-
CENTRES
Progammes & Centres
Location
सायबर क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी आणि सायबर सुरक्षेच्या समस्यांना प्राधान्य देण्यासाठी जागतिक भागीदारीचे नेतृत्व करण्याची भारताकडे आता संधी आहे.
1 डिसेंबर 2022 रोजी भारताने G20 चे अध्यक्षपद स्वीकारले. G20 ही परिषद जगातील सर्वात मोठ्या 20 अर्थव्यवस्थांना एकत्र आणते. रशिया-युक्रेन संघर्षामुळे आणि कोरोनाच्या महामारीमुळे सुस्तावलेली अर्थव्यवस्था आणि वाढलेल्या भू राजकीय तणावामुळे गेल्या दोन वर्षांत G20 चे प्राधान्यक्रम बदलले आहेत. भारतासाठी, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, हवामान बदल, शाश्वत विकास, पुरवठा साखळीमधील आणि सुधारित बहुपक्षीयता हे मुद्दे प्राधान्याचे असतील. या परिषदेच्या निमित्ताने जग एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात स्थिरावत असताना भारत महत्त्वाच्या क्षेत्रांत पुढाकार घेऊ शकतो.
यापैकीच एक महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि ते अत्यंत अस्थिर राहिले आहे. ते म्हणजे सायबर सुरक्षा. सुरक्षित सायबर स्पेसची अत्यंत आवश्यकता आहे कारण सायबर हल्ल्यांची संख्या आणि त्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: गंभीर पायाभूत सुविधांमध्ये घातपाती वाढ झाली आहे. रॅन्समवेअर हल्ल्यामुळे नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (AIIMS) सतत व्यत्यय येणं हे त्याचं ताजं उदाहरण आहे.
2022 च्या मायक्रोसॉफ्ट डिजिटल संरक्षण अहवालानुसार, राष्ट्रीय पातळीवरच्या आवश्यक पायाभूत सुविधा, विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, वित्तीय सेवा, वाहतूक व्यवस्था आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी अधिकाधिक अत्याधुनिक सायबर हल्ले होत आहेत.
या धोक्यांचा परिणाम मोठा आहे. पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक डिजिटल क्षेत्रांना यामुळे मोठा धोका संभवतो. सरकारी सेवांचे वितरण करणाऱ्या यंत्रणांवर याचा परिणाम झाला तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. म्हणूनच सायबर-सुरक्षित महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि डिजिटल सार्वजनिक प्लॅटफॉर्म राष्ट्रीय सुरक्षा हे उत्तम प्रशासन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
G20 परिषद ही पायाभूत सुविधा आणि डिजिटल सार्वजनिक प्लॅटफॉर्मची सायबर सुरक्षा आणि अखंडता निश्चित करण्यात योगदान देऊ शकते. य़ामुळेच 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखालील डिजिटल अजेंडामध्ये सायबरसुरक्षेवर भर असणं आवश्यक आहे.
आपण इंटरनेट अर्थव्यवस्थेच्या युगात राहतो आणि यामध्ये संधी आणि आव्हाने दोन्हीही आहेत यावर 2015 मध्ये झालेल्या अंटाल्या (तुर्कस्तान) G20 शिखर परिषदेत जागतिक नेत्यांनी सहमती दर्शवली. 2016 मध्ये या परिषदेचं अध्यक्षपद चीनकडे होतं. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक सहमती करार तयार करण्याच्या दृष्टीने G20 डिजिटल इकॉनॉमी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती पण त्याच्या कार्यक्षेत्रात सायबरसुरक्षेचा समावेश नव्हता.
2020 मध्ये सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 परिषदेत सायबरसुरक्षा संवाद (डिजिटल इकॉनॉमी टास्क फोर्सचा भाग म्हणून) आयोजित करून आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांच्या सायबर लवचिकतेवर लक्ष केंद्रित करून डिजिटल अर्थव्यवस्था आणि सायबरसुरक्षा यामधले अंतर भरून काढण्यात आले. डिजिटल इकॉनॉमी मंत्र्यांच्या बैठकीत भारताने डिजिटल प्लॅटफॉर्म विश्वसनीय आणि सुरक्षित बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते.
2021 आणि 2022 मध्ये इटली आणि इंडोनेशियाच्या अध्यक्षांच्या अंतर्गत सायबर सुरक्षेलाच प्राधान्य देण्यात आलं. यात डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारिणीमध्ये सायबर स्पेसचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. विशेषत: इंडोनेशियाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या मुख्य मुद्द्यांमध्ये सायबर सुरक्षा हा प्रमुख मुद्दा होता.
डिजिटल अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता ही महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि डिजिटल सार्वजनिक प्लॅटफॉर्मच्या सुरक्षिततेवर आणि अखंड कामकाजावर अवलंबून आहे यावर G20 सदस्यांचं एकमत आहे. या प्रणालींचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी, मार्गदर्शक तत्त्वे अंगिकारण्यासाठी आणि व्यावहारिक मार्ग विकसित करण्यासाठी उर्वरित सदस्यांसोबत काम करून भारत सायबर सुरक्षेबद्दलचे G20 चे कार्य पुढे नेऊ शकतो.
भारताच्या अजेंड्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे:
संभाव्य सायबर धोके ओळखणे, अहवाल देणे, त्याला प्रतिबंध करणे आणि डेटाचे उल्लंघन टाळणे यासाठी नागरिकांना कौशल्ये शिकवणे आणि सायबर सुरक्षेसाठी त्यांना सुसज्ज करणे ही G20 राज्यांची सामूहिक जबाबदारी असेल.
सायबरसुरक्षा हा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा एक अत्यावश्यक पैलू बनला आहे. त्याच्या आर्थिक आणि भू-राजकीय परिणामांमुळे त्याकडे पुरेसे लक्ष देणेही आवश्यक आहे. 2023 मध्ये G20 अध्यक्ष या नात्याने भारत हे या सगळ्या मुद्द्यांकडे जगाचे लक्ष वेधू शकतो आणि सायबर सुरक्षेचे उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकारही घेऊ शकतो.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr Sameer Patil is Director, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation. His work focuses on the intersection of technology and national ...
Read More +Arjun Gargeyasis an IIC-UChicago Fellow and was previously a researcher with the High-Tech Geopolitics Programme at the Takshashila Institution.
Read More +