Published on Oct 12, 2023 Commentaries 0 Hours ago

संयुक्त पुढाकारांद्वारे झुनोटिक रोगांच्या मूळ कारणांना संबोधित करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जी २० कडे त्याच्या प्रभावाचा आणि संसाधनांचा वापर करून घेण्याची क्षमता आहे.

झुनोसेसचा प्रतिबंध- काळाची गरज

प्राण्यांमधून मानवांमध्ये प्रसार होऊ शकणारे झुनोटिक रोग हे जागतिक आरोग्यावर मोठा भार ठरत आहेत. या रोगांमध्ये जीवाणू, विषाणू आणि परजीवी यासह रोगजनकांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश होतो, ज्यामुळे मानव आणि प्राणी दोघांचाही मृत्यू होऊ शकतो. दरवर्षी ६ जुलै हा दिवस “जागतिक झुनोसेस दिवस” म्हणून साजरा केला जातो. झुनोटिक रोग आणि त्यांचे प्रतिबंध याबद्दल जागरुकता निर्माण करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. जगभरातील २.५ अब्ज केसेस आणि २.७ दशलक्ष मृत्यू दरासाठी झुनोसेस जबाबदार आहेत, असा अंदाज २०१७ रोजी लावण्यात आला आहे. सध्या झुनोसेसचे २०० हून अधिक ज्ञात प्रकार आहेत. अंदाजानुसार, सुमारे ७० टक्के नव्याने शोधण्यात आलेले मानवामधील रोग हे झुनोटिक आहेत. याचाच अर्थ असा की हे रोग वन्यजीवांपासून उद्भवतात किंवा पाळीव प्राण्यांच्या संसर्गामुळे पसरतात. झुनोटिक प्रादुर्भावाची वारंवारिता वाढत असल्याचे दिसून आल्याने,  या झुनोटिक रोगांचा प्रसार प्रभावीपणे रोखण्यासाठी या उद्रेकास कारणीभूत ठरणारे घटक समजून घेणे आवश्यक आहे. समस्येचे प्रमाण लक्षात घेता, झुनोटिक रोगाचा प्रसार व उदय आणि मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्यावर त्यांचे परिणाम होण्यास कारणीभूत असलेल्या जटिल घटकांना संबोधित करण्यासाठी एक आंतरक्षेत्रीय दृष्टीकोन आवश्यक आहे.

हवामान बदलामुळे विविध यंत्रणांद्वारे झुनोटिक रोगांचा धोका वाढत आहे. तापमान आणि पर्जन्यमानातील बदल हे व्हेक्टर आणि रिझर्ववायर होस्टचे वितरण आणि वर्तन बदलू शकतात, परिणामी, झुनोटिक रोगजनकांचा प्रसार वाढतो.

कोविड-१९ महामारीमुळे तर झुनोसेस प्रतिबंधासाठी अधिक एकात्मिक आणि सक्रिय दृष्टिकोनाच्या गरजेवर भर दिला आहे. सर्वप्रथम, यासंबंधी सुधारित जोखीम संप्रेषण आणि सामुहिक आरोग्यामध्ये झुनोटिक रोगांच्या प्रासंगिकतेची धारणा आवश्यक आहे. यामध्ये झुनोटिक रोगांबद्दलची माहिती लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, जोखीम व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता वाढवणे आणि गैरसमज व चुकीच्या माहितीचे निराकरण करणे या गोष्टी समाविष्ट आहे. दुसरी बाब म्हणजे, हवामान बदलामुळे विविध यंत्रणांद्वारे झुनोटिक रोगांचा धोका वाढत आहे. तापमान आणि पर्जन्यमानातील बदल हे व्हेक्टर आणि रिझर्ववायर होस्टचे वितरण आणि वर्तन बदलू शकतात, परिणामी, झुनोटिक रोगजनकांचा प्रसार वाढतो. जंगलतोडीसारख्या वातावरणातील बदलाला हातभार लावणाऱ्या मानवी क्रियाकलापांमुळे झुनोटिक रोगांच्या प्रसारासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होते.  याव्यतिरिक्त, हवामानातील बदलामुळे परिसंस्थेमध्ये व्यत्यय येतो. याचा थेट परिणाम म्हणजे होस्ट, वेक्टर आणि रोगजनकांमधील परस्परसंबंधात बदल होऊन झुनोटिक स्पिलओव्हर घटनांची शक्यता वाढते. हे घटक पुढे वाढता जागतिक व्यापार आणि मानवी स्थलांतरासह एकत्रितपणे, झुनोटिक रोगांच्या उदय आणि प्रसारास हातभार लावतात. तिसरी बाब म्हणजे, या पार्श्वभुमीवर सर्वसमावेशक धोरणे आणि नियमांच्या विकासाची व अंमलबजावणीची गरज वाढली आहे.

झुनोसेस प्रतिबंधाच्यादृष्टीने सध्याचे जागतिक प्रशासन आणि या रोगांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था खंडित आहे. तसेच मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्याशी संबंधित संस्थांमध्ये समन्वयाचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. या विखंडनामुळे झुनोसेस प्रतिबंधामध्ये अंतर निर्माण झाले आहे, परिणामी जागतिक लोकसंख्या ही झुनोटिक रोगांच्या प्रादुर्भाव लक्षात घेता असुरक्षित आहे. झुनोसेस प्रभावीपणे रोखण्यासाठी, विविध भागधारकांमधील सहकार्याचा समावेश असलेला बहुक्षेत्रीय दृष्टिकोन आवश्यक आहे. (तक्ता १)

Table 1: Recommendations to prevent zoonoses disease as per level of governance

Micro Level individual or community level Promote good hygiene practices, such as handwashing, proper food handling and preparation
Safe disposal of animal waste
Education and awareness campaigns
Access to healthcare services and veterinary care -to detect and treat zoonotic diseases in a timely manner.
Meso Level Organisations and institutions Coordination and collaboration between different sectors- involvement of public health agencies, veterinary services, environmental agencies, and other relevant stakeholders.
Develop and implement surveillance systems for the early detection and monitoring of zoonotic diseases
Establish protocols for reporting and responding to outbreaks, as well as conducting research and sharing information on zoonotic diseases.
Macro level National and international governance Enact legislation and regulations to ensure the safety of food production and supply chains, as well as the welfare of animals. For instance, strengthening wildlife trade regulations to reduce the risk of zoonoses emergence.
Allocate resources for research, surveillance, and capacity building in zoonotic disease prevention and control
International cooperation and collaboration to address zoonotic diseases that transcend national borders.
Invest in research and development to advance scientific understanding of zoonotic diseases and develop innovative tools and strategies for prevention and control

या दृष्टीकोनात मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्याचा परस्परसंबंध ओळखला जातो. तसेच त्यात विविध क्षेत्रे आणि भागधारक यांच्यातील सहकार्याचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, जागतिक स्तरावर, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ही संघटना संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) आणि जागतिक प्राणी आरोग्य संघटना (ओआयई) सोबत प्राण्यांशी संबंधीत प्रमुख आजारांशी निगडीत ग्लोबल अर्ली वॉर्निंग सिस्टमवर काम करते (जीएलईडब्ल्यूएस). या सहयोगी प्रणालीमुळे झुनोसेससह प्राण्यांच्या आजाराशीसंबंधीत धोक्यांबाबत अर्ली वॉर्निंग दिली जाते तसेच त्याचा प्रतिबंध आणि त्यावर नियंत्रण वाढविण्यासाठी तिन्ही एजन्सीच्या सामर्थ्याचा फायदा घेतला जातो. यामुळे वेळेवर आणि समन्वित प्रतिसादासाठी डेटाची देवाणघेवाण आणि जोखीम मूल्यांकन साध्य होते. नामशेष होणाऱ्या प्रजातींसंबंधी आंतरराष्ट्रीय व्यापार कनव्हेन्शन (सीआयटीईएस) आणि जैविक विविधतेवरील कनव्हेन्शन, यांसारख्या आंतरराष्ट्रीय कनव्हेन्शन आणि करारांमुळे वन्यजीव व्यापार आणि यांसारख्या रोगांच्या उदयाशी संबंधीत प्रमुख घटकांना संबोधित करून झुनोटिक रोगांचा धोका कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

अशी कन्व्हेंशन्स झुनोटिक रोगजनकांचे संक्रमण कमी करण्यासाठी शाश्वत पद्धती आणि नियमांना प्रोत्साहन देतात. उदाहरणार्थ,  सीआयटीईएस हे झुनोटिक रोग संक्रमणाचा धोका असणाऱ्या नामशेष होत जाणाऱ्या  प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. या प्रजातींच्या व्यापारावर नियंत्रण ठेवून, मानवांमध्ये रोगाचा प्रसार होण्याचा धोका कमी करणे हे सीआयटीईएसचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे, ही कन्व्हेंशन जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत वापर यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे झुनोटिक रोगांचा उदय आणि प्रसार रोखण्यास मदत होते. दक्षिण आशियातील वन हेल्थ अलायन्स ऑफ साउथ एशियासारखे सहयोगी नेटवर्क हे संपूर्ण दक्षिण आशिया प्रदेशातील झुनोटिक रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रित करण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आली आहे. जागतिक समुदायाला धोका निर्माण करणाऱ्या झुनोसेसवर ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी अजेंडाचे लक्ष केंद्रित आहे. या सहयोगी प्रयत्नाचा उद्देश उदयोन्मुख झुनोटिक रोगाचा प्रादुर्भाव रोखणे, अशा रोगाची उगनस्थाने शोधणे आणि त्यास प्रतिसाद देणे हा आहे. महामारीसंबंधी चालू असलेल्या चर्चेत सदस्य राष्ट्रांची “एक आरोग्य” प्रणाली, प्रयोगशाळेची क्षमता आणि झुनोटिकशी निगडीत दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी आणि रोगजनक व साथीच्या संभाव्य प्रकारांशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी एकूण समन्वय वाढविण्यावर भर दिला जात आहे. तर, राष्ट्रीय स्तरावर, भारताने “एक आरोग्य” दृष्टिकोनाचे महत्त्व मान्य केले आहे. हा दृष्टीकोन मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्याच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकणारा व झुनोटिक रोगांना तोंड देण्यासाठी विविध क्षेत्रांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणारा आहे. झुनोटिक रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण मजबूत करण्यासाठी, भारताने झुनोटिक रोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आंतर-क्षेत्रीय समन्वय कार्यक्रम सुरू केला आहे. याव्यतिरिक्त, भारताने भारतातील झुनोसेसचा सामना करण्यासाठी रोडमॅप (रोडमॅप फॉर कॉम्बॅटींग झूनोसेस इन इंडिया – आरसीझेडआय)विकसित केला आहे. या उपक्रमाचा उद्देश देशातील झुनोसेस नियंत्रित करण्यासाठी संशोधन पर्याय ओळखणे आणि त्यांना प्राधान्य देणे आहे.

ही कन्व्हेंशन जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत वापर यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे झुनोटिक रोगांचा उदय आणि प्रसार रोखण्यास मदत होते.

या संदर्भात, जी २० हा १९ देशांमधील सरकारे व केंद्रीय बँक गव्हर्नर आणि युरोपियन युनियन (ईयू) यांचा समावेश असलेला एक मंच आहे. हा मंच विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणण्यासाठी तसेच सहकार्य आणि झूनोसिसचा प्रतिबंध करण्यासाठीच्या बेस्ट प्रॅक्टीसेस (सर्वोत्तम पद्धतीं) ची देवाणघेवाण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. जी २० मध्ये संयुक्त पुढाकार, निधी यंत्रणा आणि धोरणात्मक चौकटींद्वारे झुनोटिक रोगांच्या मूळ कारणांचे निराकरण करण्यासाठी त्याच्या प्रभावाचा आणि संसाधनांचा फायदा घेण्याची क्षमता आहे.  जी २०  खाली दिलेल्या क्षेत्रांना समर्थन देऊ शकतो.

  • आरोग्य कर्मचारी, पशुवैद्य, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि मानव-प्राणी इंटरफेसमधील लोक आणि इतर संबंधित भागधारक यांच्यातील सहकार्याद्वारे मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य यांच्यातील परस्परसंबंधांवर डेटा संकलन आणि प्रसार यांच्याशी निगडीत प्रयत्न सुधारण्यासाठी आणि जलद निदानासाठी एक समग्र चित्र विकसित करण्यास मदत करते.
  • झुनोटिक रोगांवर पाळत प्रणाली मजबूत करण्यामध्ये अलार्म प्रणाली सुधारणे, प्रयोगशाळेची क्षमता वाढवणे आणि डेटा शेअरिंग व विश्लेषणास प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.
  • झूनोसिस प्रतिबंधासाठी संशोधन आणि विकास क्षमता वाढवण्यामध्ये प्राणीशास्त्र आणि प्राणिजन्य रोगांच्या महामारीविज्ञानावरील संशोधन तसेच लसी, निदान आणि उपचारांचा विकास समाविष्ट आहे.
  • शाश्वत पद्धतींचा प्रचार करणे ही झुनोसेस प्रतिबंधाची आणखी एक महत्त्वाची बाब आहे. यामध्ये जंगलतोड आणि अधिवासाचा नाश यासारख्या रोगाच्या उदयास कारणीभूत ठरणाऱ्या चालकांना संबोधित करणे समाविष्ट आहे.
  • जगभरात झुनोटिक रोगांसाठी प्रभावी प्रतिबंध आणि नियंत्रण उपायांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे गरजेचे आहे. यामध्ये आरोग्य आणि मानव-प्राणी इंटरफेसमध्ये क्षमता-निर्माण उपक्रमांना समर्थन देणे, गरजू देशांना तांत्रिक सहाय्य प्रदान करणे आणि आंतरराष्ट्रीय मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.

विविध उपाययोजना आणि करारांची अंमलबजावणी करण्यात येत असूनही, झुनोसेस प्रतिबंधासाठी सध्याची जागतिक प्रशासन रचना खंडित असल्याचे दिसून येत आहे. पाळत ठेवणे, संशोधन आणि विकास क्षमता वाढवणे, शाश्वत पद्धतींना चालना देणे आणि जागतिक स्तरावर प्रभावी प्रतिबंध आणि नियंत्रण उपायांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे यासाठी प्रयत्नांना पाठिंबा देऊन झुनोटिक रोगांना प्रतिबंध करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये जी २० महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.