Published on Nov 18, 2023 Commentaries 0 Hours ago

तेलाच्या किमतींमध्ये दिसणाऱ्या चढ-उतारातून आर्थिक परिवर्तनाचे एक रंजक उदाहरण तयार होते- जरी आपल्याला ते समजले तरी, त्याचा अंदाज लावण्यास आपण पूर्णपणे अक्षम आहोत.

कच्च्या तेलाच्या किमतीचे अंदाज चुकीचेच अधिक

गेल्या ५० वर्षांत, कच्च्या तेलापेक्षा इतर कोणत्याच ऊर्जा संसाधनाने अधिक लक्ष वेधले नाही की दर वाढीचे अंदाज निर्माण केले नाहीत. १९७० सालच्या ‘तेलाच्या धक्क्या’नंतर, भविष्यात तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा जवळपास सार्वत्रिक होती. यामुळे आखाती प्रदेशातील श्रीमंत तेल उत्पादक, जगातील अदलाबदल करता येईल, अशा संपत्तीचा ताबा घेतील असे कथन निर्माण झाले. उत्तर समुद्रासारख्या उच्च दर असलेल्या प्रदेशातून पुरवठा वाढल्यानंतर १९८० च्या दशकात तेलाची किंमत प्रति बॅरल १० अमेरिकी डॉलर्सच्या खाली गेली, तेव्हा हे भाकीत खोटे ठरले. बाजारपेठेतील अतिरिक्त पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त झाला आणि परिणामी, किमती घसरल्या. १९८६ च्या या तेलाच्या किमतीच्या मोठ्या ‘काउंटर-शॉक’चा अर्थ असा आहे की, कच्च्या तेलाची चलनवाढीनुसार जी किंमत १९७३ मध्ये होती, तिथे ती परतली.

कच्च्या तेलाच्या किमतीतील प्रत्येक घसरणीनंतर, दर तुलनेने मोठी परंतु अल्प कालावधीसाठी उसळी घेतो. १९९० मध्ये कुवेतवर इराकने केलेल्या आक्रमणामुळे किमती प्रति बॅरल ३३ अमेरिकी डॉलर्सवर गेल्या होत्या, पण काही दिवसांतच प्रति बॅरल १० अमेरिकी डॉलर्सपेक्षा खाली घसरल्या. १९९४ मध्ये पुढील खोल खड्डा निर्माण झाला, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १३ अमेरिकी डॉलर्सपेक्षा खाली घसरल्या आणि त्यानंतर १९९६ मध्ये कच्चे तेल प्रति बॅरल २३ अमेरिकी डॉलर्सच्या वर पोहोचले. तेव्हापासून, आशियाई आर्थिक मंदीच्या बरोबरीने इराकमधून पुनरुज्जीवित उत्पादनामुळे, तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण झाली आहे.

१९९०-२०२०: मागणीतील अस्थिरता

किमती घसरत राहिल्याने, ‘दि इकॉनॉमिस्ट’ने फेब्रुवारी १९९९ मध्ये भाकीत केले की, तेलाच्या किमती प्रति बॅरल ५ अमेरिकी डॉलर्सपर्यंत घसरतील, पण वर्षाच्या अखेरीस, थंड उत्तरेकडील हिवाळा, मजबूत मागणी आणि कमी तेलाचा साठा यामुळे किमती झपाट्याने वाढू लागल्या आणि कच्च्या तेलाच्या किमती ‘दि इकॉनॉमिस्ट’ने व्यक्त केलेल्या अंदाजाच्या पाच पट झाल्या. चलनवाढीशी जुळल्या गेलेल्या अटींमध्ये, १९९०च्या दशकाच्या मध्यात कच्च्या तेलाची किंमत १९२०च्या दशकाइतकी कमी होती, जरी ती २००० मध्ये प्रति बॅरल २० अमेरिकी डॉलरच्या वर आणि लवकरच प्रति बॅरल ३० अमेरिकी डॉलर्सच्या वर गेली, तरीही ती सरासरी अंदाज व्यक्त केल्या गेलेल्या स्तरापेक्षा ती खूपच खाली राहिली. १९९० आणि २००० मधील तेलाच्या किमतींसाठी १९८३ च्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यशाळेत सहभागी झालेल्यांनी व्यक्त केलेले सर्वात पुराणमतवादी अंदाजदेखील प्रमाणाबाहेरील ठरले.

२००० सालासाठी तेलाच्या किमतीचे नऊ अंदाज सरासरी अमेरिकी डॉलर्स १८.४२बी (१९९४ डॉलर्स) चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. त्या वर्षाची सरासरी प्रति बॅरल २५.७७ अमेरिकी डॉलर्स होती, जी अंदाजांच्या सरासरीपेक्षा ४० टक्के जास्त होती. २००१ च्या सुरुवातीच्या महिन्यांत केलेल्या अंदाजानुसार, किमती वर्षाच्या उत्तरार्धात नव्या उच्चांकांना स्पर्श करतील, परंतु जागतिक आर्थिक मंदीच्या चिंतेने किमतीच्या कलावर अचानक बदल केला. ‘ओपेक’ने (ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज) उत्पादनात कपात करण्याचे ठरवले आणि तेलाची किंमत प्रति बॅरल २० अमेरिकी डॉलर्सच्या खाली स्थिरावली.

२००२ आणि २००८ मधील किमतीच्या वाढीने प्रति बॅरल १४७ अमेरिकी डॉलर्सला स्पर्श केला, ५०० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदली गेली, मागील कोणत्याही किमतीच्या वाढीपेक्षा ती कितीतरी अधिक होती आणि बहुतेक व्यावसायिक तेलाच्या किमतीचा अंदाज करणाऱ्यांनी त्याचा अंदाज लावला नव्हता. चीनकडून आणि त्याहून जरा कमी प्रमाणात भारताकडून ऊर्जा आणि इतर वस्तूंच्या मागणीत झालेल्या वाढीचा कोणीच अंदाज वर्तवला नव्हता, त्यामुळे हे घडले. २००९ मध्ये, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने तेलाच्या किमती- २००८ च्या प्रति बॅरल ९७ अमेरिकी डॉलर्सच्या पातळीवरून, २००९ मध्ये किमती- प्रति बॅरल ६० अमेरिकी डॉलर्सपर्यंत घसरण्याची अपेक्षा केली होती, त्यानंतर २०२० पर्यंत प्रति बॅरल किमती- १०० अमेरिकी डॉलर्सपर्यंत आणि प्रति बॅरल ११५ अमेरिकी डॉलर्सपर्यंत परततील अशी अपेक्षा होती. २०३० (२००८ डॉलरमध्ये). विकसनशील देशांमधील मागणी वाढ अव्याहतपणे सुरू राहील, या गृहितकावर हे अंदाज आधारित होते.

२०१४ च्या मध्यापासून- २०१६ च्या सुरुवातीच्या काळात, तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल १०० अमेरिकी डॉलर्सपासून- प्रति बॅरल ५० अमेरिकी डॉलर्सपेक्षाही कमी अशी आधुनिक इतिहासातील सर्वात खोल घसरण नोंदवली. दरातील ७० टक्के घसरण ही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या तीन सर्वात मोठ्या घसरणींपैकी एक होती आणि १९८६ च्या पुरवठा-चालित पतनानंतरची सर्वात जास्त काळ टिकणारी होती. २०१९ पर्यंत, तेलाच्या किमती प्रति बॅरल ५० अमेरिकी डॉलर्सच्या आसपास होत्या आणि २०२० मध्ये कोविड साथीशी संबंधित आर्थिक मंदीमुळे प्रति बॅरल ४० अमेरिकी डॉलर्सपेक्षा कमी झाल्या. २०२२ मध्ये कोविड साथीमुळे ब्रेंटच्या किमती प्रति बॅरल १०० अमेरिकी डॉलर्सच्या वर गेल्यानंतर आर्थिक पुनरुज्जीवन झाले. बहुतांश संस्थांनी २०२३ मधील घडामोडींच्या आधारे २०२४ साठी त्यांच्या तेलाच्या किमतीच्या अंदाजात वरच्या दिशेने सुधारणा केल्या आहेत. २०२४ मध्ये ब्रेंटची अंदाजित किंमत प्रति बॅरल ७० अमेरिकी डॉलर्स ते प्रति बॅरल ९५ अमेरिकी डॉलर्सपर्यंत आहे. तेलाच्या किमतीचा अंदाज आता मानवी बुद्धिमत्तेच्या वापरापासून बहुतांश मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराकडे जात आहे. यातील कुठले श्रेष्ठ याबाबत निष्कर्ष काढणे खूप घाईचे ठरेल.

वादाचे मुद्दे

दीर्घकालीन अंदाजाच्या दोन सामान्य त्रुटी म्हणजे वेळेचा कालावधी आणि झुंड प्रवृत्ती. कालावधीमुळे सद्य तेलाच्या किमतींवर आधारित अंदाज वर्तवले जातात आणि गर्भित निष्कर्ष असा आहे की, सद्य तेलाच्या किमती भविष्यातील तेलाच्या किमतींचा सर्वोत्तम अंदाज आहेत. ‘फ्युचर्स’ करारातील (दोन पक्षांमधील करार ज्यामध्ये दोन्ही पक्ष विशिष्ट मालमत्तेची खरेदी आणि विक्री भविष्यात ठरलेल्या तारखेला, पूर्वनिर्धारित किमतीवर करण्यास सहमत असणे) तेलाची किंमतही भविष्यातील किमतींचा अप्रभावी अंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. व्यवहारात, ‘फ्युचर्स’च्या किमती आणि सद्य बाजारपेठेच्या किमतींमध्ये फरक असल्याचे आढळून आले असले तरी, फरक सहसा कमी असतो. जेव्हा नवीन माहितीमुळे सद्य बाजारपेठेच्या किमती हलतात, तेव्हा ‘फ्युचर्स’च्या किमती प्रत्येक वेळी त्याच दिशेने जातात. यावरून असा अनावश्यक निष्कर्ष निघतो की, वर्तमानातील किंमत ही भविष्यातील किमतींचा सर्वोत्तम अंदाज आहे. कळप प्रवृत्तीचा अनेकांवर तात्काळ अनुभव आणि प्रबळ अपेक्षांवर आधारित अंदाज व्यक्त करण्याबाबत प्रभाव पडतो. गेल्या पाच दशकांच्या पहिल्या सहामाहीत, भौगोलिक राजकारण आणि तेलाच्या चढ्या किमतीच्या अपेक्षांनी किमतीच्या अंदाजांवर प्रभाव टाकला. दुसऱ्या सहामाहीत, मागणी आणि पुरवठा वाढीच्या अपेक्षांनी किमतीच्या अंदाजांवर परिणाम केला.

भविष्यातील किमतींचा अंदाज लावण्यात ‘रिटर्न टू स्टोरेज’वरील सिद्धांतही अपुरे ठरले आहेत. सिद्धांतानुसार, आजची किंमत ही आजचा पुरवठा आणि मागणी यांवर अवलंबून असते आणि उद्याची किंमत ही उद्याची मागणी आणि पुरवठा यांवर अवलंबून असते. त्याच वेळी, साठवणुकीच्या खर्चाद्वारे आजची किंमत उद्याच्या किमतीशी जोडली जाते; आणि आजचा पुरवठा हा उद्याच्या पुरवठ्यानुसार किती साठवायचा आणि आजपासून उद्यापर्यंत किती हलवायचा, या निर्णयाशी जोडला जातो.

जर आपण असे गृहीत धरले की, ‘ओपेक’मधील पुरवठा कपात किंवा चीनमधील मागणीत वाढ किंवा स्वस्त तेलाचा पुरवठा कमी होणे असे काही होत नाही, तर कच्च्या तेलाची किंमत ही अंकात्मक वेळ मालिकेची आकडेवारी म्हणून पाहिली जाऊ शकते, ज्यावर सांख्यिकी अंदाज पद्धती वापरल्या जाऊ शकतात. साधारणपणे असे समजले जाते की, जर आपल्याला एखादी गोष्ट समजली तर पुढे काय होईल याचा अंदाज बांधता यायला हवा. परंतु तेलाच्या किमती हे आर्थिक परिवर्तनाचे एक रंजक उदाहरण आहे, ते जर आपल्याला समजले तर आपण अजिबात अंदाज लावू शकत नाही.

Source: Statistical Review of World Energy 2023

लीडिया पॉवेल ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’च्या प्रतिष्ठित फेलो आहेत.

अखिलेश सती ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे कार्यक्रम व्यवस्थापक आहेत.

विनोद कुमार तोमर ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’मध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Vinod Kumar Tomar

Vinod Kumar Tomar

Vinod Kumar, Assistant Manager, Energy and Climate Change Content Development of the Energy News Monitor Energy and Climate Change. Member of the Energy News Monitor production ...

Read More +
Akhilesh Sati

Akhilesh Sati

Akhilesh Sati is a Programme Manager working under ORFs Energy Initiative for more than fifteen years. With Statistics as academic background his core area of ...

Read More +
Lydia Powell

Lydia Powell

Ms Powell has been with the ORF Centre for Resources Management for over eight years working on policy issues in Energy and Climate Change. Her ...

Read More +