Author : Harsh V. Pant

Published on Sep 14, 2023 Commentaries 0 Hours ago
मिलीटराईझ्ड जगातील नवीन समतोल

युक्रेनवर आक्रमण केल्याच्या वर्षभरानंतर रशिया आणखी एका आक्रमणाची सज्जता करत असल्याचे वृत्त समोर येत आहे. याच पार्श्वभुमीवर, जग एका धोकादायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट होत आहे. पाश्चिमात्य जगाने युद्धात स्वतःला अडकवले असले तरीही, रशिया आणि युक्रेन ही दोन्ही राष्ट्रे युद्धक्षेत्रात आपापली उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. युरेशियातील या संकटाने भू-राजनीतीनुसार जागतिक व्यवस्थेला येणारा आकार पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. अर्थात ही बाब युरोपमधील अनेकांनी कालबाह्य झाल्याचे मानले होते. युरेशियामधील संघर्ष आणि इंडो-पॅसिफिकमधील शक्तीचे संतुलन बदलल्यामुळे, जग एका वेगळ्या टप्प्यावर आहे.

रशिया-युक्रेन युद्धाने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील ध्रुवीकरण आणि त्याचे जागतिक युतींवरील दीर्घकालीन परिणाम अधोरेखित केले ​​आहेत. चीन-रशियाची युती दिवसेंदिवस मजबूत होत आहे आणि ही भागीदारी समजुन घेण्याचे आव्हान पाश्चिमात्य जगासमोर आहे. युनायटेड स्टेट्स आणि त्याच्या युरोपियन भागीदारांना यापुढे युरेशिया आणि इंडो-पॅसिफिककडे दोन भिन्न प्रिझमद्वारे पाहण्याची लक्झरी राहीलेली नाही. परिणामी, रशियावर धोरणात्मक लक्ष वाढत असले तरीही चीनवरील धोरणात्मक लक्ष कमी झालेले नाही. या बीजिंग-मॉस्को भागीदारीला धोरणात्मक प्रतिसाद तयार करण्यात पश्चिमात्य जग किती प्रभावी ठरणार आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.

चीन-रशियाची युती दिवसेंदिवस मजबूत होत आहे आणि ही भागीदारी समजुन घेण्याचे आव्हान पाश्चिमात्य जगासमोर आहे.

हे मोठे शक्ती ध्रुवीकरण उर्वरित जगाचा आवाज दाबुन टाकत आहे तसेच सर्वांची चिंताही वाढवत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा, अन्न आणि सोबतच्या आर्थिक संकटांनी अनेक देशांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली असली तरी विचलित झालेल्या जगाला उपाय शोधण्यासाठी फारसा वेळ नाही. बहुपक्षीय संस्था आणि त्यासंबंधीचे फ्रेमवर्क सर्वत्र फसल्याने जागतिक प्रशासन संकटात आहे. यामुळे ग्लोबल साऊथला दिशा देण्याची आकांक्षा ठेवणाऱ्या भारतासारख्या देशाला त्याचे नेतृत्व दाखवण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. एक जबाबदार जागतिक स्टेकहोल्डर म्हणून स्वत:साठी नवीन जागतिक भूमिका तयार करण्याच्या प्रयत्नात सर्वात कमकुवत आणि गरीब देशांचे कारण पुढे नेण्यासाठी या वर्षी आपले जी २०चे अध्यक्षपद वापरण्याचा नवी दिल्लीचा मानस आहे.

सूडबुद्धीने करण्यात येणारा बळाचा वापर हा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये शेवटचा उपाय ठरत आहे. सार्वभौम राष्ट्राविरुद्ध रशियाची वाढती आक्रमकता आणि सागरी व जमिनीवरील सीमेची प्रादेशिक स्थिती बदलण्याच्या प्रयत्नात चीनची वारंवार दिसणारी आक्रमकता यामुळे लहान-मोठ्या राष्ट्रांना त्यांच्या संरक्षणात्मक भूमिकेकडे पुनर्विचार करण्यास भाग पाडले जात आहे. युद्धाचे भविष्य नवीन तंत्रज्ञानाद्वारे तसेच बिगर लष्करी बळजबरी उपायांच्या घटत्या परिणामकारकतेची नवीन ओळख करून आकारले जात आहे.

भारत आत्तापर्यंत पाश्चिमात्य राष्ट्रे आणि रशियाशी आपले संबंध संतुलित करण्यात यशस्वी ठरला आहे. परंतु हे एक नाजूक संतुलन साधण्यात घेण्यात आलेले कष्ट अधिक आहेत. येत्या काही महिन्यांत संघर्ष वाढून फॉल्टलाइन्स तीव्र होत असल्याने, नवी दिल्लीसमोरील आव्हाने वाढणार हे स्पष्ट आहे.

हे भाष्य मूळतः Council on Foreign Relations मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.