Author : Shoba Suri

Published on Oct 30, 2023 Commentaries 0 Hours ago

हवामानामध्ये होणारे बदल पाहता शाश्वत अन्नप्रणालीची गरज निर्माण झाली आहे. ज्यामुळे पौष्टिक आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शाश्वत आहाराची हमी या निमित्ताने देता येणार आहे.

हवामानातील बदल जागतिक अन्नाची गरज आणि शाश्वत प्रणालींचे पालन पोषण

जगभरात वाढत जाणारी अन्नाची मागणी त्याबरोबरच हवामानातील बदल अशा दुहेरी आव्हानांमध्ये शाश्वत अन्नप्रणाली विकसित करणे आजची अत्यावश्यक गरज बनली आहे. हवामानात झालेले बदल दूरगामी परिणाम करणारे असतात. बदलत्या हवामानाच्या नमुन्यापासून ते वाढत्या हवामान आपत्तीपर्यंतचे घटक जागतिक अन्न सुरक्षेसाठी धोके निर्माण करतात. दुसरीकडे जगाच्या लोकसंख्येत दररोज भर पडत आहे. पर्यायाने अन्नाच्या उत्पादनामध्ये वाढ करणे आवश्यक झाले आहे. याशिवाय पारंपारिक कृषी पद्धती अनेकदा पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरणाऱ्या असतात ज्यामुळे हवामानाचे संकट आणखी वाढत जाते.

हवामान बदलाचे दूरगामी परिणाम, बदललेल्या हवामानाच्या नमुन्यापासून ते वाढलेल्या हवामानाशी संबंधित आपत्तींपर्यंत, जागतिक अन्न सुरक्षेला महत्त्वपूर्ण धोका निर्माण करतात.

ग्लोबल साऊथमधील शेतीचा विचार केल्यास येथील शेती मोठ्या प्रमाणात टिकून राहिली आहे असे नाही. तेथील जमिनीतील सेंद्रिय उत्पादनक्षमतेत घट झाली आहे. दररोज वाढणाऱ्या अन्नाच्या वाढत्या मागणीमुळे जमिनीचे शोषण, टिकाऊ खतांचा वापर, जमिनीत होणारे बदल, जनुकीय सुधारित पिकांचे उत्पादन या सर्वांचा पर्यावरणावर आणि नैसर्गिक परिसंस्थेच्या चक्रात नकारात्मक परिणाम झालेला दिसत आहे. हरितगृह वायू उत्सर्जन (GHGe), पर्यावरणातील प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास, मातीची ढासळलेली गुणवत्ता, नैसर्गिक भांडवलाचा नाश अशा अनेक नकारात्मक परिणामांमध्ये वाढ झालेली अलीकडच्या काळामध्ये दिसत आहे

2020 मध्ये, उपासमारीने ग्रस्त लोकांची संख्या 720 दशलक्ष ते 811 दशलक्ष इतकी होती. 2014 आणि 2019 मध्ये तातडीने काही बदल झाल्यानंतर, कुपोषणाचा दर 2020 मध्ये सुमारे 9.9 टक्के झाला, जो मागील वर्षी 8.4 टक्के होता. जगाची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि अन्नाची वाढती मागणी यामुळे पशुधन, पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कीटकनाशके आणि खतांचा अतिवापर होत आहे. रासायनिक कीटकनाशके आणि इतर पीक संरक्षण उपाय नसताना जगातील ५० टक्क्यांहून अधिक पिके कीटक, तण आणि रोगांमुळे नष्ट होतात. पिकांचे प्रति एकर उत्पादन झपाट्याने कमी होणे अपेक्षित असल्याने पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नैसर्गिक परिसंस्थेला त्रास होईल, मातीची धूप आणि झीज यामुळे मातीची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता आहे. पर्यायाने प्रजातींचे अधिवास धोक्यात येणार आहेत. ऍग्रोकेमिकल्सच्या वापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी गंभीर धोके समोर आले आहेत. उत्पादन वाढीसाठी रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे अन्नाची जैव रासायनिक रचना बदलते. त्याचा परिणाम मानवी शरीरावर दिसू लागतो. अतिसार, कर्करोग, न्यूरोलॉजिकल आजार, पुनरुत्पादन क्षमतेच्या प्रणालीतील बदल, विकासाच्या समस्या, श्वसनाची हानी यासारखे बरेच बदल होण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक परिसंस्थेला त्रास होईल, मातीची धूप आणि झीज यामुळे मातीची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता आहे. पर्यायाने प्रजातींचे अधिवास धोक्यात येणार आहेत.

जैविक आणि अजैविक कृषी घटकांच्या दृष्टीने अन्नसुरक्षेच्या बाबतीत हवामान बदलांचे परिणाम तितकेच लक्षणीय आहेत. वायु प्रदूषण, कुपोषण आणि तापमानातील झालेली कमालीची तफावत, कीटक आणि माती यासारख्या अजैविक घटकांचे पोषण, अन्नसुरक्षा या घटकांवर निश्चितच परिणाम होतो. याशिवाय पिके, कीटक, तण, परागकण यांच्यातील परस्पर संबंध हवामान बदलामुळे विस्कळीत झाले असून परिसंस्थांवर त्याचे परिणाम झालेले आहेत. अन्न उत्पादन आणि हवामान यांच्यातील संबंध खालील आकृतीमध्ये स्पष्ट केले आहेत.

                                                                     The food system and climate change interaction

अन्न प्रणाली आणि कृषी उद्योग या दोन्ही क्षेत्रांवर साथीच्या रोगाचा मोठा परिणाम झालेला आहे. जागतिक स्तरावर अन्न असुरक्षितता कुपोषण आणि भूक वाढलेली आहे. याचे कारण म्हणजे अन्नपुरवठा साखळीमध्ये आलेला व्यत्यय, उपजीविकेची हानी, जातीय विषमता, अन्नातील विसंगता, किमतीतील तफावत यासारख्या घटकांमुळे हा परिणाम झालेला दिसतो. अन्न सुरक्षा आणि लैंगिक समानता’ या FAO च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर पुरुष आणि महिलांच्या अन्नसुरक्षेतील दरी वाढत आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये, अंदाजे 828 दशलक्ष लोक भुकेले होते, ज्यामध्ये 150 दशलक्ष महिलांना पुरुषांपेक्षा जास्त अन्न असुरक्षिततेचा अनुभव येत होता. साथीच्या रोगामुळे महिलांमध्ये सक्तीने बंदिस्त ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच वैवाहिक अत्याचाराचा धोका वाढला आहे. महिलांच्या कृषी क्रियाकलापांवर विशेषतः परिणाम झाला आहे, ज्यामध्ये मजूरी कमावणारे, शेतकरी आणि अन्न विक्रेते हे सर्व अन्न प्रणालींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

कृषी उत्पादनामध्ये गेल्या दशकात वार्षिक  2.5-3 टक्के दराने वाढ झाली आहे. दक्षिण आशियातील लोकसंख्येमध्ये दरवर्षी 1.5 टक्के वाढ झाली आहे. कृषी क्षेत्रातील वाढीमुळे या प्रदेशाला पुरेशा प्रमाणात अन्नाची सुरक्षितता प्रदान करण्यात आली आहे. या प्रयत्नांना न जुमानता, दक्षिण आशियाई ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) हा ग्रहावरील सर्वात गंभीर आहे. उप-सहारा आफ्रिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वीस वर्षांत प्रगती झाली असली तरी, सहस्राब्दीच्या प्रारंभी GHI 38.2 वरून 2020 मध्ये 26 पर्यंत घसरले आहे (अजूनही 20-34.9 च्या प्रमाणात “गंभीर”), पूर्वीच्या तुलनेतही थोडी सुधारणा आहे असे म्हणता येईल. 42.7 चा मागील स्तर. याच कालावधीत, उप-सहारा आफ्रिकेचा GHI 27.8 वरून 27.8 पर्यंत कमी झाला, तर युरोप आणि मध्य आशियाचा GHI 10-19 च्या स्केलवर 13.5 वरून 5.8 पर्यंत कमी झाला. अहवालातील डेटा असे सूचित करतो की दक्षिण आशिया अजूनही अनवितरणाच्या दीर्घकालीन समस्यांची लढा देत आहे.

अन्न उद्योग जगाच्या हरितगृह वायू उत्सर्जनात (GHG) 30% आणि गोड्या पाण्याच्या वापरात 70% योगदान देतो.

पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या जमिनीपैकी 40% पेक्षा अधिक जमीन आता शेतीसाठी वापरली जात आहे. या ग्रहावरील कृषी प्रणाली ही सर्वात मोठी स्थानीय परिसंस्था झाली आहे. अन्न उद्योग जगाच्या हरितगृह वायू उत्सर्जनात (GHG) 30% आणि गोड्या पाण्याच्या वापरात 70% योगदान देत आहे. जैवविविधतेच्या हानीच्या कारणांची चिकित्सा केल्यास लक्षात येते की, अन्न उत्पादनासाठी जमिनीच्या वापरातील बदल झाले आहेत. इतर खाद्य श्रेणीच्या तुलनेत प्राणी उत्पन्नित अन्न जसे मास, प्रत्येक सर्व्हिंगमध्ये तुलनेने उच्च पर्यावरणीय प्रभाव असतात. या प्रभावांमध्ये जैवविविधता नष्ट होणे, जमिनीचा वापर आणि GHG उत्सर्जन यांचा समावेश होतो. 2050 पर्यंत निरोगी आहाराकडे जाण्यासाठी SDGs आणि पॅरिस कराराची पूर्तता करण्यासाठी आहारातील महत्त्वपूर्ण बदल आवश्यक असणार आहेत.

या वाढत जाणाऱ्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी पर्यावरणीय सामाजिक आणि आर्थिक परिणामांमध्ये सुसंवाद साधणाऱ्या अन्न उत्पादन वितरण प्रणाली मध्ये परिवर्तनाची गरज आहे. हवामानातील बदलाशी सुसंगत असलेल्या शाश्वत आहाराची हमी देण्यासाठी पौष्टिक आणि विकसित परिसंस्था अन्नप्रणालीची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे. ग्लोबल साउथ साठी ही गोष्ट अधिक महत्त्वाची ठरत आहे. अन्नप्रणाली आणि हवामान बदल यांच्यातील दुतर्फा कार्यकारणभाव आणि त्यांचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेणे आवश्यक आहे. अन्न मूल्य साखळीत महिलांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अन्न आणि पोषण सुरक्षेची दुहेरी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शाश्वत अन्नमूल्य श्रृंखला तयार करणे, अन्न प्रणालीच्या परिवर्तनासाठी लैंगिक समानता लागू करणे आवश्यक आहे.

शोबा सुरी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये वरिष्ठ फेलो आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.