Published on Oct 28, 2020 Commentaries 0 Hours ago

आपण माणूस असण्याचा अर्थ काय? हा प्रश्न विचारत चौथी औद्योगिक क्रांती आज आपल्याला आव्हान देत आहे. पण, माणसाने कायमच अशा आव्हांनांना समर्थ उत्तर दिले आहे.

माणसाला गरज डिजिटल शहाणपणाचीमाणसाला गरज डिजिटल शहाणपणाची

सध्या जगभर चौथ्या औद्योगिक क्रांतीचा बोलबाला आहे. या भविष्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्षम मनुष्यबळ कसे तयार करता येईल, या महत्वाच्या प्रश्नावर सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. कारण “कौशल्य” हा असा मुद्दा आहे की. ज्यामुळे या औद्योगिक क्रांतीची दिशाच बदलू शकते. त्यामुळे भविष्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे, ही आजच्या काळाची गरज ठरली आहे. त्या दिशेने आज पावले पडत असली, तरीही या मुद्द्याकडे अधिक व्यापकतेने पाहण्याची गरज आहे.

सर्वसाधारणपणे तंत्रविषयक कौशल्ये म्हटली की, प्रोग्राम डेव्हलपर्स, कोडर आणि जटिल तांत्रिक कौशल्यावरच अधिक भर असतो. पण तेवढेच पुरेसे नाही. आपल्याला डेटा सायंटिस्ट, कोडर अशी तांत्रिक कौशल्ये गरजेची आहेतच. पण, ही कौशल्ये उत्पादकांकरिता असून ती संबंधित लोकांच्या हितासाठी काम करतील आणि तेवढ्यापुरत्याच नवनिर्मितीला चालना देतील. आपल्याला त्यापलिकडे जाऊन भविष्यातील डिजिटल कौशल्यांचा विचार करायला हवा. ती अधिक व्यापक असणे गरजेचे आहे, त्यामध्ये उत्पादकांसाठी कौशल्ये, समावेशनकरिता कौशल्ये आणि मानवी समाज म्हणून प्रगती करण्यासाठी कौशल्य यांचा स्वतंत्रपणे विचार करायला हवा.

साधारणपणे, जगभर पसरलेल्या मेगाटेक कंपन्यांची नवीन नाविन्यपूर्ण उत्पादने त्यांच्या स्थानिक बाजारपेठा अगदी उत्सुकतेने वापरतात. त्यामुळे या कंपन्या यशस्वी आहेत. या मोठ्या कार्पोरेट कंपन्या, मध्यम व्यवसाय, सार्वजनिक क्षेत्र आणि सामान्य ग्राहक जोपर्यंत स्थानिक उत्पादनांची खरेदी करत नाही, तोपर्यंत स्थानिक नवनिर्मितीला भरभराट येणार नाही. या स्थानिक वापरला जो प्रमुख अडथळा आहे, तो स्वतः खरेदीदाराचाच आहे. कारण त्यांना अधिक डिजिटल कौशल्य आणि जागरूकतेची गरज आहे. एकतर आपल्याला काय हवेय तेच माहीत नाही किंवा जे हवे ते उपलब्ध देखील आहे. पण ज्या वस्तू आपल्याला समजलेल्या नाहीत त्या खरेदी कमी आपण कमी करतो.  त्यामुळे ही परिस्थिती आहे.

येथे कौशल्यांबद्दलच्या सर्वसमावेशकतेचा संबंध येतो. डिजिटल उत्पादने आणि सेवा वापरण्यास प्रत्येक व्यक्तीला सक्षम करतील अशी कौशल्ये म्हणजेच ‘समावेशन कौशल्ये’. त्यामध्ये अँप्लिकेशन्स, ऑनलाईन संवाद व सहयोगी साधने, सायबर सुरक्षा, माहितीची प्रक्रिया आणि डिजिटल तंत्रज्ञानामागील क्षमतेची मूलभूत समज यांचा समावेश आहे. प्रत्येकजण परिस्थितीशी अनुकूल होण्यास आणि भविष्यात ती कौशल्ये वापरण्यास सक्षम असतील. तसेच प्रगतीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये ही सर्वात कठीण कौशल्ये आहेत. त्यामध्ये संवाद, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, नेतृत्व व भावनिक चपळता यासारखी ती कौशल्ये आहेत. गंभीर विचारसरणी, सर्जनशीलता व समस्या सोडविणे या कौशल्यांचाही त्यामध्ये समावेश होतो.

प्रगतीच्या कौशल्याना विकसित करण्यासाठी, ज्ञान -हस्तांतरणाच्या आधारे आमच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीचे मॉडेल आपण जाणून घेणे आवश्यक आहे. चार्ल्स डार्विन यांचे वापरले जाणारे उद्गार असे की, “ही जिवंत असणारी प्रजाती ही काही सर्वात बलवान किंवा सर्वात हुशार असणारी प्रजाती नाही, तर बदलण्यासाठी सर्वात अनुकूल असणारी प्रजाती आहे.” त्यांच्या या उद्गारातून आम्हाला काही संकेत मिळतात. अधिकाधिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी, त्याकरिता सक्षम करण्यासाठी तशा शिक्षणपद्धतीची आज गरज आहे. मानसिक स्वास्थ, मूल्ये आणि आचरण बदलेल असे शिक्षण हवे, ज्यामुळे लोक स्वयंप्रेरणेने सुरुवात करतील, पुढाकार घेतील आणि स्वतःच्या जीवनातील अनुभवांना दिशा देतील.

उदाहरणार्थ, तुम्ही एका होतकरू नर्सला आधुनिक सामग्री देऊ शकता, पण त्या सामग्रीमुळे आवश्यक अशी कोणी महान नर्स बनणार नाही, हे आम्हाला आधीच माहीत आहे. तर महान नर्स बनण्यासाठी वेगळे काहीतरी करावे लागेल. हे ‘वेगळे काहीतरी’ म्हणजेच आपले आचरण, विचारसरणी आणि मूल्ये आहेत. मानसिकता आणि आचरण विकसित करण्यासाठी आपल्याला ‘काय’ (विषय) शिकवले जाते यापेक्षा, चांगल्या आव्हानांचा माध्यमातून, प्रदीर्घ अनुभवांचा वापर आणि प्रेरणा याद्वारे ते ‘कसे’ शिकवले जाते ते महत्वाचे आहे.

दुर्दैवाने शैक्षणिक आणि मनुष्यबळ विकासाचे बहुतांशी प्रयत्न हे विषययुक्त शिक्षणावर भर देणारे आहेत. आमची स्मरणशक्ती आणि विश्लेषणात्मक बौद्धिक कार्ये यांनी जेव्हा इतर प्रजाती आणि मशिन्सपासून मानवाला वेगळे केले तेव्हाच, मागील औद्योगिक क्रांती लक्षात घेऊन प्रमाणबद्ध चाचणी आणि समरूप शिक्षण यांची रचना केली गेली आहे.

त्याऐवजी आपण मानवाची प्रमुख कार्ये आणि मूलभूत क्षमता ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याद्वारे जे माहीत आहे ते आपण बदलू शकतो. चांगल्या विचारसरणीसाठी तसेच या माहितीचे प्रमाणीकरण, संकलन, विश्लेषण आणि वर्गीकरण कसे करावे ते जाणून घेऊन माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी अन्य साधनांसोबतच साक्षरता आणि संख्या या मूलभूत क्षमता असू शकतात. आपण जेव्हा तपशीलवार (झूम इन) पाहतो तेव्हा ते विश्लेषण कार्य असते आणि जेव्हा आपण ढोबळ किंवा मोठ्या दृश्यात (झूम आऊट) पाहतो तेव्हा ते संश्लेषण कार्य असते.

जेव्हा आपण मोठ्या परिदृश्यात पाहतो, खासकरून कारण आणि घटनांचा उद्धेश याकडे आपण पाहतो तेव्हा, फक्त विश्लेषण कार्येचं नव्हे तर संश्लेषण कार्यासाठीसुद्धा संपूर्ण बौद्धिक कार्याचे समर्थन गरजेचे आहे. दुसऱ्या मूलभूत क्षमता म्हणजे सर्जनशीलता आणि समस्या सोडविणे या आहेत. अनेकांना असे वाटते कि सर्जनशीलता म्हणजे चाकरीबाहेर जाऊन विचार करणे म्हणजेच आऊट ऑफ बॉक्स विचार करणे. पण जेव्हा आपण चाकोरीबाहेर जाऊन विचार करतो तेव्हा आपण निर्विचार होतो. वास्तविकपणे, सर्जनशीलता म्हणजे आपण आपल्या मनात ज्या वेगवेगळ्या चाकोऱ्या आखून ठेवल्या आहेत, त्याची जाणीव करून घेणे आणि त्या चाकोऱ्यांमध्ये तो विचार व्यवस्थित बसविणे. सुदैवाने प्रौढांनाही त्यांच्या सर्जनशील क्षमतेशी पुन्हा जोडण्यासाठी प्रशिक्षण देता येते.

शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे, आपली जीवन स्थिती सुधारण्यासाठी जेव्हा लोक आत्म नियंत्रित (स्व:नियंत्रित केलेले जीवन) आणि नैसर्गिक गुणांचा वापर करतात तेव्हा ‘मी ते करू शकतो’ अशी मानसिकता असणे गरजेचे आहे. पण एखादी व्यक्ती बाह्य नियंत्रित असते.  जेव्हा एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी, आपल्या बाहेरील घटकांचा वापर होतो तेव्हा ती व्यक्ती बाह्य नियंत्रित असते.  ज्यावेळी कारण आणि परिणाम संबंधाच्या जाणिवेबाबत आत्म नियंत्रण बोलते, त्यातून आपल्याला हव्या असलेल्या परिणामांना आपण स्वयं-निर्देशित करतो आणि ते घडवून आणतो.   एखाद्या व्यक्तीच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्याचे काम आत्म नियंत्रण करते.

भविष्याकरिता अनुकूल होण्यासाठी युवा वर्गाला जे शिखर पादाक्रांत करणे आवश्यक आहे ते फार उंच आहे. Illustration: Malte Mueller/Getty

वरील नमूद क्षमता या आपल्या सुरक्षित कोशाबाहेरच्या जीवन अनुभवातूनच प्राप्त होतात. तसेच आपल्या वर्तमान क्षमतांपेक्षा मोठी आव्हाने आम्हाला ताण देतात आणि तसे करून आमची न्यूरोलॉजी विकसित करीत असतात. प्रकल्प आधारित शिक्षण, इंटर्नशिप, कामाचा अनुभव, प्रेरणादायी घर आणि कार्यालयीन वातावरण या बाबी येथे अत्यावश्यक आहेत आणि काहीजणांसाठी त्या पुरेशाही आहेत. खासकरून व्यक्तिगत विकासाला चालना देण्यासाठी सुरक्षित कोशाच्या बाहेर काढण्याच्या कलेत समर्पित असणारे व्यवस्थापक किंवा मार्गदर्शक ज्यांना लाभले आहेत त्यांच्यासाठी तरी आवश्यक आहेतच.

तथापि, हे जीवन अनुभवाचे अंतर तर कामाच्या अनुभवाच्या पलीकडचे आहे. पण जो युवा वर्ग अनेक दशके आपल्या मातापित्यांसोबत डिनर टेबलवर बसून त्यांचे अनुभव ऐकण्याचा आणि शिकण्याचा लाभ घेऊ शकलेला नाही,  कोणाच्याही छत्रछायेचा लाभ घेऊ शकलेला नाही आणि हे जग कसे समजून घेता येईल याची माहिती देणाऱ्या चर्चामध्ये ज्यांना प्रवेश मिळलेला नाही, तसेच एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याच्यासमोर आपले काम आणि आचरण यांचा आदर्श निर्माण करण्याचा लाभ ज्यांना मिळालेला नाही, अशा युवा वर्गाबाबत काय ? हा प्रश्न आहे. भविष्याकरिता अनुकूल होण्यासाठी युवा वर्गाला जे शिखर पादाक्रांत करणे आवश्यक आहे ते फार उंच आहे.

परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित करण्याचा मार्ग जेव्हा सखोल अनुभवाच्या आवश्यकतेवर भर देतो, तेव्हा  एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण प्रगतीवर आधारित योग्य दर्जाचे अनुभव सातत्याने पुरवेल, अशाप्रकारे  मोठ्या प्रमाणात सखोल व परिवर्तनवादी शिक्षण अनुभव आपण कसे निर्माण करणार आहोत? त्यासाठी आपल्याला  व्हर्च्युअल रिअलिटी आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सचा विचार करावा लागेल. कृत्रिमरीत्या तयार केलेल्या अनुभवांचे व्यासपीठ तयार करण्याची संधी आम्हाला व्हर्च्युअल रिऍलिटी आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञान उपलब्ध देते. या तंत्रज्ञानाने त्या अनुभवांचा वापर एकाचवेळी लाखो लोक करू शकतात.

विषय निर्माण करण्यापासून सखोल अनुभवापर्यन्त नेण्यासाठी मार्ग ते उपलब्ध करून देते, तो अनुभव  (भौतिक दृष्ट्या) खरा नसेलही कदाचित पण त्यामुळे बहुतांशी अत्यावश्यक शिक्षण त्याद्वारे मिळू शकते. उदाहरणार्थ, कॉम्प्युटर निर्मित मानवासोबत अनेक सराव अनुभव घेऊन मुलाखत देण्यासाठी तरुण वर्ग तयारी करत आहेत, अशी कल्पना करा. किंवा एखाद्याला आढळून येईल कि, अगदी कार्यालयात असते तशीच बैठक कृत्रिमरीत्या भरवून त्याद्वारे संवाद आणि दृढनिश्चति कौशल्य विकसित केली जात आहेत.

खऱ्या ग्राहकाप्रमाणेच, प्रतिसाद आणि प्रतिक्रिया देणाऱ्या कृत्रिमरीत्या निर्माण केलेल्या ग्राहकासोबत काम सुरु आहे आणि प्रकल्प हाताळला जात आहे. किंवा विशेष तांत्रिक कौशल्याचा अभ्यास सुरु आहे, अशीही कल्पना करू शकता. युवा वर्गासाठी आवश्यक असणारी कौशल्ये देताना, आर्टिफिशल एइंटेलिजन्स आणि व्हर्चुअल रिऍलिटी साधनांच्या वापरामध्ये महत्वपूर्ण गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे युवा वर्गाच्या बुद्धीला विकसित करण्यासाठी आवश्यक ते प्रोत्साहन देणारे कृत्रिमरित्या अनुभव ते तयार करू शकतील.

आपण माणूस असण्याचा अर्थ काय, हा प्रश्न उपस्थित करून चौथी औद्योगिक क्रांती (4IR) आपल्याला आव्हान देत आहे. त्यासाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञान हे आपल्याला उपयुक्त ठरेल आणि मानवतेच्या भवितव्याला त्याची बाधा होणार यांची खात्री करण्यासाठी आपण आत्ताच कारवाई करू शकतो.  आपल्या परस्पर हितसंबंधांचे पालन करणारे जग निर्माण करण्यासाठी आम्ही या साधनांचा किती चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो आणि आमची कल्पनाशक्ती या येथील मर्यादा आहेत. तर एआय हे तंत्रज्ञान अडथळा ठरण्याऐवजी अधिकाधिक रोजगार संधी निर्माण करील असा अंदाज एका नव्याने झालेल्या संशोधनाने स्पष्ट केला आहे.

भविष्य काय असेल, याची  कल्पना नसली, तरी जे नुकसान झाले ते समजून घेणे सोपे आहे. मानवी कल्पनाशक्तीची मर्यादा असणे, याचा अर्थ नवीन संधी असणारच नाही असा होत नाही. आपल्याकडे जे खरोखरच चांगले आहे त्याकडे आमची ऊर्जा वळविण्यासाठी, ही नवी चौथी औद्योगिक क्रांतीसुद्धा आधीच्या क्रांतीप्रमाणेच माणसाला उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित करेल, असा विश्वास आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.