Author : Sauradeep Bag

Published on Oct 20, 2023 Commentaries 0 Hours ago

देशामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांवर डिजिटल चलन हा जादुई उपाय असू शकत नाही.

आर्थिक आव्हानांवर डिजिटल चलन उपाय असू शकतो का?

सीबीडीसी (CBDCs) ही नवीन संकल्पना नसली तरी अलिकडच्या वर्षांत त्यांच्या संभाव्य फायद्यांनी जगभराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. केंद्रीय बँकांद्वारे जारी केलेल्या रोखीच्या या नियंत्रित डिजिटल होत्या. पारंपारिक क्रिप्टोकरन्सी पेक्षा सुरक्षितता, स्थिरता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी पूरक आहेत. त्याबरोबरच केंद्रीय बँक डिजिटल चलन (CBDCs) वाढविण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे वित्त आणि तंत्रज्ञानामध्ये लक्षणीय प्रगती दिसत आहे.

CBDCs चा प्रवास 1993 पासून सुरु होतो. त्यावेळी बँक ऑफ फिनलँडने जगातील पहिले CBDC मानले जाणारे स्मार्ट कार्ड सादर केले होते. अलीकडच्या काळामध्ये बँकेने अखेरीस ही प्रणाली बंद केली असली तरी सुद्धा डिजिटल चलनांच्या भविष्यातील प्रगतीचा पायाच यावेळी घातला गेला होता. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आपण पाहतो. आज तांत्रिक प्रगती आणि भौतिक रोखीचा कमी होत चाललेला वापर जगभरातील मध्यवर्ती बँका पेमेंट सिस्टीमची कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी CBDC सक्रियपणे संशोधन करत आहेत. CBDC चे असंख्य संभाव्य फायदे असूनही, मध्यवर्ती बँकांनी त्याच्या मागणीचे काळजीपूर्वक मूल्यमापन केले पाहिजे. डिजिटल चलन मुख्य प्रवाहात आणण्यापूर्वी त्यांच्या अंमलबजावणीसाठी एक सुनियोजित यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे.

देश आणि मध्यवर्ती बँकांनी प्रथम ही मूलभूत गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गुंतवणूक आणि संसाधन वाटपाद्वारे संशोधन विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे.

CBDC संदर्भातील उपाय

CBDCs चे असंख्य फायदे दिसत असले तरी सुद्धा थोडीशी शंका आल्यास ती ओळखणे महत्त्वाचे आहे. चलनाच्या डिजिटल स्वरूपातील संक्रमण आपोआप विद्यमान आर्थिक समस्यांचे निराकरण करत नाही. CBDCs संभाव्य उपायांची विस्तृत श्रेणी सादर करत असताना त्याच्याकडे एक विशिष्ट आकार आणि उपाय म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. देश आणि मध्यवर्ती बँकांनी प्रथम ही मूलभूत गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गुंतवणूक आणि संसाधन वाटपाद्वारे संशोधन विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे. CBDC कोणती विशिष्ट आव्हाने प्रभावीपणे हाताळू शकतात, त्यांची रचना, संभाव्य फायदे आणि मर्यादा यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. त्याबरोबरच त्याचे विश्लेषण देखील करायला हवे. असा दृष्टिकोन बाळगल्यास देश आणि केंद्रीय बँकांना त्यांच्या अवास्तव अपेक्षा टाळून CBDCची खरी परिवर्तनशील शक्ती वापरण्यास सक्षम करणार आहे.

डिजिटल मर्यादा

चलनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि व्यवहार सुलभ करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ झिंबाब्वे देणे सोन्याचे समर्थन असलेले डिजिटल चलन सुरू केले आहे. राष्ट्रीय चलनाच्या घसरणीदरम्यान मूल्याचे भांडार उपलब्ध करून देताना पीअर-टू-पीअर आणि पीअर-टू-बिझनेस व्यवहार सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तथापि या सोन्याचे समर्थन असलेल्या या डिजिटल चलनाचे स्वागत झाले आहे. अतिरिक्त तरलता शोषून घेण्यासाठी सोन्याचे समर्थन संभाव्य पणे स्थानिक चलनाला सापेक्ष स्थिरता देऊ शकत आहे. तरीही झिंबाब्वे प्रजासत्ताक मध्ये खोलवर रुजलेल्या चलन समस्यांना तोंड देण्यास ते अपयशी ठरलेले दिसत आहे. अशा चलनांचा परिचय करून देत असताना ते बहुदा श्रीमंतांपुरता मर्यादित आहेत असे समजले जाते त्यामुळे गरिबीत अडकलेल्या सामान्य नागरिकांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केले जाते.

झिम्बाब्वेचे माजी अर्थमंत्री तेंडाई बिटी यांनी पर्यायी दृष्टिकोन सुचवला त्यांनी केंद्रीय बँकेला झिंबाब्वेमध्ये डॉलरला मुक्तपणे वापरता येण्याची परवानगी देऊन बाजारातील स्थिरता प्रस्थापित करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

हायपरइन्फ्लेशनचा इतिहास, यूएस डॉलर आणि झिम्बाब्वे डॉलर सारख्या अनेक चलनांवर अवलंबून राहिल्यामुळे या राष्ट्रासमोर मूलभूत आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत त्यांना केवळ डिजिटल चलनाची ओळख करून देणे पुरेसे होणार नाही. झिम्बाब्वेने 2009 मध्ये यूएस डॉलर स्वीकारला आणि नंतर त्याचे चलन स्थिर करण्यासाठी बाँड नोट्स सादर केल्या. दुर्दैवाने हे उपाय देखील प्रमुख चलनांच्या तुलनेत झिम्बाब्वे डॉलरचे वेगवान अवमूल्यन थांबविण्यात अपयशी ठरले आहे. अशाप्रकारे CBDC ची ओळख केवळ एका मोठ्या रणनीतीचा एक भाग असू शकते ज्याचे उद्दीष्ट पुन्हा डॉलरीकरण करण्याकडे सुरू झाले आहे.

झिम्बाब्वेचे माजी अर्थमंत्री तेंडाई बिटी यांनी पर्यायी दृष्टिकोन सुचवला त्यांनी केंद्रीय बँकेला झिंबाब्वेमध्ये डॉलरला मुक्तपणे वापरता येण्याची परवानगी देऊन बाजारातील स्थिरता प्रस्थापित करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. हा दृष्टीकोन केवळ डिजिटल चलनांच्या परिचयाच्या पलीकडे जाऊन झिम्बाब्वेच्या आर्थिक आणि सामाजिक गुंतागुंतांना संबोधित करणार्‍या सर्वसमावेशक उपायांची गरज हायलाइट करतो.

भुसभुशीत जमिनीवरील इमारत

2021 मध्ये नायजेरिया सरकार समर्थित डिजिटल चलन eNaira स्वीकारण्यात आले मात्र ते अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. त्याबरोबरच देशातील डिजिटल चलन वापरकर्त्यांना त्याच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. लोकसंख्येच्या 0.5 टक्के पेक्षा कमी दर, 1.15 दशलक्ष पेक्षा कमी नायजेरियन eNaira कोणताही महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरले आहे. त्याच्या मर्यादित यशासाठी अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. Bitcoin सारख्या अधिक अत्याधुनिक आणि अनुकूलनीय क्रिप्टोकरन्सीच्या तुलनेत eNaira मध्ये कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकतेचा अभाव असल्याचे समजले जाते. शिवाय त्याच्या केंद्रीकृत सरकारच्या नेतृत्वाखालील स्वभावामुळे लोकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. ज्यामुळे लोकांना त्यांची आर्थिक माहिती कार्यांना सांगण्याची चिंता वाटत आहे.

दुसरीकडे नायजेरिया मधील लोकांमध्ये क्रिप्टोकरेंसीची लोकप्रियता त्यांच्या चलनवाढीपासून संरक्षण निर्माण करण्याची क्षमता आणि स्थानिक चलनाचे अवमूल्य आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरील प्रतिबंधात्मक नियमामुळे मागे पडल्याचे दिसत आहे. या देशातील तरुणांसाठी क्रिप्टोकरन्सी वापरकर्त्याचा एक महत्त्वाचा भाग eNaira त्यांच्या विद्यमान बँकिंग एप्लीकेशन मधून स्विच करण्यासाठी आकर्षित करण्यास अयशस्वी ठरली आहे. कारण ती उल्लेखनीय फायद्यांशिवाय समान सेवा प्रदान करते. याव्यतिरिक्त ग्रामीण भागात मर्यादित इंटरनेट प्रवेशामुळे eNaira च्या व्यापक अडथळा निर्माण झाला आहे.

डिजिटल लिराचा पाठपुरावा तुर्कीच्या फियाट चलनाचे महत्त्वपूर्ण अवमूल्यन लक्षात घेऊन तुर्की नागरिकांना बिटकॉइन सारख्या पर्यायी डिजिटल मालमत्तांमध्ये स्वारस्य दाखवण्यास प्रवृत्त केले आहे.

प्रारंभिक स्वारस्य असूनही eNaira चा वापर प्रामुख्याने सरकारच्या नेतृत्वाखालील फक्त काही कुटुंबे आणि व्यापारी प्लॅटफॉर्म, सामाजिक कल्याण कार्यक्रमांपुरता मर्यादित राहिला आहे. व्यवहार मूल्यांची क्षुल्लकता नायजेरियामध्ये व्यापक स्वीकृती मिळविण्यासाठी eNaira समोरील आव्हानांवर प्रकाश टाकत आला आहे. तुर्की देखील हळूहळू अशाच समस्येकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेने अलीकडेच डिजिटल लिरासाठी प्रारंभिक चाचण्या पूर्ण झाल्याचे घोषित केले आहे .डिजिटल लिराचा पाठपुरावा तुर्कीच्या फियाट चलनाचे महत्त्वपूर्ण अवमूल्यन लक्षात घेऊन तुर्की नागरिकांना बिटकॉइन सारख्या पर्यायी डिजिटल मालमत्तांमध्ये स्वारस्य दाखवण्यास प्रवृत्त केले. तरीही, डिजिटल लिरा राष्ट्रासमोरील मूलभूत आर्थिक अडथळ्यांना प्रभावीपणे तोंड देऊ शकेल की नाही याबद्दल शंका कायम आहे.

मूलभूत गोष्टींकडे परत

अलीकडच्या काळात जगामध्ये डिजिटल चलनांचे आकर्षण वाढत आहे. मध्यवर्ती बँका बँडवॅगनमध्ये सामील होत आहेत. केवळ डिजिटल दृष्टीकोन अवलंबणे हा रामबाण उपाय ठरणार नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. उलट ते नवीन आव्हानांना जन्म देऊ शकते. राजकीय स्थिरता, मजबूत संस्था आणि सुदृढ समष्टि आर्थिक धोरणे असलेल्या देशांमध्ये CBDCs सादर करणे अधिक सहज आणि सोपे होऊ शकते. या अत्यावश्यक अटींशिवाय डिजिटल चलनांची आश्वासने अपूर्ण राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबरोबरच पायाभूत सुविधा देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. परवडणारे इंटरनेट हे अशा तांत्रिक प्रगतीसाठी आधारस्तंभ मानले गेले आहेत.

कमी व्यवहार खर्च वाढीव कार्यक्षमतेच्या दृष्टीने स्थिरता आणि संभाव्य फायदे सांगून डिजिटल रुपयाचे उद्दिष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. भौतिक चलनी नोटांच्या तुलनेत डिजिटल गतिशीलता प्रदान करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल चलनाच्या लँडस्केपमध्ये भारताचे स्थान पुढे नेण्यासाठी 2022 मध्ये डिजिटल रुपया सादर केला. कमी व्यवहार खर्च वाढीव कार्यक्षमतेच्या दृष्टीने स्थिरता आणि संभाव्य फायदे सांगून डिजिटल रुपयाचे उद्दिष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. भौतिक चलनी नोटांच्या तुलनेत डिजिटल गतिशीलता प्रदान करणे महत्त्वाचे ठरणार आहे. तथापि, UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) सारख्या मजबूत पेमेंट सिस्टमच्या अस्तित्वामुळे CBDCs सध्याच्या विस्तारामध्ये सुधारणा करू शकतात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. उदयोन्मुख राष्ट्रांनी हे समजून घेतले पाहिजे की विकसित देशांचे महत्त्वपूर्ण फायदे आहेत आणि त्यांचे निराकरण सर्वत्र लागू होऊ शकत नाही. डिजिटल चलने स्वीकारण्यापूर्वी मध्यवर्ती बँकांना त्यांच्या देशाच्या पूर्वतयारींची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. डिजिटल चलनामध्ये प्रचंड क्षमता असली तरी, त्यासाठी मूलभूत ब्लॉक्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. भक्कम आर्थिक धोरणे, डिजिटल साक्षरता, उद्योजक आणि व्यवसायांना सहाय्य करणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कारण केवळ डिजिटल चलन देशाच्या आर्थिक आव्हानांवर जादूचा उपाय असू शकत नाही.

सौरदीप बाग हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे असोसिएट फेलो आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.