Author : Sauradeep Bag

Published on Oct 04, 2023 Commentaries 0 Hours ago

हाँगकाँगमध्‍ये चीन करत असलेल्या डिजिटल मालमत्तांच्या प्रयोगामध्ये जगाचेच हित आहे. कारण हा प्रयोग उत्तम धोरण तयार करण्यात मदत करू शकतो.

हाँगकाँग हा चीनचा क्रिप्टो सँडबॉक्स आहे का?

सध्याच्या अस्थिर आणि अशांत जगात क्रिप्टो उद्योगही चढउतारांपासून लांब राहिलेला नाही. त्यामुळे या स्थितीत हाँगकाँग डिजिटल मालमत्तेचे केंद्र बनण्याचा दृढनिश्चय करत आहे. हाँगकाँगची ही महत्त्वाकांक्षा मुख्य भूप्रदेश असलेल्या चीनपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. कारण बीजिंगने सर्व प्रकारच्या क्रिप्टो-संबंधित व्यवहारांवर नियंत्रण ठेवले आहे. जूनमध्ये हाँगकाँग क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसाठी सुरक्षा आणि कमिशनद्वारे परवाना सक्तीचा करणारे नियम लागू करेल. इथल्या नियंत्रकांनी व्हर्च्युअल अॅसेट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर देखरेख करण्याच्या प्रस्तावावर सल्लामसलत सुरू केली आहे.  चीनच्या विशेष प्रशासकीय क्षेत्रामध्ये डिजिटल चलनांच्या सतत विकसित होत असलेल्या परिस्थितीत हा एक नवा अध्याय रचला जातो आहे.

क्रिप्टोला नियामक छाननीखाली आणण्याच्या या हालचालीवर लक्ष ठेवत असताना चिनी सरकार क्रिप्टोकरन्सी आणि वेब3 च्या जगात हाँगकाँगच्या प्रवेशावरही बारीक लक्ष ठेवून आहे.

हाँगकाँगच्या क्रिप्टो नियमांचा बाजारावर कसा परिणाम होईल याकडे चीन उत्सुकतेने पाहतो आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. हाँगकाँगचा हा नियंत्रक दृष्टिकोन यशस्वी ठरला तर त्यामुळे चीनच्या इतर भागांमध्ये धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकेल. क्रिप्टोकरन्सीव्यतिरिक्त चीन नवीन क्रिप्टो-लिंक उत्पादने आणि ब्लॉकचेन-आधारित उपाय जारी करण्याचा विचार करतो आहे. त्यामुळेच हाँगकाँगच्या क्रिप्टो-संबंधित व्यवहारांवर चीनचं लक्ष आहे.

Web3 म्हणजे काय? 

Web3 म्हणजे विकेंद्रित वेब यंत्रणा. ही यंत्रणा इंटरनेटच्या युगातली नवी पिढी विचारात घेऊन विससित केली आहे. ही यंत्रणा आणि त्याचा वापर करणाऱ्यांमध्ये विकेंद्रित आणि परस्परसंवाद सक्षम करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान उपयोगी पडते.

Web3 ही वेब 2.0 पेक्षा अद्ययावत आहे. वेब 2.0 मध्ये मोठ्या कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात डेटा असतो आणि ऑनलाइन अनुभवावर त्यांचे नियंत्रण असते. Web3 मध्ये वापरकर्त्यांना त्यांचा डेटा आणि परस्परसंवादांवर अधिक नियंत्रण ठेवता येते. विकेंद्रित प्रोटोकॉल आणि प्लॅटफॉर्म वापरून हे शक्य झाले आहे,   यामध्ये इथेरियम आणि IPFS ही विकेंद्रित अॅप्लिकेशन्स (dApps) तयार करता येतात. त्याचबरोबर क्रिप्टोकरन्सी व्यवहारांद्वारे मूल्याची देवाणघेवाण करता येते. Web3 यंत्रणा अर्थपुरवठ्यापासून सोशल मीडियापर्यंत सर्व उद्योगांच्या विस्तृत श्रेणीचे संभाव्य रूपांतर करू शकते आणि नव्या कल्पना आणि सहकार्यासाठी नवीन संधी निर्माण करू शकते.

प्रस्तावित नियम 

हाँगकाँगच्या अलीकडील क्रिप्टो नियमांमध्ये असे नमूद केले आहे की शहरात कार्यरत असलेल्या केंद्रीय आभासी चलन विनिमय सेवा किंवा प्रादेशिक गुंतवणूकदारांसाठी विपणन सेवा, सुरक्षा आणि भविष्यातल्या प्राधिकरणांकडून मिळवणे आवश्यक आहे. नवीन नियमांमध्ये मालमत्ता सुरक्षा उपाय, ग्राहकाची ओळख, संघर्ष निराकरण, सायबर सुरक्षा, आर्थिक लेखाजोखा, जोखीम मूल्यांकन तसेच पैशांची अफरातफर, दहशतवादासाठी वित्तपुरवठा आणि बाजारातील गैरव्यवहार रोखणे यांचा समावेश आहे. क्रिप्टोकरन्सी उद्योगात नावीन्य आणि विकासाला चालना देताना गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे हे या नियमनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हाँगकाँगला ब्लॉकचेन आणि क्रिप्टो-संबंधित व्यवसायांसाठी अधिक आकर्षक केंद्र बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. चीनमधील इतर प्रदेशांच्या दृष्टीने अधिक ब्लॉकचेन-अनुकूल धोरणे स्वीकारण्यासाठी हे एक मॉडेल म्हणून काम करते.

नव्या कल्पनांचा विचार

क्रिप्टो ट्रेडिंगवर चीनच्या क्रॅकडाऊननंतर देशातील क्रिप्टो कंपन्यांनी त्यांचे लक्ष परदेशाकडे वळवले आहे.  अनेकांनी अधिक सोयीस्कर ठिकाणी आपले तळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही नाविन्यपूर्ण कंपन्यांनी सिंगापूर आणि दुबई सारख्या ठिकाणी नवीन केंद्र स्थापन केल्या आहेत. त्यांचे विकासक अजूनही चीनमध्ये आहेत. क्रिप्टोकरन्सीसाठी हाँगकाँगने अधिक चांगले नियामक फ्रेमवर्क केल्यामुळे यापैकी काही कंपन्या पुन्हा आपल्या देशात परतू शकतील.

क्रिप्टो ट्रेडिंगच्या अस्थिरतेपासून वैयक्तिक गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी चीननेही उपाय योजले आहेत. तरीही चीनचे  Web3 मध्ये स्वारस्य वाढते आहे. अखिल जग याचा सक्रियपणे पाठपुरावा करणार असल्याने येणाऱ्या काळात ही यंत्रणा महत्त्वाची बनणार आहे. हाँगकाँगमधील डिजिटल मालमत्तेच्या नियमांबाबतच्या  घडामोडी केवळ चीनसाठीच नाही तर भारत आणि उर्वरित जगासाठीही एक वेधक परिस्थिती निर्माण करतात. हाँगकाँग हे जगातील सर्वात मोठ्या आर्थिक केंद्रांपैकी एक असल्यामुळे हाँगकाँगचा पूर्ण जगाच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो. जागतिक वित्त आणि नियामक प्रिस्क्रिप्शन या दोहोंच्या दृष्टीने  हाँगकाँग हे त्यांची डिजिटल मालमत्ता कशा प्रकारे नियंत्रित करते आणि त्यांच्याशी कसे जुळवून घेते याचे जगावरच दूरगामी परिणाम होणार आहेत.

अशी अंतर्दृष्टी जगभरातील धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त आहे. डिजिटल मालमत्ता नियमनासाठी एकच एक आकार आणि एकच एक उपाय नाही. असे असले तरी धोरणे ठरवण्यासाठी आधारभूत म्हणून काम करणारी काही प्रमुख तत्त्वे आहेत. ही तत्त्वे समजून घेतल्यास नियामकांना त्यांच्या देशासाठी म्हणून युनिक उपाय विकसित करण्यात मदत होईल.

पारंपरिक अर्थव्यवस्थेला पर्याय

डिजिटल मालमत्तेचा उदय सध्याच्या आर्थिक व्यवस्थेला कमकुवत करत नाही तर तो पारंपारिक वित्तव्यवस्थेला एक पर्याय देतो हे लक्षात घेतले पाहिजे.

क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन-आधारित टोकन्समध्ये वित्ताची कार्यक्षमता, सुलभता आणि सुरक्षितता सुधारण्याची क्षमता आहे. तथापि झपाट्याने बदलणाऱ्या आर्थिक परिसिथितीशी सुसंगत राहण्यासाठी पारंपारिक अर्थव्यवस्थेने या बदलांशी जुळवून घेतले पाहिजे. जूनमध्ये लागू होणार्‍या क्रिप्टो नियमांमध्‍ये हाँगकाँगने शहरात वेब3 यंत्रणा स्थापन करण्‍यासाठी 80 हून अधिक परदेशी आणि चिनी कंपन्यांचा पाठिंबा मिळवला आहे. हाँगकाँग मॉनिटरी आॅथॉरिटी देखील स्थिर नाण्यांबाबतच्या नियमांवर काम करत आहे. याची अंमलबजावणी 2024 पर्यंत होणे अपेक्षित आहे.

शिवाय सरकारने वेब3 यंत्रणेच्या वाढीला समर्थन देण्यासाठी HK$ 50 दशलक्ष (US$ 6.4 दशलक्ष) हाँगकाँग डाॅलर्सची तरतूद केली आहे. हाँगकाँगचे आर्थिक सचिव पॉल चॅन यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या 2023-2024 च्या अर्थसंकल्पीय भाषणात हे जाहीर केले. चीनचा एक विशेष प्रशासकीय प्रदेश म्हणून हाँगकाँगने आर्थिक धोरणे आणि नियामक फ्रेमवर्कमध्ये काही प्रमाणात स्वायत्तता मिळवली आहे. यामुळे हाँगकाँगला, जगभरातील भांडवल आणि बुद्धिमत्ता आकर्षित करून जागतिक आर्थिक केंद्र म्हणून आपली प्रतिष्ठा कायम ठेवता आली आहे. दरम्यान मुख्य भूप्रदेश असलेल्या चीनने कठोर नियम लागू करून आणि ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये मर्यादित प्रवेश ठेवून सावध दृष्टिकोन स्वीकारला आहे.

चीनच्या धोरणकर्त्यांना ब्लॉकचेनच्या संभाव्य फायद्यांची जाणीव आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल, कार्यक्षमता सुधारेल आणि खर्चही कमी होईल हे त्यांना माहीत आहे.

ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीसाठी हाँगकाँगच्या नियामक दृष्टिकोनाचे निरीक्षण करून चीनचे धोरणकर्ते या तंत्रज्ञानाच्या आर्थिक बाजारपेठेवरील प्रभावाचे निरीक्षण करू शकतात आणि संभाव्य जोखीम आणि फायद्यांचे मूल्यांकन करू शकतात. हाँगकाँगचे नियम नाविन्यपूर्णतेला चालना देण्यात आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यात यशस्वी ठरले तर ते अधिक वेब3 आणि ब्लॉकचेन-अनुकूल धोरणे स्वीकारण्यासाठी चीनसाठी एक मॉडेल म्हणून काम करू शकतात.

या कारणांमुळेच हाँगकाँगमध्‍ये चीनच्या डिजिटल मालमत्तांच्या प्रयोगात जगालाच स्वारस्य आहे. यामुळे एक उत्तम धोरण तयार होण्यात मदत करू शकते याची सगळ्यांना जाणीव आहे.  या जागेचे नियमन केले जावे की नाही हा प्रश्न जटिल आहे. तसेच नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी क्रिप्टो यंत्रणा  मोकळेपणाने चालवू देणे यामध्ये संभाव्य धोकेही आहेत.   या नाविन्यपूर्ण नियमनाचे यश आणि अपयश हे महत्त्वाचे पैलू आहेत. म्हणूनच धोरणकर्त्यांनी यामधल्या गतिमान परस्परसंवादातून शिकण्याची संधी म्हणून याकडे पाहायला हवे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.