Published on Jan 06, 2020 Commentaries 1 Days ago

भारतापुढे धोका आहे तो चीनी विकासाच्या मॉडेलच्या आकर्षणाचा. जितक्या जलद गतीने या आकर्षणातून बाहेर पडू तेवढे आपल्यासाठी फायद्याचे ठरेल.

‘चीनी मॉडेल’चे आकर्षण धोकादायक

सुमारे एका दशकापूर्वी जेव्हा मी तज्ज्ञ समितीचा एक नवनिर्वाचित सदस्य होतो, तेव्हा आम्ही काही परदेशी शिष्टमंडळाना निमंत्रण द्यायचो. यापैकी एका शिष्टमंडळाशी झालेली चर्चा आजही स्मरणात आहे. हे शिष्टमंडळ चीनहून आले होते. तेही २००९ साली जेव्हा जागतिक मंदीच्या लाटेतून इतर अनेक देशांच्या तुलनेत चीन बऱ्यापैकी सावरला होता. दुसरी बाब म्हणजे जागतिक महासत्ता असल्याच्या आपल्या सामर्थ्याचीही त्याला जाणीव झाली होती. या शिष्टमंडळातील एका चीनी प्रतिनिधीशी लेखकाचे झालेल्या संभाषणाने ‘त्यांचे मॉडेल’ आणि ‘आपले मॉडेल’ यावर विचार करायला भाग पाडले.

हा प्रतिनिधी, जो तिशीच्या उंबरठ्यातील एक तरुण होता, त्याने आम्हा भारतीयांना याची जाणीव करून दिली की, भारतातील शासन कारभाराचे जे मॉडेल आहे ते काहीही उपयोगाचे नाही. विशेषत: जर भारतातील एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्या लोकसंख्येला पुरेसे अन्न देखील मिळत नसेल तर हे मॉडेल अपयशी आहे. अर्थातच आम्ही तज्ज्ञ समितीतील जे तरुण होतो, त्यांनी याला प्रत्युत्तर दिले की, हा जो डाटा आहे तो चुकीचा आहे. भलेही एका दशकापूर्वी अशी स्थिती असेल पण, येथे लोकशाही आहे. तसेच आम्हाला असा विश्वास वाटतो की एक ना एक दिवस आम्ही या नोकरशाहीच्या आणि इतर प्रकारच्या निष्क्रियतेतून बाहेर पडू आणि जलदगतीने विकास साधण्याच्या मार्गावर असू.

ही चर्चा मी एका आदरणीय आणि अनुभवी मुत्सद्दी व्यक्तीपर्यंत पोहचवली. ते म्हणाले की, विकसित, सर्वसमावेशक आणि लोकशाही देश असलेला भारत हा दीर्घकाळापासून चीनी दृष्टिकोनासाठी असणारा एक मोठा धोका आहे. एकावेळी एक अडथळा पार करत, आपण याच दिशेने आपली वाटचाल सुरु ठेवली पाहिजे. आपण जे भारतीय मॉडेल जाणतो ते हे आहे आणि लांब पल्ल्याच्या शर्यतीत हेच मॉडेल यशस्वी ठरू शकते. भारताच्या या मॉडेलचे आपण रक्षण केले पाहिजे, त्याचे जतन केले पाहिजे आणि ते अधिक मजबूत होईल यासाठी संघर्षही केला पाहिजे.

अर्थात, गेल्या दशकात आपण जितकी अपेक्षा ठेवली होती तेवढी प्रगती करू शकलो नाही हे सत्य आहे. अनेकविध आणि परस्परव्याप्त अधिकारशाही, कोल, स्पेक्ट्रम आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचार, सरकारी अपयश, आरोग्य आणि पायाभूतसुविधांच्या बाबतीतील धोरणांची मंदगतीने होणारी अंमलबजावणी, संरक्षण मिळवण्याची आणि स्वदेशीकरणाची किचकट प्रक्रिया, अशा अनेक समस्या होत्या. २०१४ च्या जनादेशातून हे दिसून आले, हा बदल ‘सबका साथ सबका विकास’ यासाठीच होता असे मानले जात होते.

आज, आपण पाहतो आहोत की, देशभरात द्वेष आणि असुरक्षितता हातपाय पसरत आहे आणि देशातील सर्वसमावेशकतेला टप्प्याटप्प्याने आव्हान दिले जात आहे. सीमेपलीकडील गुप्तचर संस्थांचे काम आम्ही अधिक सोपे करत आहोत. खरे तर, ज्या युक्तीवादातून फाळणीचा जन्म झाला त्यासाठी आपण पहिल्यांदा कायदेशीर वैधता निर्माण करत आहोत आणि पूर्वी कधीही ठरवले गेले नाही, इतके आपण जिनांना योग्य ठरवत आहोत.

आज आपण अशा परिस्थिती आहोत जिथे ”चायना डेली” सारखी वृत्तपत्रे भारतातील इंटरनेट बंदीच्या मुद्याला उचलून असा युक्तीवाद करत आहेत की, “स्वतंत्र देशासाठी ही एक सामान्य बाब आहे.”. आपण इथपर्यंत कसे पोचलो? हा प्रश्न नक्कीच उपस्थित केला गेला पाहिजे. या प्रश्नांचे उत्तरही सोपे आहे आणि “सामान्य” या संज्ञेच्या विस्तृत होत जाणाऱ्या व्याख्येशी याचा संबंध आहे. मला हे सांगताना अजिबात संकोच वाटत नाही की, आपल्या देशातील दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्याला एक-एक पाउल ढकलत आज जिथे आपण आहोत तिथपर्यंत आणले आहे आणि यासाठी तेच जबाबदार आहेत.

कॉंग्रेसच्या काळातही पत्रकार आणि व्यंगचित्रकार यांच्यावर बंदी आणली जायची, पण सध्याच्या सत्तेने देशद्रोही शब्दाची व्याख्या थोडी व्यापक करत त्या प्रक्रियेला आणखीन प्रगतीपथावर नेले आहे. किती लोक देशद्रोही असा शिक्का बसल्याने शाळा किंवा कौटुंबिक व्हॉट्सपअॅप ग्रुपमधून बाहेर पडले असतील, याचे अगणित अनुभव असतील. प्रस्तुत लेखक देखील त्याच यादीचा एक भाग आहे!  येथे पूर्वीदेखील झुंडीकडून होणारे खून होते, पूर्वीदेखील इथे बंदी होती आणि ईदविरुद्ध दिवाळीला होणारा वीजपुरवठा यावरून निवडणुकांच्या सभा गाजायच्या. परंतु, सध्याचे सरकार आणि त्यांच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयावर निदर्शने करण्याची वेळ येईपर्यंत आणि भारताच्या एकाच भागात वारंवार होणारे मृत्यू घडेपर्यंत, अशा घटनांवर एक तर आम्ही हसत होतो किंवा अशा घटनांना वेडेपणा समजत होतो.

आम्ही देशद्रोही असण्याची व्याख्या व्यापक केली ज्यामुळे एखाद्याला या प्रकारात मोडणे सगळ्यांनाच सोपे जाईल आणि देशभक्तीला राष्ट्रवाद आणि भारतीयत्वाचा रंग देत त्या संकल्पनेची व्याख्या अधिक संकुचित केली. राष्ट्रवादी आणि “इतर” यातील फरक आपण खूपच तीव्र केला आणि इतर असणाऱ्यांसाठी आपण कठोर शिक्षा देऊ लागलो. भारतीय आदर्श या संकल्पनेबाबत आपण अपयशी ठरलो, जी अधिक समावेशक आणि स्वागतार्ह आहे असा समज होता. असा आदर्श ज्याला कधीच इतरांना भयभीत करताना पहिले गेले नाही, उलट रविंद्रनाथ टागोरांच्या भाषेत हा आदर्श इतरांना नेहमी समृद्ध करत आला आहे.

मजबूत लोकशाही, त्यासोबत जागतिक पातळीवर स्वतःचे पक्के स्थान असणारा वारसा आणि सर्वसमावेशक विकासाचे भारतीय मॉडेल हे आशियातील एक बोलके उदाहरण मानले जाते. या सर्वाला अलीकडे खेदजन्य पद्धतीने आव्हान दिले जात आहे. परंतु रस्त्यावर उतरलेली जनता कायद्याची प्रक्रिया पुनर्स्थापित करेल, जो भारतीय आदर्शांच्या तर्काशी फारकत घेणारा नसेल, असा विश्वास ठेवायला हरकत नाही.

असाच एक गंभीर धोका, जो लेखकाला अनेकदा जाणवला आहे आणि तो आहे चीनी विकासाच्या मॉडेलचा धोका. भारतात चीनसारखे सरकार हवे या आकर्षणामुळे सध्या भारतीय समाजात मोठी फूट पडलेली दिसते. जितक्या जलद गतीने आपण या आकर्षणातून बाहेर पडू तितकेच ते आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. तर, ही आकर्षणे कोणती आणि ती कशी ओळखायची?

माझ्या मते हे तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्यरत आहे, ज्याबद्दल गेल्या दोन वर्षात ऐकले असेलच. एक आहे, “चीनच्या शिजीयांग या मुस्लीम प्रांतातील असंतोषावर चीनने चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवले आहे”. परंतु, असा दावा करणारे हे समजून घेत नाहीत की, याचा अर्थ असा नाही की चीनमधील इतर प्रांत चीनी वैशिष्ट्यांशिवाय समृद्ध होऊ शकतात आणि हे कशाप्रकारे चालते हे चांगलेच ठावूक आहे. दुसरा आहे, शांघाई आणि शेंझेन प्रांतात जाणाऱ्या नवप्रवाश्यांचा दावा, जे म्हणतात, “चीनी नागरिक किती शिस्तप्रिय आहेत!” ते हे विसरतात की तिथल्या नागरिकांना सरकारी देखरेखीखाली काम करावे लागते. असे सरकार जे काहीही विसरत नाही आणि जे कधीही माफ करत नाही, याच श्रेणीत चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरणाविषयी असणाऱ्या आकर्षणाचा देखील समावेश करता येईल जो इथल्या सत्ताधारी वर्गात अधिक लोकप्रिय आहे.

तिसरा दावा, अर्थातच जो कित्येक वर्षे झाली ऐकण्यात येतोय, तो म्हणजे “अगदी थोडक्या मंजुरीसह विमानतळ सारख्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होतील अशी व्यवस्था चीनमध्ये आहे.” अर्थातच याचे उत्तर थोडेसे दीर्घ असेल, भ्रष्टाचाराला आर्थिक वैधता देण्यापासून ते पर्यावरण आणि विषमता अशा गोष्टींचा समावेश यात होईल. आता या प्रत्येक उदाहरणानानंतर, “भारतानेही असे काही तरी, करायला हवे” असे ऐकल्याची आणि त्याने किती भयावह परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना करा! चीनपासून धडे घेण्याची कल्पना मांडताना कोणीही या परिणामांची कल्पना करीत नाही. प्रत्येकाला क्रांतीचा हिस्सा बनवण्यासाठी ज्या चीनने प्रदीर्घ काळापासून आपल्या इतिहासापासून फारकत घेतली, त्या चीनमधील सुरुवातही अशी नव्हती.

चीनी कम्युनिस्ट पक्षाची मध्यवर्ती भूमिका पक्की करण्यासाठीच चीनच्या यशाच्या कथा रचल्या गेल्या आहेत. भारतात सरकारे येतात आणि जातात, त्यांना अपयशी ठरण्याची देखील संमती दिली जाईल आणि त्याच पद्धतीने ते स्वीकारले  देखील जातील. आपले शत्रू आणि इतरांबद्दल पुन्हा पुन्हा कल्पना करून आपल्याला इतिहासापासून फारकत घेण्यास मज्जाव करण्यापेक्षा नि:संशयपणे ही एक चांगली कल्पना आहे. असा मार्ग जो आपल्याला पुढे तर जाऊ देत नाहीच पण, जो आपल्याला फोडा आणि राज्य कराचे भय दाखवत राहतो.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.