Published on Oct 19, 2020 Commentaries 0 Hours ago

भारत-बांगलादेश सहकार्य साधले, तर दोघांनाही अमेरिका किंवा चीनवरील आर्थिक संकटाचा त्यांच्या अंतर्गत बाजारपेठांवर होणारा टोकाचा परिणाम टाळता येईल.

भारत-बांगलादेश एकीत दोघांचेही भले

कोविड-१९ या साथरोगामुळे जसे आरोग्याचे संकट आले, तसेच त्यासोबत एक मोठे आर्थिक संकट आले. आरोग्याच्या संकटामुळे जीवितहानी आणि आयुष्यभराचे नुकसान झाले. तर, आर्थिक संक्टामुळे विषमतेची मुळे अधिक खोलवर जाण्यापासून ते अन्न सुरक्षेत घट होण्यापर्यंत अनेक स्तरांवर, त्याचे परिणाम झाले आहेत. आज साथरोग काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतरही या उभ्या राहिलेल्या मोठ्या आर्थिक समस्या या संकटाची जखमा अधिक दुखऱ्या करतात. याचा सर्वाधिक फटका भारत आणि बांगलादेश यांच्यासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांना बसला आहे.

आज फक्त बांगलादेशा आणि भारताच्या जीडीपीबद्दल बोलण्याऐवजी, या दोन्ही देशांच्या एकत्रित वाटचालीबद्दल बोलणे आवश्यक आहे. कोविडोत्तर काळात भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांकडून अर्थव्यवस्था सावरण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यासाठी संघटनांच्या माध्यमातून प्रादेशिकतेकडे वळावे लागेल. जसे बहुक्षेत्रीय तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्यासाठी (बीआयएमएसटीईसी) घेतलेला बंगालच्या उपसागरासंबंधीचा पुढाकार; तसेच बांगलादेश, भारत, नेपाळ संबंधातील पुढाकार (बीबीआयएन) यांसारख्या गोष्टी देशांतर्गत अर्थव्यवस्था बलवान बनवण्याच्या दृष्टीने उभयतांसाठी मध्यम व दीर्घकाळासाठी लाभदायक ठरू शकतात.

याची मुख्यतः तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे, अमेरिका किंवा चीनसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांवर असलेल्या आर्थिक संकटाचा भारत आणि बांगलादेशासारख्या देशांतील अंतर्गत बाजारपेठांवर टोकाचा परिणाम होणार नाही. दुसरे म्हणजे, सध्याच्या स्थितीत चीनकडून पुरवठा साखळ्यांमध्ये अडथळे आले, तरी भारत आणि बांगलादेश ते टिकवून ठेवू शकतात. तिसरे आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, देशांतर्गत उत्पादनात आणि ग्राहकासंबंधी प्रक्रियेत कार्यक्षमता वाढावी, यासाठी दोन्ही देश प्रयत्न करीत आहेत.

बांगलादेश हा भारताचा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा विकसनशील भागीदार आहे. गेल्या दशकापासून द्विपक्षीय व्यापारही हळूहळू वाढत आहे. भारताकडून बांगलादेशाला २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ९ अब्ज २१ कोटी डॉलरची निर्यात करण्यात आली आणि याच काळात बांगलादेशातून भारतात १ अब्ज ४ कोटींची आयात करण्यात आली होती.

भारत व बांगलादेशातील व्यापारी संबंधांमध्ये वाहतूक संपर्क हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून वाहतूक कॉरिडॉर विकसीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नही केले जात आहेत. भारत आणि बांगलादेशादरम्यान बीबीआयएन मोटर वाहन कराराच्या (एमव्हीए) कार्यपद्धतीवर अलीकडेच चर्चा करण्यात आली. तसे झाले, तर शेजारी देशांच्या सहकार्याच्या दृष्टीने ते बाजी पालटवणारे ठरू शकते.

अलीकडेच कोलकाता बंदरावरून पहिल्यांदाच बांगलादेशातील चितगाँग बंदरमार्गे आगरतळा आणि आसाममध्ये माल पाठविण्यात आला. ही बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतादरम्यानची व्यापारी संपर्काची नवी सुरुवात होती. याबरोबरच, भारताने अलीकडे बांगलादेशाला १० रेल्वे इंजिन पाठवली होती. उभय देशांमधील आर्थिक उलाढालीत सुधारणा होत असल्याच्या दृष्टीने हा स्पष्ट संकेत मिळाला होता.

साथरोगाने आपल्याला काय शिकवले, असे विचारले तर एक गोष्ट सांगता येते, ती म्हणजे, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांवर नागरिक आणि सरकारांचा पूर्ण विश्वास असेल, तर आर्थिक हानीची तीव्रता कमी असते. भारत आणि बांगलादेशातील सुमारे ९० टक्के कामगार अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. गरीबांची आणि साथरोगामुळे उत्पन्न झालेल्या ताणामुळे गरीबीत ढकलल्या गेलेल्या नागरिकांची स्थिती सुधारण्यासाठी कामाच्या दिवसांत वाढ, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना (एमजीएनआरईजीएस), अधिकारांतील वाढ, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (पीडीएस) जागतिकीकरण, सामूहिक भोजनालये आदींचा उपयोग होऊ शकतो.

अन्य राज्यात कामासाठी आलेले श्रमिक मोठ्या संख्येने आपापल्या राज्यांमध्ये परतत असल्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक सुविधा निर्माण करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून ग्रामीण तारण बाजार आणि अल्पपतपुरवठा संस्थांच्या भूमिकेवर नजर टाकणे अत्यावश्यक बनले आहे. विशेषतः बांगलादेशासारख्या देशाला हे अधिक गरजेचे आहे, कारण या देशाची निम्मी लोकसंख्या त्यावरच अवलंबून आहे.

भविष्यकाळातील काम ही संकल्पना साथरोगामुळे वेगाने समोर आली आहे. कारण यंत्रांवरील अवलंबित्व वाढले आहे आणि मोठ्या प्रमाणात ऑफिसबाहेर काम सुरू झाले आहे. यामुळे करार पद्धतीने काम करणाऱ्या (गिग इकनॉमी) कर्मचाऱ्यांना संरक्षणाचा अभाव असल्याचे समोर आले आहे.

जागतिक स्तरावर डिजिटाझेशनकडे कल वाढला असल्यामुळे भारत आणि बांगलादेशाचे प्राधान्यक्रम सारखे आहेत. कारण दोन्ही देशांमध्ये कल्पकता दाखवणारे आणि बदल घडवून आणणारे तरुणच असतील. या परिवर्तनीय परिस्थितीत तरुणांना लाभ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तरुणच कल्पकता दाखवणारे आणि बदलाला वळण देणारे आहेत, डिजिटल जगासाठी आणि डिजिटल व आर्थिक उपलब्धीमध्ये (विशेषतः ग्रामीण लोकसंख्येसाठी) सुधारणा घडवून आणण्यासाठी कौशल्य व व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये गुंतवणूक ही डिजिटल जगासाठीची तयारी आहे. दोन्ही देशांतर्गत व देशांदरम्यान नव्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संशोधन, भागीदारी आणि विकास होण्यासाठी नवे पर्याय शोधणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.

भारत आणि बांगलादेश यांना आपापल्या अर्थव्यवस्थांचे एकात्मिकीकरणकरून जागतिक व प्रादेशिक मूल्यसाखळ्या आणखी मजबूत करण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. त्यामध्ये व्यापारी संपर्क साधनांमध्ये सुधारणा, वाहतुकीची साधने ही आर्थिक साधनांमध्ये परावर्तित करणे व सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि दक्षिण आशियायी विद्यापीठीय फेररचनेसारख्या एखाद्या पुढाकारातून संयुक्त संशोधन व कल्पकता दाखवण्याची संधी यांचा समावेश होतो.

योगायोगाने साथरोगाचा काळ हा मुजिब बोर्शो (बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष) दरम्यानच आला आहे. त्यामुळे भारत व बांगलादेशादरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी ही सशक्त संधी आहे. हे संबंध आर्थिक दृष्टिकोन, सांस्कृतिक समानता आणि बंगबंधुंचा वारसा यांवर उभे आहेत.

सारांश, कोविड-१९ च्या साथरोगामुळे जागतिक व स्थानिक अशा दोन्ही अर्थव्यवस्थांवर विध्वंसक परिणाम झाले आहेत. मात्र, त्याच वेळी त्याने,विकास आणि वाढीच्या मार्गाची फेररचना करून नजिकच्या भविष्यकाळात अधिक लवचिकप्रादेशिक अर्थव्यवस्था बनण्यासाठी भारत व बांगलादेशाला संधीही मिळवून दिली आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Prashant Pastore

Prashant Pastore

Prashant Pastore General Manager Water &amp: Sustainable Agriculture Solidaridad Asia

Read More +
Soumya Bhowmick

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick is an Associate Fellow at the Centre for New Economic Diplomacy at the Observer Research Foundation. His research focuses on sustainable development and ...

Read More +