Author : Nilanjan Ghosh

Published on Mar 09, 2021 Commentaries 0 Hours ago

जंगलापासून मिळणाऱ्या फायद्याचे संपूर्ण मूल्यांकन करताना एकूण बायोमासचा विचार करणे आवश्यक असून, एकूणच नैसर्गिक भांडवलाच्या मूल्यांकनात सुधार करणे गरजेचे आहे.

निसर्गाचे मूल्य ठरवताना…

पर्यावरणविषयक अभ्यासातील एका तांत्रिक, पण मूलभूत समस्येकडे जरा उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा हा प्रयत्न आहे. आजघडीला पर्यावरणविषयक फायद्याचे मूल्यांकन हे नैसर्गिक भांडवलाच्या मूल्यमापनाचा मुख्य आधार आहे, मात्र काही वैज्ञानिक प्रकाशनांमधील याबाबतचा समज असमाधानकारक असल्याचे दिसून येते. हे एकंदरीत धोरणांवरही परिणाम करते, कारण बहुतेकदा अशा प्रकारच्या मूल्यांकन यंत्रणेचा वापर तंत्रातील नुकसान भरपाईसाठी केला जातो.

अलीकडे, हे अधिक स्पष्ट झाले आहे की, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन रोखणे (कार्बन स्टॉक) आणि वातावरणातून दीर्घ काळासाठी कार्बन डायऑक्साइड नष्ट करणे (कार्बन सीक्वेस्ट्रॅशन) याकडे पर्यावरणविषयक सेवा म्हणून पाहणे ही एक वैचारिक समस्या आहे. सामान्यत: आणि विशेषत: कार्बनडायऑक्साइडचे उत्सर्जन कैद करण्याचे (कार्बन स्टॉक) आणि वातावरणातून दीर्घ काळासाठी कार्बन डायऑक्साइड नष्ट करण्याचे (कार्बन सीक्वेस्ट्रॅशन) मूल्य, या पर्यावरणविषयक सेवांचे मूल्यांकन करण्यासंदर्भातील विद्यमान साहित्यसंपदेत ही समस्या अत्यंत प्रचलित आहे.

मूळ समस्या खरे तर अशी आहे की, पर्यावरणासंबंधी सेवांविषयीच्या कल्पना बहुतेक वेळा नीट समजून घेतल्या जात नाही अथवा तिचा नीट अर्थ लावला जात नाही. पर्यावरणासंबंधी सेवा या परिसंस्थेतून मानवी समुदायाला मिळणार्‍या सेवा आहेत; मात्र, हे समजून घेणे आवश्यक आहे की, केवळ मानवी समाज आणि नैसर्गिक परिसंस्था यांतील संवादातूनच हे उद्भवते. त्या दृष्टीने, पर्यावरण सेवा ही ‘मानववंशशास्त्रीय’ संकल्पना आहे. ‘मिलेनियम इकोसिस्टम असेसमेंट २००५’मध्ये भविष्यकालीन संभाव्यतेचा विचार केलेल्या पर्यावरण सेवांच्या वर्गीकरणानुसार- जिथे पर्यावरण सेवा तरतुदी करणाऱ्या, नियमन करणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या आणि सांस्कृतिक आहेत- तिथे कार्बन शोषून घेणे ही परिसंस्थेची एक नियमित सेवा आहे.

पर्यावरण सेवांना बर्‍याचदा स्थिर आणि प्रवाही अशा रीतीने वर्गीकृत केले जाते. अर्थशास्त्रामध्ये आणि वित्त व्यवस्थेमध्ये ‘स्टॉक’ ही संकल्पना एखाद्या विशिष्ट वेळचे मालमत्तेचे मूल्य म्हणून परिभाषित केली जाते, तर ‘फ्लो’ म्हणजे व्यवहाराची एकूण किंमत होय; ज्यामध्ये विक्री आणि खरेदी, उत्पन्न, उत्पादन व त्या कालावधीतील वापर आणि गुंतवणूकीचा खर्च समाविष्ट असतो. साठ्यात पडलेली भर हीदेखील संबंधित कालावधीसाठी एक प्रवाह म्हणूनही मानली जाते.

उदाहरणार्थ- नवीन रस्ते, पूल किंवा इमारती यांसारख्या पायाभूत गुंतवणूकीद्वारे होणारी नवी भौतिक भांडवल निर्मिती. पर्यावरण सेवेच्या दृष्टिकोनातून, म्हणूनच स्थिर साठा याचा संदर्भ लावताना नैसर्गिक संसाधनांमध्ये साठलेल्या मूल्याचा संदर्भ घ्यावा; जो अद्याप लाभाच्या रूपात प्राप्त झालेला नाही, तर प्रवाहाचा लाभ पर्यावरणातील वस्तूंच्या आणि सेवांच्या वास्तविक प्रवाहाशी संबंधित आहे. अशा प्रकारे, साठा हा परिसंस्थेमधील संभाव्य आणि अवास्तविक लाभ असतो.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे, जंगलातील लाकूड साठा. जंगल अनेक तरतुदींच्या रूपात वेगवेगळ्या सेवा प्रदान करते- (उदाहरणार्थ- इमारत बांधणीसाठी उपयुक्त ठरणारे पडलेले लाकूड, इमारत बांधणीसाठीचे लाकूड नसलेली वन उत्पादने इत्यादी), नियमन (उदा. कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कैद करणे (कार्बन स्टॉक) आणि वातावरणातून दीर्घ काळासाठी कार्बन डायऑक्साइड नष्ट करणे (कार्बन सीक्वेस्ट्रॅशन)), सहाय्यकारी (उदा. जैविक नियंत्रण, जनुक-तलाव संरक्षण) आणि सांस्कृतिक (उदा. पर्यटन, अध्यात्मिक); इमारती लाकूड म्हणून ज्याचा वापर करता येतो,

अशा मुळे रोवून जमिनीवर उभ्या असलेल्या झाडांचा साठा हा मौल्यवान साठा आहे आणि झाड पडेपर्यंत मानवी फायद्याच्या कक्षेत ते प्रवेश करत नाही. म्हणूनच, एखाद्या विशिष्ट वर्षासाठी मानवी समुदायाद्वारे संपादन केलेले आर्थिक लाभ म्हणून पर्यावरण संदर्भातील सेवांना वार्षिक मूल्य प्रदान करताना आपण प्रवाहांचे मूल्यमापन करत आहोत. हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की, जरी प्रवाहाचे मूळ एका साठ्यात असले, तरी मानवी समुदायाचा किंवा अर्थव्यवस्थेचा लाभ हा नेहमीच प्रवाहाच्या स्वरूपात होतो, उदा. ‘नैसर्गिक भांडवल’ (जैवविविधता आणि नैसर्गिक मालमत्ता) हा एक स्थिर साठा आहे, जे आपल्याला पर्यावरणास सेवा असलेल्या लाभांचा प्रवाह प्रदान करते. म्हणून, पर्यावरण सेवा या स्थिर नसतात, तर प्रवाही असतात!

 कार्बन स्टॉकला पर्यावरण सेवा मानण्याचा मूर्खपणा

वन पर्यावरण सेवांच्या मूल्यांकनासंदर्भातील काही वैज्ञानिक अहवाल ‘कार्बन स्टॉक’ला म्हणजेच कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कैद होण्याचे मूल्यांकन- स्थिर असलेला लाभ असे करतात आणि ‘कार्बन स्टॉक’ला इमारत बांधणीच्या लाकूड साठ्यासारखे मानतात. त्यालाही परिसंस्थेचे स्थिर मूल्य प्राप्त व्हावे, याकरता ही जोडणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे समस्या निर्माण करणारे आहे!

नमूद केल्यानुसार, इमारत बांधणी लाकडाच्या साठ्याचे मूल्य- बाजारभावासह एकूण घनमीटर लाकूड उत्पादन- हे निश्चितपणे मूल्याचा साठा आहे, ज्याचा नंतर कधीतरी संभाव्य उपयोग होऊ शकतो. मात्र, ‘कार्बन स्टॉक’ हा मूल्यांचा साठा नसून त्यातून मूल्याच्या ओघवत्या प्रवाहाची तरतूद होते. वातावरणीय कार्बन डायऑक्साइड मानवतेसाठी लाभदायक (किंवा सेवा) नाही, परंतु मोजावी लागणारी किंमत (किंवा हानीकारक) आहे. वातावरणात वाढलेला कार्बन डायऑक्साइड हा जागतिक तापमानवाढीच्याच दृष्टिकोनातून हानीकारक आहे.

इतकेच नव्हे, तर वातावरणातील कार्बन डायऑक्साइडमुळे आरोग्यावरील खर्चाच्या दृष्टिकोनातून तसेच कमी उत्पादकता आणि जीडीपीवर नकारात्मक होणारा परिणाम अशा अनेक प्रकारे वाढीव खर्चाचा सामना करावा लागतो. म्हणून, ते मूल्य असू शकत नाही (कारण हे ‘चांगले’ नाही, जे जराही सकारात्मक व उपयुक्त ठरू शकत नाही), तर ते समाजावर लादल्या गेलेल्या किमतीशी संबंधित आहे.

जंगले कार्बन डायऑक्साईड वातावरणापासून काढून टाकणार्‍या प्रक्रियेत कार्बनला अलग करतात. प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे, कार्बनचे प्रमाण– कार्बन डायऑक्साइडच्या तुलनेत २७ टक्के इतके गृहित मानले जाते- ते जंगलाद्वारे साठवले जाते, तर उर्वरित ७३ टक्के, उदाहरणार्थ- ऑक्सिजनच्या रूपात वातावरणात सोडला जातो. हा कार्बन नंतर जंगलात राहणाऱ्या जैविक सैंद्रियांचा समूह (बायोमास), माती आणि कचऱ्याच्या रूपात जंगलात साठवला जातो आणि जंगलातील कार्बन स्टॉकचे म्हणजेच कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कैद करण्याच्या प्रक्रियेत योगदान देते. ही एक नियमितपणे होणारी प्रक्रिया आहे.

पर्यावरण सेवांच्या मूल्यांकनासंदर्भातील बहुतेक अभ्यासांमध्ये, हा विलग केलेला कार्बन आहे, जो संपूर्ण कार्बन साठा म्हणून नव्हे तर ओघवत्या प्रवाहातील लाभ, म्हणून विचारात घेतले जाते. आता येथे आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे, ती म्हणजे एकूण कार्बनचा साठा तसेच नव्याने विलग केलेला कार्बन हा एक प्रवाहित लाभ आहे! जंगलांमधून मुक्त केल्यास कार्बन स्टॉक आपल्याकरता ‘हानीकारक’ ठरेल. म्हणूनच, प्रत्येक क्षणी अथवा प्रत्येक वर्षी जंगल आपल्याला साठवलेल्या कार्बनचा तसेच विलग करण्यात आलेल्या कार्बनचा लाभ प्रदान करते, वातावरणात सोडलेल्या कार्बनने आपल्यावर लादलेली किंमत टाळायला आपल्याला मदत करते.

 कार्बनची सामाजिक किंमत

कार्बनच्या सामाजिक किमतीचे महत्त्व (सोशल कॉस्ट ऑफ कार्बन) या वस्तुस्थितीत आहे की, ते आर्थिकदृष्ट्या, एक अतिरिक्त टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करण्याच्या सर्व संभाव्य प्रमाणित खर्चावर थेट परिणाम करते. त्या दृष्टीने, खर्च कमी करण्याच्या पध्दतीच्या माध्यमातून, वातावरणात कमी प्रमाणात सोडलेल्या कार्बनच्या लाभावर हे मूल्य परिणाम करते. म्हणूनच, जंगल- ज्यात कार्बनला अटकाव होतो- हे मूल्य दर वर्षी मानवी समुदायासाठी नियमित सेवा प्रवाह म्हणून प्रस्तुत ठरते.

कार्बन वातावरणात सोडण्यास अटकाव करणारे जंगल प्रत्येक क्षणी एक नियामक जलाशय म्हणून काम करते; त्याद्वारे, समाजाला वातावरणातील कार्बनची किंमत मोजावी लागू नये, याकरता मदत करते. म्हणूनच, दर वर्षी जंगलात आधीपासून अटकाव केलेला कार्बनचा साठा आणि विलग केलेल्या कार्बनचे प्रमाण जे साठ्यात जोडले जाते, ते प्रवाहाचे लाभ प्रदान करतात.

दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, कार्बनचे नकारात्मक मूल्य दर वर्षी विद्यमान साठा टिकवून आणि विलग केलेल्या कार्बनद्वारे साठ्यात जोडले जाऊन सकारात्मक मूल्यामध्ये रूपांतरित होते. दोन्हीही पर्यावरण या सेवा प्रवाहाचे अपरिहार्य घटक आहेत. कांचन चोप्रा समिती अहवालातही हे मान्य करण्यात आले आहे. या समितीद्वारे वनजमिनीला बिगरवनजमिनीच्या वापरात रूपांतरित करण्यासाठी नेट प्रेझेंट व्हॅल्यू (एनपीव्ही)च्या अंदाजाचे सिद्धांत लागू करण्यात आले.

काही अहवाल आणि अभ्यास अनेकदा मूल्यमापनासाठी विचारात घेतात, त्यापेक्षा येथे, कार्बनची सामाजिक किंमत ही ‘कार्बन क्रेडिट’च्या (विशिष्ट प्रमाणात कार्बन उत्सर्जनाचे उत्पादन करण्यास मिळालेली अनुमती, जी पूर्ण न वापरली गेल्यास तिचा व्यापार केला जाऊ शकतो) बाजारभावापेक्षा चांगली किंमत यंत्रणा म्हणून उदयास येते. प्रमाणित उत्सर्जन कपात (सर्टिफाइड एमिशन रीडक्शन) अथवा सिद्ध झालेली उत्सर्जन कपात (व्हीईआर) या किमती बाजारातील चढ-उतारांच्या अधीन असतात.

२००७च्या आधी आर्थिक तेजीदरम्यान, सर्टिफाइड एमिशन रीडक्शन (सीईआर)च्या किमती शिगेला पोहोचल्या, परंतु अमेरिकेतील ‘सब-प्राइम’  (उच्च व्याजदर आणि खराब पतव्यवस्थेचा संदर्भ असलेले) संकट आणि युरोपीय युनियनमधील आर्थिक घसरणीनंतर ‘सीइआर’ने आपली गती पूर्णपणे गमावली. औद्योगिक उपक्रमांची गती मंदावल्याने, कार्बन क्रेडिटची मागणी घटली. परंतु याचा अर्थ असा होत नाही की, कार्बन उत्सर्जनापासून होणारी हानी कमी झाली आहे किंवा जंगलांद्वारे कार्बन विलगीकरणाच्या प्रति एककाची मूल्ये बदलली आहेत. बाजारपेठेतील किमती उत्तम माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे शोधल्या जातात आणि कार्बन बाजारपेठा या मोठ्या प्रमाणात अपूर्ण आणि सदोष असतात. म्हणूनच, जर एखाद्याला जंगलातील कार्बनकडे ‘अपॉर्च्युनिटी कॉस्ट’ म्हणून पाहण्याची आवश्यकता भासली, तर त्याकडे ‘कार्बनची सामाजिक किंमत’ यंत्रणा या अर्थाने पाहावे.

 जैविक सैंद्रियाचा संग्रह हा घटक आधार असावा

पुढे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, वन परिसंस्थेच्या सेवांच्या मूल्यांकनासाठी जैविक सैंद्रिय घटक विचारात घेणे आवश्यक ठरते, ज्यात कार्बन विलग करण्यासह कार्बन साठ्याच्या लाभांचा हिशेब ठेवणे महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे वनक्षेत्रातील ‘अपॉर्च्युनिटी कॉस्ट’ निश्चित करावी लागते. कार्बन साठ्यामध्ये सामान्यत: एकूण बायोमास असतो- भूमीवरील बायोमास आणि भूमीखालील बायोमास- ज्यात मृत लाकूड, कचरा आणि मातीतील सेंद्रिय कार्बन यांचा समावेश असतो.

साधारणपणे, वार्षिक मूल्यमापन करताना, वातावरणातून दीर्घ काळासाठी कार्बन डायऑक्साइड नष्ट करणे हा केवळ प्रवाह लाभ आहे, हे लक्षात घ्यावे लागते. मात्र, वार्षिक वन पर्यावरण सेवामूल्याकडे पाहण्याचा अधिक वैज्ञानिक मार्ग म्हणजे ‘अपॉर्च्युनिटी कॉस्ट’च्या दृष्टिकोनातून पाहणे. मृत लाकूड आणि कचरा सामान्यतः एकूण कार्बन साठ्याचा एक छोटा घटक (०.५ टक्क्यांपेक्षा कमी) असतो. जर काल्पनिकरित्या, ग्रहाच्या दर्शनीय भागातून जंगलाचा नाश केला गेला तर जे हरवून जाईल, त्यात वातावरणातून दीर्घ काळासाठी कार्बन डायऑक्साइड नष्ट करण्याच्या नव्या घटकासह एकूण बायोमास साठा नष्ट होईल.

जंगलाच्या नाशाने मातीतील सेंद्रिय कार्बनवर कुठला परिणाम होईल, हे सांगण्यासाठी नवा वैज्ञानिक पुरावा हाती आलेला नाही. म्हणूनच, कार्बन साठ्याचे नियमन सेवा म्हणून मूल्य ठरवण्याच्या बाबतीत, एखाद्याला भूमीवरील बायोमास (above-ground biomass AGB)  आणि भूमीतील बायोमास (below-ground biomass (BGB) या दोहोंची बेरीज विचारात घेणे आवश्यक आहे आणि त्याचा कार्बनच्या सामाजिक किमतीने समान गुणाकार करणे गरजेचे आहे.

 निष्कर्ष

वरील युक्तिवादांद्वारे पुढील विधाने प्रस्थापित करता येतील: अ)  सेवा हे प्रवाह आहेत, स्थिर नाहीत आणि कार्बन साठ्यामुळे प्रत्येक क्षणी लाभाचा प्रवाह होतो; ब) कार्बनची सामाजिक किंमत हा त्या लाभाचे मूल्यमापन करण्याचा आधार असावा; आणि क) कार्बन साठ्यापासून जंगलाच्या पर्यावरण सेवांचे संपूर्ण मूल्यांकन करताना एकूण बायोमासचा विचार करावा आणि मातीतील कार्बन वगळावे. या तीन वरील पैलूंसह, आपल्या नैसर्गिक भांडवलाच्या मूल्यांकन पद्धतीत सुधार करण्याची मोठी गरज आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Nilanjan Ghosh

Nilanjan Ghosh

Dr. Nilanjan Ghosh is a Director at the Observer Research Foundation (ORF), India. In that capacity, he heads two centres at the Foundation, namely, the ...

Read More +