Published on Sep 20, 2023 Commentaries 0 Hours ago
मार्बर्ग विषाणू साथरोगाचा उद्रेक : केवळ हिमनगाचे टोकच?

इक्वेटोरिअल गिनी येथे मार्बर्ग विषाणूचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सामूहिक आरोग्य’ आणि संसर्गजन्य साथरोगांशी एकत्रितपणे सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यासंबंधीचा दृष्टिकोन असणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मार्बर्ग विषाणूच्या संसर्गाचा मृत्यूदर ५० टक्के असल्याने सर्व जगाचे लक्ष त्याकडे लागले आहे. उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) संशोधन व विकास ब्लूप्रिंटकडून उद्रेकासंदर्भाने संशोधनाचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र १९६७ (आकृती १)पासून मार्बर्ग विषाणूच्या संसर्गाने तुरळक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असूनही या संसर्गावर अद्याप कोणतेही विशेष उपचार किंवा लस उपलब्ध नाही; तसेच संसर्गाचा फैलाव झालेल्या रुग्णांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे जागतिक स्तरावर आरोग्यविषयक धोक्याची पातळीही वाढते. उदाहरणार्थ, इबोलाच्या उद्रेकादरम्यान रुग्णांसदर्भाने काळजी घेण्यात कोणते अडथळे येतात, या विषयावर अभ्यास करण्यात आला असता, औषधादी साहित्य व मनुष्यबळाची कमतरता, उपचारकेंद्रांच्या संघटनात्मक रचनेचा अभाव आणि धोरणात्मक कच्च्या दुव्यांमुळे साथरोग हाताळण्याची परिणामकारकता कमी होते, असे दिसून आले. मंकीपॉक्स किंवा मार्बर्ग विषाणूच्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर आपली आरोग्य व्यवस्था ताकदवान करण्यासाठी जागतिक समुदाय साथरोग करार करण्यासाठी वाटाघाटी करीत आहे. भविष्यकाळातील साथरोगाच्या धोक्यांचा विचार करणारा हा एक आंतरराष्ट्रीय करार असेल.

Figure 1Timeline of MVD outbreak.
C: number of cases; D: number of deaths; DRC: Democratic Republic of Congo

मार्बर्ग उद्रेकामुळे नव्याने येणाऱ्या आणि पुन्हा उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांच्या धोक्यांना समन्वयाने आणि एकत्रितपणे सामना करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. चारपैकी तीन साथरोग हे प्राण्यांपासून माणसांमध्ये संक्रमीत होणारे आहेत, असे शास्त्रज्ञ सांगतात. प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी ‘इंटिग्रेटेड व्हेक्टर मॅनेजमेंट मॉडेल’सारख्या उपाययोजनांसह माहितीपूर्ण निर्णय, क्षमतावृद्धी व एकत्रित प्रयत्न हे प्रमुख घटक उद्रेक रोखण्यासाठी अवलंबण्यात येऊ शकतात. उदाहरणार्थ, मार्बर्ग विषाणूच्या प्रसारासाठी जबाबदार असणारे प्राथमिक माध्यम म्हणजे ‘रोसेटस एजिप्टीआकस’ या प्रकारचे वटवाघुळ. या वटवाघळात विषाणूंचा जणू साठाच असतो आणि खूप जवळून संपर्कात येणाऱ्या मानवात ते संक्रमीत केले जातात. ‘इंटिग्रेटेड व्हेक्टर मॉडेल’चा वापर माध्यमांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो. याचा अर्थ, अधिवास वेगळे करणे किंवा लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी जैविक नियंत्रण आदी उपाय. अशा उपायांमुळे वटवाघळाकडून मानवाकडे संक्रमण होण्याचे चक्र खंडीत करण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे उद्रेक आणि पुन्हा साथ येण्याचा धोका दूर करण्यासाठी साथरोगाची प्रकरणे व संशोधन आणि नियंत्रण उपायांवर सातत्याने देखरेख करणे आवश्यक असते. मार्बर्ग विषाणूच्या संक्रमण पद्धतीसंबंधात अधिक अचूक माहिती मिळवण्यासाठी सतत जागरूक राहून माहिती एकत्रित केल्याने पुढील फैलाव रोखण्यासाठी लक्ष्य ठेवून माहितीचा वापर  करणे आपल्याला शक्य होऊ शकेल.

‘इंटिग्रेटेड व्हेक्टर मॉडेल’चा वापर माध्यमांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो. याचा अर्थ, अधिवास वेगळे करणे किंवा लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी जैविक नियंत्रण आदी उपाय. अशा उपायांमुळे वटवाघळाकडून मानवाकडे संक्रमण होण्याचे चक्र खंडीत करण्यास मदत होऊ शकते.

सामूहिक उपाययोजना आणि आंतर क्षेत्रीय समन्वय या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवणारे कर्मचारी, बाधित समूह आणि उपेक्षित गटांसह अशा उद्रेकामुळे सर्वाधिक बाधित झालेल्यांचे म्हणणे ऐकून घेणेही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकेचे साथरोग नियंत्रण व संरक्षण केंद्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांच्या साह्याने साथरोगाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याचा फैलाव रोखण्यासाठी एकत्रितपणे काही उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. त्यामध्ये देखरेखीसाठी सहकार्य, सामूहिकरीत्या उपाय, रुग्णांचे व्यवस्थापन, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, संसर्गावर नियंत्रण, आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि सुरक्षित अंत्यसंस्कारासाठी मदत आदी उपाययोजनांचा समावेश आहे. आणखी एक परिणामकारक मार्ग म्हणजे, आपल्या आरोग्यसेवा पद्धतींमध्ये असलेल्या रचनात्मक असमानता दूर करणे. त्यामध्ये आरोग्यसेवेचा असमान पद्धतीने लाभ, सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांना पुरवण्यात येणारा अपुरा निधी आणि आरोग्यसेवेच्या अपुऱ्या पायाभूत सुविधा यांचा समावेश होतो.

याशिवाय, जागतिक स्तरावर आरोग्यविषयक धोकादायक परिस्थिती हाताळण्यासाठी साथरोग करार करण्याची गरज मार्बर्ग विषाणूच्या उद्रेकाने अधोरेखित केली आहे. साथरोग करार हा एक आंतरराष्ट्रीय करार असून या कराराचा उद्देश वेगवेगळ्या देशांमध्ये अधिक सहकार्य आणि समन्वय वाढवून जागतिक स्तरावरील आरोग्यविषयक धोक्यांशी सामना करणे, हे आहे. भविष्यात येणाऱ्या संभाव्य आरोग्यविषयक आणीबाणीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सर्वच देशांकडे आवश्यक स्रोत, साधने आणि अभ्यास आहे, याची खात्री करून या आव्हानांशी सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार हे एक अत्यावश्यक साधन आहे. या करारामुळे भविष्यातील आरोग्यविषयक आणीबाणीसाठी सज्जता आणि उपाययोजनांसाठी एक आराखडा तयार करता येईल, माहितीची देवाणघेवाण करण्याचा पुरस्कार करता येईल आणि लस व अन्य वैद्यकीय स्रोतांचे समान वाटप करण्यासाठी योग्य यंत्रणेची स्थापना करता येईल. साथरोग करारामुळे प्रवाहाबाहेरील समाजाचे आणि साथरोग उद्रेकामुळे बाधित झालेल्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेण्यास मदत होईल. निर्णय प्रक्रियेत त्यांना प्राधान्याने समाविष्ट करून घेता येईल. त्यामुळे अशी परिस्थिती हाताळताना लक्ष्यीत, प्रभावी आणि समान प्रयत्न केले जातील, याची खात्री हा करार देऊ शकेल.

भविष्यात येणाऱ्या संभाव्य आरोग्यविषयक आणीबाणीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सर्वच देशांकडे आवश्यक स्रोत, साधने आणि अभ्यास आहे, याची खात्री करून या आव्हानांशी सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार हे एक अत्यावश्यक साधन आहे.

कोविड-१९ साथरोगाने हिमनगाचे केवळ टोक दिसले आहे. कोविडपूर्व आरोग्य व्यवस्थेची दुर्बलता प्रकाशात आणली आहे. साथरोगाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही समूहामध्येच होते. त्यामुळे जोपर्यंत प्रत्येक जण जेव्हा सुरक्षित असत नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित राहू शकत नाही, याची या करारामध्ये जाणीव आहे. साथरोग कराराचा शून्य मसुद्यामध्ये प्रशासनाच्या सर्व स्तरांवर निर्णय घेताना जलद अहवाल व पारदर्शकतेसह स्रोतांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने चाचण्या अधिक समन्वयाने आणि पारदर्शकतेने होण्यासाठी काही निर्देश दिले आहेत. उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टीने अधिक योग्य चाचण्या घेतल्या जाव्यात आणि संशोधन करताना वाया जाण्याचे प्रमाणही कमी असावे, या मुद्द्यांचा करारामध्ये समावेश असावा. संसर्गजन्य रोगांचे सातत्याने होत असलेले संक्रमण आणि पुन्हा पुन्हा उद्भव यांमुळे आपण सामना करीत असलेला हा काही शेवटचा संसर्गजन्य रोग नाही, हे लक्षात येते. त्यामुळे जागतिक आरोग्य सुरक्षेसाठी सर्वसमावेशक, समान आणि न्याय्य अशी एक भक्कम बहुराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आता आली आहे. आता प्रश्न उरतो, की सध्याच्या आरोग्य व्यवस्थेतील प्रश्न नीट सोडवण्यासाठी आणि अधिक चांगल्या भविष्यासाठी देशांना सज्ज करण्यासाठी हा साथरोग करार पुरेसा सबळ असेल का?

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Viola Savy Dsouza

Viola Savy Dsouza

Miss. Viola Savy Dsouza is a PhD Scholar at Department of Health Policy Prasanna School of Public Health. She holds a Master of Science degree ...

Read More +
Jestina Rachel Kurian

Jestina Rachel Kurian

Mrs. Jestina Rachel Kurian is a research scholar at Prasanna School of Public Health pursuing her Ph.D. in data science related to biomedicine. She has ...

Read More +
Lada Leyens

Lada Leyens

Dr Lada Leyens has a background in human genetics health economics and personalized medicine. She has worked at Health Authorities for over 8 years mainly ...

Read More +
Sanjay Pattanshetty

Sanjay Pattanshetty

Dr. Sanjay M Pattanshetty is Head of theDepartment of Global Health Governance Prasanna School of Public Health Manipal Academy of Higher Education (MAHE) Manipal Karnataka ...

Read More +