Author : Manoj Joshi

Published on Oct 03, 2023 Commentaries 0 Hours ago

युक्रेन संकटानंतर वाढत्या अमेरिका-युरोप संबंधांचा युरोपीय युनियनच्या चीनबाबतच्या हितसंबंधांवर परिणाम झाला आहे का?

युरोप आणि चीन: युक्रेन संकटाचा प्रभाव

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी ५ ते ७ एप्रिल दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आयोजित शिखर परिषदेकरता चीनला भेट दिली. युरोपीय युनियन एक संघ म्हणून काम करेल, असा संकेत त्यांच्या यजमानांना देत असताना त्यांच्या संयुक्त भेटीचा उद्देश चीनला गुंतवून ठेवण्याचा होता.

युक्रेनमधील घटना, शिनजियांगमधील मानवी हक्कांशी संबंधित समस्या आणि अमेरिका-चीन तणावामुळे निर्माण झालेल्या रस्साखेचीमुळे चिघळलेले चीनसोबतचे संबंध संतुलित करण्यासाठी युरोपने केलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ आणि स्पॅनिश पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी चीनला भेट दिली आहे.

युक्रेनमधील घटना, शिनजियांगमधील मानवी हक्कांशी संबंधित समस्या आणि अमेरिका-चीन तणावामुळे निर्माण झालेल्या रस्सीखेचीमुळे चिघळलेले चीनसोबतचे संबंध संतुलित करण्यासाठी युरोपने केलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून उर्सुला वॉन डेर लेयेन चीनमध्ये होत्या आणि चिनी लोकांनी त्यांच्या संबंधित भेटी ज्या पद्धतीने हाताळल्या, त्यात तीव्र फरक होता. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पूर्ण मानाने, भव्य आदरातिथ्य करण्यात आले, तर उर्सुला वॉन डेर लेयेन यांचे स्पष्टरीत्या थंड, अनुत्सुकरीत्या स्वागत करण्यात आले. युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्याशी जे मजबूत संबंध निर्माण केले आहेत, त्यामुळे हे घडले आहे.

अमेरिकेसोबतचे संबंध अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचत असताना आणि युक्रेन संकटाच्या संदर्भात चीनच्या कृतींबद्दल स्पष्ट साशंकता असताना चीनला युरोपशी जोडले जाण्यात स्वारस्य आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, चीनचे सर्वोच्च मुत्सद्दी वांग यी यांनी युरोपचा दौरा केला आणि म्युनिक सुरक्षा परिषदेत भाषण केले, जिथे त्यांनी युक्रेनसाठी चीनची १२ कलमी शांतता योजना सादर केली आणि टेहळणी करण्यासाठी धाडल्या गेलेल्या बलून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला संदेश पाठवण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या चीन भेटीच्या पूर्वसंध्येला, उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी तज्ज्ञांसमोर पुतीन यांच्याशी मैत्रीचे संबंध कायम ठेवल्याबद्दल शी जिनपिंग यांच्यावर टीका करणारे कठोर भाषण दिले.

चिनी शांतता प्रस्तावाचा संदर्भ देत, त्यांनी पुस्ती जोडली की, युक्रेनियन भूभागाच्या संलग्नीकरणाकडे लक्ष न देणारी कोणतीही योजना व्यवहार्य नाही. मात्र, त्यांनी स्वीकारले की, युरोपसाठी अलग होणे हे व्यवहार्य धोरण नव्हते, तरीही “राजनैतिक आणि आर्थिक धोका कमी करणे” आवश्यक होते आणि या रणनीतीचा एक भाग म्हणून, युरोपीय युनियनने चिनी लोकांसोबत गैरसोयीच्या समस्या मांडण्यास अजिबात संकोच करू नये, त्याच वेळी, युरोपीय युनियन अर्थव्यवस्थेला आणि उद्योगांना अधिक स्पर्धात्मक व लवचिक बनवणारी धोरणे स्वीकारायला हवी.

दोन्ही युरोपीय नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय तसेच ६ एप्रिल रोजी त्रिपक्षीय भेट घेतली. बैठकीपूर्वी, शी जिनपिंग यांच्या बाजूने उभे राहून, मॅक्रॉन म्हणाले की, ते युक्रेन प्रश्नावर “रशियाला तर्काकडे आणि सर्वांना वाटाघाटीच्या मेजावर परत आणण्यासाठी” चीनकडे अपेक्षेने बघत आहेत. मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर, शी जिनपिंग यांनी शांतता चर्चा सुलभ करण्यासाठी आणि युक्रेन संकटावर राजकीय तोडगा काढण्याच्या चीनच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आणि सांगितले की, चीन या उद्देशासाठी फ्रान्ससोबत संयुक्त प्रस्ताव जारी करण्यास तयार आहे. लक्षणीय बाब अशी की, त्यांच्या विधानात असे म्हटले आहे की, नागरिकांचे संरक्षण करण्याच्या गरजेव्यतिरिक्त, “अण्वस्त्रे वापरली जाऊ नयेत आणि आण्विक युद्ध लढले जाऊ नये.” शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करताना, निवेदनात नमूद केले आहे की, त्यांनी “सर्व पक्षांच्या कायदेशीर सुरक्षा हितांना सामावून घ्यायला हवे. राजकीय तोडगा काढायला हवा आणि संतुलित, प्रभावी आणि टिकाऊ युरोपीय सुरक्षाविषयक रचनेला प्रोत्साहन द्यायला हवे.”

शी जिनपिंग आणि वॉन डेर लेयेन यांच्या बैठकीसंदर्भातील अधिकृत विधानातून शी जिनपिंग यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये एक सामरिक शक्ती म्हणून युरोपीय युनियनच्या भूमिकेवर जोर दिला. ते म्हणाले की, “चीन आणि युरोपीय युनियनने मतभेदांना सामोरे जावे, त्यांचे व्यवस्थापन करायला हवे आणि परस्परांचा आदर करायला हवा.” वॉन डेर लेयेन यांनी नमूद केले की, हवामान बदल आणि प्रादेशिक विवादांचे राजकीय निराकरण यांसारख्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात एकमत आहे. त्यांनी नमूद केले की, युरोपीय लोकांनी ‘अलग होण्याची’ ही संकल्पना स्वीकारली नाही आणि चीनशी त्यांचा रखडलेला संवाद पुन्हा सुरू करण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

युक्रेन संघर्षावर मतभेद

परंतु संध्याकाळी त्यांनी युरोपीय युनियन कार्यालयात एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी वॉन डेर लेयेन यांनी रशियन युद्धाच्या प्रयत्नांना मदत करण्याविरोधात चीनला चेतावणी दिली की, “यामुळे युरोपीय युनियन आणि चीनमधील संबंधांना खरोखरच हानी पोहोचेल.” मात्र, त्यांनी लक्षात घेतले की, चीनची भूमिका महत्त्वपूर्ण होती आणि युरोपीय युनियनने “आपली भूमिका बजवावी आणि युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर करणारी शांतता वाढवावी”, अशी अपेक्षा केली.

पण घोषणा आणि कानाला गोड वाटणारे शब्द याखेरीज, युक्रेनच्या बाबतीत अभावानेच व्यावहारिक मूल्य साध्य झालेले दिसते. युक्रेन संघर्षावर चीनच्या भूमिकेच्या संदर्भात शी जिनपिंग यांनी घेतलेल्या भूमिकांमध्ये कोणताही स्पष्ट बदल झालेला नाही.

तसे, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अलीकडे पार पडलेल्या रशिया भेटीनंतर ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण साधतील, अशी अपेक्षा खोटी ठरली आहे. वॉन डेर लेयेन यांनी सांगितले की, त्यांनी शी जिनपिंग यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यांचा प्रतिसाद असा होता की, जेव्हा “परिस्थिती आणि वेळ योग्य असेल” तेव्हा ते बोलण्यास तयार असतील.

त्रिपक्षीय बैठकीसंदर्भात चीनने केलेल्या अधिकृत विधानातून असे सूचित करण्यात आले आहे की, युरोपच्या संदर्भात चीनची धोरणात्मक स्वायत्तता राखणे, पुरवठा साखळी सुरक्षा वाढवणे आणि दुय्यमीकरण टाळणे हे युरोपचे उद्दिष्ट आहे. “चीन-युरोपीय युनियन संबंध कोणत्याही तिसऱ्या पक्षाला लक्ष्य करत नाहीत आणि ते कोणत्याही तिसऱ्या पक्षावर अवलंबून नसावेत किंवा लादलेले नसावेत,” असे शी जिनपिंग यांनी नमूद केले. नवीन शीतयुद्धाला खतपाणी घालणाऱ्या “लोकशाही विरुद्ध हुकूमशाही” कथन मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्यांनी हल्लाबोल केला.

बुधवारी, एका मुलाखतीत, युरोपीय युनियनमधील चीनचे राजदूत फू काँग यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन संघर्षाच्या पूर्वसंध्येला रशियन-चिनी संयुक्त निवेदनात, त्यांच्या संबंधांना “कोणत्याही मर्यादा” नाहीत, असे घोषित करण्यात आले, ते चुकीचे वर्णन करण्यात आले आहे आणि ‘कोणतीही मर्यादा नाही’ संबंध हे तोंडाची वाफ दवडण्याखेरीज दुसरे काही नाही.  फू यांच्या टीकेचा उद्देश वॉन डेर लेयेन यांच्या टीकेला विरोध करणे हा होता.

युरोपीय युनियन आणि चीनमधील इतर महत्त्वपूर्ण मतभेद

युक्रेनबाबत चीनच्या भूमिकेशिवाय, या दोघांमध्ये फूट पाडणारे इतर मुद्देही आहेत. एक प्रमुख म्हणजे शिनजियांगमधील उइघुर लोकांशी केलेली वागणूक, ज्यामुळे २०२१ मध्ये काही चिनी अधिकारी आणि संस्थांवर युरोपीय युनियनचे निर्बंध लादले गेले आणि चीनने युरोपीय संसदेच्या सदस्यांविरूद्ध निर्बंध लादले. युरोपीय युनियन-चीन यांच्यातील एक महत्त्वाचा गुंतवणूक करार तेव्हापासून अधांतरी राहिला आहे. तैवानला प्रतिनिधित्व कार्यालय उघडण्याची परवानगी दिल्याबद्दल लिथुआनियावर चीनने लादलेल्या निर्बंधांबद्दल युरोपियन्सही खूश नाहीत. 

चीन आणि युरोपीय युनियन यांच्यात महत्त्वपूर्ण व्यापार संबंध आहेत; २०२२ मध्ये चीन हा युरोपीय युनियनच्या निर्यातीचे तिसरे सर्वात मोठे गंतव्यस्थान होता आणि युरोपीय युनियनमधील सर्वात मोठा निर्यातदार देश होता. चीनच्या अलीकडील विधानांनी असे सुचवले आहे की, परस्परांशी सहकार्याचे संबंध राखण्यात स्वतःचा लाभ असल्याचे दोन्ही बाजूंना लक्षात आले. या भेटीदरम्यान फ्रान्सने आणि चीनने कोट्यवधी युरोच्या १६० एअरबस प्रवासी विमानांच्या विक्रीसह चर्चा केलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या अनेक सौद्यांवरून हे संबंध किती उपयुक्त असू शकतात, हे स्पष्ट होते, त्यापैकी बरीच टियांजिनमधील एअरबस कारखान्याच्या नव्या जुळवणी सारणीत बनवली जातील.

पण मोठे मतभेद अमेरिका आणि युरोपमधील चीनबाबतच्या बदललेल्या धारणांमधून निर्माण होतात. २०१७ मध्ये, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाने चीनला ‘सामरिक प्रतिस्पर्धी’ म्हणून घोषित केले. दोन वर्षांनंतर, २०१९ मध्ये एका संयुक्त निवेदनात युरोपियन कमिशनरनी, चीनला “तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाचा पाठपुरावा करणारा एक आर्थिक प्रतिस्पर्धी आणि प्रशासनाच्या पर्यायी प्रारूपांचा प्रचार करणारा एक पद्धतशीर प्रतिस्पर्धी” असे संबोधले. आज, युरोपीय युनियन फक्त ‘पद्धतशीर प्रतिस्पर्धी’ म्हणजे काय, याचा सामना करत आहे.

रशियाला पाठिंबा देण्याच्या निर्णयाद्वारे आजच्या चीनने युरोपीय युनियनला एक महत्त्वपूर्ण राजकीय आव्हान दिले आहे. ‘अमर्यादित’ भागीदारी निहित आहे, तीच गेल्या महिन्यात रशियाच्या भेटीनंतर पुतिन यांचा निरोप घेताना शी जिनपिंग यांनी केलेल्या टिप्पण्णीमधून स्पष्ट होते: “सध्या काही बदल आहेत, जे आपण गेल्या शंभर वर्षांत पाहिलेले नाहीत. आणि आम्हीच हे बदल एकत्र घडवत आहोत.”

या भेटीत चीन-युरोप आणि चीनची गतिशीलता स्पष्टपणे दिसून आली. जेथे युरोपीय युनियनने संयुक्त आघाडी सादर करण्याचा प्रयत्न केला, तेथे वॉन डेर लेयेन यांना डावलून मॅक्रॉन यांचे भव्य आदरातिथ्य करून चिनी लोकांनी पसंतीचे खेळ केले. २७ सदस्य देशांमधील मतभेदांना खेळवणे ही युरोपमधील चीनची रणनीती आहे. वांग यी यांच्या फेब्रुवारी दौर्‍यात- त्यांनी फ्रान्स, जर्मनी, इटली आणि हंगेरी या देशांना भेट दिली, जे चीनशी मैत्रीपूर्ण आहेत, असे समजले जाते.

काही युरोपीय वर्तुळात अशी चिंता आहे की, गटबाजी उगीचच जास्त प्रतिक्रिया देत आहे आणि याचा परिणाम चीनमधील युरोपीय युनियन हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. परंतु दुसरीकडे, युरोपीय युनियन आणि अमेरिकेने त्यांचे मतभेद बाजूला ठेवून युक्रेनला मदत करण्यासाठी एकजुटीने काम करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत.

अलिकडच्या काळात, चीनने चीन आणि मध्य आणि पूर्व युरोपीय देशांच्या गटाला प्रोत्साहन दिले आहे, ज्यांना १६+१ आणि १७+१ गट म्हणूनही ओळखले जाते. परंतु हे लिथुआनियन मुद्द्यावर आणि आता युक्रेन संघर्षावर आधारित आहे, जिथे चिनी धोरणाने विशेषतः पूर्व युरोपमध्ये लक्षणीय अस्वस्थता निर्माण केली आहे.

या सगळ्यात, युरोपसाठी प्रश्न असा उपस्थित होतो की, युक्रेन संघर्षानंतर अमेरिकेच्या खूप जवळ आल्याने त्याने आपली काही धोरणात्मक स्वायत्तता गमावली आहे का?” काही युरोपीय वर्तुळात अशी चिंता आहे की, गटबाजी जरा जास्तच प्रतिक्रिया देत आहे आणि याचा परिणाम चीनमधील युरोपीय युनियनच्या हितसंबंधांवर परिणाम करू शकतो. परंतु दुसरीकडे, युरोपीय युनियन आणि अमेरिकेने त्यांचे मतभेद बाजूला ठेवून युक्रेनला मदत करण्यासाठी एकजुटीने काम करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. पुनरुज्जीवित नाटो सुरक्षा आघाडीवर काम करत असताना, नवी ‘अमेरिका- युरोपीय युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद’- डिजिटल पायाभूत सुविधा आणि जोडणी, उदयोन्मुख तंत्रज्ञानासंदर्भातील सहकार्य, लवचिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीला प्रोत्साहन मिळण्याकरता एक नवीन चौकट तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे 

 

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Manoj Joshi

Manoj Joshi

Manoj Joshi is a Distinguished Fellow at the ORF. He has been a journalist specialising on national and international politics and is a commentator and ...

Read More +