Originally Published डिसेंबर 13 2022 Published on Dec 13, 2022 Commentaries 0 Hours ago
फिनफ्लुएंसर आणि आचारसंहिता

आर्थिक प्रभावशाली किंवा ‘फिनफ्लुएंसर’ ही अशी व्यक्ती आहे जी गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील व्यापार, म्युच्युअल फंड आणि विमा यांसारख्या वैयक्तिक गुंतवणूकीवर, प्रामुख्याने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आर्थिक विषयांवर माहिती आणि सल्ला देते. त्यांना उत्पादन किंवा सेवा प्रदान करणार्‍या व्यवसायाद्वारे भरपाई दिली जाऊ शकते.

अलीकडे, एका इंडस्ट्री कॉन्फरन्सच्या पार्श्वभुमीवर, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सूचित केले  आहे की ‘फिनफ्लुएंसर्स’ साठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अनियंत्रित आणि परवाना नसलेले स्वयंनियुक्त सल्लागार ग्राहकांची आर्थिक गुंतवणूक धोक्यात आणत आहेत, या चिंतेने सेबीकडुन जलद पावले उचलली जात आहेत.

सध्याची आव्हाने

पारदर्शकतेच्या दृष्टीने आणि सर्व प्रभावांचा मागोवा घेण्यासाठी कोणत्याही आचारसंहितेमध्ये मुख्य प्रवाहातील माध्यमामध्ये (टीव्ही, प्रिंट, डिजिटल) सर्व प्रभावकांचा समावेश असणार आहे, हे गृहीतच धरले पाहिजे.

जवळजवळ प्रत्येक भारतीय व्यावसायिकांसाठी टीव्ही चॅनेल्सकडून स्टॉक-टिप्स ऑफर करण्यात येतात. अनेक टीव्ही अँकर ट्रेडिंगच्या वेळेत स्टॉक डिस्कशन किंवा कॉर्पोरेट परिणाम कार्यक्रम चालवतात. व ते अत्यंत प्रभावशाली असतात. प्रिंट किंवा इतर डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशिष्ट कंपन्यांबद्दल लिहिणाऱ्यांसाठीही असाच युक्तिवाद केला जाऊ शकतो.

मीडिया-पत्रकारांना (ऑक्सीमोरॉन?), त्यांच्या माहिती देणार्‍या नेटवर्क्समुळे, कंपन्यांच्या अंतर्गत बातम्यांबद्दल माहिती असण्याची शक्यता नाकारली जात नाही. त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा त्यांच्या मिडीया हाऊसेससाठी – विशेषत: आर्थिक परिणामांवर प्रभाव टाकण्यासाठी ते अशा माहितीचा गैरवापर करतात की नाही हे तपासण्यासाठी कोणता कोड आहे का? मीडिया स्पेसची कॉर्पोरेट मालकी आणखी वाढत असताना, मीडिया मालकाला जाहिरात केलेल्या सामग्रीचा फायदा होत असेल तर ती सामग्री कशी चाळता येईल? हे शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पण काही प्रभावशाली, मुख्यत्वे माध्यमातील उच्चभ्रू व्यक्ती या कल्पनेचा राग धरण्याची अधिक शक्यता आहे. तसेच अशा संभाव्य नियामक संहितेमुळे त्यांचे “स्वातंत्र्य आणि घटनात्मक अधिकार” प्रभावित होतील असाही दावा करण्यात येत आहे. पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा आदर असलाच पाहिजे, परंतु हे क्षेत्र आर्थिक/गुंतवणुकीच्या निर्णयांवर प्रभाव टाकणारी सामग्री किंवा भाष्य करण्यासाठी वापरले जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

मीडिया स्पेसची कॉर्पोरेट मालकी आणखी वाढत असताना, मीडिया मालकाला जाहिरात केलेल्या सामग्रीचा फायदा होत असेल तर ती सामग्री कशी चाळता येईल? हे शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जागतिक नियमावलीतील शिकवण

ऑस्ट्रेलियामध्ये, फायनान्फ्लुएंसर्सने पूर्व परवान्याशिवाय आर्थिक सल्ला दिल्यास, त्यांना पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो, अशी तरतुद आहे. युरोपियन सिक्युरिटीज अँड मार्केट्स अथॉरिटीने गुंतवणुकीच्या शिफारशी कशा असाव्यात तसेच त्याबद्दलचे सल्ले सोशल मीडियावर कशाप्रकारे पोस्ट करावेत याबाबत सुचना दिलेल्या आहेत आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास दंडाचीही तरतुद करण्यात आली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, जर्मन फेडरल फायनान्शियल पर्यवेक्षण प्राधिकरणाने (Bundesanstalt für Finanzdienstleistungsaufsicht – BaFin) अस्सल तज्ञांव्यतिरिक्त काही स्वयंघोषित तज्ञ लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यापासुन सुरक्षित राहण्याचा सल्ला आपल्या ग्राहकांना पत्राद्वारे दिला आहे.

सिंगापूर आणि चायनीज रेग्युलेटर्सकडेही फिन्फ्लुएंसर्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. फक्त काही तटस्थपणे पोस्ट करणाऱ्या फिन्फ्लुएंसर्सचा अपवाद वगळता बर्‍याचदा या क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो, असे संशोधन आणि त्याचे निष्कर्ष डच आर्थिक पर्यवेक्षी प्राधिकरणाने (Autoriteit Financiële Markten – एएफएम) प्रकाशित केले आहेत.

आचारसंहितेची प्रथम तत्त्वे

  • फिन्फ्लुएंसर्सची व्याख्या – फिन्फ्लुएंसर्सची व्याख्या ही अधिक स्पष्ट, न्यायिकदृष्ट्या सक्षम व नियमांच्या चौकटीत बसणारी असावी. आर्थिक-गुंतवणूक संप्रेषणासाठी ग्राहक प्रवेश असलेल्या सर्व माध्यमांचा त्यात समावेश असावा. व्याख्येमध्ये थेट जाहिराती, माहितीपत्रके, वेबसाइट्स किंवा सोशल मीडियावर टाकलेला डेटा, सेलिब्रिटी किंवा ब्रँड अॅम्बेसेडरचे समर्थन, मुख्य प्रवाहातील माध्यमांमधील बातम्या कार्यक्रम जे आर्थिक गुंतवणुकीबद्दल कोणत्याही विशिष्ट दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व प्रकारच्या सामग्रीचा समावेश असावा.
  • ग्राहक संरक्षण- ज्या युगात ग्राहकाचे लक्ष वेधण्यासाठी चढाओढ लागलेली आहे आणि जिथे ग्राहक माध्यमांमध्ये विशेषत: सोशल मीडियामध्ये फॅशनेबली सादर केलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात, अशा परिस्थितीत नियामकांनी ग्राहकांचे संरक्षण करण्याची अपेक्षा करणे अयोग्य आहे का?
  • पारदर्शकता आणि डेटा आधारित संप्रेषणाची गरज- ग्राहकांना आर्थिक उत्पादने आणि सेवांबद्दल मर्यादित ज्ञान असण्याची शक्यता असते किंवा या बाबींमुळे आर्थिकदृष्ट्या असुरक्षितता निर्माण होऊ शकते. परिणामी, कोणतीही आर्थिक आणि गुंतवणूक “सत्यपूर्ण, संतुलित, डेटा-लेड” असावी हे आचारसंहितेने हे सुनिश्चित व्हायला हवे.
  • तुम्ही हे विशिष्ठ उत्पादन तुमच्या जवळच्या माणसाला विकाल का? – चाचणी हे एक साधे तर्कशास्त्र आहे जे आचारसंहितेमध्ये अंतर्भूत केले जाऊ शकते. जर कोणताही फिन्फ्लुएंसर्स विशिष्ट गुंतवणुकीचा सल्ला स्वतः स्वीकारत नसेल, तर तो सल्ला त्याने ग्राहकालाही देऊ नये.

वित्तीय नियामकांकडे सक्रिय रिअल-टाइम मार्केटवर पाळत ठेवण्याच्या क्षमतेसाठी पुरेसे तांत्रिक फ्रेमवर्क आणि आवश्यक ग्राहक संरक्षण उपाय करण्यासाठी विचार अशी डेटाचे मूल्यांकन करण्यासाठी इन-हाउस प्रतिभा असेल तेव्हाच नियम प्रभावी होऊ शकतात. आणि महत्त्वाचे म्हणजे गुन्हेगारांना त्वरीत जबाबदार धरण्यासाठी नियामक तरतुदीं असणेही गरजेचे आहे.

अर्थात या सर्वांची सुरुवात मानवी मूल्ये आणि स्वयंनियमनाने होते. पण ही मूल्ये व नैतिक नीतिमत्ता निकामी ठरत आहेत असे गृहीत धरू.

भविष्यातील आचारसंहिता

  • मुख्य प्रवाहातील पत्रकार, टीव्ही अँकर आणि पॅनेलवर येणारे पाहुणे, सोशल मीडिया समालोचकांसह प्रत्येकजण, जे कोणत्याही गुंतवणुकीशी संबंधित आर्थिक परिणामांबद्दल जे काही बोलतात किंवा लिहितात ते नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार असावेत. यात वैयक्तिक वित्त आणि गुंतवणुकीबद्दल मुद्रित किंवा डिजिटल माध्यमात लिहिणाऱ्यांचाही समावेश असावा.
  • सर्व माहिती व सामग्रीमध्ये समालोचक व टीकाकारांच्या क्षमता आणि नोंदणी तपशीलांबद्दल खुलासे असावेत. प्रत्येक माहितीत समालोचकाची गुंतवणूक किंवा सामग्रीशी आर्थिक दुवे उघड करायला हवेत.
  • नियामकाने सर्व आर्थिक उत्पादने, सेवा, उत्पादनांच्या आणि सेवांच्या गुंतवणुकीच्या सीमा परिभाषित करून त्या फिन्फ्लुएंसर्स कोडमध्ये समाविष्ट करायला हव्यात. यामध्ये आदर्शपणे पारंपारिक बँकिंग, विमा, म्युच्युअल फंड, एआयएफ ऑफरिंग, कर्ज उत्पादनांसह गृहनिर्माण, असुरक्षित, सुरक्षित, बीएनपीएल उत्पादने, शेअर ट्रेडिंग, कोणत्याही सूचीबद्ध घटकाबद्दल मत, फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सी आणि फ्युचर्स पर्याय यांचा समावेश असावा.
  • मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील संचालक आणि केएमपी यांच्याकडून नियामकाला काय अपेक्षित आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. नियामकाने इंफ्लूएंसर म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती तिचा गुंतवणूक पोर्टफोलिओ वेळोवेळी घोषित करू शकते का?
  • नियामकाकडे त्यांची अंतर्गत बँडविड्थ तयार होईल असे गृहीत धरून, ते फिन्फ्लुएंसर्सचे रजिस्टर तयार करणे शक्य आहे का ? हे पाहायला हवे.
  • आर्थिक आणि गुंतवणुकीच्या शिफारशी कोणत्याही अस्पष्टतेशिवाय स्पष्टपणे परिभाषित करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास किंवा उल्लंघनासाठी दंड आकारला जायला हवा.
  • वरील नियमांचा मागोवा घेण्यासाठी रिअल-टाइम डिजिटल पर्यवेक्षी यंत्रणा तयार व्हायला हवी. जर नियामकाने फक्त व्हिसल ब्लोअर्स किंवा तक्रारदारांकडून आवाज उठवण्याची वाट पाहिल्यास नियम मोठ्या व प्रभावशाली मीडिया हाऊसच्या बाजूने झुकले जाण्याची दाट शक्यता आहे.
  • तक्रार चुकीची आढळल्यास ते तपासुन घेणे महत्त्वाचे आहे. तक्रारदारांना तक्रारी पाठवण्याचा सोपा मार्ग तयार व्हायला हवा. एसआरओला नियामकाकडे तक्रारी अग्रेषित करण्याचे काम दिले जाऊ शकते. सध्याच्या घडीला, एसआरओजाहिरात सामग्री वगळता मीडिया सामग्रीमध्ये फार ढवळाढवळ करु शकत नाही.

नियामक हे कार्यकारी मंडळाद्वारे लोकशाहीच्या मूळ चार स्तंभांपैकी एक असल्याने पारंपारिक माध्यमांच्या अनुचित प्रभावाचा प्रभावीपणे सामना करू शकतात का? हे पाहावे लागणार आहे. कदाचित हेच मोठे आव्हान आहे.
सुपरवायझरी टेकसह हे शक्य आहे.परंतु नियामक स्वातंत्र्य आणि पर्यवेक्षकीय इच्छाशक्ती, पावले उचलण्याची क्षमता तसेच अशा शक्यतेची राजकीय सूक्ष्मता समजुन घ्यायला हवी.

हे भाष्य मूळतः CNBCTV18 मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.