Published on Jul 24, 2023 Commentaries 0 Hours ago

‘मालदीवमधून भारताची उपस्थिती हटविण्याच्या’ मोहिमेपासून यामीन दूर जात असतानाही नशीद यांनी बहुचर्चित प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे तात्पुरते थांबवले आहे.

मालदीव: 2023 च्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी सोलिह यांना झुकते माप

सत्ताधारी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीची बहुप्रतिक्षित राष्ट्रीय महासभा अपेक्षित ‘कारवाई’विना संपली आणि राष्ट्राध्यक्ष इब्राहिम ‘इबू’ सोलिह यांच्यावर अतूट विश्वास असल्याची पुष्टी महासभेत करण्यात आली. यामुळे, ज्या पक्षाची उद्दिष्टे समान आहेत, अशा पक्षाकडून– पुन्हा पुढील वर्षी उमेदवारी मिळवण्याचा त्यांचा जो पसंतीचा मार्ग आहे, तो साध्य होण्याची सध्या तरी केवळ औपचारिकता बाकी असल्याचे दिसते. आधीचा मित्र शत्रू बनल्यानंतर, संसदेचे अध्यक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष मोहम्मद ‘अन्नी’ नशीद यांनी राष्ट्रीय महासभेच्या समारोपाच्या अधिवेशनात माघार घेत, संसदीय योजनेत बदल करण्याच्या त्यांच्या बहुचर्चित प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे तात्पुरते थांबवले. नशीद अध्यक्षीय प्राथमिक निवडणूक लढवतील की त्यांचा मोहरा उभा करतील हे पाहणे बाकी आहे. हे “राष्ट्रीय महासभेनंतर लवकरच” ठरेल, ज्याकरता सोलिह यांनी काही आठवड्यांपूर्वी आपली उमेदवारी जाहीर केली होती.

रविवार, २१ ऑगस्ट २०२२ रोजी पक्षाच्या राष्ट्रीय महासभेचे सूप वाजले. या तीन दिवसीय महासभेच्या समारोप सत्रात, नशीद यांनी सोलिह यांच्या प्रशासन बदलाचा प्रस्ताव मागे घेण्याच्या आवाहनाकडे लक्ष दिले नाही. मतदानापूर्वी झालेल्या चर्चेला मार्गदर्शन करण्याची पाळी आली तेव्हा ते व्यासपीठावर गेले, राष्ट्राध्यक्ष आणि बाकीच्यांशी पुढील चर्चेसाठी तो प्रस्ताव तात्पुरता ‘होल्ड’वर ठेवत असल्याचे घोषित केले. नशीद यांच्या गटातील एका सदस्याने आधी दावा केला होता की, पक्षप्रमुखांनी ठराव मागे घेतला नसून या ठरावावर मतदान होईल- पण तसे झाले नाही.

आधीचा मित्र शत्रू बनल्यानंतरसंसदेचे अध्यक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष मोहम्मद अन्नी‘ नशीद यांनीराष्ट्रीय महासभेच्या समारोपाच्या अधिवेशनात माघार घेतसंसदीय योजनेत बदल करण्याच्या त्यांच्या बहुचर्चित प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे तात्पुरते थांबवले.

नशीद यांनी “सार्वमत न झाल्यास मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी सोडू” असे संकेत दिल्यानंतर हे सर्व घडले. या प्रक्रियेत, त्यांनी निवडणूक आयोगाचे अध्यक्ष फवाद थॉफीक यांच्या विधानावर तिरकसपणे विरोध केला की, कोविडनंतरच्या आर्थिक संकटाच्या या काळात सार्वमतासाठी १०० दशलक्ष मालदिवियन रुफिया इतका खर्च येईल. ते म्हणाले, कारण काहीही असो, “तुम्ही लोकांचे सार्वमत नाकारू शकत नाही.” तत्पूर्वी, त्यांनी असाही दावा केला होता की, सार्वमताचा ‘संक्रमणकालीन टप्पा’ पुढील वर्षी फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि या वादात राष्ट्राध्यक्षांचा समावेश नाही आणि म्हणून सोलिह यांनी दूर राहावे, असे सांगितले.

संसदीय योजना दुसर्‍या मंचावर, दुसर्‍या वेळी मांडली जाणार नाही, असा निष्कर्ष काढणे खूप घाईचे ठरेल; परंतु मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये त्यांचे नशीब सध्यातरी सीलबंद झालेले दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कट्टर-प्रतिस्पर्धी आणि माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी नशीद यांच्या प्रस्तावाला एक संकल्पना म्हणून योग्य पाठिंबा दिला, परंतु मालदीवची जनता ‘सार्वमतात याला पसंती दर्शवणार नाही,’ असे म्हटले.

पक्षाचे अध्यक्ष आणि आर्थिक व्यवहार मंत्री फय्याज इस्माईल यांच्यासह बहुतेक मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी नेत्यांनी, तसेच जुम्हूरी पक्षाचे गासिम इब्राहिम आणि गृहमंत्री शेख इम्रान यांसारख्या आघाडीच्या भागीदारांनी नशीद यांचा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला. अगदी अलीकडे नशीद यांनी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांना “राष्ट्राध्यक्ष पदाचे उत्तम उमेदवार” म्हटले होते, ते सोलिह गटात दुफळी माजवण्याच्या हेतूने केले होते. शाहिद हे संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेला एक वर्षाचा कार्यकाळ ते पूर्ण करत आहेत. विरोधी मालदीव विकास आघाडीचे अहमद शियाम आणि मालदीव राष्ट्रीय पक्षाचे कर्नल मोहम्मद नाझीम (निवृत्त) यांनीही असेच मत व्यक्त केले.

पुढे वाटचाल करताना…

पक्षाच्या बैठकीतील त्यांच्या समारोपाच्या भाष्यात, सोलिह यांनी टिप्पणी केली की, राष्ट्रीय महासभा कशी “तणावात सुरू झाली होती, परंतु उत्तम प्रकारे ती समाप्त झाली.” उद्घाटनापर निरीक्षण मांडताना, राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, “मतभेद होते, पण पक्ष पुढे जाईल,” ते एकजुटीने होईल की नाही, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. तुलनेने प्रतिनिधींच्या निर्णायक महासभेचे श्रेय, जरी नेहमीच सुरळीत नसले तरी, सोलिह यांना द्यायला हवे, ज्यांनी युक्तिवादाशी दृढता जोडली. त्यांचे स्फिंक्ससारखे बेफिकीर मार्ग, त्यांच्या समर्थकांना कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही प्रकारे अतिरेकी कृती करायला देत नाहीत.

एक प्रकारे, त्याच्या या संयमाने सोलिह यांना पक्षावर विजय मिळवण्यास मदत केली आहे, जे फक्त नशीद यांचे होते, याचे कारण नंतरच्या व्यक्तीला शक्यतो प्रतिक्रिया न देणार्‍या शत्रूला हाताळण्याची सवय नव्हती, अशा प्रकारे दुसर्‍याला चिथावणी दिली नाही तर दुसर्‍याला अनुल्लेखाने मारले. या प्रक्रियेत, निष्ठावंतांच्या निवडक गटामुळे सदैव अस्वस्थ असलेल्या नशीद यांनी प्रत्येक वळणावर, सोलिह यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या प्रत्येक टप्प्यावर कुठली ना कुठली मोठी चूक केली. इतकी की, गेल्या वर्षी बॉम्बस्फोटात त्यांना झालेल्या दुखापतीनंतर त्यांच्याविषयी आलेल्या ‘सहानुभूतीच्या लाटेचा’ मागमूसही दिसत नाही. उदाहरणार्थ, पक्षाच्या महासभेत, त्यांनी काही निम्न-स्तरीय प्रतिनिधींच्या निवडणुकीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि निषेधाच्या मोठ्या घोषणांना आमंत्रण दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे एक भाषण अर्ध्यावरच बंद करावे लागले.

पक्षांतर्गत घडामोडींवर लक्ष केंद्रित करून, ‘इस्लामिक कट्टरतावाद’, आयसिसची उपस्थिती आणि मॉड्यूल्सबद्दलही उल्लेख केला गेला नाही, जे सरकारवर हल्ला करण्यासाठी, मग ते आताच्या मालदीवियन डेमोक्रॉटिक पार्टीचे असो किंवा भूतकाळातील त्यांच्या विरोधकांचे असो, नशीद यांच्या कंपूच्या आवडत्या विषयांपैकी होते.

नशीद यांच्या कंपूने बॉम्बस्फोटाच्या तपासात मंद गतीने केलेल्या प्रगतीचा जो आरोप केला होता, त्याबद्दल पक्षाच्या राष्ट्रीय महासभेत कोणताही गंभीर उल्लेख झाल्याचे दिसत नाही, हे पुरेसे ठरते. तसेच नाशीद यांनी याआधी सोलिह यांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे जे आरोप केले होते, त्याबद्दल चकार शब्द काढला गेला नाही, कारण नशीदचे वकील-भाऊ नाझीम सत्तार हे ‘समलैंगिक घोटाळा’ प्रकरणात अटक केलेल्यांपैकी एक असल्याने याची अनेकांना लाज वाटली असती. पक्षांतर्गत घडामोडींवर लक्ष केंद्रित करून, ‘इस्लामिक कट्टरतावाद’, आयसिसची उपस्थिती आणि मॉड्यूल्सबद्दलही उल्लेख केला गेला नाही, जे सरकारवर हल्ला करण्यासाठी, मग ते आताच्या मालदीवियन डेमोक्रॉटिक पार्टीचे असो किंवा भूतकाळातील त्यांच्या विरोधकांचे असो, ते नशीद कंपूच्या आवडत्या विषयांपैकी होते.

शिवाय, दुसर्‍या बाजूने, अध्यक्ष सोलिह यांनी व्यभिचार केल्याचा फोटोग्राफिक पुरावा असल्याचा दावा केल्यामुळे नशीद यांना अध्यक्षपदावरून हटवण्याच्या राष्ट्रीय महासभेआधीच्या बोलीचा उल्लेख करण्यात आला नाही. नशीद यांनी त्यांच्या मोबाइल फोनमध्ये फोटोग्राफिक पुरावे संग्रहित केल्याचा कथित दावा केला होता- जो फोन नुकताच लंडनच्या एका रेस्टॉरंटमध्ये असताना हिसकावण्यात आला होता- इंग्लंडमध्ये असताना अधिकृत पोलिस तक्रार दाखल करण्यास प्राधान्य दिले नव्हते, अशी कबुली त्यांनी मालेतील वार्ताहरांना दिली. मालदीव पोलिसांनीही सोलिह यांच्यावर व्यभिचाराच्या आरोपासाठी नशीद यांच्यावर दाखल केलेल्या फौजदारी खटल्याचा तपास पुढे नेला नाही.

युतीची कोंडी

राष्ट्रीय महासभा जवळ आली असताना विशेषतः नाशीद यांनी जोरदारपणे असा युक्तिवाद केला होता की, जर मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी संसदीय योजनेकडे वळली नाही तर पक्षाचा ४२ टक्के पाठिंबा गमावेल आणि ‘युती सुरू राहील’ असा विचार करणे म्हणजे मृगजळ आहे. असा मूड राष्ट्रीय महासभेच्या वातावरणात दिसून आला नाही, जिथे त्यांनी जनमत न घेतल्यास आपण पक्षात राहणार नाही, असे सूचित केले. पक्ष, संसदीय, सरकारी आणि घटनात्मक व्यासपीठांमध्ये त्यांच्या कल्पनांचा प्रचार करताना, चाचणीही न करता, फरक न करणे- ही त्यांची आणखी एक समस्या होती.

जणू बालपणीचे मित्र आणि राजकीय गुरू यांना उत्तर देताना, सोलिह यांनी काँग्रेसमधील त्यांच्या वक्तव्यात, युती “सुरू राहील आणि पुरेशी मतेही मिळतील,” असे पुन्हा ठासून सांगितले. मात्र, “क्रूरतेची मर्यादा ओलांडली तेव्हा मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचा जन्म झाला” असे त्यांचे विधान स्पष्ट केले नाही तर, या विधानाने मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीच्या तीन सहयोगींपैकी एकाला दुरावण्याची शक्यता आहे. ‘मौमून रिफॉर्म मूव्हमेन्ट (एमआरएम)’चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष मौमून अब्दुल गयूम १९७८-२००८ या कालावधीत सत्तेत होते, तेव्हा ही कथित ‘क्रूरता’ घडली.

अध्यक्ष या नात्याने, नाशीद यांनी दुसऱ्या फेरीत त्यांना २००८ सालच्या निवडणुका जिंकण्यास मदत करणाऱ्या युतीवर हल्ला करून युतीला निकामी केले होते. यामुळे त्यांचे सरकार संपूर्ण कार्यकाळात संसदेत अल्पमतात होते. हा एक टाळता येण्याजोगा अडथळा होता, जे ‘जीएमआर समस्या’ प्रकारच्या वादांना कारणीभूत ठरले, ज्यामुळे त्यांचे सरकार आणि मालदीवच्या भारतासोबतच्या संबंधांना धक्का बसला.

महासभा जवळ आली तेव्हा, विशेषतः, नाशीद यांनी जोरदारपणे असा युक्तिवाद केला होता की, जर मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी संसदीय योजनेकडे वळली नाही तर पक्षाचा ४२ टक्के पाठिंबा गमावेल आणि ‘युती सुरू राहील’ असा विचार करणे म्हणजे मृगजळ आहे.

त्याचप्रमाणे, २०१८ यालच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी युती तयार होत असतानाच, सोलिह यांनी सामान्य उमेदवार म्हणून विजय मिळवला, तेव्हाही नशीद यांनी या कल्पनेला आपला विरोध दर्शवला आणि काही महिन्यांनंतर संसदीय निवडणुकीसाठी त्याचे सातत्य रोखले. मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने ८७ पैकी ६५ संसदीय जागा जिंकल्या- त्यापैकी अनेक जागा कमी फरकाने जिंकल्या. अशा प्रकारे नशीद यांच्या कार्यकर्त्यांवरील आणि मतदारांवरील विश्वासाची पुष्टी झाली. मात्र, इतर पक्षाच्या दिग्गजांनी सांगितल्याप्रमाणे, मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने स्वतःहून कधीही अध्यक्षपदासाठी थेट निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक ५० टक्के अधिक मत-सहभाग नोंदवला नाही.

यामीनचे हरवलेले टी-शर्ट्स

विशेष म्हणजे, विरोधी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार यामीन त्यांच्या ‘मालदीवमधून भारताची/ भारताच्या लष्कराची उपस्थिती हटविण्याच्या’ मोहिमेपासून दूर गेले आहेत. गेली दोन वर्षे हा त्यांचा आवडता राजकीय विषय होता. १९ ऑगस्ट २०२२ रोजी पीपीएम-पीएनसी रॅलीतील सहभागींनी (मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी काँग्रेसचा शुभारंभाचा दिवस), जिथे युतीने औपचारिकपणे त्यांचे अध्यक्षपदाचे तिकीट यामीन यांना सुपूर्द केले, त्यांनी पक्षाची पारंपारिक गुलाबी टाय परिधान केली होती. गेले काही महिने मात्र ते लाल रंगाचा ‘इंडिया आउट’चा टी-शर्ट घालत होते. यामीन यांच्या स्वीकृतीच्या भाषणातही भारताचा कोणताही थेट संदर्भ नव्हता, तरीही त्यांनी स्पष्टीकरण न देता, “राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारे सर्व करार रद्द करणे अत्यावश्यक आहे,” असे म्हटले.

त्याऐवजी, यामीनने जसे सर्वच बाबतीत व्हायला हवे होते, त्यांनी कामगिरी करण्यात अपयश आल्याबद्दल सोलिह सरकारला लक्ष्य करणे निवडले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे व घराणेशाहीचे आरोपही केले. त्यांनी असा दावा केला की, सद्य सरकारने “या प्रेमाच्या हंगामात त्यांच्या प्रशासनाने मागे ठेवलेली देशाची गंगाजळी रिकामी केली आहे”, तरुणांना लक्ष्य केले, परंतु ते म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन रोजगार निर्माण करणे ही भ्रष्टाचाराची परिसीमा आहे. असे असूनही, २०१८ साली सत्तेत आल्यापासून विद्यमान सरकारने केवळ ४,००० नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. सरकारने १७ हजारांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, असे सांगून युवा व्यवहार मंत्री मालूफ यांनी दावा लढवण्यात वेळ गमावला नाही.

यामीन समर्थक माध्यमांचा एक विभाग, माहिती आयुक्तांच्या अनेक प्रतिसादांचा हवाला देत, वरिष्ठ मंत्री आणि पक्षाच्या दिग्गजांच्या नातेवाईकांच्या- विशेषत: परदेशातील देशाच्या दूतावासांमध्ये केलेल्या ‘राजकीय नियुक्त्यां’मध्ये, आप्तेष्टांबाबत पक्षपातीपणा केल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप करीत जवळपास- दररोज बातम्या जारी करीत आहे.

अगदी अलीकडे, त्यांनी सोलिह यांच्या नातेवाईकांच्या गृहनिर्माण प्रकल्पाशी कथित संबंधांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे हा कुठल्या तरी प्रकारचा घोटाळा आहे, असा दावा करण्यात येत आहे. जर विरोधी पक्षाने या सर्वांचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा म्हणून समावेश केला तर त्याचा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अथवा मतदारांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल, हे पाहणे बाकी आहे?

संसदीय योजना दुसर्‍या मंचावरदुसर्‍या वेळी मांडली जाणार नाही असा निष्कर्ष काढणे खूप घाईघाईचे होईलपरंतु मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये त्याचे नशीब सध्यातरी सीलबंद केलेले दिसते.

एका वरिष्ठ पुरोगामी पक्षाच्या नेत्याने प्रलंबित न्यायालयीन खटल्यांचा संदर्भ देताना सांगितले की, जर यामीन यांनी ‘एमएमपीआरसी घोटाळ्यात’ सरकारचे ‘पैसे चोरले असते, तर तो पैसा आता सापडला असता. वस्तुस्थिती अशी आहे की, या प्रकरणातील दोन फौजदारी खटले अद्याप प्रलंबित आहेत आणि ट्रायल कोर्टाचा निकाल पुढील महिन्यात येणार आहे, त्यानंतर दुसऱ्यावर ठोस सुनावणी सुरू होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने यामीन यांच्यावर आरोप असलेल्या तीन मनी लाँड्रिंग प्रकरणांपैकी पहिल्या प्रकरणात तांत्रिक कारणास्तव यामीनला निर्दोष ठरवले होते आणि पुढील वर्षी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यास सक्षम होण्यासाठी त्यांना नव्या प्रकरणांमधून निर्दोष मुक्तता होणे आवश्यक आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.