Published on Oct 28, 2023 Commentaries 0 Hours ago

मॉड्युलर पॅकेजिंग व वाहतुकीसाठी योग्य आदी वैशिष्ट्यांमुळे तुलनेने स्वच्छ, पर्यायी इंधन म्हणून एलपीजीच्या औद्योगिक वापराला प्रोत्साहन दिले, तर देशाची आर्थिक व पर्यावरणीय उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात.

नैसर्गिक वायूला पर्याय द्रवीकृत पेट्रोलियम वायूचा

हा लेख ‘सर्वसमावेशक उर्जा निरीक्षक : भारत व जग’ या मालिकेचा एक भाग आहे.

भारतात द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) हा प्रामुख्याने घरगुती स्वयंपाकाचे इंधन समजला जातो; परंतु एलपीजी औद्योगिक प्रक्रिया आणि सेवांसाठीही वापरात आणला जातो. मात्र, त्यासाठी उच्च दर्जाची अचूकता व प्रक्रियेवेळी तापमानातील लवचिकता; तसेच अधिक ज्वलनशीलतेची आवश्यकता असते. अवकाश, प्रक्रिया व पाणी तापवणे, लोखंडकाम, वाळवणे, अन्न उत्पादन, पेट्रोकेमिकल उत्पादन व औद्योगिक ओव्हनसाठी वीज, शेगड्या व भट्ट्या यांसारख्या औद्योगिक कामांसाठी एलपीजीचा वापर केला जातो. नियंत्रित करता येण्याजोगे तापमान, एकसंध सामग्री, अल्प उत्सर्जन करणारे प्रदूषक (नगण्य एनओक्स (नायट्रस ऑक्साइड), एसओएक्स (सल्फर ऑक्साइड) व पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे उद्योगधंदे एलपीजीचा आवर्जून वापर करतात. एलपीजीचा उष्मांक जास्त असतो. त्यामुळे तो जळताना नैसर्गिक वायूपेक्षा अधिक उष्णता निर्माण होते. काचेच्या किंवा सिरॅमिक उत्पादनांच्या निर्मितीत प्रामुख्याने एलपीजीचा वापर होत असतो. अशा उत्पादनांच्या निर्मितीवेळी अनेक रासायनिक बदल होत असतात. एलपीजीसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ करतो आणि उत्पादन प्रक्रियेशी संबंधित तांत्रिक समस्या कमी करतो. एलपीजीचा वापर डांबरासारखे घटक गरम करणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे किंवा रस्त्यावरील वाहतुकीच्या चिन्हांसह अन्य चिन्हे प्रकाशमान करणे व प्रखर उजेडाच्या दिव्यांसाठी केला जातो. एरोसोल भांड्याचे उत्पादन करण्यासाठी उत्पादकांकडून घरगुती उत्पादनांसाठी प्रणोदक म्हणून शुद्ध ‘फिल्ड ग्रेड एलपीजी’चा वापर केला जातो.

एलपीजीचा वापर डांबरासारखे घटक गरम करणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे किंवा रस्त्यावरील वाहतुकीच्या चिन्हांसह अन्य चिन्हे प्रकाशमान करणे व प्रखर उजेडाच्या दिव्यांसाठी केला जातो.

क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) हे सर्वसामान्यपणे नेहमी वापरले जाणारे रेफ्रिजरंट आहेत; सूर्याच्या अतिनील किरणांच्या उत्सर्जनाच्या दुष्परिणामांना मर्यादा आणणारा ओझोनचा थर ‘सीएफसी’मुळे नष्ट होतो. शून्य ‘ओझोन डिप्लेशन पोटेन्शियल’ (ओडीपी) (ओझोनच्या स्तराची किती हानी झाली आहे, याचे मोजमाप करणारे हे एक रासायनिक संयुग आहे) असलेले एलपीजी हे औद्योगिक व घरगुती शीतलीकरणासाठी ‘सीएफसी’च्या जागी एक विश्वासार्ह पर्याय मानला जात आहे. एलपीजीच्या विविध वर्गीकरणामध्ये शीतलीकरणाची प्रक्रिया जरी असली, तरी घरगुती वापराचे फ्रीज आणि फ्रीजरमध्ये सर्रास आयसोब्युटेन  आढळते, तर व्यावसायिक वापराचे पंप, वातानुकूलन यंत्रणा, शीतलीकरण आणि फ्रीजर प्रक्रियेत प्रोपेन हा घटक सर्वसामान्यपणे वापरला जातो. एलपीजीची थंड करण्याची क्षमता त्याच्या पर्यायी घटकांच्या तुलनेत दहा टक्क्यांनी अधिक आहे; तसेच त्याच्या ‘थर्मोडायनॅमिक’ गुणांमुळे त्याची उर्जा कार्यक्षमता दहा ते वीस टक्क्यांनी वाढते. एलपीजी अन्य मुख्य रेफ्रिजरंट्सच्या तुलनेत किंचित कमी दाबाने काम करते आणि ‘व्हॉल्युमेट्रिक रेफ्रिजरेटिंग’चा परिणाम कायम राखते. एलपीजी आम्ल तयार करीत नाही. त्यामुळे अवरोधित केशिकांचा अडथळा दूर होतो.

असे लाभ असूनही सेवा व औद्योगिक क्षेत्रामध्ये होणारा एलपीजीचा वापर भारतातील एकूण एलपीजी वापराच्या दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. एलपीजीचा घरगुती वापरासाठी इंधन म्हणून उपयोग करण्यात यावा, यासाठी धोरणात्मक पाठिंबा देण्यात आला आहे. राजकीय व पर्यावरणीय उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अन्य क्षेत्रातील एलपीजीचा वापर मर्यादित झाला आहे. मॉड्युलर पॅकेजिंग व वाहतुकीसाठी योग्य आदी वैशिष्ट्यांमुळे तुलनेने स्वच्छ, पर्यायी इंधन म्हणून एलपीजीच्या औद्योगिक वापराला प्रोत्साहन दिले, तर देशाची आर्थिक व पर्यावरणीय उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात.

सद्यस्थिती

भारतात २०२२-२३ या आर्थिक वर्षात एलपीजीचा एकूण वापर सुमारे १.४ टक्के होता, तर बिगरघरगुती वापर एकूण एलपीजी वापराच्या सुमारे ९.१ टक्के होता. घरगुती आणि वाहतूक क्षेत्रांत वापरातील वाढीत घसरण होत असली, तरी अधिक प्रमाणात लागणाऱ्या व बिगर घरगुती एलपीजीच्या वापरात वाढ झाली आहे. २०१०-११ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या दरम्यानच्या कालावधीत एलपीजीचा बिगरघरगुती वापर वार्षिक सरासरी ८.४ टक्क्यांनी वाढला आहे, तर एकूण वापरात १.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच काळात एकूण एलपीजी वापरात सुमारे ६.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलपीजीच्या मोठ्या प्रमाणातील वापराचा वाटा २०१०-११ मधील सुमारे २.३ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये सुमारे १.४ टक्क्यांवर आला, तर बिगर घरगुती वापराचा वाटा २०१०-११ या आर्थिक वर्षात सुमारे सात टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये सुमारे नऊ टक्क्यांपर्यंत वाढला. २०२२-२३ मध्ये भारताने १८.३ दशलक्ष टन एलपीजीची आयात केली. ते वापराच्या ६४ टक्के होते. त्यावरून एलपीजी आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे लक्षात येते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात हे अवलंबित्व ४९ टक्क्यांवर गेले होते. २००९-१० या आर्थिक वर्षापासून एलपीजी वापरामध्ये वाढ होऊनही भारतीय रिफायनरींनी एलपीजी उत्पादन क्षमता वाढवलेली नाही. २०२२-२३ या वर्षात भारतीय रिफायनरींच्या माध्यमातून उत्पादित करण्यात आलेला एलपीजी, कच्च्या तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेतील एकूण क्षमतेच्या केवळ ४.२ टक्के होता. पेट्रोल व डिझेलचे उत्पादन करण्यासाठी भारतातील रिफायनरींची रचना अधिक चांगल्या प्रकारे केली आहे आणि एलपीजी उत्पादन कमी केले आहे. या सगळ्याचा परिणाम होऊन घरगुती एलपीजी उत्पादनावर मर्यादा आणली आहे.

समस्या

उद्योगांच्या माध्यमातून एलपीजीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास प्रतिबंध करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे एलपीजीची नैसर्गिक वायूशी स्पर्धा. एलपीजीचा वापर करणाऱ्या सर्व तीन क्षेत्रांमध्ये (घरगुती, वाहतूक व उद्योग) पाइपमधून येणारा नैसर्गिक वायू नियंत्रित किंमतीत उपलब्ध होतो, त्यामुळे त्या तुलनेत एलपीजीचा पर्याय महाग वाटतो. भारताच्या नैसर्गिक उर्जेच्या सुमारे पंधरा टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा असल्याने पाइपलाइनमधून येणाऱ्या नैसर्गिक वायूसारख्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीत वाढ झाली आहे. याशिवाय रास्त किंमतीमुळे गुंतागुंतीच्या व अवघड स्थानांमधून नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळाले आहे.

महागड्या नैसर्गिक वायूची गरज कमी करण्यासाठी प्रक्रियेसाठीचे इंधन म्हणून रिफायनरींकडून प्रोपेनचा अंतर्गत वापर वाढू शकतो. उद्योगधंद्यांकडूनही नैसर्गिक वायूच्या जागी एलपीजीचा पर्यायी वापर करण्यात योऊ शकतो; परंतु हे नियामक निर्बंधांवर अवलंबून आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, तेल व तेलाच्या उत्पादनांच्या तुलनेत नैसर्गिक वायूची उलाढाल सवलतीच्या दरात झाली आहे. मात्र, आयात नैसर्गिक वायूच्या किंमतीत सध्या अस्थिरता असल्याने किंमतीतील वाढ रोखण्यासाठी एलपीजीसह तेलाच्या उत्पादनांच्या जागी नैसर्गिक वायूचा वापर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महागड्या नैसर्गिक वायूची गरज कमी करण्यासाठी प्रक्रियेसाठीचे इंधन म्हणून रिफायनरींकडून प्रोपेनचा अंतर्गत वापर वाढू शकतो. उद्योगधंद्यांकडूनही नैसर्गिक वायूच्या जागी एलपीजीचा पर्यायी वापर करण्यात योऊ शकतो; परंतु हे नियामक निर्बंधांवर अवलंबून आहे. चीनमधील अनेक औद्योगिक प्रकल्पांमध्ये पूर्वी स्थानिक इंधन उत्पादनासाठी व प्रक्रिया इंधनासाठी एलपीजीचा वापर प्राथमिक इंधन स्रोत म्हणून केला जात असे. नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढत गेल्यावर यातील अनेक सुविधा वायू वितरण जाळ्याशी जोडल्या गेल्या असल्या, तरी एलपीजी साठवणूक टाक्या कायम ठेवल्या आणि गरज लागल्यास पुन्हा बदल करण्याची आपली क्षमताही कायम ठेवली आहे. भारताप्रमाणेच चीनचे बहुतेक सरकारी मालकीचे औद्योगिक प्रकल्प देशांतर्गत वायू पुरवठ्याशी जोडलेले आहेत. त्याच्या किंमतीवर नियंत्रण असते, तर खासगी क्षेत्रातील वायूचे बहुसंख्य वापर करणारे आयात रीगॅसिफाइड एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) खरेदी करीत होते. वायूच्या खासगी क्षेत्रातील वापरकर्त्यांना अशा प्रकारे एलएनजीवर आधारित नैसर्गिक वायूच्या किंमतीतील अस्थिरतेशी सामना करावा लागतो. कारण या वायूच्या किंमतीवर नियंत्रण नाही. जागतिक स्तरावर उलाढाल झालेल्या नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाली, तेव्हा आयात एलएनजीच्या तुलनेत एलपीजी अधिक वाजवी ठरला. त्यामुळे नैसर्गिक वायूकडून एलपीजीकडे वाटचाल झाली आणि त्यामुळे चीनमधून एलपीजी आयात करण्यातही वाढ झाली. चीनमधील सध्याच्या नियमांनुसार, इंधन वापरात बदल करण्यास परवानगी नाही. औद्योगिक वापरकर्ता नैसर्गिक वायू ग्रीडशी जोडलेला असेल, तर प्रणालीतून एलपीजी काढून टाकावे लागते.

देशातील एलपीजीच्या घरगुती वापरात २०२१-२२ मधील २५,५०२,०० टनांवरून २०२२-२३  मध्ये २५,३८२,००० टनांवर घसरण झाली. वाहतूक क्षेत्राकडून एलपीजीचा वापर २०२१-२२ मधील १,२२,००० टनांवरून २०२२-२३ मध्ये १०७ टनांपर्यंत खाली आला. मात्र, बिगर घरगुती आणि अधिक प्रमाणातील एलपीजीचा वापर २०२१-२२ मधील २,६३०,००० टनांवरून २०२२-२३ मध्ये ३,०१५,००० टनांवर गेला. वायूच्या ग्रीडशी जोडल्या नसलेल्या उद्योगांसाठी एलपीजीचा वीजनिर्मिती उष्णता प्रक्रियेसाठीचा स्रोत म्हणून पुरस्कार करता येऊ शकतो. ग्रामीण भागातील औद्योगिकीकरण सुलभ करण्यासाठी इंधन म्हणून एलपीजीचे विकेंद्रित स्वरूप उपयुक्त ठरू शकते. नैसर्गिक वायूच्या ग्रीडशी जोडलेल्या उद्योगांसाठी भारतातील उद्योगांच्या माध्यमातून एलपीजी व नैसर्गिक वायू यांच्यामध्ये आदलाबदल करण्याची धोरणात्मक तरतूद करण्यात आली, तर वापरातील वाढीची गती कायम राहीलच, शिवाय नैसर्गिक वायूच्या किंमतीतील अस्थिरतेची शक्यताही कमी होईल. त्यामुळे उद्योगांवरील खर्चाचा दबावही कमी होऊ शकतो.

Source: Petroleum Planning & Analysis Cell (PPAC)

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Lydia Powell

Lydia Powell

Ms Powell has been with the ORF Centre for Resources Management for over eight years working on policy issues in Energy and Climate Change. Her ...

Read More +
Akhilesh Sati

Akhilesh Sati

Akhilesh Sati is a Programme Manager working under ORFs Energy Initiative for more than fifteen years. With Statistics as academic background his core area of ...

Read More +
Vinod Kumar Tomar

Vinod Kumar Tomar

Vinod Kumar, Assistant Manager, Energy and Climate Change Content Development of the Energy News Monitor Energy and Climate Change. Member of the Energy News Monitor production ...

Read More +