तानची हीच खरी शोकांतिका आहे. तिथले लष्कर स्वतःच्या भ्रमातून जागे होण्यास तयार नाही. परंतु भ्रम कितीही कलात्मकपणे मांडले गेले किंवा जबरदस्तीने राखले गेले तरी ते कधीतरी उघडे पडतातच. खोट्या गोष्टींची इमारत नकारात्मकता, विकृती आणि विक्षिप्तपणावर बांधली गेलेली असते. त्यातल्या विरोधाभासांमुळे या इमारतीलाच तडा जाऊ लागतो. पाकिस्तान या दुटप्पीपणातून स्वतःला कायमचे वेगळे ठेवू शकत नाही. दक्षिण आशियामधल्या भूराजकारणाच्या पटावर हे नाटकी धाडस टिकणार नाही. यामध्ये अखेर सामरिक संयम आणि धोरणात्मक रणनीतीच टिकू शकते. याबाबतीत पाकिस्तान अधिकाधिक निःशस्त्र होत चालला आहे. म्हणूनच बाह्यशत्रूंपेक्षा पाकिस्तानची ही काल्पनिक कथानकेच या देशाला घातक ठरणार आहेत.
हा लेख पहिल्यांदा OPEN मध्ये प्रकाशित झाला आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Professor Harsh V. Pant is Vice President – Studies and Foreign Policy at Observer Research Foundation, New Delhi. He is a Professor of International Relations ...
Read More +Vinay Kaura PhD is Assistant Professor in the Department of International Affairs and Security Studies and Deputy Director of Centre for Peace &: Conflict Studies ...
Read More +