Published on Apr 21, 2021 Commentaries 0 Hours ago

कोविडमुळे जागतिक पुरवठा साखळ्या कोसळल्यानंतर; आता तरी पुनर्वापरयोग्य, पर्यावरणपूरक अशा चक्रिय अर्थव्यवस्थेचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

पर्यावरणपूरक ‘चक्रीय’ अर्थव्यवस्थेकडे…

कोविड-१९ संकटामुळे जागतिक पुरवठा साखळ्या असुरक्षित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आता पुनर्वापरयोग्य उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या, पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या चक्रिय अर्थव्यवस्थेबद्दल आता लिहिलेबोलले जाऊ लागले आहे. या चक्रीय अर्थव्यवस्थेमुळे पर्यावरणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत होते. त्याच वेळी या अर्थव्यवस्थेत अर्थविषयक लवचिकपणाची गरज ओळखून सामाजिक पायाही मजबूत केला जातो. ही एक बहुमुखी संकल्पना असून विसाव्या शतकाच्या अखेरीस अस्तित्वात असलेल्या वैविध्यपूर्ण विचारप्रणालींमधून तिचा जन्म झाला असून एकविसाव्या शतकात ती व्यापक प्रमाणात स्वीकारली गेली.

चक्रीय अर्थव्यवस्था या संकल्पनेचा मोठा उपयोग युरोप आणि चीनमध्ये करण्यात येत असून, आता अन्य देशांनीही ही संकल्पना आपलीशी केली आहे. व्यापक शाश्वत विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ही संकल्पना व्यावहारिक मार्ग दाखवेल; तसेच ती सद्यस्थितीस आव्हान देईल आणि परिवर्तनात्मक बदलास बळकटी देईल, असे विचारवंत आणि व्यावसायिकांनी सिद्ध केले आहे.

चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी गेले वर्ष हे महत्त्वाचे वर्ष होते. अनेक देशांनी आपापले चक्रीय आराखडे सादर केल्यामुळे या विषयाला अधिक बळ मिळाले. चक्रीय अर्थव्यवस्थेविषयक धोरणे आणि उद्दिष्टे यांच्याशी बांधील असलेल्या कंपन्या व उद्योगांच्या आघाड्यांसाठी आणि युरोपीय महासंघासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे नव्या युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी जाहीर केले.

कोविड-१९ च्या संकटप्रसंगात एक समान प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे, चक्रीय अर्थव्यवस्थेच्या स्थित्यंतरातून काय शिकवणूक मिळाली आणि या स्थितीचा परिणाम काय होईल? या संकटाचा चक्रीयतेवर सकारात्मक परिणाम कसा होईल, यासंबंधी वैयक्तिकरीत्या निरीक्षण केलेले हे तीन विषय.

१. जागतिक आर्थिक व्यवस्थेचा पुनःसमतोल साधण्याची आणि आरोग्याची दखल घेणारी व भविष्यकालीन व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण परिवर्तनांच्या रूपात विचार करणारी लवचिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याची जाणीव निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत आहे.

२. कोविड-१९ संकटामुळे जागतिक पुरवठा साखळ्या असुरक्षित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आता आपल्याला स्थानिक स्तराचा अधिक विचार करण्याची गरज आहे.

३. आपल्या थेट संपर्कात येणाऱ्या स्थानिक समुदायांशी पुन्हा जोडून घेण्याची त्वरित गरज निर्माण झाली आहे. प्रवास करणे शक्य नसल्याने आपल्या अधिक घरात बांधून ठेवले गेले आहे. एवढेच नव्हे, तर त्यामुळे कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन वाढले आहेच, शिवाय पुन्हा आपसात जोडण्याची गरजही वाढली आहे.

अधिक मूलभूत प्रभाव साध्य करण्यासाठी एकत्र येऊन चक्रीय अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाच महत्त्वाची उदाहरणे सांगता येतील.

-चक्रीय अर्थव्यवस्था ही हवामानाशी संबंधित असू शकते: जग सध्या हवामानातील दुर्गतीच्या उंबरठ्यावर आहे. सध्याच्या हवामान बदलामुळे या शतकात जागतिक तापमान ३.२ अंश सेल्सिअसने वाढले आहे. चीन आणि अमेरिकेने चालू शतकाच्या मध्यापर्यंत कार्बन डायऑक्साइडच्या शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याची घोषणा केली आहे; परंतु ही काही औपचारिक राष्ट्रीय आश्वासने नाहीत आणि ती पॅरिस कराराचे उद्दिष्ट साध्य करण्यास पुरेशीही नाहीत. कारण जागतिक हवामान २ अंश सेल्सिअसच्या खाली, खरे तर आदर्श म्हणजे १.५ अंश सेल्सिअसच्या खाली ठेवणे, हे पॅरिस कराराचे उद्दिष्ट आहे.

जागतिक हवामान १.५ अंश सेल्सिअस ते २ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर टोकाचे प्रसंग ओढवून सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक स्तरावर विनाशकारी परिणाम भोगावे लागू शकतात. ‘दि सर्क्युलॅरिटी गॅप रिपोर्ट २०२१’मध्ये एक धोरण अधोरेखित करण्यात आले आहे. कार्बन उत्सर्जन २२.८ अब्ज टनांपर्यंत कमी करून ते २ अंश सेल्सिअसच्या खाली आणण्याचे उद्दिष्ट त्यात ठेवण्यात आले आहे. सन २०१९ मधील टक्क्यांच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन ३९ टक्क्यांनी खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या अहवालानुसार, समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकूण उत्सर्जनाच्या ७० टक्के उत्सर्जन हे सार, प्रक्रिया आणि मालाचे उत्पादन याच्या माध्यमातून केले जाऊ शकते. या गरजांमध्ये कपडे, फोन आणि भोजन यांचा समावेश होतो. जगात वर्षभरातून एकदा १०० जीटीपेक्षा जास्त सामग्री वापरली जात आहे आणि त्यातील केवळ ८.६ टक्के वस्तूंचा पुनर्वापर केला गेला आहे. ज्या धोरणांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत, त्या धोरणांमुळे वार्षिक भौतिक वापर ७९ जीटीपर्यंत कमी होऊ शकतो.

उत्पादने आणि सेवा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीचे प्रमाण कमी करून आणि संसाधनांचा वापर दीर्घ काळ करून आणि जीवाश्म इंधनासारख्या मर्यादित स्रोतांच्या जागी पुन्हा निर्माण करता येणाऱ्या अपारंपरिक उर्जा स्रोतांची स्थापना करता येईल. उत्पादनांचे प्रमाणही वाढवून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ दुप्पट म्हणजे ६ टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत पुनर्वापर करावा लागेल.

-चक्रीय अर्थव्यवस्था ही ‘नूतन, सर्वसमावेशक आणि हरित अर्थव्यवस्थे’साठी एक वैविध्यपूर्ण पाया मिळवून देते. चक्रीय अर्थव्यवस्थेची आजवर नेमकी व्याख्या केली गेलेली नाही. ही खूप वेगळी संकल्पना असून त्यावर अनेक विचारप्रणाली जन्माला आल्या आहेत. त्यातून असाधारण तत्त्वे आणि धोरणे समोर आली आहेत. चक्रीय अर्थव्यवस्थेचे वर्णन करण्याशी संबंधित समर्थक भिन्न असू शकतात, तरी पर्यावरणीय आणि अर्थव्यवस्थेमधील तणाव सोडविण्यासाठी पर्यायी उपाय शोधण्याची गरज आहे, यावर ते मूलतः सहमत आहेत आणि ते समाजाला योगदानही देत आहेत.

सध्याचा काळ हा कृती करण्याचा आहे. रेषात्मक अर्थव्यवस्थेत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची क्षमता नाही आणि त्याला पर्याय शोधणे आवश्यक आहे. आपले पर्यावरणीय छत्र तोडून टाकणे आणि सामाजिक पाया मजबूत करण्यात आलेले अपयश ही खरी आव्हाने आहेत. सध्या सुरू असलेले वाद हे क्षमतानिर्मितीच्या प्रयत्नांच्या मजबुतीकरणासाठी मदत करत असताना चक्रीय अर्थव्यवस्थेची व्यवहार्यता दाखवण्याची वेळ आली आहे.

-चक्रीय अर्थव्यवस्था ही जागतिक प्रयत्नांचा परिपाक आहे. चक्रीय अर्थव्यवस्था भविष्यातील शाश्वत अर्थव्यवस्थेसाठी एक नवी संधी निर्माण करते. जागतिक अर्थव्यवस्था ही अत्यंत एकात्मिक आहे. रेषात्मक अर्थव्यवस्थेपासून फारकत घेण्यासाठी जगभरातील सर्व स्तरांवरील मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. मायक्रो, मेसो आणि मॅक्रो स्तरावरील उपाय प्रमुख भूमिका बजावतील. आतापर्यंत चक्रीय अर्थव्यवस्थेचा भर हा प्रामुख्याने औद्योगिक अर्थव्यवस्थेतील आव्हानांवर देण्यात आला होता. विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे त्वरित लक्ष पुरवणेही आवश्यक आहे. यासाठी सामाजिक आणि मानवी विकासाच्या विचारांच्या अधिक चांगल्या एकीकरणाची गरज आहे.

-चक्रीय अर्थव्यवस्था स्थानिक आणि जागतिक स्तरावर अधिक लवचिकतेचा पुरस्कार करते. दोन प्रकारच्या चक्रीय अर्थव्यवस्था विशेषतः लवचिकता वाढवत असतात. पहिला म्हणजे, पर्यायी आणि अपारंपरिक स्रोत उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाची वैविध्यता वाढवून लवचिकतेला चेतना देतात. दुसरा म्हणजे, चक्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये विकेंद्रित मूल्य साखळ्यांवर जागतिक प्रतिकूलतेचा प्रभाव कमी होतो आणि त्या स्थानिक स्तराला मदत करतात. त्यामुळे त्या वेगाने निर्णय घेण्यास उपयुक्त ठरतात.

-विशेषतः चक्रीय अर्थव्यवस्थेतील नोकऱ्यांचे महत्त्व लक्षात घेता वेगाने आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपण धोरणकर्त्यांना सजग करायला आणि भाग पाडायला हवे. चक्रीय अर्थव्यवस्थेकडून पर्यावरणीय सीमांमध्ये राहाणाऱ्या सर्वांचेच हित साधले जाते. समृद्ध समाजासाठी आणि संपत्तीच्या समान वाटपासाठी नोकऱ्यांच्या माध्यमातून कल्याणाचा मार्ग दाखवला जातो.

-शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चक्रीय अर्थव्यवस्थेचे योगदान आवश्यक असते. चक्रीय अर्थव्यवस्था म्हणजे केवळ आकांक्षांचे गाठोडे नाही, तर सकारात्मक परिणामांच्या प्रक्रियाकेंद्री तत्त्वांचा हा समुच्चय आहे. या अर्थव्यवस्थेचा अवलंब करणाऱ्यांनी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसह सध्याच्या विकासाच्या आराखड्यात आले योगदान द्यायला हवे. त्यांचे सर्वांत अमूल्य योगदान म्हणजे व्यावहारिक आणि गुणात्मक तोडगे काढण्यासाठी माहिती उपलब्ध करून देणे; तसेच परिवर्तनीय बदलाचा पुरस्कार करण्यासाठी या अर्थव्यवस्थेत असलेली सद्यस्थितीला आव्हान देण्याची क्षमता.

एका व्यापक आणि वैविध्यपूर्ण एकीकरणाची आता गरज आहे. कोणताही मोठा बदल एका रात्रीत होत नाही, की व्यापक व वैविध्यपूर्ण आधाराशिवाय होत नाही. प्राथमिक स्तरावरील आर्थिक शिस्तीसाठी चक्रीय अर्थव्यवस्थेने व्यापार आणि उद्योगाला सक्षम बनवायला हवे. धोरणकर्त्यांनी स्थूल आर्थिक पुरस्कार करण्यात बदल करायला हवा आणि मूल्य साखळ्यांभोवतीच्या धोरणावरील आपली सर्वसमावेशक पकड घट्ट करायला हवी. संकल्पनात्मक विकासाबाबत समाजाने आपले नेतृत्व कायम ठेवायला हवे आणि दीर्घकालीन लाभासाठी दक्ष राहाणे आणि समतोल राखणे आवश्यक आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.