Author : Sushant Sareen

Published on May 22, 2023 Commentaries 0 Hours ago

पाकिस्तानी लष्करात फूट पाडून इम्रान खान यांनी अशक्य आणि अस्वीकार्य वाटलेल्या गोष्टीला साध्य केल्याचे सध्या चित्र आहे.

राजकारणाने त्रस्त व महत्त्वाकांक्षेने प्रेरित पाकिस्तानी लष्कर

हा संक्षिप्त भाग Pakistan: The Unravelling या मालिकेचा आहे.

१२ मे रोजी रात्री उशिरा, पाकिस्तानी लष्कराचे अधिकृत प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी हे पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यांचे राजीनामे आणि बडतर्फीच्या अफवा दूर करण्यासाठी जिओ टीव्हीवर उपस्थित होते. ९ मे ला इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात पाकिस्तानी लष्कर आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. या पार्श्वभूमीवर फोर कॉर्प्सचे कॉर्प्स कमांडर आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. १२ मे रोजी युनायटेड किंगडममध्ये सध्याच्या लष्करी नेतृत्वाविरुद्ध अथक मोहीम चालवणाऱ्या एका माजी लष्करप्रमुखाने पाकिस्तान सरकारच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांची नावे उघड केली होती. इम्रान खान पंथाचा भाग असणारे इतर अनेक कॉर्प्स कमांडर गोळीबाराच्या मार्गावर होते आणि त्यांना लवकरच लष्करातून काढून टाकले जाईल अशी अफवाही पसरली होती. गेल्या काही दिवसांपासून वणव्याप्रमाणे पसरत असलेल्या अशा खळबळजनक ‘बातम्यांदरम्यान इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) प्रमुखांनी काहीसे चुकीचे स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामुळे परिस्थिती अजून बिघडण्याची चिन्हं आहेत.

पाकिस्तानी लष्करात फूट पाडून इम्रान खान यांनी अशक्य आणि अस्वीकार्य वाटलेल्या गोष्टीला साध्य केल्याचे सध्या चित्र आहे.

पाकिस्तानी लष्करात सारे अलबेल नाही हे स्पष्टच आहे. पाकिस्तानी लष्कर हे दुभंगलेले घर आहे ही काही ब्रेकिंग न्यूज नाही. गेल्या वर्षभरात तशा प्रकारच्या बातम्या तसेच दबक्या आवाजातील चर्चांमधून पाकिस्तानी सैन्यातील अगदी वरपासून वेगवेगळ्या पदामधील फूट स्पष्ट होत होती. यात ही फूट केवळ व्यक्तिमत्त्वावर आधारित नसून वैचारिक आणि राजकीयदृष्ट्याही आहे, असे सूचित करणारे काही आक्षेप आणि अनुमानही काढण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्करात फूट पाडून इम्रान खान यांनी अशक्य आणि अस्वीकार्य वाटलेल्या गोष्टीला साध्य केल्याचे सध्या चित्र आहे. जर आता जनरल असीम मुनीर लष्करामधील आपल्या अधिकारावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करत असतील आणि पाकिस्तानसारख्या देशात आपली कमांड आणि कंट्रोल सिस्टम पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत असतील, तर ही एक धोक्याची बाब ठरणार आहे.

या टप्प्यावर शिस्त लागू करण्यासाठी आणि लष्करप्रमुखांच्या अधिकाराची पुनर्स्थापना करण्यासाठी उचलण्यात आलेली कठोर पावले एकतर लष्करातील संकट वाढवू शकतील किंवा ते लष्कर प्रमुखांच्या मागे भक्कम आधार निर्माण करू शकतील. जर वर देण्यात आलेल्यां पैकी पहिली बाब घडली तर पाकिस्तानातील हे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. यात पाकिस्तानी लष्कराची संस्थात्मक अखंडता आणि सुसंगतता याचे अपरिहार्यपणे नुकसान होणार आहे. लष्करप्रमुखांची अवहेलना करण्यात जर या जनरल्सचा गट यशस्वी झाला, तर तो इतरांसाठीही एक वेगळा पायंडा पाडेल. असे जर झाले तर नागरी सरकारांविरुद्धच्या सत्तापालटांऐवजी लष्करप्रमुखांविरुद्धची सत्तापालट ही न्यू नॉर्मल गोष्ट ठरणार आहे. परिस्थिती अधिक ढासळली तर इस्लामाबादमध्ये कदाचित खार्तूमसारखे दृश्य दिसेल. परंतु जरी जनरल मुनीर यांनी अजून काही काळ तग धरल्यास, लष्करातील असंतोष अधिक स्पष्ट होईल व त्यांचा त्यांना नक्कीच फटका बसणार आहे.

याआधी, महत्वाकांक्षी जनरल्स सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्नात असतानाच कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. यात पाकिस्तानी लष्कराच्या शिस्त आणि एकतेवर प्रचंड ताण आला आहे. १९७१ च्या पराभवानंतर, कनिष्ठ अधिकार्‍यांनी अक्षरशः उघडपणे वरिष्ठांना शिवीगाळ केला होता ज्यामुळे त्यांना त्यांची पदे गमवावी लागली होती. १९७० च्या दशकात काही तरुण अधिकाऱ्यांनी लष्कराच्या नेतृत्वाविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली होती. १९९० च्या दशकाच्या मध्यात, मेजर जनरल झहीरुल इस्लाम अब्बासी यांच्या नेतृत्वाखालील अधिकार्‍यांच्या गटाने लष्करातील उच्चपदस्थांचा नायनाट करून सत्ता हस्तगत करण्याचा कट रचला होता. २००० च्या सुरुवातीस, हिजबुत तेहरीरशी संबंध असलेल्या असंतुष्ट अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यात इतर अधिकाऱ्यांमध्ये एका ब्रिगेडियरचाही समावेश होता.

जर आता जनरल असीम मुनीर लष्करामधील आपल्या अधिकारावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करत असतील आणि पाकिस्तान सारख्या देशात आपली कमांड आणि कंट्रोल सिस्टम पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत असतील, तर ही एक धोक्याची बाब ठरणार आहे.

लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या गटाचे किंवा पंथाचे सदस्य होऊ देता कामा नये, असे आयएसपीआरचे तत्कालीन महासंचालक मेजर जनरल अतहर अब्बास म्हणाले होते. आता वास्तविक तिच गोष्ट घडत आहे. सद्यस्थितीत, अधिकारी हे लष्कराशी निष्ठावान न राहता इम्रान खान पंथाशी एकनिष्ठ असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ आणि जनरल राहील शरीफ यांच्या विरोधात इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे प्रमुख आणि काही कॉर्प्स कमांडर्ससह जनरल्सच्या गटाने इम्रान खान यांच्या २०१४ मधील धरणं आंदोलनाचा वापर करून षड्यंत्र रचले होते. यात पंतप्रधान शरीफ हे राहिल शरीफ यांना पदच्युत करतील आणि लष्कर व शासन या दुहेरी राजवटीत बदल घडून येईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती.

हे सर्व कट अयशस्वी ठरले असले तरी, ते पाकिस्तानी सैन्यात, सत्ता बळकावण्याच्या मोहात पडलेल्या अधिका-यांची सततची समस्या अधोरेखित करणारे आहेत. असेच काहीसे चित्र सध्या पाकीस्तानात आहे. फक्त यावेळी, गोष्टी भूतकाळात घडलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या घडत आहे हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sushant Sareen

Sushant Sareen

Sushant Sareen is Senior Fellow at Observer Research Foundation. His published works include: Balochistan: Forgotten War, Forsaken People (Monograph, 2017) Corridor Calculus: China-Pakistan Economic Corridor & China’s comprador   ...

Read More +